मागच्या धाग्यावर खुप गर्दी झाली म्हणून म्हटलं नवीन धागा, भाग २ वगैरे काढावा..
सद्ध्या बरीच लग्न, कार्यक्रम झालेत घरी आणि गणगोतात त्यामुळे प्रत्येकवेळी ह्या ड्रेस वर मॅचिंग, त्या साडीवर मॅचिंग मूळे त्रासुन गेली .. बर हरबार मनासारख मिळेल तर शप्पथ.. ज्वेलरी मधे फक्त कानात घालायला काय ते आवडत त्यातही नविन काही फॅशन आवडतच नव्हती म्हणून ये रे माझ्या मागल्या म्हणत सुरु झालेला कुंडल / झुमका प्रवासाची हि झलक तुमच्यासोबत शेअर करतेय..
अजुनही म्हणावं तसं विक्री बाबत सिरिअस नै आहे मी पण हरवेळी घरी जाते तर किट सोबत ठेवते साहित्याची आणि याला त्याला दाखवत सुद्धा असते म्हणून माझ्या माम्या, मावश्या, बहिणी असे ज्यांना ज्यावर जसे हवे तसे बनवून विकले तेवढाच काय तो अनुभव.. माझीही बनवायची हौस फिटून जाते आणि तयार केलेले झुमके सुद्धा खपून जातात तर तेवढेच पैसे सुद्धा मिळतात.. आता नोकरीवर असलेल्या याच गणगोतांची मित्रमंडळी सुद्धा मागणी करुन राहिली आहेत.. बघु कुठवर चालतोय हा प्रपंच ते..
कानातले बनवताना वापरत असलेल्या साहित्यावरुन त्याची किंमत ठरवते मी.. आणि हो समोरच्याशी किती गटगट आहे त्यावरही विकलेत म्हणा .. असो..
स्काईप वर शिकवाव म्हणत होते पण माझं नेट आणि वेळ सगळ्यांची सांगड बसता बसत नै आहे म्हणुन येथेच स्टेप बाय स्टेप कृती देते म्हटलं.. जमवुन घ्या , निभावून घ्या ..
अडला व्हिडीयो, फोटोचे पाय धरी असं झालयं..
काही मागील धाग्यावर टाकलेले सुद्धा इथं देतेय. इतर सर्व नवे आहेत..
तर पहिले कृती देते. तुम्ही सुद्धा करुन पाहिल्यास मजा येईल.. बाकी तर सर्व आवडीप्रमाणे आहे म्हणा
लागणारे साहित्य :
यात स्टूड (ठेपीच्या कानातल्यांसाठी लागणारा बेस) ला ग्लु गन च्या साहाय्याने अर्धा मोती चिपवून घ्यावा आणि त्याच्या बाजुने क्विलींग पेपर ने गोल करुन घ्यावा. त्यात तारेची गोल रिंग टाकून घ्यावी.
टोपाला चेन लावण्यापूर्वी आतल्या बाजुने पेपर वारनिश चे निदान दोन थर द्यावेत. त्यानी तो आकार फिक्स राहण्याकरिता मदत होते.
बॉलचेन टोपाला चिटकवण्यासाठी मी फेविकॉलचं रु. ३०/- ला मिळणार ऑल फिक्स वापरलय.
टोप / डोम तयार करण्यासाठी चा फोटो जालावरुन इथ डकवलाय..
खाली दिल्याप्रमाणे तारामधे सगळ्या गोष्टी अरेंज कराव्या..
प्लायर्स च्या मदतीने तार वळवून घ्या आणि तयार केलेल्या स्टूड मधे फिक्स करा. सरतेशेवटी पेपर वारनिश चे दोन हात त्यावरुन मारल्याने ते वॉटप्रुफ होतात (जहर खानेसे आदमी मरता है इसका मतलब ये तो नही के उसे खाया हि जाए क्या समझे.. ) .
हे फायनल प्रॉडक्ट :
हे नवे जुने बनवलेले काही..
यापूढे बनवले तर फोटो टाकेल शायद..
लाईट्वेट असल्यामूळे तसेच हॅण्डमेड असल्यामूळे सुद्धा या प्रकारच्या ज्वेलरीला भरपुर मागणी आहे अन ते हि भरपुर किमतीत.. बघु साईड बिझनेस चा विचार करुन..
टीना, पट्टीची कलाकार आहेस ग
टीना, पट्टीची कलाकार आहेस ग तु! मस्त लिव्हलयस..:)
सगळे टोप भारीये....
धन्यवाद सर्वांचे.. दादा, इथ
धन्यवाद सर्वांचे..
दादा,
इथ तर मला आधीच अश्या क्विलींग च्या कानातल्यांचे दुकान थाटलेले दिसलेत मॉल मधे..
माझ्या संपर्कातील लोकांना ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांना मी शिकवलेलेच आहे .. राहता राहिला कुणाला जाऊन हे शिकवायचा, याच्याकडे उदरनिर्वाहाच साधन म्हणून बघण्याचा प्रश्न तर ज्या ज्या स्त्रिया माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांना हा एक तर बालीशपणा वाटतो नै तर शहाणपणा..
मी ज्या गावात राहते तिथल्या लोकांची सुद्धा याकडे बघण्याची वृत्ती फार काही कौतुकाची नाही.. मी सुट्ट्यांच्या वेळेत हे सर्व करु शकते जेव्हा मी घरी असते.. इथं परिक्षेकरिता अभ्यासाकरिता येण असत आणि त्यामूळे कुठं बाहेर जाणं भेटणं जवळपास नाहिच.. हवी ती नोकरी हाती पडल्याशिवाय काहि खर नाही..
असो..
तरी आईच्या शाळेत लेकरांना शिकवण्याच्या प्रस्ताव ठेवलाय त्या सर्वांनी .. बघू कस जमेल तस पुढल्या सुट्टीत.. पण लेकरं आणि त्यांच बॅकग्राउंड इतक भयान असत बरेचदा कि त्यांना २० रुपयाच्या स्ट्रिप्स, १५ रु ची पिन घेणे पण होईल कि नाही शंकाच आहे.. बघु कार्यशाळेत वाटप करता आले तर .. आईचा जो निर्णय राहिल त्यावर..
किती सुरेख बनवले आहेस.
किती सुरेख बनवले आहेस. शाब्बास, टीना.
काय मस्त आहेत सगळेच
काय मस्त आहेत सगळेच पीसेस!
क्विलिंग प्लस खडे/मोतीची आयडिया एक नंबर आहे. शेवटचे निळे तर फारच आवडले. अनेकानेक शुभेच्छा तुला!
अतिशय सुरेख.
अतिशय सुरेख.
केवळ आणि केवळ अप्रतिम!!
केवळ आणि केवळ अप्रतिम!!
अतिशय सुबक आणि सुंदर !
अतिशय सुबक आणि सुंदर !
खुपच छान आहेत सारेच, मला ते
खुपच छान आहेत सारेच, मला ते जुन्यातील ४ नंबर वाला फोटु लईच आवडला..
एक प्रश्ण आहे, याला तुम्ही जे क्विलींग पेपर वापरले आहे, ते किती जाडीचे आहे (2mm/5mm)
खुपच छान आहेत सारेच, मला ते
खुपच छान आहेत सारेच, मला ते जुन्यातील ४ नंबर वाला फोटु लईच आवडला..
एक प्रश्ण आहे, याला तुम्ही जे क्विलींग पेपर वापरले आहे, ते किती जाडीचे आहे (2mm/5mm)
खुपच छान आहेत सारेच, मला ते
खुपच छान आहेत सारेच, मला ते जुन्यातील ४ नंबर वाला फोटु लईच आवडला..
एक प्रश्ण आहे, याला तुम्ही जे क्विलींग पेपर वापरले आहे, ते किती जाडीचे आहे (2mm/5mm)
स्वधा.. क्विलिंग पेपर
स्वधा..
क्विलिंग पेपर ३,५,७,१० मिमी मधे मिळतात..
मी नेहमी ३ मिमी च युझ करते कुठल्याही कारागरीकरिता
फार सुंदर आहेत झुमके!!
फार सुंदर आहेत झुमके!!
वॉव टीना, सुपर लाईक!!क्विलिंग
वॉव टीना, सुपर लाईक!!क्विलिंग बरोबर माणिक मोती.. खूप सुंदर बनवलेत झुमके..
किती सुरेख केले आहेत.
किती सुरेख केले आहेत. अप्रतिम!
टिना, टिना, टिना... भेट ग
टिना, टिना, टिना... भेट ग मला..
तो काळ्या बॅकग्राउंडचा सेटवाला फोटो तर "हाय मैं मर जांवा" आहे अगदी. तु खरच व्यवसायाचा विचार करत असशील तर तसला सेट मला देशील का?
खुप सुंदर आहेत ग टिना
खुप सुंदर आहेत ग टिना कानातले.
नक्कीच कर साईड बिझनेस. तुला त्यासाठी शुभेच्छा.
टीना, तु प्रॉपर शिकली आहेस का
टीना, तु प्रॉपर शिकली आहेस का क्विलींग?
मला शिकायच आहे. बरं ते सोनेरी मण्याची माळ, हीर्यांची माळ वैगेरे सामान कुठे मिळते.
अप्रतिम..
अप्रतिम..
मुग्धटली, अगं व्यवसाय म्हणजे
मुग्धटली,
अगं व्यवसाय म्हणजे यानं त्यानं मागितलं कि द्यायच बनवून विकत असं दिलयं बर्याच जणांना.. देईल ना तुलापन त्यात काय
सस्मित,
प्रॉपर क्विलींग शिकणे म्हणजे ? सॉरी मी खरचं ढ आहे काही काही बाबतीत..
मी आत्तापर्यंत कधीच कुठल्या गोष्टीचे क्लासेस नै लावले सिरॅमिक वर्क वगळता..
हे पण असचं बघीतल, आवडलं, करुन पाहिलं अन जमलं..
बाकी सोनेरी माळ (बिडचेन), हिर्यांची माळ (डायमंड चेन) वगैरे एम्ब्रॉयडरी च्या दुकानात मिळतं..
सुंदर काय काय करत असतेस ग?
सुंदर
काय काय करत असतेस ग? आणि तेही इतक्या सफाईदारपणे. बिजनेसचा नक्की विचार कर.
सोनेरी मनी कसे चिकतवतेस. माझे
सोनेरी मनी कसे चिकतवतेस. माझे पडले. मि फेविकॉलनेचिकटवले होते.
सगळेच सुंदर. शेवटचे निळे आणि
सगळेच सुंदर. शेवटचे निळे आणि मधले एक लाल कुंदन लावलेले विशेष आवडले.
नेमके कुठले सोनेरी मनी गं ?
नेमके कुठले सोनेरी मनी गं ?
अगं म्हणजे क्लासेस च म्हणायचं
अगं म्हणजे क्लासेस च म्हणायचं होतं.
सोनेरी माळ (बिडचेन), हिर्यांची माळ (डायमंड चेन)>>> थॅन्क्स.
अप्रतिम....
अप्रतिम....
सुरेख! सुंदर कला आहे तुझ्या
सुरेख! सुंदर कला आहे तुझ्या हातात टिना.
कित्ती गोड!!! खरचं खूप
कित्ती गोड!!! खरचं खूप सुरेख....
कोणतेही मेटल चे मणी ग.
कोणतेही मेटल चे मणी ग.
कला आहे तुझ्या हातात आणि
कला आहे तुझ्या हातात आणि पेशन्सपण !
अप्रतिम !
अप्रतिम
अप्रतिम
Pages