श्रीरामावताराची क्षमा मागून
स्टेटस अपडेट - वाईफ किडनॅपड, फिलिंग सॅड अॅंड लोनली
सुपर लाईक बाय उर्मिला
रिप्लाय (राम) -उर्मिले, ताई हरवली तर तू लाईक देतेस?
रिप्लाय (उर्मिला) - भावोजी, तुम्ही आम्हा दोघांची अशीच ताटातूट केलीत, आता भोगा आपल्या कर्माची फळे
लाईक- लक्ष्मण
कैकयी - तरी सांगत होते टवळीला दागिने घालून जाऊ नकोस वनवासात. पण मी सासू आणि तीही सावत्र, मग कोण ऐकतेय?
लाईक - मंथरा
डिस्लाईक - कौसल्या आणि कैकयी
कौसल्या - रामा, आता तरी तुझे 'एकपत्नीव्रत' सोड रे
लाईक - सुमित्रा आणि अयोध्येतील मंत्रीगण
सुग्रीव - हे राम, सेलिंग इन द सेम बोट
लाईक - तारा
हनुमान - च्यामारी ! आमची डबल ड्युटी सुरु झाली म्हणायची. बॉस, आधी, प्रमोशन लेटर हातात द्या, त्याशिवाय लंकेपर्यंत उडत जाणे, द्रोणागिरी उचलणे असली अंग-मेहनतीची कामे नाही करणार.
लाईक - अंगद, जांबुवत आणि अनेक वानरे आणि अस्वले
डिसलाईक - राम, लक्ष्मण, सुग्रीव
रिप्लाय (राम) - काय बोलतोस हनुमंता, शोभते का असे बोलणे?
रिप्लाय (हनुमान)- आधी तुमच्या फॅमिलीचे ते "वचनप्रिय" हे बिरुद फेकुन द्या. मी फसलोय इथे तुमच्या वचनपुर्तीची म्हणजे माझ्या प्रमोशनची वाट बघत.
रिप्लाय (राम)- अरे तुझ्याशिवाय मी काय अन कसे करु?
रिप्लाय (हनुमान) - आउटसोर्स करा ही अंग-मेहनतीची कामे, नाहीतरी स्टेटस अपडेट केलेत ना तेचबुकावर. मग शोधु देत त्या मायबोलीकरांनाच सीतामाईला.
नल - यो ! एकदाचे आपल्या फिल्डमधले काम आता तरी मिळणार बुवा.
लाईक - नील आणि इतर अनेक स्थापत्यविशारद
रिप्लाय (नील)- गुडलक ब्रो. यु कॅन डू इट.
लक्ष्मण- दादा, माझे ऐक. तसे ही सैन्य जमवणे, सेतूबंधन, लंकेत पोहोचून लढाई करणे, सैन्याचा खर्च हे सारे आपल्या 'वनवास बजेटमध्ये' अंतर्भूत नाहीच आहे. त्यापेक्षा वहिनीपेक्षाही एखाद्या सुंदर राजकन्येशी विवाह करणे हे डील चांगलेच कॉस्ट सेव्हर आहे.
रिप्लाय ( राम) - प्रजेच्या हितासाठी तुझ्या पर्यायाचे मी स्वागत करतो लक्ष्मणा.
लाईक - भरत, शत्रुघ्न, कौसल्या, सुमित्रा, सुमंत, इतर मन्त्री व समस्त अयोध्यावासी
डिसलाईक - जनक, उर्मिला, मांडवी, शॄतकीर्ती
सीता -हाय ऑल, माय फर्स्ट एअर ट्रॅवल !! थ्रिलिंग एक्स्पिरिअन्स !! लंका- द गोल्डन सिटी - ऑसम. ठेवलेय काय त्या भिकार अयोध्येत? आय लव्ह धिस लॅंड !!
लाईक - उर्मिला, मांडवी, शृतकीर्ती
डिसलाईक - राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न,कौसल्या, सुमित्रा, कैकयी आणि समस्त अयोध्यावासी
रिप्लाय (मांडवी) - ताई, माझी शॉपिंग लिस्ट पाठवते ग व्हॉटस अपवर.
रावण - हुर्रे ! टारगेट अचिव्हड !!
लाईक - शूर्पणखा
डिसलाईक - मंदोदरी
रिप्लाय (मंदोदरी) - भला इसमे ऐसी क्या बात है जो मुझमे नही?
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आदिमाता - अरे विष्णू, काय चालले आहे काय? अरे मानवी मर्यादेत राहून मानवाना 'मर्यादापालन' शिकवण्यासाठी तुला हा अवतार घ्यायला लावले मी. इतके माणसाळायला नाही सांगितले. लक्ष्मी, शेषनाग तुम्ही दोघेही??? थांबा, तुमची मेमरीच फॉर्मॅट करते
आदिमातेच्या सुपरकम्प्युटरवरुन - ऑल्ट + कंट्रोल + डिलिट
मस्त लिहिलंय !
मस्त लिहिलंय !
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/52145#new या कट्ट्यावर.
आशिका, शब्दखुणांच्यात नुसती
आशिका, शब्दखुणांच्यात नुसती तेचबूक! अशी शब्दखूणही दे. म्हणजे त्यावर क्लिक केल्यावर सगळ्या एंट्र्यांअमध्ये तुझीही एंट्री दिसेल.
मस्त लिहलेय
मस्त लिहलेय
ऑल्ट + कन्ट्रोल + डिलिट
ऑल्ट + कन्ट्रोल + डिलिट
भारीये सांभाळून हं. धार्मिक
भारीये
सांभाळून हं. धार्मिक भावना दुखावायला सुरूवात झाली सुद्धा...
नव्या प्रतिसादासाठी धन्यवाद
नव्या प्रतिसादासाठी धन्यवाद !
प्लीज, कुणाच्याही धार्मिक भावना दुखवायचा हेतू नाही हो. मुळात मी पण याच धर्माची आणि अश्विनीने म्हटल्याप्रमाणे पूर्णतया आस्तिकच आहे. तेव्हा हे सगळे स्टेटस अगदी करमणूक म्हणून लाइटली घ्या.
मामी- हो शब्दखूणात तेचबूक लिहिते.
तेचबूक ! - राम बदलुन
तेचबूक ! - राम बदलुन
परफेक्ट मल्ली
परफेक्ट मल्ली
सही जमलंय
सही जमलंय
(No subject)
सही
सही
क्षमा याचना घातल्याने बदललेय
क्षमा याचना घातल्याने बदललेय का?
शेवटचा ट्विस्टतर धम्माल आहे.
शेवटचा ट्विस्टतर धम्माल आहे. आशिका .... सह्हीच. मामि + १
क्षमा याचना घातल्याने बदललेय
क्षमा याचना घातल्याने बदललेय का?>>>> हो + घरच्या लॅपटॉपवरुन अनुस्वार उमटत नाहीत. त्यामुळे किंवा हा शब्द किन्वा असे टाईप केले होते, ते सारे शब्द आता अनुस्वार देऊन लिहिलेत.
आवडलं. मायबोलीने तात्पुरता
आवडलं.
मायबोलीने तात्पुरता काही तरी फेसबुक सारखा यु आय दिला तर मजा येईल
विशेष हे आवडलं
"नल - यो ! एकदाचे आपल्या फिल्डमधले काम आता तरी मिळणार बुवा.
लाईक - नील आणि इतर अनेक स्थापत्यविशारद
रिप्लाय (नील)- गुडलक ब्रो. यु कॅन डू इट."
मस्तच ग आशिका
मस्तच ग आशिका
धन्यवाद नवीन प्रतिसादकांना.
धन्यवाद नवीन प्रतिसादकांना.
Pages