Good Will Hunting हा १९९७मधील रॉबिन विल्यम्स आणि मॅट डॅमन यांचा अजरामर सिनेमा
.
अतिशय सामान्य परिस्थितीतल्या विलला (Will - मॅट) गणिताची उपजतच देणगी असते. अडचण एकच असते की तो ज्या परिस्थितीतून आला त्यातून आलेली एकूणच जगण्याबद्दलची, आयुष्यात प्रगती करण्याबद्दलची उदासिनता, चिडखोरपणा या गोष्टी त्याच्या प्रगतीतली धोंड बनलेल्या असतात.
त्यात त्याचा समुपदेशक म्हणून रॉबिन विल्यम्स यांची भूमिका तर फारच सुंदर.
हा सिनेमा जरूर पहा. उत्कृष्ट कथा, संवाद, अभिनय यामुळे तर हा सिनेमा नटलेला आहेच, पण यातील एका थोडे दुर्लक्ष होऊ शकेल अशा एका गोष्टीबद्दल मला बोलायचे आहे.
खालच्या स्तरातून वर येताना येणारी आव्हाने आपण विचारही करू शकणार नाही अशी भयंकर असतात. त्यांच्यावर आधीच्या हलाखीच्या परिस्थितीत असताना समाजातले काही घटक त्यांच्यावर अन्याय करत आहेत अशी त्यांची भावना झालेली असते. ती परिस्थिती बदलल्यावर मग समाजातील त्या घटकांबद्दल कटुता बाळगत, त्यांचा बदला घेण्याच्या भावनेने जगणारेच अधिक असतात. त्या परिस्थितीतून बाहेर येणे माझ्याच हातात होते, त्यातून वर येण्याचे कष्ट घेणे हे माझेच काम होते या भावनेने तेव्हा ती कटुता असलीच तरीही त्यातून बाहेर पडणारे फारच विरळा. अनेकदा त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एका मेंटॉर – मार्गदर्शकाची गरज पडते. अनेकांच्या यशोगाथेत त्यांना असे कोण रत्नपारखी भेटले याबद्दल आपण ऐकतो. मग ते शेजारी, नातेवाईक, शिक्षक यांच्यापैकी कोणी असतील किंवा आणखी कोणी.
मात्र हे जरी असले, तरी माझ्या मते एखाद्याला स्वत:च स्वत:चा उद्धार करून घ्यायचा असेल, तर त्यात येऊ शकणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्याची संगत, त्याचे मित्र. आता हेच पहा ना, ज्यांचे भवितव्य त्यांच्या आईवडलांवर अवलंबून नाही, असे मित्र एकमेकांच्या आधारानेच मोठे होतात, शेवटपर्यंत एकमेकांना धरून असतात. आपले काही भले होऊ शकणार नाही, आपण काही मोठे होऊ शकणार नाही, हीच भावना असते त्यांच्यात. अशा दुष्टचक्रात एखादा खरोखर गुणी असलेला मुलगा अडकला असेल, तर त्याची प्रगती होणे निव्वळ अशक्य. कारण त्या मित्रांना याचे गुण लक्षात आलेच, तरीही हा आपल्याबरोबर राहिला तर इथल्या विहिरीतला बेडुक होऊन राहील हे त्यांच्या लक्षात येण्याची शक्यता फारच कमी. उलट कोणी काही वेगळे करू पाहील, तर, ‘आला मोठा xxxx बनायला निघालाय’, असे म्हणून त्याची हेटाळणी होण्याचीच, त्याचे पाय ओढण्याचीच शक्यता अधिक.
या चित्रपटात मात्र विलचे मित्र त्याला त्यांची संगत सोडून जायला सांगतात. आम्ही आमचे आयुष्य असेच जगू. पण तू मात्र मोठा होऊ शकशील. चित्रपटात हा प्रसंग काही धाड-धाड बॅकग्राउंड म्युझिक लावून किंवा डोक्यावर मारलेला नाही. अतिशय सौम्यपणे दाखवलेला आहे.
एकूणच हा चित्रपट पाहिला नसेल तर जरूर पहा.
‘आला मोठा xxxx बनायला
‘आला मोठा xxxx बनायला निघालाय’ यात xxxx च्या जागी काय होतं..?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तुम्ही फार दीर्घ लिहिता
तुम्ही फार दीर्घ लिहिता बुवा...अता कुठे वाचण्याची मजा येत असते आणि तेवढ्यात लेख संपतो...असे करु नका हो !
बादवे
हा सिनेमा माझा शॉर्ट लिस्टेड आहे. पाहुअयात परत