चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५)

Submitted by rar on 1 October, 2015 - 00:53

ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्‍याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.
आता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा Happy
----------------------------------------------------------------------
आपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ! ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी !

सगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.
आपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :

लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे
लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे

यापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.

१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.
२) फोनवर काही उपयुक्त अ‍ॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अ‍ॅप नसेल तरी काही हरकत नाही.
१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.
७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी

साधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -
१०,००० स्टेप्स - दीड तास
७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे

३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट" पूर्ण करा.

सप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत ?
चला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk? Ready to take the challenge?
Good Luck and go for it ... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फिट्बीट चार्ज २ वाला आहे. सकाळी ५५००/६००० होतात, दिवसभरात मिळुन ११००० च्या पुढे आणी फ्लोअर तर ३० च्या पुढे.

रोज ७ ते ८ हजार पावले चालली जातात. पैकी ६००० ही "चालणे" या उपक्रमा अंतर्गत चालताना आणि उरलेली रोजच्या दैनंदीन वावरण्यात !
गेले वर्षभर अ‍ॅप असल्याने माझे आकडे मला कळले , पण हे इतके मी गेली १५- २० वर्षे रोजच चालतो आहे. पण वजन अलिकडे ४- ५ वर्षांपूर्वी ३-४ किलोने वाढले च आहे.

हे ६००० पाउले चालणे बर्याचवेळा टेकडी चढणे , धावणे अशा स्वरूपाचेही असते !
आणि इतर व्यायामही असतो जोडीला .. सूर्यनमस्कार , योगासने , Abdominal excersizes असे आलटून पालटून !!
पण खाण्यावरचा कंट्रोल सुटतो....

दिवसाला सरासरी १२,००० जमू लागली.
App च्या गेल्या सात दिवसांतल्या स्कोरवरून मिळणारा रँक ५० च्या आत आणला. काही नाही. रविवारच घरातच दर तासानंतर ५००-६०० पावलं मुद्दाम चाललो. रविवारी बहुतांश लोक चालायला जात नाहीत. त्याचा लाभ घेतला.

२) फोनवर काही उपयुक्त अ‍ॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. >> कुठली उपयुक्त अ‍ॅप आहेत. काही नावे कुणी सांगेल काय.?

चालत्यांनो,
चालण हा प्रकार अजिबात न आवडणारा मी आता तुमच्या वर्गात नवीन दाखल झालोय. मी एका ४४ किमी चालण्याच्या चॅलेंजमधे भाग घेतलाय.
अजून ४५ दिवस आहेत तयारीला. आतापर्यंत सलग २० किमी पर्यंत मजल गाठु शकलो आहे. वेळ फक्त शनिवार रविवारीच, आणि पुण्यात बाहेर प्रचंड ऊन. पण तरी अजून एका महिन्यात ३० किमी च्या वर पोहोचायचे लक्ष आहे. चॅलेंज युकेमध्ये म्हणून थंड व पावसाळी वातावरणात असण्याची शक्यता आहे.

दीर्घ अंतर चालायचा कुणाला अनुभव आहे का?. तुम्ही कशी तयारी केलीत, काय काळजी घेतली, काय टाळले, काय खाल्ले , चालण्याव्यतिरिक्त वेगळा काही व्यायाम केला का?. तुमचे प्रत्यक्ष अनुभव व सल्ले उपयोगी पडतील. कृपया येथे लिहा.

हा धागा वाचून मी सुधा चालण्या च अंतर वाढवलं रोज सकाळी 2km एकाचवेळी आणि रात्री 2,km एकाच वेळी चालयचो ते वाढवून सकाळी 5, km आणि रात्री 3 km Ase वाढवले पण एक लक्षात आले की जास्त अंतर चालण्यात चालण्याचा वेग कमी होत आहे आणि उन्हाचा त्रास पण खूप होतो .
फक्त चालणे हा पूर्ण व्यायाम आहे ह्याच्यावर माझा विश्वास कमी झालंय कोण्ही तरी सांगावे चालणे हा पूर्ण व्यायाम आहे का

आणि
जास्त अंतर कमी स्पीड नी चालण्या पेक्षा कमी अंतर जास्त स्पीड नी चालणे हे जास्त फायदेशीर आहे का

नाही चालणे हा पूर्ण व्यायाम नाही. परंतु तुमच्या lazy lifestyle साठी नक्कीच फायदेशीर आहे. कोणीतरी 1.5वर्षाच्या बाळाच्या हातात fitbit लावला होता तर त्याच्या दिवसाच्या steps 13k+ count झाल्या. असं वाचला कुठे तरी.
Anyways तुम्हाला पूर्ण व्यायाम करायचंय आहे तर अर्धा तास भरभर चालून मग सूर्यनमस्कार घालू शकता. सूर्यनमस्कार हा full body workout आहे. सुरुवातीला 5 सूर्यनमस्कार मग हळू हळू वाढवायचे

Pages