Submitted by मंजूताई on 27 September, 2015 - 02:08
लागणारा वेळः १ तास
लागणारे जिन्नसः मूळ कृती प्रमाणे
बदललेले घटकः गाजर ऐवजी दुधी व चणाडाळी ऐवजी: पिस्ता
क्रमवार पाककृती:
दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्या. किसणीने किसून सालं काढून घ्या. एका कढईत तूप टाकून किस मंद आचेवर शिजवायला ठेवा. सोललेले पिस्त्याची आपल्या आवडी प्रमाणे जाड बारीक पावडर करून घ्या. दुधीचा किस कोरडा होत आला की साखर व नारळाचा चव घाला. हे मिश्रण कोरड होत आलं की पिस्त्याची भरड, वेलदोडा जायफळ पूड घाला. मिश्रण कढई सोडायला लागलं की तूप लावलेल्या थाळीत पसरवून वड्या पाडा.





टीपा:
१) दुधीची किसून साल काढली त्या सालाची चटणी करता येते.
२) वडी चवीला उत्तम झाली घरच्यांना आवडली.
३) वेगवेगळी कॉम्बिनेशन्स वापरून वेगवेगळ्या नैसर्गिक रंगाच्या वड्या करता येतील उदा: गाजर्/लाल भोपळा व बदामाची पूड व काटं कोहळ व काजू घालून पांढर्या वड्या , डाळींबाचा रस घालून इ.
४) वड्यांच्या ऐवजी मोदक किंवा इतर साचे वापरुन विविध आकार देता येतील.
५) क्रोममधून पाकृ लिहिली त्यात नविन पाकृ धागा दिसत नाहीये.
६) फोटो गंडलेत... वड्यांचा छान हिरवा रंग आहे. सवडीने फोटो सुधारण्यात येतील. कोणी केल्यास सुंदर फोटो टाका.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो मोठे टाका ना.
फोटो मोठे टाका ना.
वा नाव झकास. वडयांची चव ही
वा नाव झकास. वडयांची चव ही मस्तच असेल. फोटोच तंत्र अजून जमलं नाहीये ना? झूम करुन पाहिले.
Mast combination aahe.
Mast combination aahe.
मस्त आहे कल्पना. मला आधी
मस्त आहे कल्पना.
मला आधी वाटलं की दोन्ही घटकांऐवजी पिस्तेच वापरलेत त्यामुळे दोनदा पिस्ते म्हणून दुपिस्ता. मटण दो प्याजा च्या चालीवर.
दुधी आणि पिस्ते छान लागतील असं वाटतंय.
Bhannat combination.. Mast
Bhannat combination.. Mast lagat asnar chavila...photo khup lahan distoy
छानच लागत असणार. आवडली
छानच लागत असणार. आवडली पाककृती.
मस्त आहे प्रकार!
मस्त आहे प्रकार!
मस्त आहे दुपिस्ता वडी. छान
मस्त आहे दुपिस्ता वडी.
छान दिसतायेत वड्या.
मस्त
मस्त
आवडले बदल.
आवडले बदल.
मस्त!
मस्त!
छान दिसताहेत वड्या.. दुधीच्या
छान दिसताहेत वड्या..
दुधीच्या वड्या नेहमीच आवडतात. दादरचं प्रकाश हॉटेल आणि आस्वाद हॉटेल दोन्हीकडच्या अप्रतिम सुंदर असतात.
पिस्ते एक कप घेतले का?
दुधीच्या वड्या! आह्हा!!
दुधीच्या वड्या! आह्हा!!