Submitted by अतुल. on 24 November, 2015 - 22:53
बरेचदा मराठी वाक्प्रचार अथवा शब्दांसाठी तितका प्रभावी व परिणामकारक इंग्लिश पर्यायी शब्द वा वाक्प्रचार सापडत नाही (किंवा आठवत नाही). डिक्शनरी किंवा गुगल ट्रान्सलेशन चा पण फारसा उपयोग होत नाही. अशा वेळी इथे तो शब्द/वाक्प्रचार दिल्यास इतर कोणी मा.बो. कर मदत करू शकेल यासाठी हा धागा.
(अशा प्रकारचा एखादा धागा आधी अस्तित्वात असेल असे वाटले होते. पण "हितगुज:भाषा" मध्ये कुठे दिसला नाही म्हणून नवीन काढला. कृपया धागा न भरकटवता फक्त याच हेतूसाठी वापरला जावा हि विनंती. धन्यवाद.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरा उलटा प्रश्न : 'A wolf in
जरा उलटा प्रश्न :
'A wolf in sheep's clothing' साठी मराठी पर्याय काय ?
मला 'अस्तनीतला निखारा'सुचतोय.
अधिक योग्य जरूर सुचवा.
कौतुक एज इन "कौतुकाने बघितले
कौतुक एज इन "कौतुकाने बघितले / सांगितले" ह्यासाठी काय इंग्रजी पर्यायी शब्द/फ्रेझ वापरता येईल?
कौतुकाने पाहिले - अॅडमायर्ड,
कौतुकाने पाहिले - अॅडमायर्ड, वॉचड विथ प्राइड ,
watched with pride हे जास्त
watched with pride हे जास्त चपखल आहे.
प्राईड म्हटलं की 'अभिमानाने
प्राईड म्हटलं की 'अभिमानाने बघितले' असं होईल.
कौतुक = appreciation अस
कौतुक = appreciation अस मला वाटते आहे.
हो पण watched with pride ही
हो पण watched with pride ही एक फ्रेज आहे. watched with appreciation असे काही नाही. फार फार तर.. त्याने/तिने, gave him an appreciating glance अस म्हणता येईल.
appreciation >> अमेरिकन
appreciation >> अमेरिकन वापरात ह्या शब्दाला ग्रेटफुलनेस ची छटा आहे. कोणी मदत केली तर नुस्तं थॅन्क्स न म्हणता 'आय रियली अप्रिशेयट ' म्हणायची पद्धत आहे .
WATCHED WITH ADMIRATION अस
WATCHED WITH ADMIRATION अस म्हणा मग.
गुगलबाबा WATCHED WITH
गुगलबाबा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
WATCHED WITH appreciation = कौतुकाने पाहिला.
admiration.
admiration.
धन्यवाद! माझ्या मनात आईवडील
धन्यवाद! माझ्या मनात आईवडील आपल्या लहान मुलांचे कौतुक करतात आणि त्यांच्या बाळलीला दुसऱ्यांना कौतुकाने सांगतात त्या अर्थाने प्रश्न होता. मला वाटते अगदी अचूक शब्दप्रयोग जमणार नाही. Appreciation will be closest and based on situation there can be shade of admiration/pride...
मला कधीचे पडलेला १ प्रश्न.
मला कधीचे पडलेला १ प्रश्न. बरं झालं धागा काढला.
नक्कि कर \ नक्कि सांग हा....हे कसं सांगायचं?
मला वाटते अगदी अचूक
मला वाटते अगदी अचूक शब्दप्रयोग जमणार नाही. Appreciation will be closest and based on situation there can be shade of admiration/pride... >. या संदर्भात Appreciation पेक्षा प्राइड जास्ती चपखल बसेल असं मला वाटतं.
कौतुकाचा अतिरेक असं काही दर्शवायचं असेल तर डोटिंग पॅरेंट्स , ग्रॅण्ड पॅरेट्स असं ही म्हणता येइल
कौतुक = कमेंड
कौतुक = कमेंड
नक्कि कर \ नक्कि सांग हा >>
नक्कि कर \ नक्कि सांग हा >>
कॅन यू कमिट, कॅन आय काउंट ऑन यू , कॅन यू कन्फर्म , डू आय हॅव युवर वर्ड फॉर इट
प्रत्येक भाषेचा म्हणून एक
प्रत्येक भाषेचा म्हणून एक लहेजा असतोच, सो अगदीच चपखल शब्द मिळेलच असं प्रत्येकवेळी होत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेकणे (बर्फाने, गरम पाण्याने
शेकणे (बर्फाने, गरम पाण्याने ई.) याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
शेकणे (बर्फाने, गरम पाण्याने
शेकणे (बर्फाने, गरम पाण्याने ई.) याला इंग्लिश मध्ये >>
Using hot or cold compress, Using heat pack or ice pack,
You can also say 'ice the joint' or 'ice the bruised area'
hot fomentation
hot fomentation
'जागरण' (खूप जागणे याअर्थी)
'जागरण' (खूप जागणे याअर्थी) ला इन्ग्लिश शब्द?
बर्निंग द मिडनाइट ऑइल अति
बर्निंग द मिडनाइट ऑइल अति काम, मेहनत, कठोर परिश्रम अशा अर्थाने
पुलिंग ऑल नाइटर - कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासासाठी .
बर्निंग द कँडल अॅट बोथ एंड्स - हा जुन्या पुस्तकात आढळतो.
नाइट आउल - हे साधारण रात्री उशीरा पर्यंत पार्टी , नाच गाणी अशा संदर्भात वापरले जाती
काउंटिंग शीप - निद्रानाशाने होणारे जागरण
मेधा, धन्स.
मेधा, धन्स.
जागरण = 1. Sleeplessness 2.
जागरण =
1. Sleeplessness
2. Insomnolence / insomnia
'उंदराला मांजर साक्ष' -
'उंदराला मांजर साक्ष' - ह्याला संलग्न एखादा वाक्प्रचार आहे का ईंग्रजी मधे? मला सारखं असं वाटतय, की कुठेतरी वाचलाय आणी लक्षात येत नाहीये.
Sleeplessness 2. Insomnolence
Sleeplessness
2. Insomnolence / insomnia >. हे इन्व्हॉलंटरी आहेत.
जागरण मला तरी व्हॉलंटरी वाटतो जसे मंगळागौरीचे , परिक्षे च्या आधीचे जागरण.
इन्सोम्निया ला निद्रानाश जास्त सुटेबल आहे
>>> जागरण मला तरी व्हॉलंटरी
>>> जागरण मला तरी व्हॉलंटरी वाटतो जसे मंगळागौरीचे , परिक्षे च्या आधीचे जागरण.
इन्सोम्निया ला निद्रानाश जास्त सुटेबल आहे
+1
बरं.
बरं.
"हलक्या कानाचा" ला इंग्रजी
"हलक्या कानाचा" ला इंग्रजी शब्द?
Credulous आणि Gullible हे शब्द मिळाले. पण ते थोडे inexperienced / innocent या अर्थाचे वाटतात.
मला ignorant or not-bothered या अर्थाने वापरायचे आहे.
तो बॉस हलक्या कानाचा होता. स्वतः नीट ऑबझरव्ह करून निर्णय घेण्याची तसदी घेत नव्हता असे काहीसे.
बर्निंग द कँडल अॅट बोथ एंड्स
बर्निंग द कँडल अॅट बोथ एंड्स - हा जुन्या पुस्तकात आढळतो.>>>>
मला वाटते याचा संबंध जागरणाशी नसावा , याचा अर्थ---- न सोसणारे / आवाक्या बाहेरचे कष्ट करणे -- असा काहीसा होतो
मेणबत्ती दोन्ही बाजूने पेटवली तर चटकन संपेल, तसेच एखादा माणूस ऑफिस, मग अजून काही activity, सोशल सर्विस , असे सगळे सगळे एकाचवेळी करत असेल आणि त्याचा त्याला भयंकर ताण येत असेल तर त्याच्या बाबतीत वरील वाक्प्रचार वापरता येईल
Pages