श्रीलंका सहल - भाग १ - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/55306
श्रीलंका सहल - भाग १ - एअरपोर्ट ते नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55355
श्रीलंका सहल - भाग २ अ - हॉर्टॉन प्लेन्स नॅशनल पार्क
http://www.maayboli.com/node/55444
श्रीलंका सहल - भाग २ ब - हॉर्टोन प्लेन्स नॅशनल पार्क http://www.maayboli.com/node/55445
श्रीलंका सहल -भाग ३ - न्यू झीलंड फार्म, अशोक वाटीका, अरालिया ग्रीन हिल्स
http://www.maayboli.com/node/55526
श्रीलंका सहल - भाग ४ - व्हीक्टोरिया गार्डन, नुवारा एलिया http://www.maayboli.com/node/55845
श्रीलंका सहल - भाग ५ - नुवारा एलिया ते कँडी http://www.maayboli.com/node/55900
श्रीलंका सहल - भाग ६ - सिगिरीया http://www.maayboli.com/node/55940
इथून पुढे...
सिगिरीया हून परत आल्यावर आणि दुपारी एक छान झोप काढल्यावर संध्याकाळ मोकळीच होती. कँडीला त्या
तळ्याच्या काठीच बुद्धाचे एक मोठे देऊळ आहे. प्रत्यक्ष बुद्धाचा एक दात तिथे असून अनेक भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. पर्यटकांची तर असतेच पण स्थानिकांचीही भरपूर गर्दी असते. रेटारेटी नसते पण मुख्य गाभारा आहे तो मी गेलो त्यावेळी बंदच होता. अनेक भाविक तो कधी उघडतोय त्याची वाट बघत तिष्ठत बसले होते, मला तिथे काही
थांबावेसे वाटले नाही, कारण बाहेरवे आवार खुणावत होते. ( इथेही भारतीयांना तिकिटात सवलत आहे. प्रत्यक्ष
त्या धर्माच्याच जपानी पर्यटकांनाही ती सवलत नव्हती. )
बाहेर खुप मोठे मोकळे आवार आहे, तिथे बहावा, आयर्नवूड ( नागकेशर ) यांची बरीच झाडे आहेत. ( हा श्रीलंकेचा
राष्ट्रीय वृक्ष आहे ) तशीच काही अनोळखी झाडे पण दिसलीच. परत एकदा त्या सरोवराला फेरी मारली.
हे सरोवर एकाच पातळीत असले तरी सभोवतालचा रस्ता मात्र खालीवर जातो त्यामूळे आपल्या नजरेला ते
सरोवर वेगवेगळ्या पातळीवर दिसत राहते. हि प्रदक्षिणा मोकळेपणी मारता येते कारण त्या देवळालगतचा काही
भाग सोडल्यास कुठेही विक्रेते नाहीत. तिथे तिखट मीठ लावलेली कैरी खात मी फेरी पुर्ण केली.
देवळाच्या बाहेर बरीच कमळाची फुले विकायला होती, पण त्या सरोवरात मात्र कमळे नव्हती आणि माझीच नजर ना लागो, जलपर्णीपण नव्हती. मग हॉटेलच्या बाहेरच्या सुपार्मार्केटमधे काही खायचे पदार्थ घेतले आणि ताणून दिली.
उद्या कोलंबोसाठी निघायचे होते पण त्यापुर्वी मला एक अत्यंत महत्वाच्या स्थळाला भेट द्यायची होती. आणि
ते म्हणजे पेरादेनीया रॉयल बोटॅनिकल गार्डन. १४७ एकरावर पसरलेले हे विस्तिर्ण गार्डन मला निवांतपणे
बघायचे होते ( येस यू गेस्ड इट.. मला वेळ कमी पडला ! )
सकाळी ब्रेकफास्ट वगैरे आटपून मी साडेआठलाच तयार झालो आणि चेक आऊटही केले. तिथे तिकिटासोबतच
बागेचा नकाशाही देतात. खरं तर मी त्यांच्या वसंत ऋतूत यायला हवे होते ( कारण नकाशातले ते फोटो त्यांच्या ऐन वसंतातले होते ) पण त्या बागेने मला निराश केले नाही.
मूळात ती बाग अत्यंत सुंदर रितीने राखलेली आहे. झाडे तर इतकी विपुल आणि विविध आहेत ( ४००० नमुने आहेत ) कि सर्व बघणे केवळ अशक्य आहे. बहुतेक झांडाजवळ शास्त्रीय नावांचे फलक आहेतच. अनेक झाडांवर
इतर देशांसोबत भारताचे नाव गौरवाने लिहिलेले दिसले.
सेशल्स, मलेशिया मधली काही खास झाडे होतीच त्याशिवाय आमच्या आफ्रिकेतले बदनाम, कोला नटचेही झाड होते. पाणथळ जागी वाढणारी झाडे, पाम च्या जाती, औषधी वनस्पती असे गट तर होतेच पण अगदी गवताचेही
वेगवेगळे नमुने तिथे होते.
संपुर्ण बागेत एकही विक्रेता नाही कि कुठे कसला कचरा नाही. हिरवळ तर एवढी विस्तिर्ण आहे कि कुणालाही ( म्हणजे माझ्यासारख्या जे. ना.ना पण पळत सुटावे असे वाटेल. )
तिथे एका दालनात ऑर्किडसचे छान कलेक्शन आहे. ( त्याचे फोटो मात्र स्वतंत्र भागात देईन )
१) सिगिरियाहून परतताना आम्ही इथे जेवलो.
२) आणि हे रुचकर जेवण
३) हे त्या देवळातले फोटो ( तितकेसे चांगले नाहीत पण कल्पना यावी म्हणून देतोय )
४)
५) हा त्या देवळाचा परीसर
६) हे नागकेशराचे झाड
७) हे एक मला अनोळखी झाड
८)
९)
१०) हे कँडीचे सरोवर
११)
१२) तिथल्या एका रस्त्याचे नाव
१३) त्या गार्डनच्या प्रवेशद्वारापाशीच.. पिवळा टॅबेबुया
१४) सीता अशोकाचा एक वेगळा प्रकार ( आपल्याकडच्या फुलांचा गुच्छ दाट असतो )
१५) ही एक स्थानिक नववधू.. तिथे फॉटोसेशनसाठीच आली होती
१६)
१७ )
१८)
१९)
२०) मंदार
२१) कैलाशपति
२२)
२३) उर्वशी
२४)
२५)
२६)
२७) कलाबाश नटमेगची ची अतिसुंदर फुले
२८) माणसांच्या तुलनेत झाडांची उंची
२९) त्या कलाबाश नटमेगची बरीच फुले खाली पण पडली होती
आणि त्याची पाने
३०) हे आणखी एक अनवट प्रकरण
३१) रेड ट्रेलिंग बाउहिनिया ( मलेशिया )
३२) मॅग्नोलिया स्पेनोकार्पा
३३) ग्लोरिओसा सुपर्बा
३४) किंग जास्मिन , हे फुल ३ सेमी व्यासाचे होते आणि खुप सुगंधी देखील
३५)
३६)
३६)
३७) सदाफुलीतही अनोखे रंग
३८)
३९)
४०)
४१) दलदलीतली इटुकली कमलिनी
४२) आले वर्गातल्या एका झाडाचे फूल
४३)
४४) जास्वंदाचा एक अनोखा प्रकार
४५) हा सेशल्सचा माड, ८० फुट उंच आणि ३ फूट घेराचा
४६) ही कोला अक्यूमिनाटाची म्हणजेच कोलानटची फुले. याच्या फळांची सवय सहज जडते आणि मग त्याचे
व्यसन जडते. याचा अर्क कोला पेयात वापरतात.
४७)
४८)
४९)
५०) या पिवळ्या फुलात एक चिनी मुखवटा दिसतो का बघा बरं !
५१)
५२)
५३)
५४)
५५) गवताच्या जाती
५६) विस्तिर्ण हिरवळ ( त्या झाडाखाली माणसे बसलेली आहेत. त्याचाही विस्तार खुप मोठा आहे )
५७) माझ्या पावलाच्या तुलनेत पानाचा आकार बघा
५८) मोठी करमळ
क्रमशः
जबरदस्त आणी अतीशय मनमोहक.
जबरदस्त आणी अतीशय मनमोहक. दिनेशजी थॅन्क्स अ लॉट. फार आवडली श्रीलन्का. तुमच्या नजरेतुन अजूनच खुलली आहे. ते बुद्धाचे मन्दिर आणी त्याचे आसपासचे फोटो पण टाका की इथे.
हो त्या पिवळ्या फुलात ( फोटो क्र ५० ) गम्मतशीर चीनी चेहेरा ( लाम्बलचक खाली वळलेल्या मिशा, पिचपिचे बारीक डोळे, भुवया सगळे स्पष्ट दिसते.:फिदी: गम्मत आवडली.:स्मित: सरोवर पण जाम आवडले.
अतीशय सूंदर फूलं, स्वर्गीयच
अतीशय सूंदर फूलं, स्वर्गीयच
अबब!!!!!!!! किती प्रकार
अबब!!!!!!!! किती प्रकार फुलांचे.. पुन्हा पुन्हा पाहातच राहावेसे वाटणारे..
त्या माडाच्या उंचीवरूनच ताडमाड शब्द जन्मला असेल..
कोलानट्,जायंट जॅसमिन.. आणिक काय काय... आहाहा... ट्रीट फॉर आईज..
त्या वधू चा चेहरा किती भारतीय दिसतोय आणी तिचा पोशाख मलेशिअन्,इंडोनेशियन टच असलेला आहे..
त्या ८ नं च्या फोटोतील
त्या ८ नं च्या फोटोतील स्ट्रेंज फळांचे हे फळ भाऊबंद असेल काय..
खुप सुंदर फुले. नवरा-नवरी पण
खुप सुंदर फुले.
नवरा-नवरी पण छान आहेत.
वा किती सुंदर पण प्रत्येक
वा किती सुंदर पण प्रत्येक झाडाफुलाचे नाव लिहा ना प्लीज माहिती असल्यास. ही फुले मी सिंगापुरात नेहमी बघतो पण नावच माहिती नसत
खूपच सुंदर! हिरवळीवरचा तो
खूपच सुंदर!
हिरवळीवरचा तो आडवातिडवा पसरलेला वृक्ष तर खास आहे.
मस्त फोटो आणि माहिती. अश्या
मस्त फोटो आणि माहिती.
अश्या परिसरात दिवसभर नुसतं निसर्ग न्याहाळत बसायला ही मजा येईल.
आभार ... रश्मी.. त्या देवळात
आभार ...
रश्मी.. त्या देवळात माझे मन रमले नाही. गर्दी होतीच. ३ ते ९ फोटो त्या परीसरातलेच.
वर्षू.. मला पण तू टाकलेला हाच फोटो आठवला. पण माझ्या फोटोतली फळे झाडावरच होती. कुणी खाताना दिसले नाही, बाजारातही नव्हती. आणि खरेच खुप मोठे कलेक्शन आहे तिथे.
सकुरा.. हि नवरी बहुतेक हिंदु होती. बुद्धधर्मी मुली लग्नात पांढरी साडी नेसतात ( नवरदेव आपल्या खंडेरायासारखा पगडी वगैरे घातलेला असतो ) आणि याहून दागिन्यांनी सजलेल्या असतात. आणि या फोटोतली नवरी ज्या पद्धतीने साडी नेसलीय ती खास श्रीलंकन पद्धत. तिथे आपल्या पद्धतीने पण साड्या नेसतात आणि त्या पद्धतीला कँडीयन पद्धत म्हणतात.
आदीजो... असे बरेच वूक्ष आहेत तिथे आणि ते छान जोपासलेले आहेत. त्या हिरवळीवर कुठेही कागदाचा कपटाही नव्हता. ( स्वच्छता हि आपल्यासाठी अप्रुपाची गोष्ट आहे नाही ! )
बी, तिथे अभ्यासासाठी झाडे आहेत त्यावर व्यवस्थित पाट्या आहेत पण इथलय फोटोतली बहुतेक फुले, शोभेची म्हणून लावलीत. म्हणून नावे नाहीत.
मित... खरेच एक पूर्ण दिवस हवा या बागेत भटकायला.
खूप छान ओळख होतेय या
खूप छान ओळख होतेय या मालिकेतून श्रीलंकेची! इतका शेजारी आणिनिसर्गरम्य देश पण अजून तरी जाणं झालं नाही.
पहिलाच फोटो खूप आवडला. अर्थातच्बाकीचेही छानच. ते अनोळखी फूल बघून मलाही वर्षूच्या त्या फुलाची आठवण झाली .
हाही भाग सुंदर नेहमीप्रमाणेच.
हाही भाग सुंदर नेहमीप्रमाणेच.
मस्त
मस्त
बापरे सारे काही वेड
बापरे सारे काही वेड लावणारे,,,
४० न. च्या प्रची मधे जे फुल दिसते आहे, त्याचे रोप मला मिळाले आहे:)