द(इन्)फेमस गोल्डन ट्रँगल

Submitted by वर्षू. on 9 October, 2015 - 21:18

यस्स!! तोच गोल्डन ट्रँगल, लहानपणापासून ज्याच्याबद्दल इतक्या अदभुत गोष्टी ऐकलेल्या होत्या ,त्यांच्यामुळे
या ट्रँगल ला एक रहस्यमयी वलय प्राप्त झालं होतं, माझ्या मनात.
खरंतर गोल्डन ट्रॅंगल चा अँगलच , चिंगमाय ची ट्रिप आखायला कारणीभूत होता.
मेखाँग आणी रुआक नदी च्या संगमावर थायलँड्,म्यांमार आणी लाओस या तिन्ही देशांच्या सीमा एका त्रिकोणात
मिळतात . या त्रिकोणात कोणतेच सरकार नाही. त्यामुळे इथे पिकणारे वारेमाप अफू चे पीक, चीनी व्यापारी
सोने देऊन विकत घेत. म्हणून या त्रिकोणाला गोल्डन ट्रँगल असे नांव पडले.
अंमली पदार्थांचा व्यापार म्हंजे गोल्डन ट्रँगल असाच अर्थ आहे आग्नेय देशांत.
सातव्या शतकापासून चीन मधे अफू ,औषधाच्या स्वरूपात प्रचलित होता. त्या काळात इतर देशांतून चीन मधे अफू, आयात केला जाई.पुढे पुढे तंबाखूत अफू मिसळून सेवनाचे प्रमाण इतके वाढले चीन मधेच अफू ची लागवड करण्यात आली. ही लागवड मंग जमातीचे आदिवासी करत. त्यांचा सारा माल, चीन मधेच खपून जाई. नंतर
इंडोचायना वर राज्य करणार्‍या फ्रेंच वसाहती मोठ्या प्रमाणात अफू विकत घेऊ लागल्या.
पुढे माओ च्या लाल सैनिकांनी चंकाई शेक ला हाकलून लावल्यावर, मंग आदिवासी स्थलांतर करून थाय . म्यांमार परिसरात गेले. त्यामुळे या भागांत अफू उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.
१९५० मधे इराण आणी चीन मधे अफू लागवडी वर कायद्याने बंदी आणल्याने ही साऊथ ईस्ट एशिया मधे अफू ची लागवड प्रमाणाबाहेर होऊ लागली.
विएट्नाम युद्धा च्या काळात, बेसुमार अमली पदार्थांच्या चालणार्‍या बेकायदेशीर व्यापारामुळे गोल्डन ट्रँगल ला ख्याती मिळाली. ८० च्या दशकात पश्चिमी देशांत अफूची मागणी जोरदार वाढली.या व्यापारातून मिळणारा अफाट पैसा, अमेरिकन गुप्तहेर संस्था , लाओस मधे गुप्त कारवाया आणी छुप्या युद्धांकरता वापरू लागली.
आता मात्र थायलँड , तीव्रतेने अफू उत्पादनावर नियंत्रण घालण्याचे काम करत आहे. इथे अफू ची लागवड करणे बेकायदेशीर आहे. पण लाओस सारख्या गरीब देशात स्थानिक लोकं अजूनही अफू चा सर्रास उपयोग करतात. इथे दळणवळणा करता साधने, चांगले रस्ते फारच कमी असल्याने आधिकार्‍यांना या व्यापारावर नियंत्रण घालणे कठीण जाते. लाओस मधे हॉटेल्स, रेस्टोरेंट्स्,ट्रेकिंग संस्था उघडून पर्यटन उद्योग वाढवण्याकरता सरकार कार्यरत आहे. इथे पर्यटकांना अफूपानाची परवानगी नाही.
थायलँड आणी लाओस या देशांनी अफू वर कठोर नियंत्रणाला सुरुवात केलीय , म्हणून कि काय आता सोनेरी त्रिकोणातला म्यांमार देश, अफू उत्पादनात आघाडीवर आलेला आहे.

तर अशी ख्याती ,असा इतिहास असलेल्या या त्रिकोणा वर जायला , चिंगमाय च्या राहत्या हॉटेलमधूनच एक दिवसीय ट्रिप बुक केली. त्याप्रमाणे सकाळी ७.३० वाजता ,चिंगराय ला जायला निघालो. चिंगमाय शहरापासून साडे तीन तासांच्या अंतरावर असलेले चिंगराय शहर , थायलँड च्या उत्तरेकडचे सर्वात शेवटले शहर.
शहराच्या बाहेर असलेले हे टेंपल ऑफ हेल .. चक्क.. आपल्याकडील नरकाची इमॅजिनरी दृष्ये , थाय रुपात इथे चितारलेली आहेत. हे मंदीर अजून निर्माणाधीन आहे..
शुभ्र दगडातले मंदिर, कसल्याश्या आरश्यांचे, अभ्रका चे तुकडे मिसळून बांधले जात आहे. ऊन्हात चमचम करते हे मंदीर..पण आम्ही गेलो त्या दिवशी आभाळ होतं त्यामुळे ते नुस्तच शुभ्र शुभ्र दिसत होतं.

इथेही बाप्पा चं वेगळ्या रुपातलं दर्शन

सोनेरी रंग पे मत जाओ.. हे प्रसाधन गृह आहे.. Proud

चिंगराय मधून गोल्डन ट्रँगल ला जायचे प्रवेश द्वार.. इथून लाँच मधून तास भर फिरवून लाओस मधे उतरवतात. पण त्यापूर्वी तुमचे पासपोर्ट्स , गाईड जवळ जमा करावे लागतात..

थायलँड चा किनारा

पाचच मिनिटात मागे थायलँड चा किनारा , डावीकडे म्यांमार चा किनारा तर उजवीकडे लाओस चा किनारा दिसू लागतो.. पर्वत्,हिरवाई,नदी तीच.. पण किती वेगळे देश..

हा पहा म्यांमार, पण इथे उतरायची परवानगी नाही..


तो समोर लाओस


इथे उतरून थोडी विश्रांती घ्या.. अर्ध्या किलोमीटर च्या आरक्षित क्षेत्रात जे शॉपिंग सेंटर आहे फक्त तिथेच फिरा..
इथले विक्रेते थाय भाषा बोलू शकतात आणी आनंदाने थाय बाथ ( आंघोळ नाही.. करंसी ) घेतात.

इकडे विविध बाटल्यांमधे निरनिराळ्या जातीचे साप भरलेली दारू का दारू भरलेले साप विकायला होते.. ते कोण लोकं घेत होते,ते सांगायची काही गरजे का?? Wink

आम्ही आपलं लोकल बिअर ला म्हटले,' लाओ ' तर लगेच उघडून हजर केला कॅन..

परतीच्या रस्त्यावर जरा आडबाजूला असलेल्या लाँग नेक ट्रायबल भागात थांबलो. हे लाँग नेक विलेज , टूरिस्ट्स ना आवर्जून दाखवतात.. इथेही रिस्ट्रिक्टेड एरियातच प्रवेश दिला जातो.
येथील मुलींच्या गळ्यात वयाच्या पाचव्या वर्षांपासून , पितळी वायर्स हसळ्याटाईप गुंडाळल्या जातात. पूर्ण आयुष्यभरात तीन वेळा हा कार्यक्रम होतो.पूर्वी च्या काळात जंगली प्राण्यांच्या आक्रमणापासून रक्षण व्हावे म्हणून हा उपाय योजला गेला होता. पण आता हा प्रकार टूरिस्ट्स्ना आकर्षित करण्याच्या हेतूने केला जात असावा..
या लहानग्या शाळेत न जाता , आई किंवा एखाद्या वयस्कर स्त्री बरोबर या मर्यादित क्षेत्रात हातमागावर स्कार्फ्स, शाली विणत बसतात आणी सगळ्यांबरोबर आनंदाने फोटो काढून घेतात.
या गोड पोरींना पाहून कसेसेस झाले.. इतक्या लहान वयात पितळी वायर्स गळ्याभोवती गुंडाळल्याने त्यांच्या मानेला लांबी मिळते पण कण्यातली ताकद नष्ट होते. वायर्स काढल्यावर त्यांना तोल सांभाळणे कठीण जाते..
धडधाकट स्त्रियांना स्पाँडेलायटिस च्या पेशंट सारखे करून टाकलेले पाहून बेचैन वाटलं..

हे जडगोळं ६ किलोचं लोढणं Angry

हा फोटो ही जवळ जवळ सगळ्या दुकानातून दाखवतात

आता त्यांच्या गळ्यातल्या रिंग्स चे ओझे आमच्याच मनावर येऊन बसले होते जणू.. सर्व जणांनी परतीचा प्रवास
मुक्यानेच पार पाडला..

हाँ, थोडा वेळ चिंगराय मधे पायी फिरायची हौस ही पूर्ण करून घेतली होती. एखाद्या देशाची अगदी शेवटली सीमा पाहण्याची पहिलीच वेळ!! अगदी साधारणसा दिसणारा पूल पायीच ओलांडला कि लगेच बर्मात प्रवेश करता येणार होता. पण इमिग्रेशन चे नियम कडक रीतीने पाळले जातात इथे. सायकल रिक्षा, दुचाक्या मजेने पूल क्रॉस करून बर्मात प्रवेश करत होत्या.. ते पाहून गम्मत वाटली..

तो नाल्यापलीकडे बसलेला माणूस दिसला का?? तो बर्मात आहे बर्का.. इकडून ओरडून त्याच्याशी सहज बोलता आले असते

ते पाहा .. इमिग्रेशन क्रॉस करायच्या गेट मधून पलीकडचे म्यांमार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सुरुवातीपासूनचे खुमासदार वर्णन वाचता वाचता त्या पितळी रिंग्जनी जणू सगळ्यावर विरजण टाकले ...

तुझी लेखशैली मात्र अप्रतिम .... Happy

मस्त लिहिलेस वर्षुताई. त्या पितळी रिंग्ज घातलेल्या मूली पाहुन कसेस वाटल
पण मला ते दारुत साप वगैरे प्रकरण समजल नाही

jhakaas! Happy

Kahi european deshat paN asa ahe asa wachla ahe.. eka shaharat 2/3 deshanchya borders...

'The Accidental Prime Minister' madhe wachla hota, ki aplya Manmohan Singhanna Bharat-Pak darmyan asach free roaming karnya itke relations have note(minus opium of course :p)

but...

पहिला फोटो कसला मस्तय पण का काय माहीत पाहिल्या पाहिल्या एक अभद्रशी फिलिंग आली Uhoh

ते लोढणं कशासाठी आहे? कसंतरीच वाटलं ते बघुन

जाई, ते दारुतले साप म्हणे दारू टेस्टी बनवतात (नॉट शूअर)

सुरेख फोटो आणि माहिती.... मायनस त्या पितळी रिंग्ज... (ह्यूमन राईट्स वाल्यांना हे असलं काही दिसत नाही!!)

इथले विक्रेते थाय भाषा बोलू शकतात आणी आनंदाने थाय बाथ घेतात.
>>
मी हे पटकन असे वाचले, थाय भाषा बोलू शकतात आणी आनंदाने थाय थाय नाचतात Proud

पितळी रिंगा अस्वस्थ करणारे आहे खरे Sad
जगात असे किती वेडगळ समाज आहे ज्यांना अजून अकला यायच्यात..

लेख माहिती फोटो, अर्थातच सारे उत्तम आणि ज्ञानात भर!

वा! छान वर्णन.

नरकाचं मंदिर ... कल्पना कोणाच्या डोक्यातून निघाली देव जाणे. पण मस्त आहे ते मंदिर.

सुरुवातीपासूनचे खुमासदार वर्णन वाचता वाचता त्या पितळी रिंग्जनी जणू सगळ्यावर विरजण टाकले ... >>> शशांक पुरंदरे + १

वर्षु फोटो आणी माहिती खरच मस्त आहे, पण चान्दपे काला दाग याप्रमाणे ते गळ्यातल लोढणे पाहुन वाईट वाटले.:अरेरे: हे लोक कुठल्या मानसीक जगात जगतात देव जाणे.

मस्त वर्णन.

ते साप चीनी लोक घेत असणार ना? अंगावर काटा आला ते पाहुन. चीनी लोक साँप, वाघ इत्यादि प्राणी खाल्ले की आपली लैंगिक ताकद वाढते असे समजतात. मला हे मानसिक विकृतिचे लक्षण वाटते.

ऋन्मेष Lol थाय थाय हसले!!!!

साधना,तुझी माहिती बरोबरे..

वाघाचे लिंग, जिवंत सापाचे रक्त , या गोष्टींची..इंडोनेशियातील चायनीज लोकांमधे क्रेझ दिसून येते

छान माहिती आणि फोटो. गळ्यात पितळी रिंगा घातलेल्या बायकांवरची डिस्कवरीवरची डॉक्यूमेंटरी पाहूनच फार विचित्र फिल आला होता. प्रत्यक्ष पाहताना काय वाटलं असेल कल्पना करु शकतो.

अग मागे मी टायगर फ़ार्म चा वीडियो पाहात होते तेव्हा वाटले की चायना मधल्या चिन्याना फ़क्त हेच एक वेड आहे की काय?

मला हे फार ईस्ट मधले लोक नेहमी ज़रा अनाकलनिय वाटतात. त्यानासुद्धा उर्वरित जगाबद्दल हेच वाटत असेल. कुठेतरी वाचलेले की जापानी लोक जापानी सोडून इतर कुणावरहि विश्वास ठेवत नाहीत.

त्या रिंग वाल्या बाया फ़क्त फोटोत पाहिलेल्या. काय विचित्र प्रथा आहे.

त्या रिंग वाली बाई चा फोटोआणि ती विचित्र प्रथा पाहुन बर्‍याच निराशजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.आणि ते स्वभाविक आहे.

आपल्यात पण बांगड्या घालने ,कान टोचने,नाक टोचने,पायात जाड-जाड तोडे घालने व इतरही बर्‍याच प्र्था या

विचित्र प्रथांचे छोटे स्वरुप आहे जे फक्त स्त्रीयांच्याच वाट्याला आहे कुठे आवडिने तर कुठे नाईलाजाने त्या हे पाळत असतात.

मस्त फोटोज !
ते गळ्यातल्या रिंग्जचे फोटो खरच खुप डिस्टर्बिंग आहेत.
ते दारुतले साप म्हणे दारू टेस्टी बनवतात >>> छे हो , दारु सापांना टेस्टी बनवते. Proud

Pages