चाफ्याचे शिंपण घातले...

Submitted by जिप्सी on 28 October, 2015 - 05:17

हिरवा चाफा
प्रचि ०१

प्रचि ०२
भुई चाफा
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

(भुईचाफ्याचे प्रचि मायबोलीकर सुन्या आंबोलकरकडुन साभार Happy )

सोनचाफा
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
कवठी चाफा
प्रचि १०

प्रचि ११

(प्रचि मायबोलीकर जागूकडुन साभार Happy )

सफेद चाफा
प्रचि १२

प्रचि १३

(प्रचि मायबोलीकर जागूकडुन साभार Happy )

देवचाफा
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
पांढरा चाफा
प्रचि १८

प्रचि १९
गुलाबी चाफा
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

नागचाफा

प्रचि २४

प्रचि २५
कनकचंपा (मुचकुंद)
प्रचि २६

प्रचि २७
रामधनचंपा
प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
तटी:
१. वरील सर्व प्रचि "चाफा" या शिर्षकांतर्गत असले तरी प्रत्येक फुलाचे कूळ (फॅमिली) वेगवेगळी आहे. Happy
२. यातील काही प्रचि मायबोलीवरच पूर्वप्रकाशित आहे. या थीमसाठी पुन्हा एकत्र केलेत. Happy
३. शिर्षक कवियत्री इंदिरा संत यांच्या "बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले....." या कवितेतील. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान.

मागे दिनेशदांनी भुईचाफ्याचे जे फुल टाकले होते ते वेगळे होते. तू जे अपलोड केले ते वेगळे दिसत आहे. आणि सफेद चाफ्यालाच हिरवा चाफा नाही म्हणत का? इथे सिंगापुरात तू जे म्हणतेस तो सफेद चाफा कितीतरी ठिकाणी आढळतो. त्याचा वास इतका सुंदर आहे की मला वाटत तोच हिरवा चाफा असावा कारण त्याला पांढर्‍यापेक्षा हिरवी छटा जास्त आहे.

प्रचि २९ चे नाव काय आहे?

थंड | 28 October, 2015 - 05:23

सुंदरच! चाफ्याचा सुवास दरवळ्ला!
अनंतचाफा नाहिये न ह्यात?

तू जे अपलोड केले ते वेगळे दिसत आहे. आणि सफेद चाफ्यालाच हिरवा चाफा नाही म्हणत का?>>>>बी, दिनेशदांनी कुठले फोटो टाकलेले ते माहिते नाही रे. सफेद चाफ्याला हिरवा चाफा नाही म्हणत. Happy प्रचि ०१ आणि ०२ मध्ये जो आहे तोच हिरवा चाफा. हिरव्या चाफ्याचा सुगंध एकदम कातिल असतो. Happy

प्रचि २९ चे नाव काय आहे?>>>>प्रचि २९ रामधनचंपाच आहे. फुल सुकल्यावरचा फोटो आहे. याला काळसर रंगाच्या बिया येतात.

अरे दोन धागे झालेत!!!!>>>>अके, एका धाग्यातील मजकुर/चित्र काढुन टाकलाय आणि अ‍ॅडमिनला डिलीट करण्याची विनंती केली आहे.

थंड, तुमचा प्रतिसाद या धाग्यावर पोस्ट केला. Happy

जिप्सी, चाफा अगदीच जिव्हाळ्यचा , त्या मुळे खुप खुप आभार.. Happy
सगळेच फोटो अप्रतिम, अगदी स्वर्गीय सौन्दर्य...:)
शिर्षक फार आवडले..
नाग चाफा, मुचकंद, रामधन चंपा हे सगळेच मला नविन ...
आत्ता केव्हा एकदा मी प्रत्यक्षात पाहिन असे झाले आहे..
प्र.ची २९ चे नाव काय?

प्र.ची १२, आणि १३ पांढरा सोनचाफा..:)ईतक्यात्च लावलाय मी, गणपतीच्या सुमारास फुलं देखिल आलेली..

जिप्सी,
प्रचि २९ चे नाव काय आहे?>>>>प्रचि २९ रामधनचंपाच आहे. फुल सुकल्यावरचा फोटो आहे. याला काळसर रंगाच्या बिया येतात.>>

प्रचि २८ हे पिवळ्या रंगाचे फुल आहे आणि त्याला जास्त पाकळ्या आहेत. मग २८ आणि २९ दोन्ही फुले कसे असतील?

Bandhile me bandhile indrache toran bandhile, maze atishay avadate gane. Sarvsakshi chitrapatat aahe bahutek. Smita Patil. Jayraam hardikar.

Sorry for Roman.

Asha kavitechya oli ani Gipsy photo lekhan mhanaje najrela ani manala surekh mejvaani.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

प्रचि २८ हे पिवळ्या रंगाचे फुल आहे आणि त्याला जास्त पाकळ्या आहेत. मग २८ आणि २९ दोन्ही फुले कसे असतील?>>>>>बी हे दोन्ही एकाच झाडाचे आहेत Happy तुझ्यासारखाच माझाही समज होता. पण पिवळ्या रंगाच्या फुलाच्या पाकळ्या गळुन गेल्यावर लाल रंगाच्या यात काळ्या बिया येतात. Happy कधी मुंबईला आलास तर हिरानंदानी गार्डन किंवा राणी बागेत प्रत्यक्ष दाखवेन. Happy

थंड, अनंतचाफ्याबद्दल नाही माहित. Sad

अन्जु ताई माझेही अत्यंत आवडीचे गाणे. सर्वसाक्षी चित्रपटातीलच आहे, स्मिता पाटीलवर चित्रित Happy

मस्त शिंपण घातलेस रे भाऊ,.....

देवचाफा उर्फ फ्रंजिपॅनी उर्फ प्लुमेरिआ मध्ये अजुन एक फुल येते लांब पेन्सिलीसारख्या पांढ-या पाकळ्या असलेले. प्रचि १८ मध्ये आहे तसे दिसणारे, पण त्या पाकळ्या अजुन भरपुर मागे खेचल्या तर कशा पेन्सिलीसारख्या बारिक आणि लांब होतील तशा.. माझ्या आधीच्या ऑफिसात होते त्याचे झाड. देवचाफ्याला अगदी मंद असा सुवास पण आहे, आणि भरपुर मध... मुण्ग्या मरत असतात या झाडावर....

भुईचाफा वाढतोय माझ्याकडे. बघु फुले येतात का..

सुंदर!
भुईचाफा, सफेद चाफा, रामधनचंपा, नागचाफा अजून बघायचेत... सफेद आणि पांढरा - इतके वेगळे? Happy

हे रामधन आणि नागचाफा कुठे आणि कधी फुलतात? ही फुले बाजारात नाही मिळत ना?

Mala chafyache thodech prakar mahitey. Bhuichafa aikun mahitey. Sonchafa, kavathi chafa ani nehemichech laal pivale chafe mahit hote. Baki aaj kalale prakar.

जिप्सि, किती चमत्कारिक वाटत हे सर्व .. इथे पण ते लाल फुल दिसते आणि पिवळे सुद्धा. आज तुझ्यामुळे कळले हे असे का आहे .. धन्यवाद Happy

हे रामधन आणि नागचाफा कुठे आणि कधी फुलतात? ही फुले बाजारात नाही मिळत ना?

राणीबागेत फुलतात की.. एक पुर्ण गल्ली नागचाफ्याची आहे, त्यात ओळीने ८-१० तरी झाडे असतील. रामधनाची ३-४ झाडे असावीत.

Pages