ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.
आता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा
----------------------------------------------------------------------
आपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ! ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी !
सगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.
आपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :
लेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे
लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे
यापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.
१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.
२) फोनवर काही उपयुक्त अॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अॅप नसेल तरी काही हरकत नाही.
१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.
७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी
साधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -
१०,००० स्टेप्स - दीड तास
७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे
३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट" पूर्ण करा.
सप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत ?
चला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk? Ready to take the challenge?
Good Luck and go for it ...
रोज सलग वेळेत इतके चालणे नाही
रोज सलग वेळेत इतके चालणे नाही जमायचे पण २ किमी व संध्याकाळी २ किमी चालणे होते ऑफिस च्या निमित्ताने
चांगला उपक्रम. मी ७५०० चे
चांगला उपक्रम.
मी ७५०० चे उद्दिष्ट ठेवत आहे.
चालणार!! असे आत्ता तरी
चालणार!! असे आत्ता तरी म्हणतोय. मधेच काहीतरी आधी ठरलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे म्हणतोय.
Me 25 sep pasun chalu
Me 25 sep pasun chalu kelay.
Roj sakali amachya colony madhe 5.5 or 6 KM chalte
mag ghari yeun fresh houn 1 tasani ghara pasun station paryant sadharan 1.6 KM
sandhyakali station to home 1.6
1 athavdyat farak janavtoy...sobat divsache Rs.40 auto che vachtat.
Mala sangayla avdel
Mala sangayla avdel ki...sobat me STARVA navache app chalu thevte...KM mojanya sathi ...gr8 app.
अभिनंदन रार! छान उपक्रम.
अभिनंदन रार! छान उपक्रम.
स_सा, ह्या चॅलेंजमध्ये सलग फिरावे अशी अट नसते. पण अॅप किंवा इतर फिटनेस डिव्हाईस वापरत नसाल तर मोजायला सोपे म्हणून सलग १-१.१५ तास फिरलेले बरे पडते.
सामान्यपणे नोकरीपेशा प्रौढ व्यक्ती १५०० ते ३००० पावले रोज चालते. त्यात १-१.१५ तास अधिक फिरल्यास ढोबळमानाने दहा हजार पावले चालून होतात.
आमच्या कंपनीने 'स्टेपथलॉन'
आमच्या कंपनीने 'स्टेपथलॉन' मोहिमेत भाग घेतला आहे. त्यानुसार आम्हाला एक स्टेप काउंट मोजण्यासाठीचे डिव्हाईस मिळालंय. ते वापरलं असता, ३.५-४.५ हजार पावले चालली जातात दररोज हे लक्षात आले. बैठे काम असल्याने चालणं फारच कमी.
आत्ता याचा वापर करून स्टेप काउंट वाढवायचा प्रयत्न आहे, म्हणजे फायदा होईल.
अर्थात मी हे डिव्हाईस सकाळी फिरायला जाताना (२० मिनिटे) वापरत नाही तरी पण काउंट एवढा जास्त होत नसणार.
बघू या धाग्यानिमित्त काही प्रगती होते का ते.
मस्तच उपक्रम ! सदिच्छा
मस्तच उपक्रम !
सदिच्छा
ंमी करतेय आजपासून सुरूवात,
ंमी करतेय आजपासून सुरूवात,
चांगला उपक्रम आहे. मी
चांगला उपक्रम आहे.
मी https://help.fitbit.com/?p=charge वापरते १०००० स्टेप्स साठी.
मी लेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे उद्दिष्ट ठेवत आहे.
मस्त (आणि आवश्यक) बाफ . मी
मस्त (आणि आवश्यक) बाफ :). मी मधे रोज प्रयत्न करायचो आणि सकाळपासून ठरवले तर १०००० करता येतात बहुतांश दिवस हे ही लक्षात आले होते. पण आता ते फिटबिट चालेनासे झाले - सेन्सर ची काहीतरी गडबड असावी. त्यामुळे एखादे अॅप सांगा योग्य. मग मी पण सामील होतो.
What you measure, you improve अशा अर्थाचे काहीतरी मायकेल हॅमर बोलला होता ते पटते याबाबतीतही.
स्टेप मोजायचे अॅपची नावे
स्टेप मोजायचे अॅपची नावे सांगाना प्लिज.
सायकलिंग/रनिंग/चालणे करता किमी मोजण्यासाठी स्ट्रावा वापरतो (केदारने ओळख करुन दिली)
स्टेपचे माहित नाही.
मस्त उपक्रम आहे हा.. गेल्या
मस्त उपक्रम आहे हा..

गेल्या वर्षी क्लाएंट ऑफिसमधे ठेवला होता .. सगळे रोज लंच ब्रेकमधे चालायला जायचे एकत्र.. नंतर मग वेळ मिळेल तसं.. दर महिन्याचा विजेता ठरवायचे
बरेच लोक काका-काकु, आजी-आजोबा कॅटेगिरीवाले होते.. रोज आले की एकमेंकांना विचारायचे तुझं किती माझं किती
विविध अॅप्स अॅन्ड्रॉईड
विविध अॅप्स अॅन्ड्रॉईड असेल तर गुगल फिट.
असाच काहीसा उपक्रम
असाच काहीसा उपक्रम (जगभरातल्या संयुक्ता मेंबर्सनी एकाच दिवशी एकाच वेळी चालायचं/धावायचं चॅलेंज) आऊटडोअर्स आणि मंजिरी ह्यांनी दीड दोन वर्षापूर्वी इंट्रोड्युस केला होता.
ओके केदार. फुट स्टेप काउन्टर
ओके केदार. फुट स्टेप काउन्टर असा सर्च दिल्यावर बरीच आली समोर.
चांगला उपक्रम. मी गेल्या
चांगला उपक्रम.
मी गेल्या वर्षापासुन आठवड्यतुन 5 दिवस हे चॅलेज पुर्ण करत आहे.
दिवसभरात २५०० स्टेप्स ऑफीस मध्ये दर तासाला आणि दुपारच्या जेवणानंतर आणि उरलेले ७५०० स्टेप्स संध्याकाळी साधारण १ तास चालुन पुर्ण करतो. apple6 खिसातच असतो, तो स्टेप्स मोजतो आणि पुर्ण वर्षाचा हिशोब पण ठेवतो.
.
खर सांगु का? लाज वाटती, भ्या
खर सांगु का? लाज वाटती, भ्या वाटत, पण काये ना की धा हजार असा आकडा लईच मोठा वाटतोय...

अन म्हणूनच मी गुगल फिट डाऊनलोड करुन घेतलय, आता नेहेमीच्या हालचालित किति पावले होतात ते बघतो, सांजच्याला फिरायला जातो तेव्हा किति पावले ते बघतो, अन मग अंदाज घेऊन ठरवतो की १० हजार होतील वा नाही.
तिकडे सायकलीचे साधे शंभर किमीही होत नाहीयेत महिनाभरात ( जोरात रडणारी बाहुली). गेल्या अख्या महिन्यात एक पेडलही नाही मारले :(( एनिवे.....
पैर सलामत तो सायकल पचास......
पावले मोजायचे नविन आकर्षण इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
मी नूम वॉक वापरायचे ते चांगलं
मी नूम वॉक वापरायचे ते चांगलं चालायचं. नंतर पेडोमीटर याच नावाचं एक वापरायचे. पण सेन्सिटिव्हिटी वगैरे सर्व हाय असून पण फोन किपॅड लॉक झालं की पावलं मोजणं बंद. (हे एम आय यु आय अपडेट नंतर व्हायला लागलं.)
आता गुगल फिट वर आले. सध्या चांगलं चालू आहे. कधीकधी अंगात आल्यासारखं पावलं मोजणं बंद करतं काही वेळ.
गूगल फिट पेक्षा 'विथिंग्स' हे
गूगल फिट पेक्षा 'विथिंग्स' हे अॅप पाहा. जास्त फिचर्स आहेत.
Vivofit आणि त्याबरोबर चालणे.
Vivofit आणि त्याबरोबर चालणे. गेले सहा महिने नियमीत ११,०००+ पावले टाकणे सुरू आहे.
आठवड्याला ३६ ते ४२ मैल चालणे होते... (काल आजारपणामुळे पहिला खण्ड पडला, म्हणजे चाललो नाही).
आज परत सुरू...
लिंबू, १०००० सुरूवातीला मोठा
लिंबू, १०००० सुरूवातीला मोठा वाटेल पण हळुहळू जमेल. नंतर आपण आपोआप जास्त चालू लागतो
पावले मोजायचीही अॅप असतात हे
पावले मोजायचीही अॅप असतात हे माहीत नव्हते, फ्री असेल तर डालो करेन लगेच, आणि ऑक्टोबरमध्ये चालायचे म्हणजे डोक्यावर छानशी सावली हवीच... त्यामुळे तुर्तास टार्गेट वार्गेट तर काही नाही पण अॅपने सध्या मी दिवसाला एवरेज काय किती चालतो हे मोजता आले तर बघण्याची उत्सुकता आहे.
मी आहे सामील !! दररोज टाकायचे
मी आहे सामील !! दररोज टाकायचे की दर सोमवारी. मला वाटते आठवड्यातून एकदा टाकले तरी चालतील. पण सुरवातीला एक आठवडा प्रोत्साहन म्हणून दररोज टाकणे पण पटते
आजपासून मी पण सामील
आजपासून मी पण सामील
मी लेवल २ ला सामील
मी लेवल २ ला सामील
फोन वरील काही उपयुक्त
फोन वरील काही उपयुक्त अॅप:
आयफोन ६/६s : हेल्थ अॅप आहेच जे दररोज तुमचे स्टेप्स् मोजते
पेसर (Pacer) : हे अॅप पण अँड्रॉईड आणि सर्व आयफोन वर मोफत उपलब्ध आहे. फक्त चालताना फोन जवळ ठेवावा लागतो (जो बहुतेक वेळा असतोच)
फार अवघड नाही : दुपारी आणि रात्री जेवणानंतर एक मोटी चक्कर मारली तरी १०K होउ शकतात.
आयफोन ६/६s : हेल्थ अॅप आहेच
आयफोन ६/६s : हेल्थ अॅप आहेच जे दररोज तुमचे स्टेप्स् मोजते >>> धन्यवाद एम्जी. हे बघतो. इतके दिवस फिटबिट मुळे पाहाय्ची गरज पडली नव्हती, ६ घेतल्यावरही.
फक्त फिटबिट दिवसभर घातलेले असल्याने घरातल्या घरात चाललेल्या स्टेप्सही त्यात आपोआप मोजल्या जातात, ते फोन मधे होणार नाही.
मी पण लेवल-२ ला सामील.
मी पण लेवल-२ ला सामील. आठवडाभर कसकाय होतं ते बघून अपग्रेड करता आलं तर बघतो. आठवडाभर तरी रोज अपडेट लिहा रे, गिल्टमुळे मोटीवेशन येईल.
फिट्बीट बँडचे सर्वात चांगले
फिट्बीट बँडचे सर्वात चांगले मॉडेल भारतात राहणार्यांना खूप महाग पडते.१९९००. अजून टेक्नॉलॉजी वाढली तर मोबाईल सारख्या किमती कमी होतील का हर्ट रेट मॉनीटर्स च्या?
अर्थात लुक्स आणि फिचर्स सर्वात चांगले फिटबीटचेच आहेत.
Pages