श्रीलंका सहल - भाग १ - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/55306
श्रीलंका सहल - भाग १ - एअरपोर्ट ते नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55355
श्रीलंका सहल - भाग २ अ - हॉर्टॉन प्लेन्स नॅशनल पार्क
http://www.maayboli.com/node/55444
श्रीलंका सहल - भाग २ ब - हॉर्टोन प्लेन्स नॅशनल पार्क http://www.maayboli.com/node/55445
श्रीलंका सहल -भाग ३ - न्यू झीलंड फार्म, अशोक वाटीका, अरालिया ग्रीन हिल्स
http://www.maayboli.com/node/55526
श्रीलंका सहल - भाग ४ - व्हीक्टोरिया गार्डन, नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55845
श्रीलंका सहल - भाग ५ - नुवारा एलिया ते कँडी http://www.maayboli.com/node/55900
श्रीलंका सहल - भाग ६ - सिगिरीया http://www.maayboli.com/node/55940
श्रीलंका सहल - भाग ७ - कँडी रॉयल बोटॅनिकल गार्डन
•
http://www.maayboli.com/node/56086
इथून पुढे...
या बागेच्या एका भागात ऑर्किड्स चे दालन आहे. ऑर्किड्स ची फुले म्हणजे माझा विक पाँईट. कितीही बघत बसलो तरी समाधान होत नाही. सिंगापूर, बँकॉक, बाली, मॉरिशियस, नैरोबी इथली फुले बघण्याचे भाग्य मला लाभले आहे. आपल्याकडे ईशान्य भारतात त्याची पद्धतशीर लागवड होते आणि १२ ते १४ एप्रिल ला तिथे त्यांचा महोत्सव भरतो, हे मी वाचलेय फक्त पण कधी तिथे जाण्याचा योग आला नाही.
आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रातही निसर्गतः काही ऑर्किड्स फुलतात. या फुलांभोवती एक गूढ वलय आहे कोकणात. सहसा हि फुले देवपुजेत वापरत नाहीत. ही गुढता आलीय ती अनेक बाबींमूळे. ही झाडे सहसा जमिनीवर नसतात तर एखाद्या झाडावर, तीदेखील वरच्या फांद्यांवर उगवतात ( ती बांड्गुळे असावीत असा एक
गैरसमज कोकणात आहे. तो अर्थात्च खरा नाही. ऑर्किड्स मूळ झाडाचे शोषण करत नाहीत. ते हवेतूनच पाणी आणि पोषक द्रव्ये मिळवतात. त्यासाठी त्यांची मुळे खास सक्षम असतात ) ती अचानक आणि मोठ्या संख्येने उमलतात. आकाराने मोठी, रंगाने भडक असतात. शिवाय ती कशी उगवतात, याचेही गुढ आहेच कारण तिला फळे जरी लागली तरी बिया सहज रुजत नाहीत ( त्यासाठी एक उपाय म्हणजे ती फळे वासराला खायला देऊन, त्याचे शेण वापरायचे , त्यातल्या बिया रुजतात )
वर उल्लेख केलेल्या देशात टिश्यू कल्चरने त्यांची पैदास केली जाते. त्याच्या नवीन नवीन जातीही तयार करतात.
आपल्याकडेही बाहुली आमरी, कथकली आमरी, भ्रमर आमरी असे खास वाण आहेत. ( मीच एक सविस्तर लेखही लिहिला होता पुर्वी )
तर ही तिथली फुले. हे दालन बंदीस्त आह त्यामूळे प्रकाश अपुरा होता फोटोसाठी. तरीपण या फुलांचे सौंदर्य जाणवेलच. या दालनाच्या बाहेर मसाल्याच्या झाडांचा विभाग आहे. तिथे एका मोठ्या फळाचे झाड दिसले ( तो कसला मसाला ते मात्र कळले नाही कारण तेवढ्यात पाऊस सुरु झाला होता. ) तिथे एक गिफ्ट शॉप आहे. सुगंधी तेले, अगरबत्या, टि शर्ट्स मिळतात. बाहेर एक कॉफी शॉप आहे.
आता आम्ही कोलंबोकडे निघालो. वाटेत आधी कबूल केल्याप्रमाणे थिवांकाच्या घरी जेवलो.
2)
3)
4)
5)
6)
7)
8)
9)
10)
11)
12)
13)
14)
15)
16)
17)
18)
19)
20)
21)
22)
23)
24)
25)
26)
27)
28)
29)
30)
31)
32)
33)
34)
35)
36)
37)
38)
39)
40)
41)
42)
44)
45)
46)
47)
48)
49)
50)
51)
52)
53)
54)
55)
56)
57)
58)
59)
60)
61)
62)
63)
64)
65)
66) This was a fruit of some spice tree, could not get the name though.
67) Lunch at Thiwanka’s place
क्रमशः
अतीव सूंदर चित्र !!
अतीव सूंदर चित्र !!
आहाहा सुरेख. किती विविधता
आहाहा सुरेख. किती विविधता रंगांची. परत येईन बघायला.
४ नं. मंकी ऑर्किड आहे का.
शेवटची कलरफुल डिश टाकायलाच हवी होती का . भूक लागलीना.
वाह!! किती सुरेख ऑर्किड्स..
वाह!! किती सुरेख ऑर्किड्स.. एक से बढकर एक..
ते जेवण किती मिक्स्ड काय काय आहे?? पदार्थ ओळखू येत नाहीयेत.. नावं सांग बरं आणी जमल्यास एखादी श्रीलंकन रेसिपी ही टाक सेपरेट!!!
सुरेख ऑर्किड्स. ईशान्य
सुरेख ऑर्किड्स.
ईशान्य भारतातील ऑर्किड्स महोत्सव पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे.
आभार, अन्जू, मंकी ऑर्किड
आभार,
अन्जू, मंकी ऑर्किड वेगळे असते.
वर्षू, अगदी घरगुति जेवण. लाल तांदळाचा भात, मुगाची भाजी, बीटची भाजी, संबळ, छोले वगैरे पण सगळे पदार्थ मला आवडले. रेसिपी टाकीनच कधीतरी.
सकुरा.. मला खुप इच्छा आहे ती राज्ये बघायची. बघू या कधी शक्य होतेय ते.
फारच सुंदर फोटो दिनेश.
फारच सुंदर फोटो दिनेश.
सुंदर! आता श्रीलंकन
सुंदर! आता श्रीलंकन खाद्ययात्राही येऊ देत...
सुंदर फोटोज!!!
सुंदर फोटोज!!!
मला ते जेवणाचे ताट फार आवडले.
मला ते जेवणाचे ताट फार आवडले. तो भात फार छान दिसतो. मला वाटत रेड राईस वापरला. ब्राऊन राईस नाही वाटत.
बाकी ऑर्चिड छान टिपलेत. पण इथे मला रोजच दिसतात ऑर्चिड.
आभार.. बी, तूमच्याकडच्या
आभार..
बी, तूमच्याकडच्या ऑर्किड कलेक्शनला तोड नाही. सिंगापूरचे राष्ट्रीय फूलच आहे ना ते. खरं तर आयूष्यात पहिल्यांदा, एवढ्या संख्येत ऑर्किड्स मी तिथेच बघितली.
मस्तच दिनेश दा . आता रेसेपि
मस्तच दिनेश दा . आता रेसेपि पन येउ द्या लवकरच
फोटो खुप सुंदर आहेत. अर्थात
फोटो खुप सुंदर आहेत. अर्थात ऑब्जेक्टच सुंदर म्हटल्यावर काय....
but somehow I am not in love with orchids... मला नाही आवडात एवढी. मला सुवासिक फुले आवडतात.
लाल तांदळाचा भात ब-याच दिवसांनी पाहिला.
दिनेशदा खुप सुंदर फोटो.
दिनेशदा खुप सुंदर फोटो.
बघावे ते नवलच.. दिनेश दा
बघावे ते नवलच.. दिनेश दा तुम्ही काही कंद / बीया आणल्या अहेत का तीकडुन..
साधना, या बहुतेक सगळ्या
साधना, या बहुतेक सगळ्या हायब्रीड जाती आहेत. आपल्याकडे काही आमरी सुगंधी असतात. पण त्या बहुतेक झाडांवर उंच जागी असतात. सहसा नजरेला पडत नाहीत. ( व्हॅनिला पण ऑर्किड आहे. )
सायु, तिथे तसे काही विक्रीला नव्हते. सिंगापूरमधे मिळू शकतात. आपल्याकडे अजून याचा म्हणावा तसा प्रसार नाही. उष्ण आणि दमट हवामानात चांगल्या होतात या. मुंबईला तयार झाडे मिळू शकतील.
खुपच सुंदर फोटो
खुपच सुंदर फोटो
सायु, पहिल्या फोटोत
सायु, पहिल्या फोटोत बियांबद्दल माहिती आहे. या बिया रुजण्यासाठी एका खास बुरशीची मदत लागते.
किती प्रकारची ऑर्किड्स आहेत
किती प्रकारची ऑर्किड्स आहेत !!!
सर्व फोटो सुर्रेखच ...
बाप रे.....किती...प्रकार !!!
बाप रे.....किती...प्रकार !!! सुन्दर!!!
परत आभार.. केनयामधल्या
परत आभार..
केनयामधल्या ऑर्किड्स चे पण ख्प फोटो दिले होते मी.
३ भाग आहेत, अवश्य पहा.
http://www.maayboli.com/node/30025
http://www.maayboli.com/node/30026
http://www.maayboli.com/node/30027