Submitted by अतुल. on 24 November, 2015 - 22:53
बरेचदा मराठी वाक्प्रचार अथवा शब्दांसाठी तितका प्रभावी व परिणामकारक इंग्लिश पर्यायी शब्द वा वाक्प्रचार सापडत नाही (किंवा आठवत नाही). डिक्शनरी किंवा गुगल ट्रान्सलेशन चा पण फारसा उपयोग होत नाही. अशा वेळी इथे तो शब्द/वाक्प्रचार दिल्यास इतर कोणी मा.बो. कर मदत करू शकेल यासाठी हा धागा.
(अशा प्रकारचा एखादा धागा आधी अस्तित्वात असेल असे वाटले होते. पण "हितगुज:भाषा" मध्ये कुठे दिसला नाही म्हणून नवीन काढला. कृपया धागा न भरकटवता फक्त याच हेतूसाठी वापरला जावा हि विनंती. धन्यवाद.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला यासाठी इंग्लिश
मला यासाठी इंग्लिश प्रतिशब्द/phrase हवे आहेत:
१. पोकळ सल्ला
२. (एखाद्याला) हाकलून लावणे
१. Hollow advise २. Drive
१. Hollow advise
२. Drive away. Banish.
गूगल ट्रान्सलेट वापरून पहात जा. अनेकदा बरे काम करते.
धन्यवाद ! १. Hollow Advise
धन्यवाद !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१. Hollow Advise हे शब्दशः भाषांतर वाटते. अशी phrase आहे का इंग्रजीत? (मला तरी गुगल वर फारशी आढळत नाही)
२. Drive away योग्य शब्द. धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(हो गुगल ट्रान्सलेट आधी वापरून मगच पोष्ट टाकली)
हाकलून लावणे ला to oust असं
हाकलून लावणे ला to oust असं ही एक क्रियापद वापरतात. बरेचदा जर आपल्याला त्या अर्थाच्या जवळपास जाणारा इंग्रजी शब्द माहिती असेल तर त्या शब्दापुढे thesaurus असे लिहून गुगल करावे. त्याच अर्थाचे निरनिराळे शब्द सापडतील. त्यातून मग तुमच्या वाक्यात चपखल बसणारा शब्द सापडू शकतो.
१. युसलेस टिप्स/पीस आॅफ
१. युसलेस टिप्स/पीस आॅफ ॲडवायस
२. किक हिम/हर आउट
Kicked Out ...... perfect !
Kicked Out ...... perfect !
(Exactly this is what I created this thread)
पोकळ धमक्या ऐकलंय. फुकटचा
पोकळ धमक्या ऐकलंय. फुकटचा सल्ला ऐकलंय. पोकळ सल्ला म्हणजे काय? मदतीची कृती अपेक्षित असताना फक्त सल्ला देणं?
हो. अगदी बरोबर. समस्या नीट
हो. अगदी बरोबर. समस्या नीट समजून घेऊन मदत होईल असे काही सांगण्या ऐवजी फक्त वरवर उपदेशात्मक बोलणे.
>>>पोकळ सल्ला >>>समस्या नीट
>>>पोकळ सल्ला
>>>समस्या नीट समजून घेऊन मदत होईल असे काही सांगण्या ऐवजी फक्त वरवर उपदेशात्मक बोलणे
ह्यासाठी 'bootless advice' चपखल वाटतो.
१)मला भरपूर काम आहे,हात कामात
१)मला भरपूर काम आहे,हात कामात गुंतले आहेत.
२)देखल्या देवा दंडवत
३)नसत्या उठाठेवी /लष्कराच्या भाकय्रा
आणि
४)तोंडावरची माशीही उडवता येत नाही
यांसाठी काही इंग्रजी वाक्ये आहेत का?
१ My hands are full
१ My hands are full
अतुलपाटील हॉलो अॅडव्हाईस हा
अतुलपाटील हॉलो अॅडव्हाईस हा शब्दप्रयोग इंग्रजीत आहे.
http://www.experienceproject.com/groups/Can-Not-Stand-Hollow-Advice-And-...
http://agenomics.ca/2013/08/ageism-hollow-advice-and-lost-opportunities/
मुळात दोन वेगवेगळ्या कल्चर्स
मुळात दोन वेगवेगळ्या कल्चर्स बद्दल होतंय हे असं वाटत नाही का? भारतीय संस्कृती (बाबौ! आलाच शब्द. कृपया विपर्यास नसावा) आणि इंग्रजी कल्चर त्यातही प्रत्येक भागांतलं वेगवेगळं यात फरक आहेच ना?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाषा ही त्या त्या कल्चरशी बांधली गेलेली असते, त्यानुसार मग त्यात लहेजे, वाक्प्रचार, म्हणी इ येतात. सो प्रत्येकच शब्दाचं असं चपखल, तंतोतंत भाषांतर नाही होऊ शकत, असं मला वाटतं. हा, त्या त्या शब्दाच्या जवळपास जाणारे शब्द, म्हणी नक्कीच मिळतील.
योकु +१! 'आमच्या हिच्या
योकु +१! 'आमच्या हिच्या हातच्या गरम गरम थालिपिठांची चव कश्शाकश्शाला नाही' याचं पर्यायी इंग्रजी वाक्य द्या असं सांगण्यासारखं आहे हे
<<१)मला भरपूर काम आहे,हात कामात गुंतले आहेत.
२)देखल्या देवा दंडवत
३)नसत्या उठाठेवी /लष्कराच्या भाकय्रा
आणि
४)तोंडावरची माशीही उडवता येत नाही
यांसाठी काही इंग्रजी वाक्ये आहेत का?>>
यांचं खरंच भाषांतर हवं आहे का 'आमच्या हिच्या...' सारखं चॅलेन्ज आहे हे?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@पुनम ,बरोबर ओळखलेत. वरती
@पुनम ,बरोबर ओळखलेत. वरती @योकु /१०.५० सारखाच प्रतिसाद देणार होतो पण नंतर >>>बरेचदा मराठी वाक्प्रचार अथवा शब्दांसाठी तितका प्रभावी व परिणामकारक इंग्लिश पर्यायी शब्द वा वाक्प्रचार सापडत नाही (किंवा आठवत नाही). डिक्शनरी किंवा गुगल ट्रान्सलेशन चा पण फारसा उपयोग होत नाही. अशा वेळी इथे तो शब्द/वाक्प्रचार दिल्यास इतर कोणी मा.बो. कर मदत करू शकेल यासाठी हा धागा.<<<< हे पुन्हा वाचले आणि धागा चालू रहावा या शुद्ध हेतूने आणखी प्रतिवाक्ये विचारली.काही डोक्याला चालना होईल.
Jack of all but master of non
Jack of all but master of non याला ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ म्हणता येईल का?
आपल्यापेक्षा खूपच तरुण
आपल्यापेक्षा खूपच तरुण व्यक्तीला आपण "हे तर कालचे पोर" किंवा "हि तर कालची पोरं" असे संबोधितो. यातल्या "कालचे पोर" या अर्थाचा (किंवा तसाच परिणाम साधणारा दुसरा एखादा) इंग्रजी शब्द/वाक्प्रचार कोणाला माहित आहे का?
wet behind the ears / hardly
wet behind the ears / hardly dry behind the ears ?
@स्वाती: क्या बात है. परफेक्ट
@स्वाती: क्या बात है. परफेक्ट
धन्यवाद
वेट बिहाईंड द इअर हा काही
वेट बिहाईंड द इअर हा काही चांगल्या (लोकांनी बोलण्याच्या )प्रतीचा शब्द नाही असे वाटते. थोडे स्लँग वाटते.
चु भु द्या घ्या.
आमच्यात (डागदरांच्या सर्कलमध्ये ) तरी आम्ही 'निओफाईट' असा शब्द वापरतो.
हो. तो तसा इतरांना कमी
हो. तो तसा इतरांना कमी लेखणारा शब्द आहे. पण "कालचे पोर" सुद्धा तशाच अर्थाने आहे.
अच्छा neophyte ... नवीन शब्द
अच्छा neophyte ... नवीन शब्द माहिती झाला. धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
wet behind the ears असे का
wet behind the ears असे का म्हणत असावेत? कान, ओला... काय संदर्भ असावा?
गजानन, नुकत्याच जन्मलेल्या
गजानन, नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या शरीरावरील ओला द्रव पुसला तरी कानाच्या मागे थोडा राहून कान ओलसर लागतात म्हणून!
आपल्या मराठीत- अजून ओठ पिरगळले तर दूध निघेल, म्हणतात तसं!
साती, ओके. धन्यवाद. म्हणजे
साती, ओके. धन्यवाद.
म्हणजे अगदीच तास मोजून "काल जन्मलेल्या" ला प्रति-शब्दप्रयोग झाला म्हणायचा.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
स्वाती, सही!
.
.
नॉव्हिस, न्यू कमर , रूकी
नॉव्हिस, न्यू कमर , रूकी किंवा बोली भाषेत जॉनी कम लेटली, न्यूबी हे ऐकले आहेत
Novice, new comer, rookie , Johnny come lately , newbie
न्युबी +१
न्युबी +१
आम्ही काय बान्गड्या नाही
आम्ही काय बान्गड्या नाही भरल्या - अशा अर्थाची इन्ग्रजी म्हण अथवा वाक्प्रचार आहे का?
@डेलिया - त्या अर्थाचा नाही
@डेलिया - त्या अर्थाचा नाही पण त्याच्या अगदी विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार आहे - वेअरिन्ग द पॅन्ट्स.
उदा. शी वेअर्स द पॅन्ट्स अॅट होम!
वेअरिन्ग द फ्रॉक असा नवा वाक्प्रचार बनवता येईल की!!!
Pages