प्रचि ०१
"आसमंत दाराशी सुरू होतो. पायाखालच्या सावळ्या मखमलीपासून नक्षत्रापर्यंत आसमंताच्या आविष्कारांकडे चौकस, संवेदनाक्षम नजरेनं पाहिलं तर थक्क करणारी अनोखी अंतरंग उलगडतात. प्रतिमांच्या पलीकडचं दिसू लागतं. कविता आशयघन होतात. निसर्गाच्या सान्निध्यात ताणतणाव दूर होतात.विश्वात आपण क्षुद्र आहोत हे उमगतं. अहंकार लुप्त होतो. निरागस आनंद मिळतो. निसर्गनिरीक्षणातून सृष्टीच्या निर्मितीचा विचार अस्वस्थ करतो आणि मनाला थेट परमेश्वरापर्यंत पोचवतो. निसर्गात आश्चर्याचा साठा अमाप आहे. निसर्गाच्या लोभस प्रतिमा पाहायला कुठं दूरदेशी जायला नको. मंतरलेला आसमंत आपल्या दाराशीच आतुरतेनं साद घालतोय. त्याच्या आविष्कारांचा वेध घेण्यासाठी तरल मनाची कवाडं उघडा."
("आसमंत" - श्रीकांत इंगळहळीकर, करोला पब्लिकेशन)
त्या रात्री गप्पांची मैफिल अंमळ जरा उशीरापर्यंतच रंगली. रात्री मैफिलीची सांगता होतानाच घरात शिरणार्यां धुक्यांचे लोटांनी उद्या काहीतरी अविस्मरणीय पहावयास मिळणार याची चुणुक दाखवली. पहाटे जरा उशीराच म्हणजे ५:४५ला जाग आली, फ्रेश होऊन बंगल्याच्या दरवाजा उघडल्यावर समोरच्या दृष्याने भारावून गेलो. डोंगरावरून वाहणारे पांढरेशुभ्र दाट धुके, दरीतुन वाहत येणारे श्वेतवर्णीय धुके, शहरावर पांघरलेली धवल रंगाची दुलई आणि पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लावण्यासाठी उत्सुक असलेला सूर्यनारायण. खरोखर एक "मंतरलेला आसमंत" आमच्या दाराशी आतुरतेने साद घालत होता. सूर्यनारायणाचा हा "आगमन सोहळा" अवर्णनीय होता.
"हळू हळू रेखांकित होईल, सुंदर स्वप्नांची, भासांची धूसर सृष्टी
सारे शाश्वत आणि शुभंकर, अनायास आकारा येईल तुझियासाठी"
(कवी: सुधीरजी मोघे)
प्रचि ०२
आतापर्यंत सूर्यदेवाची विविध रूपे पाहिली होती पण आज त्याचा थाट काही निराळाच. हा सारा "सोहळा" कॅमेर्यासत बंदिस्त करू कि डोळ्यात साठवू अशा संभ्रमावस्थेत होतो. तंद्री भंग पावल्यावर कॅमेर्याने हा सारा उत्सव टिपु लागलो. कदाचित फोटोंमधुन हा नयनरम्य सोहळा जाणवणार नाही पण प्रत्यक्षातील ते काही क्षण वर्णनातीत होते. साधारण अर्धा पाऊण तास चाललेला हा प्रकाशोत्सव एक अविस्मरणीय आठवण देऊन गेला. अर्थात त्यानंतरही हा भारावलेला आसमंत सोबत होताच. सातारा, यवतेश्वराचा डोंगर व चाळकेवाडी येथुन टिपलेल्या "आसमंताची" हि चित्रसफर.
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ...
प्रचि १२(वरील प्रचिंवर पोस्ट प्रोसेसिंग मायबोलीकर Sano (संदेश करलकर) यांनी केले आहे.
)
एक से एक भन्नाट फोटो मित्रा
एक से एक भन्नाट फोटो मित्रा !!!
नेहमीप्रमाणेच अप्रतीम.
नेहमीप्रमाणेच अप्रतीम.

क्षितिजी आले भरते गं, घनात
क्षितिजी आले भरते गं,
घनात कुंकुम खिरते गं ...बोरकरांच्या या ओळी साक्षात प्रगटल्यात . तुम्ही त्या योग्य कोनातून टिपण्यात यशस्वी झालात ...सुन्दर अनुभुती...
निव्वळ सुंदर... खूपच आवडले
निव्वळ सुंदर... खूपच आवडले
सुंदर्,अति सुंदर.. निसर्गा ला
सुंदर्,अति सुंदर.. निसर्गा ला कॅमेराबद्ध करण्याचे कौशल्य तुझेच.. ग्रेट जॉब जिप्सी
व्वाह! सुरेख!
व्वाह! सुरेख!
जिप्स्या.. फोटो जपून ठेव रे
जिप्स्या.. फोटो जपून ठेव रे बाबा.. कुठल्या तरी कॅलेंडरच्या पानावर दिसायचे पुढच्या वर्षी...
अप्रतिम.... फोटोज!!!
अप्रतिम.... फोटोज!!!
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!
अशक्य सुंदर!!
अशक्य सुंदर!!
जिप्स्या, पार्शॅलिटी करतोस
जिप्स्या, पार्शॅलिटी करतोस काय रे, दुसर्यांदा धन्यवाद केलेस ते सगळ्यांचे का नाही ? कुणाला वगळलेस ? मला कि काय ?
मस्त रे. माझ्या गावी जाउन
मस्त रे.
माझ्या गावी जाउन आलास..
वावावावावा!!!!!!!
वावावावावा!!!!!!!
जिप्सी नेहमीप्रमाणेच फोटोज
जिप्सी नेहमीप्रमाणेच फोटोज अप्रतिम आले आहेत , दोन नंबरचा फोटो तर साक्षात स्वर्गाचा एक नमुनाच असावा असे भासवत आहे .
इतके जास्त साईझ चे फोटो कसे काय उपलोड करता तुमी ?
पहिले चार फोटो तर क्लास अगदी
पहिले चार फोटो तर क्लास अगदी ..खूपच सुंदर फोटो
नि:शब्द केलेस. एकूण एक फोटो
नि:शब्द केलेस. एकूण एक फोटो सुंदर आहे या फिचरमधला.
रच्याकने, 'असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याला सामोरं येतया आभाळ' या ओळी स्विफ्टुलीला जास्त लागू होताहेत त्या फोटोत
. आणि तोच फोटो सगळ्यात जास्त आवडला मला. विशाल, अमर्याद, थोडेसे रौद्र दिसणारे आकाश आणि त्याखाली बेदरकारपणे, त्याच्या रंगाला पण काँट्रास्ट देत उभी असलेली मानवाची निर्मिती. क्लासिक!
अप्रतिम .....!
अप्रतिम .....!
अप्रतिम......
अप्रतिम......
Pages