Submitted by प्राचीस on 15 December, 2015 - 09:43
व्हॅक्क्युम क्लिनर घ्यायचा आहे. हँडी हवा आहे, जड, हलवा-हलव करायला सोपा असेल असा. आई कडे जुन्या प्रकारचा Eureka Forbes चा होता. वर्षातुन २ वेळा वापरला जायचा. इतर वेळ माळ्यावर. असा बिलकुल नको.
मला अडचणीच्या ठिकाणी सहज जाणारा आणि महिन्यातुन १-२ वापरता येणारा हवा आहे. खरं तर sliding च्या खिडक्यांसाठी आणि खिडक्यांच्या जाळीवर साचणार्या धुळीसाठी हवा आहे.
हा आवडला आहे. पण इथे विचारल्याशिवाय घेउ वाटत नाही आहे.
http://www.amazon.in/Eureka-Forbes-Easy-Clean-Plus/dp/B00F3ABT48/ref=sr_...
इतर चांगले पर्याय ही सुचवा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घ्या बिनधास्त. दोन्ही कामं
घ्या बिनधास्त. दोन्ही कामं मस्त करेल. माझा युरोक्लीन बुलेट आहे. त्यात आणिक्षयात मेन युनीटचा आकार, रंग सोडला तर बाकी सेम.
Search for Zibo duster on
Search for Zibo duster on amazon? It is more handy for Dusting. Vaccume cleaner is another necessary important purchase ☺ I have both ☺
Eureka Forbes चांगली कंपनी
Eureka Forbes चांगली कंपनी वाटते.. आमच्या घरी Eureka Forbes Euroclean Wet and Dry Vacuum Cleaner (http://www.amazon.in/Eureka-Forbes-Euroclean-Vacuum-Cleaner/dp/B00GNZH6E...) आहे. २ वर्षांपासून अगदी दररोज वापरला जातोय पण काहीच प्रोब्लेम नाही आलेला ...
धन्यवाद! Zibo duster बद्दल
धन्यवाद!
Zibo duster बद्दल पाहिलं, interesting आहे.
आता व्हॅक्क्युम क्लिनर घ्यायला काही हरकत नाही.
नवराही आजकाल म्हणतो, मायबोलीवर बघ ना लोक काय म्हणतात ते.
राजसी, झिबो डस्टरच्या
राजसी, झिबो डस्टरच्या माहितीबाबत भरपूर धन्यवाद.
प्राचीस -- कोणता vacuum
प्राचीस --
कोणता vacuum cleaner घेतला. आम्ही पण पहात आहोत.
आमचा जुना युरेका फोर्ब्सचा
आमचा जुना युरेका फोर्ब्सचा खूप वापरून बिघडला, त्यालाही काही वर्षे झाली. आता नवा घ्यायचाय. वेट ॲन्ड ड्राय घ्यावा की आणखी काही फीचर्स असतात? कुठल्या कंपनीचा चांगला आहे? ॲमेझॉनवर बऱ्याच अनोळखी कंपन्या दिसल्या
तरी आपापले अनुभव, मते, टिप्स द्या
रोबो/रुम्बा घ्यायचा नाहीये कारण खिडक्या, ग्रिल्स, सोफे, कोळिष्टके साफ करता यावीत अशी महत्वाकांक्षा आहे
माझ्या व्हॅक्युम क्लीनरची
माझ्या व्हॅक्युम क्लीनरची चित्तरकथा
तीन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीसाठी साफसफाई करताना हा मध्येच बंद पडला. काही आठवड्यांनी युरेका फोर्ब्सचा वॉटर फिल्टर विकायला नेमाने येणारा सेल्समन आला. त्याला व्हॅक्युम क्लीनरबद्दल सांगितले. त्याला सेलिंग अपॉर्च्युनिटी दिसली. त्याने त्याच्या व्हॅक्युम क्लीनरवाल्या पार्टनरला बोलवले. याने फार काही हात न लावता त्याची मोटर बिघडली असेल. तुम्ही दुरुस्त करायला गेलात तरी तोच पार्ट आता मिळणार नाही. नवे व्हॅक्युम क्लीनर बघा, म्हणत माझ्याच पीसीवर मला ब्राउस करायला लावत फिशिंग करतात तसं ऑर्डर प्लेस करायला लावत होता. वेट क्लीनिंगवाला गळ्यात घालू पाहत होता. पण मी मला इतक्यात घ्यायचा नाहीए म्हणून त्याच्या उत्साहावर पाणी ओतलं.
काही महिन्यांनी त्यांच्याच साइटवरून एक्सफोर्स घेतला. यात सगळ्या अॅटॅचमेंंट्स आधीच्या सारख्याच आहेत. फक्त जरा अधिक मोठा आणि जड आहे.
आल्यानंतर एकदोन दिवसांत त्याचे उद्घाटन करू गेलो तर पॉवर ऑन झाल्याचे इंडिकेशनच दिसेना. त्यांना फोन लावून डिफेक्टिव्ह पीस आहे का? डेमोसाठी माणूस पाठवा इत्यादि सर्व्हिस रिक्वेस्ट रजिस्टर केली. मग अचानक , ऑफिसमध्ये काँप्युटर बंद पडला की सर्व्हिस इंजीनियर सांगायचे तो पहिला उपाय आठवला. सगळी कनेक्शन्स काढून पुन्हा लावून चालू करून बघा. व्हॅक्युम क्लीनर दुसर्या पिन पॉइंटला लावून पाहिला आणि ऑन झाला.
आमचा तो पिन पॉइंट बिघडला होता. तो पॉइंट व्हॅक्युम क्लीनरशिवाय अन्य कशासाठी न वा परला जात नसल्याने ते लक्षात आलं नव्हतं. जुना व्हॅक्युम क्लीनर उगाच भंगारात गेला. १६-१७ वर्षे वापरला होता. म्हणून फार वाईट नाही वाटले.
डायसन Dyson चे व्हॅक्युम क्लीनर अगदीच अॅस्पिरेशनल आहेत. एक्स्चेंज ऑफरमध्ये वीस हजारापर्यंत सूट देताहेत.