अनेक लोक फ्री बेसिक्ससाठी आपला आवाज उठवतांना दिसत आहेत. तसे नोटीफिकेशन्स दर मिनिटाला, सेकंदाला येताहेत. जे लोक फ्री बेसिक साठीच्या मोहीमेवर क्लिक करून आपला आवाज ट्राय कडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आपण कशासाठी आवाज उठवला याची कल्पना आहे का ?
हा व्हिडीओ पहा.
https://www.facebook.com/marathimaticom/videos/10154065432884311/
नेट न्यूट्रॅलिटीला विरोध करणारी एक युक्ती मोदींच्या फेसबुकला भेट दिल्यावेळी मार्क झुकेरबर्गने केली होती. प्रोफाईलला तिरंग्याचं चित्रं लावलं की ट्राय कडे आम्ही इंटरनेट ओआरजी ला पाठिंबा देतो असा काहीतरी मेसेज जाण्ञाची व्यवस्था होती असं वाचनात आलेलं. काही उत्साही लोकांनी त्याचा प्रोग्रामही व्हायरल केला होता. त्याबद्दलचं खरं खोटं काय ते अद्याप कळालेलं नाही.
मात्र इंटरनेट ओआरजी हा रिलायन्स, फेसबुक आणि काही दिग्गज कंपन्यांचा उद्योग आहे, ज्या द्वारे इंटरनेटवर त्यांना आपला ताबा मिळवता येईल. सध्याच्या नेट न्यूट्रॅलिटीच्या कल्पनेमुळे त्यांच्या इराद्यांना तडा जातो. गेल्या वेळी प्रोफाईल प्रोग्राम प्रकरणी संताप व्यक्त झाल्यानंतर आता फ्री बेसिक्सची मोहीम सुरू आहे.
या वर क्लिक केल्यानंतर काय होतं ते वरील व्हिडीओत सांगितलेलं आहे. वेळ खूपच कमी असल्याने ट्रायकडे नेट न्यूट्रॅलिटीला सपोर्ट असणा-यांनी ऑथेन्टीक साईटवरून मेसेज पाठवायला काहीच हरकत नसावी. त्यात नुकसान काहीच नाही कारण मेसेज थेट ट्राय कडे जातो. मात्र वर दिलेल्या व्हिडीओत जो दावा केला आहे त्यामुळे फ्री बेसिक हे फेसबुकचं स्कॅम असून नेट न्यूट्रॅलिटीला सपोर्ट असणा-यांची फसवणूक होते आहे काय, खरं आणि काय खोटं हे तपासून त्यावर चर्चा व्हावी.
स्पॉक, सविस्तर खुलाश्यासाठी
स्पॉक, सविस्तर खुलाश्यासाठी धन्यवाद.
या धाग्याबद्दल धन्यवाद.
या धाग्याबद्दल धन्यवाद. आत्ताच ट्रायला इमेल पाठवला.
या धाग्याबद्दल धन्यवाद.
या धाग्याबद्दल धन्यवाद. आत्ताच ट्रायला इमेल पाठवला. >> मी पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मीपण केलीये मेल, पण मला हा
मीपण केलीये मेल,![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पण मला हा प्रकारच रुचत नाहीये. कोण त्याच्या बाजूने कोण याच्या बाजूने असे मेल पाडा, म जो जास्त तो जिंकला. मग त्यासाठी जाहिरातबाजी...
काय मुर्खपणा आहे
हे काय होतंय पाहूया पण झुक्या ने अजून काही असा धंदा करायचा प्रयत्न केल्यास त्याला बल्क मध्ये फेबु अकाऊंट डिलीट करून धडा शिकवायला हवा.
अनपढ समजतोय तो आपल्याला ..
कारण जर आपण हे असे नसते केले
कारण जर आपण हे असे नसते केले तर भारतातील सरकारी बांबुचा कामाचा इतिहास बघता त्यांनी त्यांना वाटेल तो अर्थ लावला असता आणि कंपन्यांना पाहिजे तो निकाल दिला असता.
मागच्या वेळेला आपण प्रचंड मताने आपली बाजु नोंदवल्यामुळे काहीतरी तरी फरक पडल्य ज्यामुळे त्यांना त्यावेळेलाच काही निर्णय घेता आला नाही. त्यात तेव्ह निवडणूकांचे वारे होते.
आत परत तोच प्रयत्न आहे.
हे असे जनतेकडुन मते मागवणे सर्व राज्य / केंद्रीय खात्यात सतत होत असते. पण या वेळेला याचा थेट दुष्पपरिणाम आपल्याला भोगायला लगणार असल्यमुळे आपण असे करत आहोत. इतर खात्यांच्या बाबतीत थेट दुष्पपरीणम दिसत नाहीत. खुप वेळ जावा लागतो. तसेच ते जेव्हा मत मागवतात तेव्हा त्या शाखेतले तज्ञ जबाबदार लोक (भारतातील) एवढी जागॄक नसतात की सामाजीक मोहीम चालू करतील.
पण यापुढे ते ही होईल सोशल मिडीयामुळे.
फर्स्ट पोस्ट आणि अन्य काही
फर्स्ट पोस्ट आणि अन्य काही ठिकाणी चालू असलेली चर्चा खाली देत आहे.
Zuckerberg’s Internet.org is unfair: Facebook founder’s pet project faces ire from Airtel, Vodafone
http://tech.firstpost.com/news-analysis/zuckerbergs-internet-org-is-unfa...
Why is internet.org bad?
https://www.reddit.com/r/india/comments/3mcps6/why_is_internetorg_bad/
Did FB use Digital India campaign to promote Internet.org?
http://www.hindustantimes.com/social-media/did-fb-use-digital-india-camp...
Airtel Zero, Internet.org against net neutrality: MTNL
http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/Airtel-Zero-Internet-o...
मायबोली व इतर मराठी संस्थळांचा या प्रकरणातील दृष्टीकोण काय असेल हे जाणून घ्यायला आवडेल.
फ्री बेसिक्स january २०१६
फ्री बेसिक्स january २०१६ पर्यंत स्थगित
आजच्या मटा मधे सांगितले आहे
इजिप्त मध्ये फ्री बेसिक्स बंद
इजिप्त मध्ये फ्री बेसिक्स बंद झाले
http://techcrunch.com/2015/12/31/facebooks-controversial-free-basics-pro...
बादशहा | 1 January, 2016 -
बादशहा | 1 January, 2016 - 07:20
फ्री बेसिक्स january २०१६ पर्यंत स्थगित
आजच्या मटा मधे सांगितले आहे
<<
अहो बादशहा, तुमचा प्रतिसाद जानेवारी २०१६चाच आहे की!
बापरे हे फारच डेंजर आहे.. आता
बापरे हे फारच डेंजर आहे.. आता सगळे क्लीअर समजले.. धाग्याबद्दल धन्यवाद
साधना आपल्या बरेच पोस्टमध्ये बरीच उपयुक्त माहिती आहे.. त्या पोस्ट शेअर करू शकतो का, व्हॉटसप किंवा फेसबूकवर .. अर्थात आपलाही हेतू तोच असावा ही माहीती जास्तीत जास्त शेअर करणे
https://www.facebook.com/NDTV
https://www.facebook.com/NDTVRavish/posts/1715989405302826:0
चांगले लिहिले आहे
प्रचंड आवडत आहे धागा.
प्रचंड आवडत आहे धागा.
अहो दिमा january पर्यन्त
अहो दिमा
january पर्यन्त म्हणजे january संपेपर्यंत ना
म्हणजे अजुन निदान एक महीना तरी आहे
फेस्क्बुक की फेकबुक ज्या
फेस्क्बुक की फेकबुक![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ज्या महाभागांनी रिलायंस आणि फेसबुकवर विश्वास ठेवला, त्यांना मिळालेला मेसेज
सकाळमधली ही बातमी वाचून हुश्श
सकाळमधली ही बातमी वाचून हुश्श झालं !
ट्राय चा नेट न्यूट्रॅलिटीस पाठिंबा.
Pages