प्रचि ०१
"आसमंत दाराशी सुरू होतो. पायाखालच्या सावळ्या मखमलीपासून नक्षत्रापर्यंत आसमंताच्या आविष्कारांकडे चौकस, संवेदनाक्षम नजरेनं पाहिलं तर थक्क करणारी अनोखी अंतरंग उलगडतात. प्रतिमांच्या पलीकडचं दिसू लागतं. कविता आशयघन होतात. निसर्गाच्या सान्निध्यात ताणतणाव दूर होतात.विश्वात आपण क्षुद्र आहोत हे उमगतं. अहंकार लुप्त होतो. निरागस आनंद मिळतो. निसर्गनिरीक्षणातून सृष्टीच्या निर्मितीचा विचार अस्वस्थ करतो आणि मनाला थेट परमेश्वरापर्यंत पोचवतो. निसर्गात आश्चर्याचा साठा अमाप आहे. निसर्गाच्या लोभस प्रतिमा पाहायला कुठं दूरदेशी जायला नको. मंतरलेला आसमंत आपल्या दाराशीच आतुरतेनं साद घालतोय. त्याच्या आविष्कारांचा वेध घेण्यासाठी तरल मनाची कवाडं उघडा."
("आसमंत" - श्रीकांत इंगळहळीकर, करोला पब्लिकेशन)
त्या रात्री गप्पांची मैफिल अंमळ जरा उशीरापर्यंतच रंगली. रात्री मैफिलीची सांगता होतानाच घरात शिरणार्यां धुक्यांचे लोटांनी उद्या काहीतरी अविस्मरणीय पहावयास मिळणार याची चुणुक दाखवली. पहाटे जरा उशीराच म्हणजे ५:४५ला जाग आली, फ्रेश होऊन बंगल्याच्या दरवाजा उघडल्यावर समोरच्या दृष्याने भारावून गेलो. डोंगरावरून वाहणारे पांढरेशुभ्र दाट धुके, दरीतुन वाहत येणारे श्वेतवर्णीय धुके, शहरावर पांघरलेली धवल रंगाची दुलई आणि पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लावण्यासाठी उत्सुक असलेला सूर्यनारायण. खरोखर एक "मंतरलेला आसमंत" आमच्या दाराशी आतुरतेने साद घालत होता. सूर्यनारायणाचा हा "आगमन सोहळा" अवर्णनीय होता.
"हळू हळू रेखांकित होईल, सुंदर स्वप्नांची, भासांची धूसर सृष्टी
सारे शाश्वत आणि शुभंकर, अनायास आकारा येईल तुझियासाठी"
(कवी: सुधीरजी मोघे)
प्रचि ०२
आतापर्यंत सूर्यदेवाची विविध रूपे पाहिली होती पण आज त्याचा थाट काही निराळाच. हा सारा "सोहळा" कॅमेर्यासत बंदिस्त करू कि डोळ्यात साठवू अशा संभ्रमावस्थेत होतो. तंद्री भंग पावल्यावर कॅमेर्याने हा सारा उत्सव टिपु लागलो. कदाचित फोटोंमधुन हा नयनरम्य सोहळा जाणवणार नाही पण प्रत्यक्षातील ते काही क्षण वर्णनातीत होते. साधारण अर्धा पाऊण तास चाललेला हा प्रकाशोत्सव एक अविस्मरणीय आठवण देऊन गेला. अर्थात त्यानंतरही हा भारावलेला आसमंत सोबत होताच. सातारा, यवतेश्वराचा डोंगर व चाळकेवाडी येथुन टिपलेल्या "आसमंताची" हि चित्रसफर.
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ...
प्रचि १२
(वरील प्रचिंवर पोस्ट प्रोसेसिंग मायबोलीकर Sano (संदेश करलकर) यांनी केले आहे. )
हे सर्व प्रचि पाहताना
हे सर्व प्रचि पाहताना श्रीकांत इंगळहळीकर यांच्या आसमंत या पुस्तकातील वरील परिच्छेद प्रकर्षाने आठवत होता आणि याच ओळी या प्रचिंसोबत असाव्यात असं मनापासुन वाटतं होतं. मायबोलीकर चिनूक्स यांनी त्याबद्दल तशी रितसर परवानगी घेतल्यामुळे हे शक्य झाले. मनापासुन धन्यवाद चिनूक्स.
डोळ्याचे पारणे फिटले.
डोळ्याचे पारणे फिटले. दिवाळीची चाहूल देणारा सुखद गारवा या फोटोतुन जाणवतोय. धुके अप्रतीम दिसतेय.
कसले भन्नाट फोटो आहेत.
कसले भन्नाट फोटो आहेत. भन्नाट फोटो बघुन झाले असे वाटेपर्यंत जलाशयाच्या फोटो पाशी येऊन पोचले. आणि वरचे फोटो परत विसरले...
अप्रतिम, वा !! सातार्यातील
अप्रतिम,
वा !! सातार्यातील जुन्या आठवणी जाग्या करून दिल्यास एकदम.
वा! अप्रतिम.
वा! अप्रतिम.
डोळ्याचे पारणे फिटले. +१
डोळ्याचे पारणे फिटले. +१ अप्रतिम
पहिल्या फोटोतला प्रत्येक कंन्टेटं भारी आहे.
मस्स्स्त!
मस्स्स्त!
पहिला फोटु कस्ला कातिल आहे
पहिला फोटु कस्ला कातिल आहे राव. भन्नाटच. अहाहा, अप्रतिम. स्पीचलेस.
लई भारी!!!
लई भारी!!!
आहा. जिप्सी वन ऑफ युअर बेस्ट.
आहा. जिप्सी वन ऑफ युअर बेस्ट. पहिले चार फोटो अत्यंत जबरदस्त आले आहेत. फार आवडले.
अप्रतिम.... माझा सातारा आहेच
अप्रतिम....
माझा सातारा आहेच इतका सुंदर .... <3
पहिले २-३ फोटो जबरदस्त आहेत
पहिले २-३ फोटो जबरदस्त आहेत रे. भारी!!
पुणेमार्गे सातार्याला जाताना आम्हाला हिंग लावुन पण विचारत नाही हा शुध्द हालकटपणा आहे माने!! :रागः
अप्रतीम! बास्स्स्स! सध्या
अप्रतीम!
बास्स्स्स! सध्या इतकंच!
नेहमीप्रमाणेच अप्रतीम.
नेहमीप्रमाणेच अप्रतीम.
Khupach chan! Khup aavadali
Khupach chan!
Khup aavadali prachi.
खासच!
खासच!
कसले भारी फोटो आहेत.सुंदर
कसले भारी फोटो आहेत.सुंदर ,..मस्त...
अप्रतिम. मस्त.
अप्रतिम. मस्त.
अप्रतिम.! निव्वळ अप्रतिम
अप्रतिम.! निव्वळ अप्रतिम मित्रा!
पुन्हा पुन्हा पहात रहावेत असे
पुन्हा पुन्हा पहात रहावेत असे अप्रतिम ....
पहिले तीन, शेवटून चौथा आणि
पहिले तीन, शेवटून चौथा आणि दुसरा छान आहेत!
(बाकीचे काही पोस्ट प्रोसेसींगला गडबडले आहेत असं वाटतंय! वै.म. चू.भू.द्या.घ्या.)
"निसर्ग कॅम्र्यात नाही पकडता
"निसर्ग कॅम्र्यात नाही पकडता येणार कदाचित"-नाहीच.त्याला कॅम्रा हवा तसा पकडू दे चालेल.नंतरचे उचकपाचक नकोच.आणि वर्णनासाठी तुला सुचेल तेच लिहीना.
Jabari...
Jabari...
वा , सुंदर !
वा , सुंदर !
जिप्सी डोळ्याचे पारणे फिटले.
जिप्सी डोळ्याचे पारणे फिटले. + ∞ अप्रतिम....
छान.
छान.
झकास! अप्रतिम नाजरा !
झकास! अप्रतिम नाजरा !
आहाहा अप्रतिम.
आहाहा अप्रतिम.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!!!!
सुंदर.. स्वप्नवत !
सुंदर.. स्वप्नवत !
Pages