श्रीरामावताराची क्षमा मागून
स्टेटस अपडेट - वाईफ किडनॅपड, फिलिंग सॅड अॅंड लोनली
सुपर लाईक बाय उर्मिला
रिप्लाय (राम) -उर्मिले, ताई हरवली तर तू लाईक देतेस?
रिप्लाय (उर्मिला) - भावोजी, तुम्ही आम्हा दोघांची अशीच ताटातूट केलीत, आता भोगा आपल्या कर्माची फळे
लाईक- लक्ष्मण
कैकयी - तरी सांगत होते टवळीला दागिने घालून जाऊ नकोस वनवासात. पण मी सासू आणि तीही सावत्र, मग कोण ऐकतेय?
लाईक - मंथरा
डिस्लाईक - कौसल्या आणि कैकयी
कौसल्या - रामा, आता तरी तुझे 'एकपत्नीव्रत' सोड रे
लाईक - सुमित्रा आणि अयोध्येतील मंत्रीगण
सुग्रीव - हे राम, सेलिंग इन द सेम बोट
लाईक - तारा
हनुमान - च्यामारी ! आमची डबल ड्युटी सुरु झाली म्हणायची. बॉस, आधी, प्रमोशन लेटर हातात द्या, त्याशिवाय लंकेपर्यंत उडत जाणे, द्रोणागिरी उचलणे असली अंग-मेहनतीची कामे नाही करणार.
लाईक - अंगद, जांबुवत आणि अनेक वानरे आणि अस्वले
डिसलाईक - राम, लक्ष्मण, सुग्रीव
रिप्लाय (राम) - काय बोलतोस हनुमंता, शोभते का असे बोलणे?
रिप्लाय (हनुमान)- आधी तुमच्या फॅमिलीचे ते "वचनप्रिय" हे बिरुद फेकुन द्या. मी फसलोय इथे तुमच्या वचनपुर्तीची म्हणजे माझ्या प्रमोशनची वाट बघत.
रिप्लाय (राम)- अरे तुझ्याशिवाय मी काय अन कसे करु?
रिप्लाय (हनुमान) - आउटसोर्स करा ही अंग-मेहनतीची कामे, नाहीतरी स्टेटस अपडेट केलेत ना तेचबुकावर. मग शोधु देत त्या मायबोलीकरांनाच सीतामाईला.
नल - यो ! एकदाचे आपल्या फिल्डमधले काम आता तरी मिळणार बुवा.
लाईक - नील आणि इतर अनेक स्थापत्यविशारद
रिप्लाय (नील)- गुडलक ब्रो. यु कॅन डू इट.
लक्ष्मण- दादा, माझे ऐक. तसे ही सैन्य जमवणे, सेतूबंधन, लंकेत पोहोचून लढाई करणे, सैन्याचा खर्च हे सारे आपल्या 'वनवास बजेटमध्ये' अंतर्भूत नाहीच आहे. त्यापेक्षा वहिनीपेक्षाही एखाद्या सुंदर राजकन्येशी विवाह करणे हे डील चांगलेच कॉस्ट सेव्हर आहे.
रिप्लाय ( राम) - प्रजेच्या हितासाठी तुझ्या पर्यायाचे मी स्वागत करतो लक्ष्मणा.
लाईक - भरत, शत्रुघ्न, कौसल्या, सुमित्रा, सुमंत, इतर मन्त्री व समस्त अयोध्यावासी
डिसलाईक - जनक, उर्मिला, मांडवी, शॄतकीर्ती
सीता -हाय ऑल, माय फर्स्ट एअर ट्रॅवल !! थ्रिलिंग एक्स्पिरिअन्स !! लंका- द गोल्डन सिटी - ऑसम. ठेवलेय काय त्या भिकार अयोध्येत? आय लव्ह धिस लॅंड !!
लाईक - उर्मिला, मांडवी, शृतकीर्ती
डिसलाईक - राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न,कौसल्या, सुमित्रा, कैकयी आणि समस्त अयोध्यावासी
रिप्लाय (मांडवी) - ताई, माझी शॉपिंग लिस्ट पाठवते ग व्हॉटस अपवर.
रावण - हुर्रे ! टारगेट अचिव्हड !!
लाईक - शूर्पणखा
डिसलाईक - मंदोदरी
रिप्लाय (मंदोदरी) - भला इसमे ऐसी क्या बात है जो मुझमे नही?
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आदिमाता - अरे विष्णू, काय चालले आहे काय? अरे मानवी मर्यादेत राहून मानवाना 'मर्यादापालन' शिकवण्यासाठी तुला हा अवतार घ्यायला लावले मी. इतके माणसाळायला नाही सांगितले. लक्ष्मी, शेषनाग तुम्ही दोघेही??? थांबा, तुमची मेमरीच फॉर्मॅट करते
आदिमातेच्या सुपरकम्प्युटरवरुन - ऑल्ट + कंट्रोल + डिलिट
हे राम! घोर कलियूग रे
हे राम! घोर कलियूग रे बाबा....
सुपर डुपर लाईक!!!!! शेवटचा
सुपर डुपर लाईक!!!!!
शेवटचा ट्विस्टतर धम्माल आहे. आशिका .... सह्हीच.
आशिका , सही जमलय. हसुन हसुन
आशिका , सही जमलय. हसुन हसुन मुरकुंडी वळली.
(No subject)
सीता -हाय ऑल, माय फर्स्ट एअर
सीता -हाय ऑल, माय फर्स्ट एअर ट्रॅवल !! थ्रिलिन्ग एक्स्पिरिअन्स !! लन्का- द गोल्डन सिटी>>
रावण - हुर्रे ! टारगेट अचिव्हड !!>>
तुमची मेमरीच फॉर्मॅट करते>>
जब्बरदस्तं!!!!
आशिका भारीये हे!
आशिका भारीये हे!
मस्तं आहे!
मस्तं आहे!
Mast! Khup ch aawadale! Dev
Mast! Khup ch aawadale! Dev ekdum technosavy zalet sagle....tu
आशिका हजारो लाईक्स....
आशिका हजारो लाईक्स....
हे हे हे भारीये!
हे हे हे भारीये!
ुहे राम
ुहे राम
(No subject)
(No subject)
मस्त!
मस्त!
अगदीच खल्लास !!
अगदीच खल्लास !!
भारी
भारी
आशिका द्वापाराला बायपास करुन
आशिका
द्वापाराला बायपास करुन कली नावाचा व्हायरस त्रेतायुगात शिरला
ढिंचॅक एकदम..
ढिंचॅक एकदम..
माय फर्स्ट एअर ट्रॅवल !!
माय फर्स्ट एअर ट्रॅवल !! थ्रिलिन्ग एक्स्पिरिअन्स !! लन्का- द गोल्डन सिटी - ऑसम.
सही
सही
Good one
Good one
धन्यवाद सगळयांना
धन्यवाद सगळयांना
आधुनिक राम !
आधुनिक राम !
too good
too good
हे राम...
हे राम...
मस्त ग
मस्त ग
सनातनीनी वाचले तर ठ्ठो करुन
सनातनीनी वाचले तर ठ्ठो करुन उडवतील.
(No subject)
मस्त लिहिलय! कट्ट्यावर या
मस्त लिहिलय!
कट्ट्यावर या धाग्याची लिंक मिळाली.
सकुरा, कट्ट्यावर (नोड ४९८१)
सकुरा, कट्ट्यावर (नोड ४९८१) ह्या धाग्याचं डिस्कशन झालेलं नाही.
लबाडकोल्हा, धागाकर्ती पुर्णपणे आस्तिक आहे आणि राम तिचे आराध्य आहे. तिने विनोदी उपहासाने वरिल स्टेटस लिहिले आहे. आदिमातेच्या कमेंटवरुन ते कळायला हवं.
Pages