Submitted by संतोष वाटपाडे on 18 December, 2015 - 22:00
कोठे विरघळलो नाही गर्दीत मिसळलो नाही
त्यामुळे कधी दुनियेला मी पसंत पडलो नाही...
जातीचे शस्त्र मिळाले आरक्षण चिलखत झाले
घरबसल्या विजय मिळाला शत्रूशी लढलो नाही..
कुणबी चढले फ़ासावर ...कळले...वाईटच झाले
आम्ही पणत्या पेटवल्या पण चिडलो बिडलो नाही..
ती जितकी वाढत आहे मी तितका बहरत आहे
वेदनेस माझ्या अजुनी मी पुरता कळलो नाही..
माघार घेतली तेव्हा मी मान वळवली होती
तुज नको कळाया म्हणुनी मुद्दामच रडलो नाही..
लावणे जीव परक्यांना असहिष्णूता जर असते
हे किती बरे झाले की.. मी सहिष्णु बनलो नाही...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे
छान आहे
>>>ती जितकी वाढत आहे मी तितका
>>>ती जितकी वाढत आहे मी
तितका बहरत आहे
वेदनेस माझ्या अजुनी मी पुरता कळलो
नाही..>>>छान!
कळलो नाही …. फारच छान …
कळलो नाही …. फारच छान …
ती जितकी वाढत आहे मी तितका
ती जितकी वाढत आहे मी तितका बहरत आहे
वेदनेस माझ्या अजुनी मी पुरता कळलो नाही..>>> क्लास...
>>> जातीचे शस्त्र मिळाले
>>>
जातीचे शस्त्र मिळाले आरक्षण चिलखत झाले
घरबसल्या विजय मिळाला शत्रूशी लढलो नाही..
कुणबी चढले फ़ासावर ...कळले...वाईटच झाले
आम्ही पणत्या पेटवल्या पण चिडलो बिडलो नाही..
ती जितकी वाढत आहे मी तितका बहरत आहे
वेदनेस माझ्या अजुनी मी पुरता कळलो नाही..
माघार घेतली तेव्हा मी मान वळवली होती
तुज नको कळाया म्हणुनी मुद्दामच रडलो नाही..
लावणे जीव परक्यांना असहिष्णूता जर असते
हे किती बरे झाले की.. मी सहिष्णु बनलो नाही...<<<
एकसे एक शेर! मात्र असहिष्णूता ह्या शब्दाचे असहिष्णुता असे करावे लागेल.
>>>जातीचे शस्त्र मिळाले
>>>जातीचे शस्त्र मिळाले आरक्षण चिलखत झाले
घरबसल्या विजय मिळाला शत्रूशी लढलो नाही..<<<
हा शेर फार थेट
धन्यवाद बेफिदा.... छान वाटले
धन्यवाद बेफिदा.... छान वाटले अभिप्राय वाचून....
ती जितकी वाढत आहे मी तितका
ती जितकी वाढत आहे मी तितका बहरत आहे
वेदनेस माझ्या अजुनी मी पुरता कळलो नाही.......मस्त !
अनेक शेर आवडले, धन्यवाद
अनेक शेर आवडले, धन्यवाद
जातीचे शस्त्र मिळाले आरक्षण
जातीचे शस्त्र मिळाले आरक्षण चिलखत झाले
घरबसल्या विजय मिळाला शत्रूशी लढलो नाही..
पटलं नाही.
-दिलीप बिरुटे
प्राध्यापक साहेब ...आभारी
प्राध्यापक साहेब ...आभारी आहे मी आपल्या अभिप्रायासाठी..... मला जास्त आवडला तो शेर....किती योगायोग ना!
वा वा एकसे बढकर एक झाले आहेत
वा वा एकसे बढकर एक झाले आहेत शेर !!
जियो !!
>>> मला जास्त आवडला तो
>>> मला जास्त आवडला तो शेर....किती योगायोग ना !
छान. चांगली गोष्ट आहे. मग असंच लिहित राहा.
-दिलीप बिरुटे