अंजीर बर्फी

Submitted by मृणाल साळवी on 11 November, 2015 - 16:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुकामेवा = १ कप
सुके अंजीर = १५-२० (४ तास पाण्यात भिजवुन)
खजुर = ७-८
तुप = ३ चमचे
वेलची पावडर = १ छोटा चमचा
जायफळ पावडर = १ छोटा चमचा

क्रमवार पाककृती: 

१. एका पॅनमधे सुकामेवा मंद गॅसवर परतुन घ्यावा.

c1

२. मिक्सरमधे भिजवलेले अंजीर आणि खजुर बारीक वाटुन घ्यावे.

c1

३. मिक्सरमधे सुकामेवा बारीक करावा. (खाली फोटोत दाखवल्याप्रमाणे)

c1

४. पॅनमधे ३ चमचे तुप गरम करुन त्यात वाटलेले अंजीर व खजुर परतुन घ्यावे.

c1

५. सर्व मिश्रणाचा गोळा होईपर्यंत परतावे. गोळा तयार झाल्यावर त्यात बारीक केलेला सुकामेवा, वेलची पावडर व जायफळ पावडर टाकुन एकत्र करुन घ्यावे. थोडासा सुकामेवा वरुन सजावटीसाठी बाजुला काढुन ठेवावा.

c1

६. एका खोलगट पॅनला तुप लावुन त्यात हा गोळापारुन घ्यावा.
७. वरुन अजुन थोड्या सुक्यामेव्याने सजवुन बर्फी फ्रिजमधे सेट होण्यासाठी ठेवावी.

c1

८. ३-४ तासानी पॅन बाहेर काढुन त्याच्या वड्या पाडुन घ्याव्यात.

c1

९. अंजीर बर्फी खायला तयार आहे.

c1c1

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाढणी/प्रमाण: 
१३-१५ बर्फी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, मस्त सोप्पी आहे रेसिपी. फोटोही क्लास आले आहेत.
मायबोलीच्या शिरस्त्याप्रमाणे प्रश्न विचारायलाच हवेत. सुक्या मेव्यात बदाम, पिस्ते, काजू इतकंच आहे का? साखरेची अजिबातच गरज नाही का?

हो. ह्यात साखरची गरज लागत नाही. खजुर आणि अंजीरचा गोडवा पुरेसा होतो. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अजुन साखर टाकु शकता.
सगळ्यांचे खुप धन्यवाद. Happy

अहो, कशाला साखर टाकायची, खजुर अंजिर यांची मूळ गोडी जाइल त्याने.
पहिल्यांदाच साखर न टाकता केलेल्या बर्फी बघतोय, छानच आहे. Happy
नक्की करणार मी.

मृणाल, ह्यात खजूरही भिजवून घ्यायचेत का? मी वर तसं लिहिलेलं नाही म्हणून न भिजवताच वाटले अंजीराबरोबर. पण नीट वाटले गेले नाहीत. थोडं दूधही घातलं वाटताना पण तरीही. तेव्हा भिजवणं श्रेयस्कर.

मानव, फोटोत दाखवलेले अंजीर सुद्धा चालतील.

सायो, माझ्या कडचे खजुर जास्त कडक नव्हते, त्यामुळे अंजीर सोबत सहज वाटले गेले. जर खजुर वाटले जात नसतील तर भिजवुन घेतले तरी चलतात. काहि प्रॉब्लेम येणार नाही.

आजच केली बर्फी. ऑस्स्स्सम झाली आहे. साखर घालावी लागेल की काय असं वाटलं पण एकदम बेताची गोड आहे.

सायो म्हणते तसं थोडं दूध घालावं लागलं वाटताना आणि सुकामेवा अर्धा कप पुरला. मी खरं तर मोजून २० अंजीर आणि १० खजूर घेतले होते.

मी अंजीर+खजूर आणि सुकामेवा दोन्ही एस आकाराचं ब्लेड लावून फुड प्रोसेसरमधे वाटले.

खूपच छान!

थँक्स सिंडे, हा बाफ वरती काढल्याबद्दल. ही पाककृती मी वाचली होती, पण प्रतिक्रीया काहीच लिहिली नव्हती. घरी खजूर, अंजीर, मिक्स सुकामेवा सगळंच आहे. ह्याच आठवड्यात करून बघते.

करच, फारच छान लागते ही बर्फी. वर दिलेल्या प्रमाणात काजूकतलीच्या जाडीच्या आणि आकारात तेवढ्याच साधारण १५-१६ बर्फ्या झाल्या.

Pages