मागच्या धाग्यावर खुप गर्दी झाली म्हणून म्हटलं नवीन धागा, भाग २ वगैरे काढावा..
सद्ध्या बरीच लग्न, कार्यक्रम झालेत घरी आणि गणगोतात त्यामुळे प्रत्येकवेळी ह्या ड्रेस वर मॅचिंग, त्या साडीवर मॅचिंग मूळे त्रासुन गेली .. बर हरबार मनासारख मिळेल तर शप्पथ.. ज्वेलरी मधे फक्त कानात घालायला काय ते आवडत त्यातही नविन काही फॅशन आवडतच नव्हती म्हणून ये रे माझ्या मागल्या म्हणत सुरु झालेला कुंडल / झुमका प्रवासाची हि झलक तुमच्यासोबत शेअर करतेय..
अजुनही म्हणावं तसं विक्री बाबत सिरिअस नै आहे मी पण हरवेळी घरी जाते तर किट सोबत ठेवते साहित्याची आणि याला त्याला दाखवत सुद्धा असते म्हणून माझ्या माम्या, मावश्या, बहिणी असे ज्यांना ज्यावर जसे हवे तसे बनवून विकले तेवढाच काय तो अनुभव.. माझीही बनवायची हौस फिटून जाते आणि तयार केलेले झुमके सुद्धा खपून जातात तर तेवढेच पैसे सुद्धा मिळतात.. आता नोकरीवर असलेल्या याच गणगोतांची मित्रमंडळी सुद्धा मागणी करुन राहिली आहेत.. बघु कुठवर चालतोय हा प्रपंच ते..
कानातले बनवताना वापरत असलेल्या साहित्यावरुन त्याची किंमत ठरवते मी.. आणि हो समोरच्याशी किती गटगट आहे त्यावरही विकलेत म्हणा .. असो..
स्काईप वर शिकवाव म्हणत होते पण माझं नेट आणि वेळ सगळ्यांची सांगड बसता बसत नै आहे म्हणुन येथेच स्टेप बाय स्टेप कृती देते म्हटलं.. जमवुन घ्या , निभावून घ्या ..
अडला व्हिडीयो, फोटोचे पाय धरी असं झालयं..
काही मागील धाग्यावर टाकलेले सुद्धा इथं देतेय. इतर सर्व नवे आहेत..
तर पहिले कृती देते. तुम्ही सुद्धा करुन पाहिल्यास मजा येईल.. बाकी तर सर्व आवडीप्रमाणे आहे म्हणा
लागणारे साहित्य :
यात स्टूड (ठेपीच्या कानातल्यांसाठी लागणारा बेस) ला ग्लु गन च्या साहाय्याने अर्धा मोती चिपवून घ्यावा आणि त्याच्या बाजुने क्विलींग पेपर ने गोल करुन घ्यावा. त्यात तारेची गोल रिंग टाकून घ्यावी.
टोपाला चेन लावण्यापूर्वी आतल्या बाजुने पेपर वारनिश चे निदान दोन थर द्यावेत. त्यानी तो आकार फिक्स राहण्याकरिता मदत होते.
बॉलचेन टोपाला चिटकवण्यासाठी मी फेविकॉलचं रु. ३०/- ला मिळणार ऑल फिक्स वापरलय.
टोप / डोम तयार करण्यासाठी चा फोटो जालावरुन इथ डकवलाय..
खाली दिल्याप्रमाणे तारामधे सगळ्या गोष्टी अरेंज कराव्या..
प्लायर्स च्या मदतीने तार वळवून घ्या आणि तयार केलेल्या स्टूड मधे फिक्स करा. सरतेशेवटी पेपर वारनिश चे दोन हात त्यावरुन मारल्याने ते वॉटप्रुफ होतात (जहर खानेसे आदमी मरता है इसका मतलब ये तो नही के उसे खाया हि जाए क्या समझे.. ) .
हे फायनल प्रॉडक्ट :
हे नवे जुने बनवलेले काही..
यापूढे बनवले तर फोटो टाकेल शायद..
लाईट्वेट असल्यामूळे तसेच हॅण्डमेड असल्यामूळे सुद्धा या प्रकारच्या ज्वेलरीला भरपुर मागणी आहे अन ते हि भरपुर किमतीत.. बघु साईड बिझनेस चा विचार करुन..
टीना, खूप छान बरेच दिवसानी
टीना, खूप छान बरेच दिवसानी आलीस माबोवर पण त्याच पारण फेडलस बघ. काय कला आहे तुझ्या हातात ! आणि हो धाग्याच नाव पण क्यूट आहे.
बघु साईड बिझनेस चा विचार करुन. >>> करच.
मस्त आहेत सगळे.
मस्त आहेत सगळे.
वा मस्तच गं...
वा मस्तच गं...
सुरेख!
सुरेख!
अप्रतिम.........
अप्रतिम.........
माते, कुठे आहेत आपले चरण?
माते, कुठे आहेत आपले चरण?
मस्तच!
मस्तच!
वेलकम बॅक!! सगळेच अप्रतीम
वेलकम बॅक!! सगळेच अप्रतीम जमलेत..
बॅकलॉग चा उरका पाडतिये काय
बॅकलॉग चा उरका पाडतिये काय टीना?
टिनू.. तू कुठे
टिनू.. तू कुठे असतेस?
भेटायचंय तुला
_______/\_______
सुंदरच
सुंदरच
मस्त मस्त!
मस्त मस्त!
Amazing! You are a
Amazing! You are a professional!
मस्त जमले आहेत.
मस्त जमले आहेत.
फोटो जबरीच. नमस्कार!
फोटो जबरीच. नमस्कार!
बघु साईड बिझनेस चा विचार
बघु साईड बिझनेस चा विचार करुन. >>> करच.+१११११११११
जबरी कला आहे तुझ्या हातात. फार आवडले, अप्रतीम!
झुमका गिरा रे वाली गेली आज!
झुमका गिरा रे वाली गेली आज! हा धागा वाचताना तिची आठवण होणे अपरिहार्य!
वॉव.... शी ईज बॅक विथ अ
वॉव.... शी ईज बॅक विथ अ बॅन्ग!
टिने....भारी जमलंय सगळं! चालू दे!
थँकु ऑल.. झुमका गिरा रे वाली
थँकु ऑल..
झुमका गिरा रे वाली गेली आज! >> अरेरे
एकदम प्रोफेशनल लेव्हलचं काम
एकदम प्रोफेशनल लेव्हलचं काम अहे.
वा वा वा... फार सुंदर जमलय
वा वा वा... फार सुंदर जमलय सर्वच.
सुरेख. छान वाटलं तु आल्यावर
सुरेख. छान वाटलं तु आल्यावर नवीन कुंडलदर्शन झालं.
टीना, मी नेहमी सुचवतो तेच
टीना, मी नेहमी सुचवतो तेच सांगेन. स्वतः करायला वेळ मिळणार नाही म्हणून ज्यांना आवड आहे त्यांना शिकवून त्यांना रोजगार मिळेल असे पहा. मला असे वाटते कि तूला ( वयाने मोठा आहे मी ) एकच वस्तू करायचा कंटाळा येत असणार. तेव्हा ही कला कुणाच्या हातात सोपवली कि, तू दुसर्या कलाविष्काराकडे वळशील. आणि असे केले कि तूझ्यातली हुनर कायम ताजीतवानी राहील.
सुपर्ब!! कलाकार आहेस, बयो!
सुपर्ब!! कलाकार आहेस, बयो!
सगळेच सुंदर आहे.
सगळेच सुंदर आहे.
सुरेख
सुरेख
काय जबरदस्त कलाकारी आहे
काय जबरदस्त कलाकारी आहे तुझ्या हातात - ग्रेट .... कीप इट अप .....
सुरेख.. कीप इट अप..
सुरेख.. कीप इट अप..
अप्रतिम
अप्रतिम
मस्तच.. सुरेख झाले आहेत.
मस्तच.. सुरेख झाले आहेत.
Pages