मायबोली गणेशोत्सव २०१५ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३ - खेळ मांडियेला" २३ सप्टेंबर - समाप्त!

Submitted by संयोजक on 22 September, 2015 - 23:51

गणपती बाप्पा मोरया!

आपल्या लहानपणच्या आठवणींच्या खजिन्यातला एक लखलखता कप्पा असतो तो लहानपणच्या खेळांचा आणि आपल्या आवडत्या खेळगड्यांचा. वय वाढतं, खेळ बदलतात आणि ते बदलतच राहतात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर. आणि हळूहळू लहानपणी हरेक खेळात हिरीरीनं भाग घेणारा हरहुन्नरी खेळाडू, प्रेक्षक कधी बनून जातो त्याचं त्यालाच कळत नाही... आणि म्हणूनच कदाचित तो लखलखता कप्पा कायमच लखलखत राहतो आपल्या आठवांच्या भाऊगर्दीतही!

आज तोच आपला आवडता खजिना चित्ररूपाने उलगडायचा आहे 'मायबोली गणेशोत्सव २०१५'मध्ये, झब्बू खेळताना!

'खेळ मांडियेला'

आजवर खेळलेल्या, न खेळलेल्या, बैठ्या, मैदानी, सांघिक, वैयक्तिक अश्या सार्‍या सार्‍या खेळांच्या तुम्ही टिपलेल्या रूपाला तुम्हांला मायबोलीकरांसोबत उजाळा द्यायचा आहे.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ वेगवेगळे खेळ आणि खेळ खेळताना खेळाडूंची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ:
Slide8.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा.. .. या कॅटेगिरीत बसणारा एक ही नाही कलेक्शन मधे..पण पाहायला मज्जा येणारे..
म्हंजे ऑलरेडी झालीच आहे मस्त सुरुवात

.

मानुषी, तुम्ही दिलेले दोन्ही फोटो चालणार नाहीत. खेळ खेळतानाचा किंवा खेळण्याच्या साहित्याचा फोटो हवा आहे.

खरा खेळ, राज्य कुणावर किंवा पहिली बॅटींग कुणाची हे ठरवण्यापासूनच चालू होतो त्यामुळे हा फोटो चालावा

DSC00193.JPG

Pages