Submitted by दुसरबीडकर on 13 December, 2015 - 05:24
जगण्यासोबत समन्वयाची कला साधली नाही..
जगून घेतो तरी जिंदगी जरी चांगली नाही..!!
ह्रदयावरुनी किती मोसमी वारे आले-गेले
एक सुखाची सर मुक्कामी कधी थांबली नाही..!!
जिथे झाड आंब्याचे व्हावे तिथेच बाभुळ झालो..
नशिबामधल्या काट्यांची मग भिती वाटली नाही..!!
कुठल्याही कवितेच्या गावी जाणे जमले नाही..
आयुष्याची कविता शब्दांमधे मावली नाही..!!
एका श्वासापासुन सगळे जीवन उसने असते..
तरी सत्यता कधीच तू माणसा मानली नाही..!!
-गणेश शिंदे,दुसरबीडकर..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
हरेक ख़याल लाजवाब !! फ़क्त
हरेक ख़याल लाजवाब !!
फ़क्त शब्दांमधे करावे लागेल आणि शेवटाचा मिसरा मला लयीत वाचता आला नाही .
सुन्दर गझल.
धन्यवाद स्पाॅक.. धन्यवाद
धन्यवाद स्पाॅक..
धन्यवाद सुप्रियाजी..
दोन्ही अभिप्राय स्विकार..
जिथे झाड आंब्याचे व्हावे
जिथे झाड आंब्याचे व्हावे तिथेच बाभुळ झालो..<<< ही ओळ
कुठल्याही कवितेच्या गावी जाणे जमले नाही..
आयुष्याची कविता शब्दांमधे मावली नाही..!!<<< हा शेर
आणि
एका श्वासापासुन सगळे जीवन उसने असते..<<< ही ओळ
आवडले. शुभेच्छा!
सही! मस्त गझल! >>>
सही! मस्त गझल!
>>> ह्रदयावरुनी किती मोसमी वारे
आले-गेले
एक सुखाची सर मुक्कामी
कधी थांबली नाही..!!>>>हा अधिक आवडला!
शेवटचा शेर मी असा वाचून पाहिला...
> >>एका श्वासापासुन सगळे जीवन उसने असते..
धापा टाकत जगताना ही बात मानली नाही..!!>>> (कृ.गै.न.)
शुभेच्छा!
वाह गणॅशा
वाह गणॅशा .....लाजवाब.....आवडी गजल !!
मनःपुर्वक
मनःपुर्वक आभार...!
बेफिकीरजी...
सत्यजीतजी...
संतोषजी...!
छानच..! एक सुखाची सर मुक्कामी
छानच..!
एक सुखाची सर मुक्कामी कधी थांबली नाही..!!
जिथे झाड आंब्याचे व्हावे तिथेच बाभुळ झालो..
आयुष्याची कविता शब्दांमधे मावली नाही..!! >>>> या ओळी अप्रतिम..!
दुसरा शेर आवडला काही ओळी छान
दुसरा शेर आवडला
काही ओळी छान
छान
छान
खूप छान
खूप छान
कुठल्याही कवितेच्या गावी जाणे
कुठल्याही कवितेच्या गावी जाणे जमले नाही..
आयुष्याची कविता शब्दांमधे मावली नाही..!! >>>> छान.
ह्रदयावरुनी किती मोसमी वारे
ह्रदयावरुनी किती मोसमी वारे आले-गेले
एक सुखाची सर मुक्कामी कधी थांबली नाही..!!>>व्वा