मागचा भाग (दोन-पायी पाहुणे): http://www.maayboli.com/node/56618
--------------------------------------------------------------------------------
पहिले काही दिवस सगळं नवीन नवीन होतं तोवर फक्त कौतुक वाटलं. किती या सगळ्या गुणी हत्तिणी आहेत नि त्यांचे किती लाड करू आणि किती नको! मग सरावल्यावर त्यांना माझ्या आणि मला त्यांच्या लहानसहान लकबी गोड खुपायला लागल्या. तिन्ही त्रिकाळ त्याच गोतावळ्यात वावरल्यावर, त्यांच्यात रुळतानाच्या या काही गोष्टी. त्या त्या वेळी हाताशी असलेल्या कागद-पेनाने खरडून ठेवलेल्या.
एकेकीचे स्वभाव, त्यांची सरळ आणि वाकडी वळणं. कट्टी-बट्टी, नखरे, प्रेम आणि रोजचं वावरणं. अगदी घरच्या गोष्टी. खाजगी नाहीत, किंवा गुपितंही नाहीत. साध्याच गोष्टी! एका दुपारी ओसरीवर बसून यांच्याकडे बघतानाच्या...
(फोटोच्या केसालाही धक्का न लावता तो मायबोलीवर टाकण्याचं टेक्नीक अजून जमलं नाहीये मला. हा फोटो नीट नाही दिसला तर please या लिंकवर बघा: http://arnika-saakaar.blogspot.co.uk/2015/11/blog-post_15.html)
क्रमशः
वा! मस्त लिहलय. छान
वा! मस्त लिहलय. छान निरिक्षण.
तुमचं अक्षरहि सुंदर आहे.:)
वा! मस्त लिहलय. छान
वा! मस्त लिहलय. छान निरिक्षण.
तुमचं अक्षरहि सुंदर आहे.:)
सुरेख!!
सुरेख!!
खूपच छान! काल अधाश्यासारखं
खूपच छान! काल अधाश्यासारखं ब्लॉगवर वाचून टाकलं होतं.
हे ही सुरेख. माझ्याक्डे
हे ही सुरेख. माझ्याक्डे कुत्र्यांची आई मुलीची जो डी आहे. आई माझ्यासारखीच आहे बिनधास्त.
कुठेही जाईल काही ही करेल. पण मनाने सेन्सिटिव्ह. आजारी पडली की गप बसऊन असते.
मुलगी म्हणजे खोडकर प्रेमळ व डिमांडिंग. प्रचंड खादाड. पण खरेच गोड स्वभावाची. दोघी एक मेकीं साठी अन्न लपवून ठेवतात प्राण्यांचं बाँडिंग फार घट्ट असत एकीला बाहेर नेलं की दुसरी कावरी बावरी होते. मी अवेळी बाहेर पडले की दोघी काळजी करतात.
अर्निका, खुप छान अनुभव शेअर
अर्निका, खुप छान अनुभव शेअर करताय तुम्ही. वाचताना खुप छान वाटतय. आधीचे दोन भाग वाच्ल्यवर हा भाग ब्लॉगवरुन जाउन वाचला होता. आवडलं लेखन.
वा खूप सुरेख श्रीमती लेक
वा खूप सुरेख
श्रीमती लेक ह्यान्ची ओळख करून दिल्याबद्दल आभार
तुमचं अक्षर सुंदर आहे
तुमचं अक्षर सुंदर आहे
पटकन चौथा भाग येऊ दे
पटकन चौथा भाग येऊ दे
लेखमाला सुंदर आहेच. पण याची
लेखमाला सुंदर आहेच.
पण याची शीर्षक 'हादगा' असं का आहे? त्या शब्दाचा संबंध कुणी उलगडून दाखवेल काय?
माझ्या माहितीत १) गुलाबाई-भोंडल्यासारखा एक खेळ/उत्सव/सण व २) एक फुलांचं झाड, ज्याच्या फुलांची भाजी/भजी मस्त होतात, इतकीच काँटेक्स्ट आहे. दोन्हीतून मला काहीच अर्थबोध होत नाहिये.
दीड मायबोलीकर, हादगा म्हणजे
दीड मायबोलीकर, हादगा म्हणजे भोंडल्यालाही म्हणतात आणि त्यात हत्तीच्या चित्राभोवती/रांगोळीभोवती फेर धरून नाचतात. मी खर्या हत्तींभोवती बरोब्बर भोंडल्याच्या नऊ दिवसांच्या वेळीच (म्हणजे हस्त नक्षत्र चालू असतानाच) होते. जिवंत हादगा खेळत! म्हणून नाव हादगा.
हस्ताचा आणि हादग्याचा संदर्भ सहज कळला नाही तर कळायला कठीण जाईल, बरोबर आहे तुमचं.
अहो दीमा, हादगा हा हत्तीचा
अहो दीमा,
हादगा हा हत्तीचा खेळ आहे.
हत्तीचे चित्र केंद्रस्थानी ठेऊन बाजूने सगळ्या फेर धरतात. सगळं काही त्या हत्तीला साक्षी मानून, मध्ये ठेऊन.
इथेही मुख्य पात्र हत्ती आहेत आणि बाकी जंगलाची, माणसांची धावपळ , आणि आत्ता इथे लेखिकेने मांडलेली शब्दांची आरासदेखिल केवळ त्या हत्तींना सांभाळण्याकरता, हत्तींसाठी.
म्हणून हादगा!
अर्निका! एकाचवेळी दोघींनी
अर्निका!
एकाचवेळी दोघींनी लिहिलं.
खूप छान लिहीतेयस तू! आणि अक्षरही टप्पोरं, मोत्यांसारखं गोलगोल आहे.
छान आहे लेखमालिका. पुढच्या
छान आहे लेखमालिका. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!!
हादगा हे शीर्षक खूप छान आहे.
हादगा हे शीर्षक खूप छान आहे. हा ही भाग सुरेख! किती सुंदर अक्षर आहे तुझं! आता पुढचा भाग लवकर येऊ दे!
ओह. खानदेशात
ओह.
खानदेशात भोंडला/गुलाबाई/भुलाबाई हा खेळ खेळताना लेकुरवाळी पार्वती शंकराला घेऊन माहेरी आलेली असते. तिच्या "मूर्ती"समोर आरास करतात, गाणी गातात, टीपर्या खेळतात. त्यात घरोघरचा खाऊ ओळखतात वगैरे..
त्यात हत्तीचा काही संबंध नसतो.
हे पहा : गुलाबाई-गुलोजी-बाळं यांच्या "मूर्तींचा" फोटो:
तस्मात, ती शंका.
खुलाशाबद्दल धन्यवाद!
असं होय! मलाही हे नवीन कळलं
असं होय! मलाही हे नवीन कळलं हादगा अगदी कोकणातला शब्द आहे बहुतेक!
Thank you, everyone!
दीमा, हे बघून गोलूची आठवण
दीमा, हे बघून गोलूची आठवण झाली.
खूप मस्त लिहित आहेस. सगळेच
खूप मस्त लिहित आहेस. सगळेच भाग छान. अक्षर सुरेख आहे.
हादगा भाग ३ पण आवडले अक्षर
हादगा भाग ३ पण आवडले
अक्षर सुंदर आहे ब्लॉग वरचे फोटो पण छान आहेत
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
अर्निका, मालिकेतल्या सगळ्या
अर्निका, मालिकेतल्या सगळ्या लेखांवर मागच्या/पुढच्या लेखाच्या लिंक्स देशील का? नंतर शोधायला सोपं जाईल.
हा भागही सुरेख!
हा भागही सुरेख!
जिज्ञासा, दिल्या. ताबडतोबड!
जिज्ञासा, दिल्या. ताबडतोबड!
क्युट सर्व प्रकारचे प्राणी
क्युट सर्व प्रकारचे प्राणी भयंकर आवडतात त्यामुळे लेख पैल्या नंबराने वाचते आहे. त्यातही हत्तीसारख्या एरवी दुरूनच झलक दिसणार्या प्राण्याच्या स्वभावविशेषांचं इतकं बारकाईनं निरिक्षण करून ते लिहिलेलं विशेष आवडलं.
वरच्या सगळ्यांनां +१ .. अक्षर
वरच्या सगळ्यांनां +१ .. अक्षर किती सुरेख आहे!
हाही भाग आवडला , एकंदरित
हाही भाग आवडला , एकंदरित तुलाही प्राण्यांची ( हत्तीची) भाषा समजायला लागली तर.
सुंदर लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.
हा ही भाग खुप आवडला! तुझं
हा ही भाग खुप आवडला!
तुझं अक्षर खुप सुंदर आहे.
सुंदर. अक्षरही सुरेख.
सुंदर. अक्षरही सुरेख.
मस्त.. सुरेख अक्षर आहे.
मस्त.. सुरेख अक्षर आहे. पुढचे भाग येऊ दे पटापट
Pages