सुकामेवा = १ कप
सुके अंजीर = १५-२० (४ तास पाण्यात भिजवुन)
खजुर = ७-८
तुप = ३ चमचे
वेलची पावडर = १ छोटा चमचा
जायफळ पावडर = १ छोटा चमचा
१. एका पॅनमधे सुकामेवा मंद गॅसवर परतुन घ्यावा.
२. मिक्सरमधे भिजवलेले अंजीर आणि खजुर बारीक वाटुन घ्यावे.
३. मिक्सरमधे सुकामेवा बारीक करावा. (खाली फोटोत दाखवल्याप्रमाणे)
४. पॅनमधे ३ चमचे तुप गरम करुन त्यात वाटलेले अंजीर व खजुर परतुन घ्यावे.
५. सर्व मिश्रणाचा गोळा होईपर्यंत परतावे. गोळा तयार झाल्यावर त्यात बारीक केलेला सुकामेवा, वेलची पावडर व जायफळ पावडर टाकुन एकत्र करुन घ्यावे. थोडासा सुकामेवा वरुन सजावटीसाठी बाजुला काढुन ठेवावा.
६. एका खोलगट पॅनला तुप लावुन त्यात हा गोळापारुन घ्यावा.
७. वरुन अजुन थोड्या सुक्यामेव्याने सजवुन बर्फी फ्रिजमधे सेट होण्यासाठी ठेवावी.
८. ३-४ तासानी पॅन बाहेर काढुन त्याच्या वड्या पाडुन घ्याव्यात.
९. अंजीर बर्फी खायला तयार आहे.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
वॉव्,लव्हली!!! छान झालीये
वॉव्,लव्हली!!! छान झालीये बरफी
८-९ फोटो काय सॉल्लिड आहेत.
८-९ फोटो काय सॉल्लिड आहेत. फोटो काढणार्याला/ रीला एक अंजीर बर्फी अधिक इनाम द्या
वॉव खरंच मस्त रेसिपी आणि
वॉव खरंच मस्त रेसिपी आणि सुंदर फोटो .. हे ट्राय करून बघेनच ..
वा, मस्त सोप्पी आहे रेसिपी.
वा, मस्त सोप्पी आहे रेसिपी. फोटोही क्लास आले आहेत.
मायबोलीच्या शिरस्त्याप्रमाणे प्रश्न विचारायलाच हवेत. सुक्या मेव्यात बदाम, पिस्ते, काजू इतकंच आहे का? साखरेची अजिबातच गरज नाही का?
मस्त रेसेपी ..ट्राय करेन या
मस्त रेसेपी ..ट्राय करेन या रेसेपीने अंजीर बर्फी .शेवटचा फोटो झकास एकदम !!
भारी फोटो. फोटो बघून ट्राय
भारी फोटो. फोटो बघून ट्राय करावीशी वाटते आहे,
झक्कास!
झक्कास!
खूप छान. सजावट आणि स्वच्छ
खूप छान. सजावट आणि स्वच्छ उजेड आवडला.
वॉव अगदी, तोपासु... आणि
वॉव अगदी, तोपासु... आणि सजावट पण अप्रतिम..
wow !! superb सोप्पी आहे
wow !! superb
सोप्पी आहे पाकृ . सादरीकरणहि सुरेख
सुंदर दिसतेय बर्फी. सोप्पी
सुंदर दिसतेय बर्फी. सोप्पी आहे करायला. यात थोडा खवा घातला तर मस्त चव येइल असे वाटतेय.
मस्त! साखर न वापरता बर्फी!
मस्त! साखर न वापरता बर्फी! सोप्पी कृती.
हो. ह्यात साखरची गरज लागत
हो. ह्यात साखरची गरज लागत नाही. खजुर आणि अंजीरचा गोडवा पुरेसा होतो. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अजुन साखर टाकु शकता.
सगळ्यांचे खुप धन्यवाद.
छानच जमलीय बर्फी. खजूराचे
छानच जमलीय बर्फी. खजूराचे प्रमाण थोडे वाढवले तर या मिश्रणाला शिजवायचीही गरज राहणार नाही.
अहो, कशाला साखर टाकायची, खजुर
अहो, कशाला साखर टाकायची, खजुर अंजिर यांची मूळ गोडी जाइल त्याने.
पहिल्यांदाच साखर न टाकता केलेल्या बर्फी बघतोय, छानच आहे.
नक्की करणार मी.
फोटो पाहून जीव तृप्त. काय
फोटो पाहून जीव तृप्त. काय सुंदर् फोटो आहेत.
असले सुके अंजीर असतील तर ते
असले सुके अंजीर असतील तर ते सुद्धा पाण्यात भिजवत ठेवावे का ४ तास?
मस्तच! नेहेमीप्रमाणेच फोटोज
मस्तच! नेहेमीप्रमाणेच फोटोज एकदम प्रो आहेत.
मृणाल, ह्यात खजूरही भिजवून
मृणाल, ह्यात खजूरही भिजवून घ्यायचेत का? मी वर तसं लिहिलेलं नाही म्हणून न भिजवताच वाटले अंजीराबरोबर. पण नीट वाटले गेले नाहीत. थोडं दूधही घातलं वाटताना पण तरीही. तेव्हा भिजवणं श्रेयस्कर.
मस्त आहे रेसिपी, मनस्विनिने
मस्त आहे रेसिपी, मनस्विनिने अशी रेसिपि लिहली होती,
मानव, फोटोत दाखवलेले अंजीर
मानव, फोटोत दाखवलेले अंजीर सुद्धा चालतील.
सायो, माझ्या कडचे खजुर जास्त कडक नव्हते, त्यामुळे अंजीर सोबत सहज वाटले गेले. जर खजुर वाटले जात नसतील तर भिजवुन घेतले तरी चलतात. काहि प्रॉब्लेम येणार नाही.
कृती आवडली, शुगरलेस बर्फी
कृती आवडली, शुगरलेस बर्फी पहिल्यांदाच पाहिली, वेळ मिळेल तेव्हा थोडी नक्की करुन पाहणार.
मस्तच..
मस्तच..
आजच केली बर्फी. ऑस्स्स्सम
आजच केली बर्फी. ऑस्स्स्सम झाली आहे. साखर घालावी लागेल की काय असं वाटलं पण एकदम बेताची गोड आहे.
सायो म्हणते तसं थोडं दूध घालावं लागलं वाटताना आणि सुकामेवा अर्धा कप पुरला. मी खरं तर मोजून २० अंजीर आणि १० खजूर घेतले होते.
मी अंजीर+खजूर आणि सुकामेवा दोन्ही एस आकाराचं ब्लेड लावून फुड प्रोसेसरमधे वाटले.
खूपच छान! थँक्स सिंडे, हा
खूपच छान!
थँक्स सिंडे, हा बाफ वरती काढल्याबद्दल. ही पाककृती मी वाचली होती, पण प्रतिक्रीया काहीच लिहिली नव्हती. घरी खजूर, अंजीर, मिक्स सुकामेवा सगळंच आहे. ह्याच आठवड्यात करून बघते.
करच, फारच छान लागते ही बर्फी.
करच, फारच छान लागते ही बर्फी. वर दिलेल्या प्रमाणात काजूकतलीच्या जाडीच्या आणि आकारात तेवढ्याच साधारण १५-१६ बर्फ्या झाल्या.
वा! खूप छान दिसतेय बर्फी !
वा! खूप छान दिसतेय बर्फी !
अरे वा.. पाकृ आवडल्याबद्दल
अरे वा..
पाकृ आवडल्याबद्दल खुप धन्यवाद.
अ प्र ति म !! तुमचे सादरीकरण
अ प्र ति म !!
तुमचे सादरीकरण आणि फोटो नेहमीच खास असतात. रेसिपी तर सुरेख आहेच. नक्की करुन बघेन.
खरच सुंदर.
खरच सुंदर.
Pages