हिरवा चाफा
प्रचि ०१
प्रचि ०२
भुई चाफा
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
(भुईचाफ्याचे प्रचि मायबोलीकर सुन्या आंबोलकरकडुन साभार )
सोनचाफा
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
कवठी चाफा
प्रचि १०
प्रचि ११
(प्रचि मायबोलीकर जागूकडुन साभार )
सफेद चाफा
प्रचि १२
प्रचि १३
(प्रचि मायबोलीकर जागूकडुन साभार )
देवचाफा
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
पांढरा चाफा
प्रचि १८
प्रचि १९
गुलाबी चाफा
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
नागचाफा
प्रचि २४
प्रचि २५
कनकचंपा (मुचकुंद)
प्रचि २६
प्रचि २७
रामधनचंपा
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
तटी:
१. वरील सर्व प्रचि "चाफा" या शिर्षकांतर्गत असले तरी प्रत्येक फुलाचे कूळ (फॅमिली) वेगवेगळी आहे.
२. यातील काही प्रचि मायबोलीवरच पूर्वप्रकाशित आहे. या थीमसाठी पुन्हा एकत्र केलेत.
३. शिर्षक कवियत्री इंदिरा संत यांच्या "बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले....." या कवितेतील.
क्या बात है!! आज पहिल्यांदा
क्या बात है!!
आज पहिल्यांदा चाफा बोलला..
सुरेख!
सुरेख!
छानच. २९ नंबर रामधनचंपाचे फळ
छानच.
२९ नंबर रामधनचंपाचे फळ आहे. त्यात हिरव्या / काळ्या बिया असत्या तर ते कर्णफुलासारखे दिसले असते. कनकचंपाचा ( फुलाचा ) फोटो सकाळी काढायला हवा. त्यावेळी ते पांढरेशुभ्र असते. आणि तो फोटोही जरा वरतून घ्यावा लागतो, ते फूल झाडाखालून नीट दिसत नाही. हातात धरून फोटो काढलाय तो त्याच्या बाह्यदलांचा. तेही सुगंधी असते व त्याची वीण घालून डोक्यात माळतात.
वा! किती सुरेख थीम आणि सुरेख
वा! किती सुरेख थीम आणि सुरेख शीर्षक.
किती वेगवेगळे प्रकार आहे चाफ्यात. फॅमिल्या वेगळ्या आहेत हे दिसतंच आहे. मग यांना सगळ्यांना चाफा का म्हणू लागले असतील देव जाणे.
देवचाफा, सफेदचाफा, गुलाबी चाफा यात अनेकानेक छान छान छटा असतात. मी गोव्याला आणि पाँडिचेरीच्या ऑरोविलमध्ये मस्त रंग बघितले आहेत. फोटो आहेत का ते शोधते ....
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद
वरील सगळे फोटो "बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले, शिंपण घातले....चाफ्याचे शिंपण घातले" आशाताईंचे गाणे ऐकत पाहतोय. मस्तच वाटतंय.
किरू
मी गोव्याला आणि पाँडिचेरीच्या ऑरोविलमध्ये मस्त रंग बघितले आहेत. फोटो आहेत का ते शोधते ....>>>>>मामी, फोटो सापडल्यावर इथे पण पोस्ट कर.
काय मस्त आहे इतके प्रकार एकदम
काय मस्त आहे
इतके प्रकार एकदम पहायला मिळाले.
मस्त...
मस्त...
सुंदर... लपविलास तु हिरवा
सुंदर...
लपविलास तु हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का... हे मालति पांडे (बर्वे) यांचं गाणं आठवलं...
आमच्या इथे (सदर्न स्टेट्समधे) हे चाफ्याच्या जातकुळीतलं (चुभुदेघे) झाड सापडतं, मॅग्नोलिया. काहि फुलांचा डायामिटर ऑल्मोस्ट एक फुट असतो, परंतु सुवास नाहि...
हे आमच्या नेबरहुडमधलं -
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
मेजवानी आहे मस्त.
मेजवानी आहे मस्त.
काहि फुलांचा डायामिटर
काहि फुलांचा डायामिटर ऑल्मोस्ट एक फुट असतो, परंतु सुवास नाहि...>>>>> येस्स, याच्याबद्दल ऐकलेलं. हा मॅग्नोलिया कश्मिरमध्ये दिसलेला
वा वा!! अगदी गाण्यासहीत
वा वा!! अगदी गाण्यासहीत दरवळला!!
ओह थॅंक्स; दुरुस्ती करतो...
ओह थॅंक्स; दुरुस्ती करतो...
मस्त!!
मस्त!!
मस्त आहेत फोटो..
मस्त आहेत फोटो..
आहाहा.. सुंदर थीम ,
आहाहा.. सुंदर थीम , फोटोंबद्दल नवीन विशेषणे कुठून आणू बरं!!!!
काही प्रकार पहिल्यांदाच पाहिले.. सुपर!!!
मस्त कल्पना आहे. काही काही
मस्त कल्पना आहे. काही काही चाफा कुळातील फुले माहीती पण नव्हती. हे संकलन करायला योग्याला मदत करणार्यांचे पण आभार.
एक फुस. काही फुले तोडुन हातात धरुन त्याचे फोटो काढले आहेत ते आवडले नाही. त्यापेक्षा ती फुले कुठेतरी ठेवुन फोटो काढल्यास छान वाटेल.
बाकी फोटो म्हणुन फोटो काही खास वाटले नाहीत पण एक कल्पना व कलेक्शन म्हणुन मस्त आहेत.
मस्त कलेक्शन..
मस्त कलेक्शन..
एक फुस. काही फुले तोडुन हातात
एक फुस. काही फुले तोडुन हातात धरुन त्याचे फोटो काढले आहेत ते आवडले नाही.
हिरव्या चाफ्याचे माहित नाही, पण प्रचि २७ मधला कनकचंपा रस्त्यावर पडलेला उचललेला आहे हे मी नक्कीच सांगु शकते (हा जर राणीबागेतला फोटो असेल तर माझ्यासमोरच ही उचलाउचली झाली, आम्ही तिथे काही फुले उचलली होती) हा वृक्ष १०-१५ फुट वाढल्यानंतरच फुले द्यायला लागतो, त्यामुळे त्याची फुले हाताने खुडणे अशक्य. हिरव्या चाफ्याचा वेल आहे, त्याची फुले जिस्प्याने खुडली असावित... आयुष्यात पहिल्यांदाच हिरवा चाफा पाहिल्याचा आनंद तो घरच्यांबरोबर चाफ्याच्या वासासोबत वाटुन घेऊ इच्छित असावा.
साधना फुले खुडण्याबद्दल नाही
साधना फुले खुडण्याबद्दल नाही तर ती हातात धरुन फोटो काढले की मजा जाते असे म्हणतोय. त्याऐवजी ते कुठेतरी जमिनीवर, भिंतीवर एखाद्या भांड्यात ठेवले तर फोटो मस्त येईल.
असो. वासाकरता माझ्या टॉपला कवठीचाफा व सफेदचाफा. सफेद चाफ्याचा झाडाखालुन गेलो तरी त्याचा गंध लपुन रहात नाही.
सगळेच फोटो अप्रतिम, अगदी
सगळेच फोटो अप्रतिम, अगदी स्वर्गीय सौन्दर्य...स्मित
शिर्षक फार आवडले..
नाग चाफा, मुचकंद, रामधन चंपा हे सगळेच मला नविन ... >> +१
प्रचि मस्तच..
सुंदर !
सुंदर !
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
एक फुस. काही फुले तोडुन हातात
एक फुस. काही फुले तोडुन हातात धरुन त्याचे फोटो काढले आहेत ते आवडले नाही. >> हो, मला ही नाही आवडत. फुलाची जागा झाडावरच असं वाटत.
भूई चाफा हा प्रकार भन्नाट आहे
भूई चाफा हा प्रकार भन्नाट आहे फक्त चैत्रातच बहुतेक फुल येतात.. आणि बरोबर पाने नसतातच.. आणि नंतर वर्षभर पाने.. एका कंदाला एकच फुल येतं,,
मस्त.. पांढरा चाफा आणि
मस्त.. पांढरा चाफा आणि देवेचाफा पाहिलेत, बाकीचे इथेच पाहिलेत
मस्त प्रचि! मलाही खूप आवडतो
मस्त प्रचि! मलाही खूप आवडतो चाफा! माझ्या चीपाॅयवर रोज चाफ्याची फुलेच असताता
वा! सुगंध सुगंध....
वा! सुगंध सुगंध....
मस्त फोटो कितीतरी नविन
मस्त फोटो
कितीतरी नविन प्रकार समजले चाफ्याचे - भुई चाफा, नागचाफा, कनकचंपा (मुचकुंद), रामधनचंपा.
का माहित नाही पण मला गुलाबी चाफा नाही आवडत
रत्नगिरीला भगवतीला बरीच पांढर्या चाफ्याची झाडे आहेत बहुतेक. लहानपणी पाहिली होती. त्याचा मस्त मंद सुगंध यायचा
मस्तच जिप्सी!!
मस्तच जिप्सी!!
Pages