महाराष्ट्राच्या वैभवशाली आणि ऐतिहासिक सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण, ढोल-ताशांचे गजर, प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूका या सर्वांचा आनंद पुन्हा एकदा घेण्याची संधी सर्व पुणेकराना मिळणार आहे. निमित्त आहे, 'छायाविष्कार' या पुण्यातील मानाचा गणपती श्री ताम्बडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या तर्फे आयोजित छायाचित्रण प्रदर्शन !
प्रदर्शनाचे हे यंदा तिसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच 'वन्य प्राणी जीवन', 'पुण्यातील वाहतूक', व 'स्कूल चले हम' या विविध विषयांवरील छायाचित्रेसुद्धा प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
17 ते 19 ओक्टोबर दरम्यान 'बालगंधर्व कलादालन येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. शनिवार सकाळी 10 वाजता प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री. चारुहास पण्डीत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
या निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेसाठी आलेल्या दोनशेहून अधिक छायाचित्रांचे हे प्रदर्शन असून या स्पर्धेचा निकाल व बक्षिस समारम्भ ज्येष्ठ छायाचित्रकार श्री. सतीश पाकणीकर यांच्या हस्ते प्रदर्शन स्थळी रविवार, दि. 18 औक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
प्रदर्शन 17 ते 19 ओक्टोबर, सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत विनामुल्य खुले राहील.
या स्पर्धेसाठी मंडळाला "रीवा" चे सहकार्य लाभले असून महाराष्ट्र टाईम्स यासाठी माध्यम प्रायोजक आहे.
अरे वा!! माहितीबद्दल धन्यवाद!
अरे वा!! माहितीबद्दल धन्यवाद!