निरोप - अंतिम

Submitted by सन्केत राजा on 11 January, 2016 - 08:59

नमस्कार मायबोलीकर... बर्याच दिवसांनी लेखनाचा प्रयत्न करतो आहे. या आधी निरोप या कथेचे 3 भाग टाकले पण नंतर मायबोलीचा परवली शब्द विसरल्यामुळे जमले नाही. आता राहिलेला भाग पोस्ट करतोय....
खरे तर शाळेला निरोप देताना मनाची स्थिती त्यावेळी जी झाली होती ती आता होणे शक्य नाही, पण कथा अपूर्ण ठेवणं मला आवडत नसल्याने हा भाग लिहून कथा पूर्ण करतो.

______________________________________________

" खरेच या मुलांच्या प्रेमाला तोड नाही. यांनी दिलेल्या भेटीपेक्षा मनातली भावना आणि यांचे शिक्षकेतर कर्मचार्यांवरील प्रेम खरंच खुप श्रेष्ठ आहे... मला अभिमान वाटतो की मुलांनी दिलेल्या शिकवणीच
पालन मनापासून केलं. याबद्दल सर्व शिक्षकांच्या वतीनं मी या सर्व मुलांचे कौतुक करतो तसेच येणार्या शालान्त परीक्षेमध्ये सर्वांना उज्ज्वल यश प्राप्त होवो अशी सदीच्छा व्यक्त करतो.............धन्यवाद!!
गहिवरून जाऊन मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर थांबले पण या वेळी कडकडाट तर सोडाच, साधी एक टाळीसुद्धा वाजली नाही. क्षणच तसे होते.., सगळी मुले एकजात चुप होउन ऐकत होती, शिक्षक बसलेले अन् दहावीचा वर्ग??? चेहर्यावर दुःखद भावना एकवटलेल्या होत्या सर्वांच्या.. ताटातूट.... दुरावा....मुश्कीलीने पुढे कधी झालीच तर नाहीतर न होणारी मित्रमैत्रिणींची भेट..... कशाचं दुःख करावं तेच कळत नव्हतं. त्यानंतरही काही जण बोलले, शुभेच्छा दिल्या व निरोप समारंभ संपला...
त्यानंतर मुले शिक्षकांचे आशीर्वाद घ्यायला लागली. एकेका शिक्षकासमोर वाकुन नमस्कार करत होती.. शिक्षक सुद्धा आजपर्यंत केलेल्या खोड्या विसरुन आम्हाला तोंड भरुन आशीर्वाद देत होते. मधेच एखाद्या नौटंकीवाल्याच्या पाठीवर थाप मारुन " मेल्या आता तरी सुधार" असे म्हणून त्याही परीस्थितीत हसवायचा प्रयत्न करत होते पण याक्षणी तरी आम्ही कोणीच हसत नव्हतो, उलट आणखीनच हुंदके देत होत्या मुली. काय प्रेम होतं ते?? आमच्यातील काहीजणांनी आपल्या उचापतींनी याच स्टाफला नाकीनऊ आणले होते. वेळोवेळी प्रसाद पण मिळाला होता, पण तरी नवीन खोड्या करण्यात कोणतीही कसर ठेवली नव्हती... आणि आज सगळ्या चुका माफ करुन आशीर्वाद पण मिळत होते.. खरंच धन्य ते शिक्षक आणि धन्य ती शाळा......
यात मी पण मागे नव्हतो. फरक ईतकाच होता की एक हुशार आणि चांगला मुलगा म्हणून मी सर्वांना माहीत होतो. त्यामुळेच प्रत्येक शिक्षकांचे चरणस्पर्श करताना मला पण हुंदके अनावर होत होते.. शेवटी माझे आवडते चव्हाण सर समोर आले... ईथे मात्र माझा संयम संपला व अक्षरशः त्यांच्या पायांवर कोसळून लहान मुलासारखा रडायला लागलो... सरांनी उठवून मला जवळ घेतले व प्रेमाने थोपटले.., मी पण अश्रु आवरुन पुन्हा नमस्कार केला व शाळेला अंतिम निरोप देउन बाहेर पडलो..........

शाळेने दिलेल्या ज्ञानाचा उपयोग करुन जगाच्या स्पर्धेत भरारी घेण्यासाठी......!!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users