मी एक प्रवाह अवखळ सा,
तू स्थीर पात्र गंगेच,
मी एका अल्लड मुलाच्या हातातला भोवरा,
तू एका राजस कन्येची बाहुली,
मी एक माळरानावरच झाड....ज्याच्या पंखाखाली वसले संसार,
तू एक बागेतला सोनचाफा...तुला पानी शेंदायला माणस चार,
सुगंध तुझा स्वभाव.... मला फक्त उन वाऱ्याची साथ,
नाजूक दोर्याची दोन टोक प्रेमाने एकत्र आली,
पण ह्या सगळ्याची सांगड घालता घालता पार दमणूक झाली,
तुझ्या नी माझ्यात हि काळीकुट्ट दरी आली,
माळरान वरच्या उन्हात चाफ्याचा जीव सुकला
जाण असतानाही असा का खेळ मांडला
माझ्या सुकलेल्या पानात आता तुझा सुगंध नाही
तुलाही आता रानातल्या वाऱ्याचा सोस परवडत नाही
तुझ्या स्थीर पात्राखालाच ढवळण आता नकोस वाटत,
माझ्या खळ खळ नाऱ्या हास्याच दुखं तुला नाटकीच वाटत,
ठरवलं आता ......वरवरच्या ह्या जगण्याला आपण तिलांजली द्यायची,
पण आपल्या वेलीच्या फुलांना सावली कशी द्यायची?
ह्यांचे अर्धे निर्धे तुकडे आपल्याला नाही करता यायचे,
सगळं 'आपल' आता 'माझ आणी तुझ' झालाय,
त्यांच्या मनाचे तुकडे हि आपण वाटून घ्यायचे?