Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हि टिप भारीच आहे. अगदी कूलर
हि टिप भारीच आहे.
अगदी कूलर नाही पण पॅडेड पिकनिक बॅग आहे. त्यातपण हे चांगलं बसेल.
धन्यवाद परत एकदा.
पिकनिकसाठी भाजणीचे वडेही छान
पिकनिकसाठी भाजणीचे वडेही छान पर्याय आहे, सोबत लोणचे, मिरची, लसणीचं तिखट, केचप काहीही चालते. अर्थात भाजणी नसेल तर तिखट मिठाच्या पुऱ्या.
बेसन लावलेली भाजी टिकते? हे
बेसन लावलेली भाजी टिकते? हे माहीत नव्हतं>>>
व्यवस्थित तेल घालून भोपळा मिरची भाजी अर्धवट शिजली की त्यावरभरपूर बेसन शिवरून चांगली परतुन शिजवायची. चवीला अप्रतिम आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत टिकतेही.
हळद खराब होते का?
हळद खराब होते का?
स्वयंपाक घरात एक वस्तू शोधताना हळदीचे जुने पाकिट मिळाले. त्यावरची expiry date दिसत नाहीये. तसेच ते गेल्या ६ महिन्यात घेतलेले आहे कि २-४ वर्षात तेही आठवत नाही. काय करावे?
मला काही सांगता येईल असे वाटत
मला काही सांगता येईल असे वाटत नाही पण खायचे नसेल तर उटणे बनवून त्यात वापरता येईल
पाकीट उघडून बघा , चांगली असेल
पाकीट उघडून बघा , चांगली असेल तर वापरू शकता. फ्रीज मध्ये असेल तर नक्कीच चांगली असेल. बाहेर असेल तर सांगता येत नाही पण नुसती बघून ही कळेल चांगली आहे की नाही ते.
वासावरून कळेल.
वासावरून कळेल.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
sonalisl, हळद सहसा खराब होत
sonalisl, हळद सहसा खराब होत नाही. बारीक चाळणीतून चाळून घ्या. सद्ध्या जो लॉट वापरत आहात तो झिपलॉकच्या बॅगेत ठेवून द्या आणि ही जुनी आधी वापरायला काढा.
ब्राउनी करायचा विचार होता.
ब्राउनी करायचा विचार होता. चॉकोलेट लवकर वितळेल म्हणून गरम बटर ओतलं त्याच्यावर. चॉकलेट तर वितळलं आणि सुके पदार्थ (मैदा, साखर, कोको पावडर, बेकिंग पावडर, कॉर्न स्टार्च दोन टीस्पून) त्यात टाकले. दुध टाकून सगळं हलवलं पण ते कोरडंच राहिलं. समुद्राच्या वाळूसारखं लागत होतं हाताला. अजून दुध टाकलं तरी तसंच. त्याला नेहमीच्या बॅटरसारखा सरसरीतपणा आलाच नाही, मातीची ढेकळच वाटत होती. मग तसंच टाकलं ओटीजी मध्ये. थोडया वेळाने ओटीजी बाहेरून वास तर चांगला येत होता पण टेक्सचर तसंच. काढलं बाहेर (कितीवेळ ठेवणार आत). आता वरचा थर खारट लागतोय तर खालचा थर कडू. कॉर्नस्टार्च मी पहिल्यांदा टाकलं कारण ब्राउनी घट्ट असते आणि तूनळीवरपण बघितलं होतं.
माझ्यामते बटर जास्त झालं आहे आणि ते गरम नाही टाकायला हवं होतं. हे प्रकरण आता खाववतही नाहीये आणि फेकवतही नाहीये. परत थोडा मैदा आणि साखर टाकून शिजवलं तर होईल का रिपेर.सध्या फ्रिजरमध्ये ठेवलंय. कोणाला काही अनुभव असेल तर प्लीज सांगा.
धन्यवाद शुगोल.
धन्यवाद शुगोल.
आता वरचा थर खारट लागतोय तर खालचा थर कडू. >>> मग अवघड आहे.
घरी भरपूर लाल बीट आहे आणि
घरी भरपूर लाल बीट आहे आणि आणखी येणार आहे त्याच काय काय करता येईल ? काही आयडिया आहे का
बीट कटलेट , बीटाची कोशिंबीर , कच्चा किंवा उकडून मीठ लावून खाणे , लोकांना वाटणे इतकेच मला माहित आहे
अजून काय करता येईल का ? टिकाऊ काही पदार्थ असतात का लोणचं वगैरे सारखे ?
बीट किसून त्याचा हलवा / शिरा करतात का ??
हो हलवा करता येईल,गाजर हलवा
हो हलवा करता येईल,गाजर हलवा style
बीट + नारळ अश्या वड्या पण खूप
बीट + नारळ अश्या वड्या पण खूप सुरेख होतात. करुन बघा. कधी संपतील कळणार पण नाही.
रश्मीला मम. थालीपीठ पण करता
रश्मीला मम. थालीपीठ पण करता येईल.
हो हलवा करता येईल,गाजर हलवा
हो हलवा करता येईल,गाजर हलवा style>> ओके बाकी सगळं सेम च ना कृती? .. बघते करून
बीट + नारळ अश्या वड्या पण खूप सुरेख होतात>> ओह अच्छा .. हे डोक्यात नाही आलं
माझ्याकडे २ बीट आहेत रेड आणि येल्लो वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे पदार्थ करून बघते
धन्यवाद !!
रश्मी, मी तेच लिहिणार होते.
रश्मी, मी तेच लिहिणार होते. बिट + ओला नारळ वड्या फार मस्त होतात आणि दिसतात. बीट गोड असल्यामुळे साखर खूप कमी वापरली जाते, त्यामुळे गिल्ट पण कमी.
बिट कटलेट, बीट सूप आणि शेवटी बीटच्या गोड वड्या /बर्फी असं बीटरूट थीम असलेलं मील होऊन जाऊ दे. (बीट सूप पण मस्त लागतं. )
फ्रिझ सुद्धा करु शकता. लागेल
फ्रिझ सुद्धा करु शकता. लागेल तसे वापरायचे. शिजवुन प्युरे करुन आईस क्युब ट्रेत फ्रिझ करा. सेट झाले की काढुन झिपलाॅकमधे. फ्रिझरमधे महिना दिडमहिना आरामात राहतील.
मीरा.. on 23 July, 2020 - 11
हो ना ! बीटचे सूप , कटलेट, बीटाचा पराठा , कोशिंबीर , बीट राईस** ,हलवा !! झालंö ताट भरलं डाव्या उजव्या बाजूसकट !!
**बीट राईस (जसा टोमॅटो राईस असतो तसा ह्याचा पण बनत असेल करून बघायला हवा , बारीक चिरून )
फ्रिझ सुद्धा करु शकता>> ओह ! ओके .. मी कोणताच पदार्थ अजून तसा फ्रीझ केला नाहीये आता याचं करून बघते .. आक्ख बीट पण ठेवलंय फ्रीझर ला
त्याच काय होतंय ते २-३ दिवसांनी सांगेन
धन्यवाद !! बघते आता कसला कसला उरक पडतोय ते :डोंमा:
हो मीरा. चवीला आणी रंगाला पण
हो मीरा.
चवीला आणी रंगाला पण सुरेख. मला फक्त प्रमाण माहीत नाही. लग्नाच्या आधी स्वयंपाकात माझा उजेड असल्याने मी हे शिकलेच नाही. माझी आई करायची सर्व, पण आता आईच नाही.
मग विचारणार कुणाला?
थोडी अॅडिशन म्हणून मिल्क पावडर घालुन बघता येईल.
हे मस्तेय, जमल्यास पाकृ पण
हे मस्तेय, जमल्यास पाकृ पण द्या न, मला सध्या हिमोग्लोबिन अगदीच कमी झाल्याने बिट खायला सांगितले आहे पण मला काही केल्या खायला जमतच नाहीये पालक अन बीट.
बरे झाले अंजली यांनी इकडे विचारले, मलाही फायदा होईल
कांदा-बीट भाजी पण छान लागते.
कांदा-बीट भाजी पण छान लागते.
नेहमीसारखी फोडणी, कढीलिंब, हि.मिरच्या
चिरलेला कांदा टाकून परतायचा.
मग चिरलेलं बीट टाकून हलवून वाफ द्यायची.
मीठ, ओलं खोबरं, दाण्याचं कूट
भाजी तयार.
बीट गोडसर असतं, म्हणून मिरच्या जरा जास्त घालायच्या.
भाजी एकदम टेस्टी लागते.
एकवेळ ओलं खोबरं नसेल तरी चालेल, पण दाण्याचं कूट हवंच.
एका मोठ्या बिटाची अशी भाजी दोघांना एकवेळ पुरते
उकडहंडीत बिट , बटाटा अशा
उकडहंडीत बिट , बटाटा अशा भाज्या मस्त होतात
बिटाच्या पुऱ्या लिहिल्या आहेत
बिटाच्या पुऱ्या लिहिल्या आहेत का कोणी, नसतील तर मी लिहिते.
बीट उकडले की कंटाळा येतो मला खायला, जास्त गोड होतं ते.
अंजू, जरुर लिही.
अंजू, जरुर लिही.
कृती नाही, पुऱ्या पण करता
कृती नाही, पुऱ्या पण करता येतील असं म्हणणे माझं
शेजारच्या काकी ने मिरच्या
शेजारच्या काकी ने मिरच्या दिल्या आहेत खूप साऱ्या. एकदा तेलात परतून मीठ आणि शेंगदाणा कुट घालून केल्या फ्राय. पण चवीला फारच तिखट आहेत. अजुन काही करता येईल का मिरची दुसरा मुख्य साहित्य म्हणून वापरून
मिरच्यांचे तुकडे करून उन्हात
मिरच्यांचे तुकडे करून उन्हात / मायक्रो मध्ये वाळवा. मिक्सर वर बारीक पूड करून हे पांढरं तिखट फ्रिजमध्ये ठेऊन द्या. लागेल तसं कोशिंबीर, पोहे, साखी, इतर कशातही वापरू शकता. फीज मध्ये वर्षभर काही होत नाही.
कोशिंबीर, पोहे, साखी, इतर
कोशिंबीर, पोहे, साखी, इतर कशातही वापरू शकता. फीज मध्ये वर्षभर काही होत नाही.>>> पोहे वगैरेत तर चालेलच पण उडदाच्या पापडसाठीच्या पीठात तसेच उपासाच्या बटाटा व साबुदाणा पापड, चकली यात पण चालेल.
हो, पापडात वगैरे पण चालत.
हो, पापडात वगैरे पण चालत. इनफॅक्ट त्यासाठीच करतात, पण जपानला तिखट मिरच्या मिळायच्या नाहीत आणि पोहे आणि साखी मध्ये लाल तिखट नको वाटायचं म्हणून मग आई हे करून द्यायची. शिवाय हवं तितकं घालता येतं. पदार्थ अति तिखट होत नाही.
फक्त मिक्सरवर बारीक करताना काळजी घ्या. एकदम नाकात जाऊन ठसका लागु शकतो.
Pages