लेझर बाबत मार्गदर्शन हवे आहे

Submitted by bvijaykumar on 27 September, 2015 - 00:25

मी डायबेटीक रेटिनोपथी आहे. डोक्टरां नी लेझर चा उपचार सांगितला. त्याप्रमाणे २ सेटिंग ही झाले . मायबोली वर यावर अनेक उहापोह वाचला. माझी शंका हीच आहे की ... लेझर चा उपचार केल्यानंतर काय दुष्परिणाम होतात ? उपचार केल्यानंतर डोळा पुर्ववत होण्यासाठी किती कालावधी लागतो.? ही बाब माहीत आहे. की जी दॄष्टी आहे तीच राहते.. २ सेटींग झाल्या नंतर जवळची दॄष्टी योग्य वाट्ते. पण दुरची दॄष्टी धुसर झाल्यासारखी वाटते. २ दिवस झाले आहेत. मार्गदर्शन करावे. स्वःत चे अनुभव शेअर करावेत.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डायबेटिक रेटायनोपथी पूर्णपणे पूर्ववत होऊ शकत नाही. लेजरमुळे रोग आटोक्यात रहातो व दृष्टी काही प्रमाणात सुधारते.

याच विषयाबाबत मलाही विचारायचे होते.
आजकाल संजिवन नेत्रालय (Retina Care Centre) यांची बरीच जाहिरात सुरु आहे. लेजरची गरज नाही वगैरे.
काही तथ्य आहे का त्यात? कुणाला काही अनुभव?

"Our Prescribed Ayurvedic Medicine are FDA (India) Approved."

असे त्या संजीवन नेत्रालयावर लिहिलेले आहे. हिंदुस्थानातील सर्वाधिक प्रगत शास्त्रानुसारच्या उपचारांसाठी तुम्हाला शुभेच्छा!

बीविजयकुमार, या बाबतीत तुम्ही तज्ञ डॉक्टरांचा सल्लाच घेतलेला उत्तम. कारण इथले अनुभव हे व्यक्तिसापेक्ष असणार जे तुमच्या बाबतीत लागू पडतीलच असे नाही. तुमचे वय, कामाचे स्वरूप इत्यादीनुसार नेत्रतज्ञ तुम्हाला उपाय सांगतील. हवे तर अजून एका नेत्रतज्ञाचा सल्ला त्याबाबतीत घेऊ शकता.

एक पॉजिटीव्ह अनुभवः
माझ्या वडलांना डोळ्याचे विकार उद्भवतील याची सुरुवातीपासून कल्पना होती (डायबेटिक नाहीत मात्र लहानपणापासून मोठ्या नंबरचा चष्मा वगैरे). पस्तिशीत मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले. त्यानंतर त्यांचे वय/कामाचे स्वरुप व विकसित होणार्‍या तंत्रज्ञानानुसार त्यांच्या डॉक्टरांनी जी उपाय योजना अवलंबिली त्यामुळे त्यांना जवळपास साठीपर्यंत दोन्ही डोळ्यांनी काम करता आले. या उपाययोजनेत लेजरचा समावेश होता. त्याचे काही दुष्परिणाम (माहिती असलेले) झालेही मात्र एकुण निर्णय हा एक ट्रेडऑफ होता. या काळात डोळ्यात फ्लोट येणे, रेटिनाशी संबंधित काही इतर व्याधी हे सर्व होत होते. अर्थात त्याची कल्पना होती व त्याप्रमाणे त्यावर शक्य ते उपचार केले.
तेव्हा केवळ अमूक एका उपचारपद्धतीचे साइडइफेक्ट/दुष्परिणाम न बघता अनेक इतर बाबी बघून तुम्हाला तज्ञ लोक तुम्हाला योग्य तो सल्ला देतील.