कापूर जीवनाचा करण्यात अर्थ नाही

Submitted by बेफ़िकीर on 8 December, 2015 - 00:29

कापूर जीवनाचा करण्यात अर्थ नाही
जाळून ह्या जिवाला जगण्यात अर्थ नाही

पाऊस पाड आता ज्याच्यात स्वत्त्व लोपे
भुरट्या सरींमधे ह्या भिजण्यात अर्थ नाही

नाते जपायची घे तूही जबाबदारी
कोणी नसेल तेव्हा फुलण्यात अर्थ नाही

वाहून जात आहे जीवन क्षणाक्षणाने
आता तुझा किनारा धरण्यात अर्थ नाही

हे वाहिल्यामुळे तर मन लख्ख लख्ख होते
हे 'बेफिकीर' अश्रू पुसण्यात अर्थ नाही

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वाहिल्यामुळे तर मन लख्ख लख्ख होते
हे 'बेफिकीर' अश्रू पुसण्यात अर्थ नाही .......>>..

...................मक्ता सुरेख !

Nice

मस्तच, आवडली गझल.

<<
पाऊस पाड आता ज्याच्यात स्वत्त्व लोपे
भुरट्या सरींमधे ह्या भिजण्यात अर्थ नाही
<<

फक्त या शेरातला 'ठळक' केलेल्या शब्दाचा अर्थ कळला नाही.

नाते जपायची घे तूही जबाबदारी
कोणी नसेल तेव्हा फुलण्यात अर्थ नाही

व्वा…

गझलेची जमीनही आवडली.
शुभेच्छा.

छान!!

नाते जपायची घे तूही जबाबदारी
कोणी नसेल तेव्हा फुलण्यात अर्थ नाही

हे वाहिल्यामुळे तर मन लख्ख लख्ख होते
हे 'बेफिकीर' अश्रू पुसण्यात अर्थ नाही

हे दोन्ही सर्वात छान वाटले.

वा! Happy

वाहून जात आहे जीवन क्षणाक्षणाने
आता तुझा किनारा धरण्यात अर्थ नाही

मस्त !

फारच सुन्दर !!! ... मस्तच !...पाऊस पाड आता ज्याच्यात स्वत्त्व लोपे
भुरट्या सरींमधे ह्या भिजण्यात अर्थ नाही

छान...