सुरती लोचो.... गुजराथ चे फास्ट फूड, स्ट्रीट फुड. ह्या पदार्थाचा इतिहास गमती शीर आहे. एकदा ढोकळा बिघडला म्हणुन एका सुरतेच्या हॉटेल वाल्याने त्या पिठावर काही प्रयोग केले. त्यातुन ह्या पदार्थाचा जन्म झाला.
मागे एकदा एका मैत्रिणी कडे खल्ला होता. पण क्रुती माहित नव्हती. अंतर्जालावर शोधताना ह्याची क्रुती सापडली. मग माझे थोडे प्रयोग करुन खालिल प्रमाणे बनवला.
साहित्यः
१. चण्याची डा़ळ १ वाटी ( ५ तास भिजत घालावी )
२. ३/४ वाटी उडिद डाळ ( ५ तास वेगळी भिजत घालावी)
३. १/२ वाटी पोहे ( आर्धातास भिजलेले)
४. गाजर, फरसबी बारीक चिरुन १ वाटी
५. हिंग, हळद, मीठ, धणे पूड, जीरे पूड, हिरव्या मिरच्या २ बारीक चिरुन
६. इनो फ्रुट सॉल्ट १ टी.स्पु.
७. भेळेची गोड चटणी, शेव, डाळींब दाणे
८. आले किसुन १ टी.स्पु.
९. दही
१०. कळी मीरी पावडर
कॄती :
१. चणाडाळ, उडिद डाळ, पोहे वाटुन घ्यावे.
२. वाटलेल्या मिश्रणात चिरलेल्या भाज्या, हिंग, हळद, मीठ, धणे +जीरे पूड, आले, मिरच्या सगळे एकत्र करावे.
३. एकिकडे वाफवायची तयारी करावी. मोदक पात्र, किंवा कुकर शिट्टी काढुन ...काहीही
४. वाफेच्या भांड्यातिल पाणी उकळले कि आता लोचा वाफवायला ठेवणार त्या वेळेस त्याच्या मधे इनो फ्रुट सॉल्ट घालावे. जास्त घोटत बसु नये. हलक्या हाताने एकत्र करावे. ज्या भांड्यात उकडायचे त्याला तेलाचा हात लावावा. मिश्रण त्यात घालुन वरुन मिरी पूड भुरभुरावी व मिश्रण १५ मिनिटे वाफवावे.
७. एक डिश मधे लोच्याचा तुकडा, त्यावर दही, गोड चटणी, शेव व डाळींबाचे दाणे घालुन द्यावे.
एकदम यम्मी चव येते. तेल अजिबात नाहिये.... त्या मुळे पथ्याच्या लोकांना ही खायला हरकत नाही. तिखट चटणी ही घालु शकता.
३ ते ४ लोकांसाठी पुरेसा होतो.
मोकिमी, जबरदस्त !!
मोकिमी,
जबरदस्त !!
धन्यवाद ५ & ६ क्रमांकाचा
धन्यवाद
५ & ६ क्रमांकाचा फोटो गायब आहे.....
असो....
त्या लोच्या च्या वड्या पाडु नयेत. लपका तोडावा
मस्त हेल्दी चाट! कर के
मस्त हेल्दी चाट! कर के देखेंगे!
मस्तच लोचा,
मस्तच लोचा,
ऐ वॉव, मस्त वाटतीये रेसिपी..
ऐ वॉव, मस्त वाटतीये रेसिपी.. आवडत्या दहात टाकून ठेवलीये.. करीन नक्की..
स्लर्पऽ .....
स्लर्पऽ .....
मस्त आहे हा प्रकार. लोच्यो
मस्त आहे हा प्रकार. लोच्यो हे पहिल्यांदा ऑफिसात ऐकलेले, आमच्या बिग बॉसचा हा म्हणे खूप आवडता प्रकार आणि सुरतेच्या एका विशिष्ट दुकानातुन त्याच्यासाठी अधून मधून आणला जातो हे ऐकल्यावर नाव गुगलून रेसिपी मिळवलेली. पण कधी करून पाहिले नाही.
हि हेल्दि वर्ज मात्र नक्की करेन. ह्याचे तुकडे पाडू नयेत हे मात्र खरे।
'काहीतरी लोचा आहे' म्हणजे
'काहीतरी लोचा आहे' म्हणजे काहीतरी गडबड आहे, अशा अर्थाचा शब्दप्रयोग ऐकीवात होता. लोचा म्हणजे अॅक्चुअली बिघडलेल्या ढोकळ्याचा पदार्थ हे वाचून गम्मत वाटली.
घोटाळा अशा नावाचाही काही मराठी पदार्थ आहे ना?
मस्त
मस्त
लोचा मस्त. घोटाळा अशा
लोचा मस्त.
घोटाळा अशा नावाचाही काही मराठी पदार्थ आहे ना?>>>>> अंडा भुर्जीला बोलायचो लहानपणी.
दीमा.. घोटाळा म्हणजे अंड्याची
दीमा..
घोटाळा म्हणजे अंड्याची भुर्जी....( बहुतेक)
लोचा खरे तर दह्या विना खातात. मी पण मैत्रिणीकडे खाल्ला तो दह्य विना. पण मला खुप कोरडा वाटला. मी त्यात जरा व्हेरिअशन करुन दही आणि भाज्या घातल्या. भाज्या घातल्याने तो अगदी वन डिश मील सारखा होतो. अजुन कौतुक करायचे असेल तर भाज्या परतुनही घालता येतिल. पण ह्याची जी एक प्रकारची रॉ चव आहे त्यातच मजा आहे.
सुरत मधे जो मिळतो त्यात दही घालत नाहीत ( रेफः गुजराती शेजारीण). कधी कधी जास्त वाफवला तर कोरडा होतो. ह्यात ढोकळ्या सारखा हलके पणा नसतो. त्या मुळे दही घालावेच. खुप सुरेख चव येते.
मस्त....सुरतेच्या प्रसिद्ध
मस्त....सुरतेच्या प्रसिद्ध दुकानातला खाल्ला आहे.पण फार गोड चवीचा होता त्यामुळे विशेष आवडला नव्हता.त्यानंतर घरी बर्याचदा केला. भरपुर आले,हिरवी मिरची आले पेस्ट, लसुण-हि.मि.-आले, चणाडाळ ऐवजी मूग डाळ ,मूग-मसुर डाळ , त्या बरोबर थोडीशी कसुरी मेथी कि.वा दोन पानाची मेथीची ताजी भाजी घालुन...याबरोबर दह्यातली चटणी..
हा लोच्या नक्कीच करुन पाहेन
हा लोच्या नक्कीच करुन पाहेन एकदा.
तोपासु.
तोपासु.
मस्त आहे.
मस्त आहे.
सरस छे, लोचो...
सरस छे, लोचो...:)
मस्तच.
मस्तच.
वॉव मस्त
वॉव मस्त रेसिपी..............
केला आणि खाल्ला. आवडला. सध्या
केला आणि खाल्ला. आवडला. सध्या लो कॅल, लो कार्ब पदार्थांची फार गरज आहे. त्यात छान भर पडली. थँक्यू!
सुलेखा... ह्म्म!! मुग डाळ
सुलेखा...
ह्म्म!! मुग डाळ घालुन करुन पहिला पाहिजे. माझ्या एका मैत्रीणीने पालक घालुन केला. चांगला लागला म्हणाली. मलावाटते थोडी धने पूड घातली की पालकाचा उग्र वास मरत असावा....
मुग डाळीचा करुन पहाते... हलका होइल से वाटते.
मो की मी, मस्त रेसिपी आणि
मो की मी, मस्त रेसिपी आणि फोटो तोंपासु आहेत.
मस्त दिसतेय.. तसेच लागतही
मस्त दिसतेय.. तसेच लागतही असेल..
@ लोचा , घोटाळा... तसेच गडबड देखील असते.. फ्रूट सलाड आईसक्रीम वगैरे वगैरे फालूदा टाईप मिक्स
तसेच गडबड देखील असते.. फ्रूट
तसेच गडबड देखील असते.. फ्रूट सलाड आईसक्रीम वगैरे वगैरे फालूदा टाईप मिक्स>>>>>>>>> अहा! काय आठवण काढलीस.
पाककृती आवडली, त्यामागची
पाककृती आवडली, त्यामागची कहाणीही मजेदार.
थोडे अवांतरः गडबड/घोटाळा या अर्थासोबतच, गुजरातीत लोचो (લોચો) म्हणजे गुठळ्या असलेला, lumpy.
मला ह्या धाग्याचं नाव वाचुन
मला ह्या धाग्याचं नाव वाचुन सारखं 'लोच्या ए ढोकळा हो गया' असं मनात येतय.
_/\_ धन्यवाद,दोन वेळा केलि
_/\_ धन्यवाद,दोन वेळा केलि प्राक्क्रुति छान आहे, पहिल्यन्दा ऐक्लि आनि आवड्लि, घरि सर्वाना सुद्धा आव्ड्लि
सर्वाना धन्यवाद
ढोकळ्यावरच करुन बघणार
ढोकळ्यावरच करुन बघणार