तेचबुक - स्टेटस - मुपीफेम ज्यु. ब्रम्हे

Submitted by राहुल१२३ on 27 September, 2015 - 16:35

तेचबुक - स्टेटस - मुपीफेम ज्यु. ब्रम्हे

ज्यु. ब्रम्हे - आज काकांनी पुन्हा एका तरुणीला लुनावर लिफ्ट दिली आणि साडे चार हजार रुपये गमावून बसले.

इन्स्पेक्टर महेश : डॅम इट! पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. काहीतरी करायला हवे.
(लाईक्स : ज्यु. ब्रम्हे, ब्रम्हे काका, दया, एसीपी प्रद्युम्न, चुलबुल पांडे, सिंघम आणि समस्त हिरो पोलीस दल) (डिसलाईक्स : समस्त गुन्हेगार मंडळी)

मुपी फेम मांजर : मी पण स्कुटीवरुन प्रवास करते. कधी स्कुटरच्या चाकाच्या आत, तर कधी डीकी मधुन. स्कुटरवरुन फिरताना मला विमानातुन फिरतेय असे वाटते. पण मला कधी कुणी पैसे नाही दिले की साधे बशीभर दुध ही! उलट ही पुण्यातली भटकी कुत्री मात्र सगळ्या दुचाकींच्या मागे भुंकत धावत असतात. त्यांचे काही तरी करायला पाहिजे.
(लाईक्स : मुपी फेम मांजर फॅन क्लब,अखिल पुणे सायकल क्लब, अखिल पुणे जॉगर्स क्लब, अखिल पुणे पाळीव कुत्री मित्र मंडळ)
(डिसलाईक्स : समस्त भटकी कुत्री, ब्रम्हे काका आणि ज्यु. ब्रम्हे)

एक भटका कुत्रा : काय साली ही पाळीव कुत्री म्हणावीत. आपल्याच जातीच्या प्राण्यांविरुध्द लाईक्स देतायत. भारीच माणसाळलीत साली.
(लाईक्सः समस्त भटकी कुत्री, मुपी फेम मांजर)
(डिसलाईक्स : समस्त पाळीव कुत्री )

दुसरा भटका कुत्रा : तर तर लांगुलचालन नाही केले तर यांचे वाढदिवसाचे फ्लेक्स कसे झ़ळकणार!
(लाईक्सः समस्त भटकी कुत्री)

एसीपी प्रद्युम्न : लांगुलचालन ?? भटका कुत्रा आणि इतकी शुध्द भाषा?? दया कुछ तो गडबड है
लाईक्सः समस्त पाळीव कुत्री, इन्स्पेक्टर महेश, चुलबुल पांडे, सिंघम, समस्त हिरो पोलीस दल

दया : सर, भटका कुत्रा असला म्हणून काय झाले. पुण्य नगरीतला आहे. विद्वानांचे उष्टे खाऊन तेवढी विद्वत्ता आलीच असणार
(लाईक्सः समस्त भटकी कुत्री, इन्स्पेक्टर महेश, चुलबुल पांडे, सिंघम, समस्त हिरो पोलीस दल, समस्त पुणे प्रेमी)

भटका कुत्रा : हा साला पाळीव कुत्राच असणार. डु. आय घेऊन आमच्या ग्रुप मध्ये घुसुन जासुदी करत असणार
(डिसलाईक्स : पाळीव कुत्री)
ज्यु. ब्रम्हे : धागा भरकटतोय. काकांचे ४,५०० रुपये लंपास करणार्या त्या मुलीचे काय?
(लाईक्सः समस्त मायबोली धागा बचाव मंडळ)

मुपी फेम पोपा मॅडम : ज्यु. ब्रम्हेचे काका हे माझ्या नाना वाड्यातल्या शाळेतले विद्यार्थी. नेहमीच काहीना काही वेंधळेपणा करणार. एकदा मी वर्गात काहीतरी तुटक तुटक, असंबद्ध शिकवत होते, तेव्हा याला निबंधाच्या वह्या घेऊन स्टाफ रुममध्ये पाठवले तर ह्याने त्या वह्या एका मुलीला देउन टाकल्या आणि ती मुलगी वह्या घेऊन पसार झाली. तेवढ्यात हेड सर आले आणि त्यांनी माझी बदली थेट येरवड्याला केली.
(लाईक्सः समस्त मुपी वाचक, ज्यु. ब्रम्हे, ब्रम्हे काका)

इन्स्पेक्टर महेश : डॅम इट! ही केस खुपच जुनी आहे तर. काहीतरी करायलाच पाहिजे.
(लाईक्सः समस्त हिरो पोलीस दल,)

मुपी फेम माया : लोखंडाची साखळी तुटेल पण आई वडिलांची माया तुटणार नाही
(लाईक्सः बबन)
(डिसलाईक्स : समस्त मुपी वाचक)

एसीपी प्रद्युम्न : डॉ. सालुंखे इस कमेंट मे जरुर कोई हिंट है
(लाईक्सः इन्स्पेक्टर महेश)

तात्या विंचु बाहुला : ओम भट स्वाहा ! Biggrin
(लाईक्स : रिशी पकुर )
इन्स्पेक्टर महेश: तात्या विंचु बाहुल्याची कमेंट लाईक्ड बाय रिशी पकुर ? Uhoh
दया : सर, आय डी दो हुए, तो क्या हुए, सारी दुनिया जानती है की तात्या विंचु बाहुला और रिशी पकुर एक ही इन्सान है.
(लाईक्सः एसीपी प्रद्युम्न)
(डिसलाईक्स : तात्या विंचु बाहुला, रिशी पकुर, घना)

शोले फेम राधा: Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1

ठाकुर : बहु, इतके दिवे कश्याला लावलेस?

रामुकाका : ठाकुर , तिन्ही सांजा झाल्यात ना? जय तिथे माउथ ऑर्गन वाजवतोय ना मग ही बया इथे असे सिग्नल देतेय.
(लाईक्सः जय, वीरु, बसंती)
(डिसलाईक्स : ठाकुर)

केतकर काका: काय रे जय, अदिती, रजनी, जुई माहिती आहेत मला! आता ही राधाची काय भानगड आहे.
कदम काका : अहो तो जय वेगळा नि हा जय वेगळा !
(लाईक्सः जय, नंदिनी मॅडम)

बबन : वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.
(डिसलाईक्स : समस्त मुपी वाचक)

इन्स्पेक्टर महेश : वेगळा विदर्भ ?? डॅम इट! ही काय नवी भानगड आहे.
(लाईक्सः समस्त हिरो पोलीस दल)

मुपी वाचक : (प्रतिक्रिया छापा) ते तुम्हाला नाय कळणार. कधी तरी मुपी वाचत चला.
(लाईक्स : समस्त मुपी वाचक)
दुसरा मुपी वाचक : अरे कुणीतरी अमेरिका वारी वर लेख लिहा रे!
(लाईक्स : समस्त मुपी वाचक)

एसीपी प्रद्युम्न : अमेरिका?? दया, जरा त्या धुमवाल्या इन्स्पेक्टर जय आणि अलीला फोन लाव. त्यांनी सोल्व केलेल्या केस वर आपण लेख लिहु नि मुपीवर छापवू.
(लाईक्स : समस्त मुपी वाचक)

केतकर काका: काय रे जय, आता हा अली कोण? ही काय “नवीन” भानगड आहे?

कदम काका : अहो तो जय वेगळा नि हा जय वेगळा !
(लाईक्सः जय, नंदिनी मॅडम)

दया : सर, कुछ भी करो पर मुपी मे अमेरिकावाला लेख मत लिखो. एक तो अभिजित के वजह से मै मै पहले ही बदनाम हु और ...
(डिसलाईक्स : अभिजित)

एसीपी प्रद्युम्न : और? और क्या दया?

भटका कुत्रा : अहो, कधी अमेरिका वारी वर एक लेख लिहाच. मग बघा. आम्ही मांजरींवर, दुचाकींवर तुटुन पडतो त्यापेक्षा भयंकर प्रतिक्रिया येतील. असेल हिंमत तर लिहुन बघा.
(डिसलाईक्स : समस्त मुपी वाचक)

ज्यु. ब्रम्हे : अरे माझ्या काकांच्या साडेचार हजार रुपयांचे काय झाले.

एक माबोकर: वाट बघा. इथे कुठल्या चर्चेचे विषय भरकटण्याशिवाय काही झालेय का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे मस्त कल्पना! पण स्वाती ठकार, यार्देना सासोन्कर इस्त्राइल, चालणारी आमसुलं, एवरेस्ट च्या शिखरावर, मोबाईल वाले माकड, टेकडीवर "डबा" धरून बसलेले चोर इ . इ . हवे होते!! शोले ,राधा , ठाकूर, महेश कुणाचीच गरज नव्हती मग!!

" इस्राइलवाल्या मॅडम " कोण?>>>> ते काहीतरी यार्देना सासोनकर असे नाव आहे >> बरोबर.. त्याच त्या.. sasonkar yardena israel

'डबा' धरुन बसलेले चोर? हा वाचला नसावा अजून. आणि तो एक चिनूने पाळलेल्या कोंबडीच्या पिल्लाचा लेख आहे न एक?
चालणारी आमसुलं मात्र एकदम आऊट ऑफ वर्ल्ड आहेत.

पण स्वाती ठकार, यार्देना सासोन्कर इस्त्राइल, चालणारी आमसुलं, एवरेस्ट च्या शिखरावर, मोबाईल वाले माकड, टेकडीवर "डबा" धरून बसलेले चोर इ . इ . हवे होते!! शोले ,राधा , ठाकूर, महेश कुणाचीच गरज नव्हती मग!!

>>
मला वाटले होते की मुपीची पात्र एवढी फेमस नसतील, म्हणून इतर प्रसिद्ध पात्र अ‍ॅड केली. पण इथल्या प्रतिक्रिया वाचुन तर वाटतंय की मी समजत होतो त्यापेक्षा मुपी खुपच हीट आहे.

यार्देना सासोनकर >> मी जेव्हा पासुन मुपी फॉलो करतोय, तेव्हा पासुन तरी यांच्या प्रतिक्रिया फारश्या वाचण्यात नाही आल्या.

बाकी मुपीतल्या "मास्टर पीस" लेखांची लिस्ट कुठेतरी ठेवायला हवी.

माबोवर एका धाग्यावर मुपीतल्या लेखांच्या लिंक्स साठवता येतील का? आय मीन माबोच्या पॉलिसीनुसार चालेल का?

र्म्द, फेबु वर ग्रुप आहे मुपीचा. तिथे बर्‍याच सुपरहिट लिन्का आहेत.
डिकीनं चुकवलं विमान, अमेरिकेतल्या ब्लॅक आउट मधे लोळत दरवाजाखालून बाहेर यावे लागलेली प्रेग्नन्ट बाई, ताम्हिनी घाटात गाडीच्या ब्रेक खाली आलेला फुटबॉल, फार भारी भारी अजरामर साहित्य आहे मुपीत! Happy

बायदवे ही बघ चालणारी आमसुलं Happy
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=FUEE

"मुक्तपीठ facebook" असं गुगल करा Happy सगळ्या लिन्का मिळतील. इथे ऑफिस मधे फेबु नाही बघता येत त्यामुळे लिन्क्स नंतर देईन हव्या तर. .

>>>चालणारी आमसुलं, एवरेस्ट च्या शिखरावर, मोबाईल वाले माकड, टेकडीवर "डबा" धरून बसलेले चोर इ . इ . हवे होते!! >> Rofl

http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5380818249547306815

http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5612429860566415089

http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5579794248106326196

http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5406500643385796947

http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5224765647076197708

ह्या घ्या अजून थोड्या लिंका Happy स्वाती ठकार कमेंट्स करता सेव्ह केल्या होत्या मी बहुतेक.

Pages