पुणे
लिंबूटिंबू, साजिरा,
तुमचा प्रेमळ आग्रह मी समजू शकतो. पण काय आहे, साजिरा, मी इथे कितीहि अपेयपान, अभक्ष्य भक्षणाच्या बाता मारल्या, तरी बोलून चालून मूळचा भटच. अस्सल को. ब्रा. मला खरे तर आपले पुण्याचे भारतीय जेवणच आवडते. पण लिंबूटिंबू, अहो तुमच्या सौ. ना एव्हढा त्रास कशाला? त्यापेक्षा आपण वैशाली, बॅरिस्टा मधे वगैरे भेटू. तिथे आपण आपली उदबत्ति लावली तर ते हरकत घेणार नाहीत ना?
भेळ इ. पदार्थ मला वर्ज्य. दरवर्षी भारतात आल्यावर किमान तीन दिवस तरी मरणोन्मुख अवस्थेत जातात. तेंव्हा आपले गरम चहा, कॉफी पुरे.
आता भारतीय वेळेची मला कल्पना आहे (इथले भारतीय तरी फारसे वेगळे नाहीतच.) तेंव्हा तुम्ही सर्वांना ९ वा. भेटायचे आहे असे सांगा. फारतर रवीवारी एव्हढ्या भल्या पहाटे उठायला लावले म्हणून मला चार दोन शिव्या घालतील! त्यात काय नवीन?
अर्थात माझ्यातर्फे! मागे तुम्ही सगळा उपद्व्याप केलात, मी आयता बसून जेवलो. आता थोडी फूल ना फुलाची पाकळी माझ्यातर्फे.
लिंबूटिंब
लिंबूटिंबू, अहो तुमच्या सौ. ना एव्हढा त्रास कशाला? >>>>
म्हणजे या ऑप्शनवर अर्थातच अजून फुली मारलेली नाही झक्कींनी, असा याचा अर्थ होतो बरं का लिंबूदादा! मीही मग झक्कींसोबत आलो तर कसे? मलाही जेवायला मिळेल ना? पुर्ण जेवण होईस्तवर तुम्हीच बोला. मी चकार शब्द तोंडातून न काढता जेवेन.
फक्त बटाटाट्यात उदबत्ती मला नको, फक्त झक्कींनाच लावा (म्हणजे झक्कींच्या ताटासमोर लावा).
बाकी झक्की, माझ्या आमंत्रणाचा पुन्हा एकदा विचार करावा ही विनंती. मागच्या आठवणी चार वर्षे पुरल्या. यावेळीही उदबत्तीचा वास वगैरे आवडला नाही, अन ते आणखी ४-५ वर्षे लक्षात राहिले, तर उगाच त्रास.
बघा बुवा!
--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!