एकेकाळी राम म्हटले की डोळ्यासमोर अरुण गोईल यायचा आणि सीता म्हटले की दिपिका. (पदुकोन नव्हे)
कृष्ण म्हटले की नितिश भारद्वाज आठवायचा आणि हनुमान म्हटले की दारा सिंग.
देवांना आपण फोटोतच पाहिले असल्याने त्यांचे नेमके असे रूप आपल्या डोळ्यासमोर नसते, त्यामुळे मालिका चित्रपटांमध्ये फेमस झालेले कलाकारच पटकन डोळ्यासमोर येतात.
पण तेच ‘मेरी कोम’ चित्रपटात प्रियांका चोप्रा कितीही मेरी कोम दिसत असली किंवा तिने कितीही उत्तमप्रकारे ती भुमिका वठवलेली असली, तरी मेरी कोम बोलताच खरीखुरी मेरी कोमच डोळ्यासमोर तरळते.
दगडी चाळीच्या डॅडींना मी बरेच वेळा प्रत्यक्ष पाहिले आहे, पण तरीही आज "दगडी चाळ" पाहिल्यावर माझी अशी स्थिती झाली की आता यापुढे मकरंद देशपांडेच डोळ्यासमोर येतील.
....... पण तरीही दगडी चाळ हा चित्रपट आहे अंकुश चौधरीचा !
सत्तार, उद्या नाशिक बाजा ठेवलाय. यायचे. नाचायचे. प्रसाद घ्यायचा. आणि कल्टी मारायची. .. असे साधे सोपे डायलॉग अंकुश चौधरी स्टाईल मध्ये जेव्हा सुरु होतात तेव्हाच आपल्याला समजते की हा ‘अंकुश चौधरी शो’ आहे.
२०१३ ला दुनियादारीत चमकल्यानंतर यावर्षी त्याचे क्लासमेट, डबल सीट... आणि आता हा दगडी चाळ! चौधरींचा अंकुश यंदा फॉर्मला आहे. जर तो तुम्हाला आवडत असेल, तर हा चित्रपट बघण्यासाठी हे एकमेव कारण पुरेसे आहे.
ईतर कोणाला ‘डॅडी आणि दगडी चाळ’ काय प्रकरण आहे हे माहीत नसेल, तर त्यांची उत्सुकता शमू शकते. ज्यांना हे प्रकरण माहीत असेल, त्यांच्या हाती फार काही विशेष लागणार नाही. कारण त्या जागी मुंबईतील कोणीही अ, ब, क डॉन दाखवला असता तरी चित्रपटावर काही फारसा फरक पडला नसता.
कथा एका ओळीत सांगायची झाल्यास, वास्तव मध्ये संजय दत्त जसा भाईगिरीच्या लाईनला खेचला जातो, साधारण त्याच प्रकारे इथे अंकुशवर ती वेळ येते. फरक ईतकाच की अंकुश किनार्याकडे पोहायचे प्रयत्न सोडत नाही. यात तो यशस्वी होतो की नाही हे चित्रपटातच बघा, पण तुम्हाला दोन सव्वादोन तास खुर्चीवर खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होतो. कारण चित्रपटात विनोद, रोमान्स, अॅक्शन सोबत सस्पेन्स आणि थोड्याफार डोक्यॅलिटीच्या क्लृप्त्या योजल्या आहेत ज्या आपल्या डोक्यातील किडा वळवळत ठेवतात.
मराठी चित्रपटांची तांत्रिक बाजू हल्ली फारच सुधारली आहे. इथेही त्या वाढलेल्या अपेक्षा सहज पुर्ण होतात.
संगीताबद्दल बोलायचे झाल्यास यात दोनच गाणी आहेत. त्या पैकी एका रोमांटीक गाण्याची लिंक मी खाली देतो.
https://www.youtube.com/watch?v=6zoKKPTzWUE
मुद्दाम देतोय कारण काल रात्री तीन साडेतीन वाजता मी हे गाणे यूट्यूब वर ऐकले आणि त्यावरूनच हा चित्रपट बघायचा निर्णय घेत लगोलग दोन तिकीटेही बूक केली. (चित्रपट दोघांनाही आवडला)
अंकुशच्या जोडीने यात पूजा सावंत आहे. दोघांची जोडी यात छान आणि हटके दिसलीय. तिला कपडेही फार छान दिलेत आणि ती यात वावरली सुद्धा अशी आहे की बरेचदा हिंदी चित्रपटातीलच हिरोईन वाटते. या चित्रपटापुरते बोलायचे झाल्यास मला तिच्यात मुग्धा गोडसे आणि प्रियांका चोप्रा यांचे हलकेसे मिश्रण दिसले. रोमान्स पलीकडे मात्र तिला फारसे काही काम नाही.
ईतर कलाकारांमध्ये कमलेश सावंत, म्हणजे द्रुश्यम मधील ईनस्पेकटर गायतोंडेने यात इनस्पेक्टर काळे बनत तशीच धमाल उडवलीय.
आधी मला वाटलेले की या चित्रपटात दगडी चाळीचे उदात्तीकरण असेल, मात्र तसे काही नव्हते. त्यामुळे तसले काही डोक्यात ठेऊन चित्रपट बघायला जाऊ नका किंवा त्यामुळे चित्रपट न बघण्याचा निर्णय घेऊ नका.
वर उल्लेखल्याप्रमाणे अंकुश चौधरी आवडीचा असेल तर नक्की बघा. त्याने हल्ली जी स्टाईल पकडलीय ते पाहता असे वाटते की त्याला घेऊन अमिताभचे अॅक्शन चित्रपट मराठीत रिमेक करावेत. माझ्या हातात असते तर मी ‘दिवार’ बनवला असता. शशी कपूर कोणीही चालला असता, कारण या भावात एकहाती चित्रपट खेचायची ताकद आलीय.
असो,
हे निश्चितच चित्रपट परीक्षण नसून चित्रपट ओळख आहे, जी मी पाहिलेल्या आणि मला आवडलेल्या मराठी चित्रपटाबद्दल देतोच. त्यामुळे स्टार नाही देणार. पण फार अवास्तव अपेक्षा न ठेवता, ‘चला आज एक मराठी चित्रपट बघूया’ म्हणत बाहेर पडा, वेळ आणि पैसे वसूल नक्की होतील.
आमचे झाले
चांगले लिहिलेय. गवळीला मी
चांगले लिहिलेय. गवळीला मी देखील प्रत्यक्ष पाहिलेय, त्यामूळे बघीन नक्कीच.
गाण्याची चाल आणि चित्रीकरण काही खास वाटले नाही.
धन्यवाद दिनेशदा, खालील एक
धन्यवाद दिनेशदा,
खालील एक महत्वाचे वाक्य नुकतेच अॅड केले.
ईतर कलाकारांमध्ये कमलेश सावंत, म्हणजे द्रुश्यम मधील ईनस्पेकटर गायतोंडेने यात इनस्पेक्टर काळे बनत तशीच धमाल उडवलीय.
उद्या आणखी काही सुचले तर आणखी अॅड करेन.
बाकी पुर्ण चित्रपटभर गवळी असले तरी ही गवळींची कथा नसून त्यांच्याशी संबंध आलेल्या सुर्याची (काल्पनिक) कथा आहे. कथेच्या गरजेनुसार जे संदर्भ आलेत ते मात्र माझ्या माहितीप्रमाणे अचूक आहेत.
आणि हो त्या गाण्याचा मूड आणि चित्रपटाची जातकुळी भिन्न आहे टोटल.
छान लिहीले आहे. परवा हवा येउ
छान लिहीले आहे. परवा हवा येउ द्या मधे ही सगळी गँग (म्हणजे या चित्रपटातली :)) आली होती तेव्हा पासून कुतूहल आहे. अंकुश चौधरी बच्चन ला चांगला चॅनेल करतो हे दुनियादारीत बघितले होते. पण अमिताभचे चित्रपट रीमेक करण्यापेक्षा तसा आविर्भाव देउन दुनियादारीसारखाच रोल जमला तर आवडेल बघायला.
पूजा सावंत एकदम ग्रेसफुल वाटली होती निदान लांबून, हवा येउ द्या मधल्या सीन्स मधे.
मस्त लिहिलंयस.
मस्त लिहिलंयस.
चित्रपट आपटून उतरला की राव
चित्रपट आपटून उतरला की राव थेट्रातून . आता कसली ओळख करून देताय. वरातीमागून घोडं झालं हे तर
छान लिहिलंय. अंकुश नेहमीच
छान लिहिलंय. अंकुश नेहमीच आवडतो. कुठल्याश्या धाग्यावर मी लिहिलं ही होतं की त्याला त्याच्या पोटेंशियल पेक्षा कमी सिनेमे मिळाले किंवा त्याने कमी सिनेमे केले !
चौधरींचा अंकुश यंदा फॉर्मला आहे. जर तो तुम्हाला आवडत असेल, तर हा चित्रपट बघण्यासाठी हे एकमेव कारण पुरेसे आहे.>>> याच कारणासाठी पाहणार
आपटून उतरला? याच शुक्रवारी
आपटून उतरला? याच शुक्रवारी लागला ना?
चित्रपट 2 ऑक्टोबरला लागलाय.
चित्रपट 2 ऑक्टोबरला लागलाय. म्हणजे आता तिसर्या आठवड्यात गेला आहे. अजून कुठे कुठे आहे हे बूक माय शो वर समजेलच. विकीवर पहिल्या आठवड्याची बॉक्स ऑफिस कमाई बहुतेक 6 करोड दाखवली आहे. सध्याची स्थिती माहीत नाही पण माऊथ पब्लिसिटीवर पुन्हा उसळी घेऊ शकतो.
या शुक्रवारी सिटीजन आणि
या शुक्रवारी सिटीजन आणि राजवाडे लागलाय. कोणताही चित्रपट ३ दिवस चालतो. अगदी हिट असेल तर दोन तीन आठवडे . दगडी चाळ आता सिन्गल स्क्रीन वरच चालू आहे. त्यामुळे तो आता इतिहास जमा झाला आहे. टीव्हीवर वाट पहावी (अथवा पाहूही नये :))
Daddy n. Dagadichaal baddal
Daddy n. Dagadichaal baddal kahi tari sanga ki
Parikshan awadal
कृपया गुन्हेगारांचे
कृपया गुन्हेगारांचे उदात्तीकरण होऊ नये.
आमच्या इथल्या तीनही
आमच्या इथल्या तीनही मल्टीप्लेक्स वर काल शनवारि याची पोस्टर्स पाहिलित. सो, अजुन इथून उतरला नाहिये आणि आपटला पण नाहिये. सो, उगीच अफवा पसरवु नका.
मी अजुन पाहिला नाहिये, पण अंकुश आवडतो. त्यामुळे सीडी वर पाहीन.
हुडा, दगडी चाळ आपटला वगैरे
हुडा, दगडी चाळ आपटला वगैरे नसुन हिट झालेला आहे. पुण्यात तिसर्या आठवड्यातही ५० हून जास्त शो चालू आहेत आणि त्यातले ४०+ शो मल्टिप्लेक्सेस मध्ये चालू आहेत. मुंबईत याहूनही जास्त असतील कदाचित..
रोमान्स आणि ॲक्शन- दोघांत अंकुश शोभला आहे. मराठीत इतके चांगले फाईट सिक्वेन्सेस बघून सुखद धक्का बसला. यासाठी, आणि अंकुशसाठीही, मोठ्या पडद्यावर बघायला हवा.
कोणताही चित्रपट ३ दिवस चालतो.
कोणताही चित्रपट ३ दिवस चालतो. अगदी हिट असेल तर दोन तीन आठवडे.
>>>
म्हणजे हा चित्रपट अगदी हिट झाला म्हणायला हरकत नाही.
आणि हो, मी स्वताही मल्टीप्लेक्समध्येच पाहिला.
रीया, त्यांच्याबद्दल तुम्हाला गूगाळून मिळेल. उगाच मी एखादा शब्द इथे तिथे केला तर झाला माझा गेम
मराठीत इतके चांगले फाईट सिक्वेन्सेस बघून सुखद धक्का बसला. >>> यासाठी प्लस वन !
ओके काय म्हणून सर्चू?
ओके
काय म्हणून सर्चू?
अंकुश ऑल टाईम फेव्हरेट आहे.
अंकुश ऑल टाईम फेव्हरेट आहे. त्यामुळे पाहायचा आहेच.
ऋ छान लिहिलयस..
अरे देवा.. रीयाजी का एवढी
अरे देवा.. रीयाजी का एवढी उत्सुकता

अरुण गवळी नावानेच सर्च मारा, विकीचे पान असेलच आणि न्यूजही बर्याच मिळतील.
बेस्ट आयडीया म्हणजे सध्या नवरात्र आहे, दगडी चाळीची देवी प्रसिद्ध आहे. मी काही वर्षांपूर्वी गेलेलो. तुम्हीही तिच्या दर्शनाला जाऊन या. सोबत माहिती मिळाली तर बोनस समजा
मुंबई अंडरवर्ल्ड वर बरीच चांगली पुस्तकेही असावीत. मी फक्त ‘डोंगरी ते दुबई’ याबद्दल ऐकून आहे, ते ही वाचले नाही. बाकी दाऊद, बाबू रेशीम, अमर नाईक, अरुण गवळी ईत्यादी थोर लोकं होऊन गेलेत (वा आहेत) ते कसे संपले याच्या कहाण्या नक्कीच खूप रोचक आहेत.
ईथे कोणाला माहिती असतील पुस्तके तर सुचवा.
रुनम्या , मस्तच रे.
रुनम्या
, मस्तच रे.
कॉलेजचा एक मित्र दगडी चाळीत राहायचा. त्याच्या घरी जाणे येणे असायचे. त्या वयात तिकडच एकदम जबरी वाटायचं. त्या चाळीत अनेक भुयारी मार्ग बनवले होते. पोलिसांची धाड पडली कि सगळे त्यातून पळायचे, ज्यांना पळायला वेळ मिळत नसे ते कोणाच्याही घरात घुसून यजमानाच्या पलंगावर चादर ओढून गुपचूप झोपायचे. पोलिसांना त्या घुसलेल्या माणसाबद्दल माहिती देताना यजमानांची चांगलीच पंचायत व्हायची. पण तिथल्या रहिवाश्यांना याची सवयच झालेली. आणखी एक, तिथे राहणारी सगळीच मंडळी काही गुन्हेगार नव्हती.
मस्तं परीक्षण केलंय.
मस्तं परीक्षण केलंय.
रीयाजी का एवढी
रीयाजी का एवढी उत्सुकता
>>>
Honestly, मला अरुण गवळींना डॅडी म्हणतात हे माहीत नव्हतं. मला ते कोणी तरी थोर व्यक्तीमत्त्व वाटलेलं.
आता कळाल्यावर सर्च करण्यात काही इंटरेस्ट नाही.
दगडी चाळ नावाची एखादी गोष्ट अस्तित्वात आहे हे ही मला माहीत नव्हतं.
असो!
बेस्ट आयडीया म्हणजे सध्या नवरात्र आहे, दगडी चाळीची देवी प्रसिद्ध आहे. मी काही वर्षांपूर्वी गेलेलो. तुम्हीही तिच्या दर्शनाला जाऊन या. सोबत माहिती मिळाली तर बोनस समजा
>>
मुंबई? अजिबात नको रे बाबा!
Honestly, मला अरुण गवळींना
Honestly, मला अरुण गवळींना डॅडी म्हणतात हे माहीत नव्हतं.>>
तरी ओके, चांगले आहे
मुंबई? अजिबात नको रे बाबा! >>
कधीतरी मुंबईचा चुकीचा भाग फिरून मुंबईबद्दल चुकीचे मत बनवले आहे का? असे होते बरेच जणांचे.. असो हा विषय नाही, यावर पुन्हा कधीतरी ..
युटुब वर पाहिला, अंकुश
युटुब वर पाहिला, अंकुश चौधरीनी खरच चांगलं काम केलय, मला खरं तर तो अजिबातच आवडायचा नाही , पण दुनियादारी मधे चक्क बरा वाटला आणि दगडी चाळ मधला हा रोल परफेक्ट वठवलाय .. त्याच्या फिजिक ला बच्चन स्टाइल हाणामार्या सुट झाल्यायेत!
कथा मांडणी पहाताना तेजाब ची आठवण झाली.. महेश देशमुख चा मुन्ना कसा झाला हे इन्सपेक्टरला सांगतानाचे फ्लॅशबॅक आठवले.
थोडी सरकार ची आठवणही आली पण सरकार मधे फार उदात्तीकरण केलय अमिताभचं , तसं इथे मुळीच नाही !
मकरन्द देशपांडेचं 'दगडी चाळीचे डॅडी' कॅरॅक्टर सिनेमा व्यापत नसूनदेखील त्याचं अॅक्टींग जबरी.. एकदा बघायला नक्कीच चांगला आहे सिनेमा.
अंकुश चौधरी आवडतोच... त्याचं
अंकुश चौधरी आवडतोच... त्याचं सगळं चांगलं आहे, प्रेझेन्स, पर्सनॅलीटी पण आवाजात जाम मार खातो. त्याने त्याच्या उंचीला आणि आवीर्भावाला शोभेल असा कोणाचा तरी आवाज उसना घ्यायला हवा, डबींग करून.
)
(इथे ऑडीयोची सोय हवी होती, त्याच्या बोलण्याची आणी आवाजाची नक्कल करायचा मोह आवरता आवरत नाहीये
पण आवाजात जाम मार खातो << so
पण आवाजात जाम मार खातो
<< so true .. वरण भात अॅक्सेंट आड येतो काही मराठी अॅक्टर्सचा, त्या पैकी !
पण द.चा. मधे बर्या पैकी बेअरिंग घेतलय कॅरॅक्टरचं !
उंचीला आणि आवीर्भावाला शोभेल
उंचीला आणि आवीर्भावाला शोभेल असा कोणाचा तरी आवाज उसना घ्यायला हवा, डबींग करून. >>> रियल लाईफ शमिताभ?
चित्रपटात सुरवातीलाच वर्ष
चित्रपटात सुरवातीलाच वर्ष १९९६ म्हटले गेले आहे पण बघताना असे वाटत नाही.
१. अंकुश आणि पूजा सावंतचे कपडे, बूट त्या वेळेचे वाटत नाहीत
२. काही काही प्रसंगात पाठीमागे आजच्या गाड्या दिसतात. उदा. activa , स्विफ्ट
३. गाड्यांच्या नंबर प्लेट्स त्या वेळेस अश्या नव्हत्या.
४. अंकुश एका माणसाला कार मध्ये भेटून खंडणी मागतो त्या प्रसंगात तो माणूस आधी चालत्या कार मध्ये कॉर्डलेस वर बोलताना दाखवलाय.
movie नाही पाहिलंय पण ' धागा
movie नाही पाहिलंय पण ' धागा धागा ' गाण आवडल खूप.
१. अंकुश आणि पूजा सावंतचे
१. अंकुश आणि पूजा सावंतचे कपडे, बूट त्या वेळेचे वाटत नाहीत
>>>
पूजा सावंतबाबत मलाही हाच प्रश्न पडलेला, पण जाणकारांनी माहिती दिली की तेव्हाही अश्या मध्यमवर्गीय बिल्डींग आणि चाळींमध्ये असे कपडे घालणारी एखादी मुलगी असायची. फरक ईतकाच की ते तितक्या सहजतेने घेतले जायचे नाही आणि ती तिच्या मॉडर्न कपड्यांसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध व्हायची. या चित्रपटात मात्र ते सहजेतेने दाखवलेले.
कपडे "त्या वेळच्या दृष्टीने
कपडे "त्या वेळच्या दृष्टीने मॉडर्न वाटत नाहीत" असे त्यांना म्हणायचे असावे.
हे म्हणजे १९२० सालात सिनेमा घडतो असं दाखवलं आणि एखाद्या सीनमधे वरुन जंबोजेट जाताना दाखवलं तर? (तो सिनेमा सायन्स फिक्शन नाही हे गृहित धरुन हे विधान करतोय)
समजले नाही, म्हणजे तेव्हाही
समजले नाही, म्हणजे तेव्हाही मुली तोकडे कपडे घालायच्या पण तेव्हाची फॅशन स्टाईल अशी नव्हती असे म्हणायचे आहे का?
Pages