मधू मलुष्टे : बी.ए. कम्प्लीटेड, फायनली! फीलिंग ऑसम्म!
शेअर्ड बाय सुबक ठेंगणी
सुबक ठेंगणी, झंप्या दामले, सखाराम गटणे, हरितात्या, बावज्या धना बोहोरीकर आणि ६७ अदर लाईक धिस.
सुबक ठेंगणी : प्राऊड ऑफ यू
मधू मलुष्टे अँड १२७ अदर लाईक धिस.
हरितात्या : पुराव्याने शाबित करा!
सुबक ठेंगणी : दाखवून टाक रे त्यांना बी.ए.चं सर्टिफिकेट...
मधु मलुष्टे अँड १२७ अदर लाईक धिस.
हरितात्या : तो पुरावा नव्हे. मधू मलुष्टे आणि सखाराम गटणे या दोन वेगळ्या व्यक्ती नव्हेत, एकच आहेत असं माझं कायमचं मत आहे! त्याबद्दल बोलतोय मी!
मधु मलुष्टे : यू सी, ही जाहीर बदनामी आहे, यू सी...
सुबक ठेंगणी आणि सखाराम गटणे लाईक धिस.
झंप्या दामले : असेनात का! बी.ए. कम्प्लीटेड, फायनली!
सुबक ठेंगणी लाईक्स धिस.
सखाराम गटणे : हरितात्या, माझे असे प्रांजळ मत आहे, की आपल्याला अजून प्राज्ञ परिक्षेची पातळी लक्षात आलेली नाही!
हरितात्या : मी बी.ए.च्या परिक्षेबद्दल बोलतोय. आणि तू जाहीर बदनामीचं वाक्य लाईक काय केलंयस? महाराज असते तर शिरच्छेद केला असता तुझा...
झंप्या दामले लाईक्स धिस.
बावज्या धना बोहोरीकर : मधूशेट, ते बी.ए.च्या परिक्षेमंदी आक्षर चांगलं आसावं लागतंय की त्याबिगर पन चालून जातंय?
झंप्या दामले : आता काय फरक पडतो! बी.ए. कम्प्लीटेड, फायनली!
सुबक ठेंगणी : अक्षर चांगलं असावं लागणारच. तिथे लेखनिक नसतो कुणी ’आक्षरास हासू नये’ असं लिहून घ्यायला...
मधु मलुष्टे, झंप्या दामले अँड १२७ अदर लाईक धिस.
झंप्या दामले : अजून सख्याने हरितात्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाही!
बावज्या धना बोहोरीकर लाईक्स धिस.
सखाराम गटणे : सख्या हे संबोधन वापरण्याची अनुमती मी केवळ सेक्रेटरीसाहेबांना दिलेली आहे. इतर कुणीही माझ्या अनुमतीविना मला या नामाने हाक मारू शकत नाही.
सेक्रेटरी लाईक्स धिस.
सुबक ठेंगणी : मधू कुठे गायब झाला या सगळ्यात?
मधु मलुष्टे अँड १२७ अदर लाईक धिस.
हरितात्या : घाबरला महाराजांच्या शिरच्छेदाच्या शिक्षेला...
बावज्या धना बोहोरीकर : पर, शिर्छेद त सखारामचा व्हनाराय ना?
मधु मलुष्टे, सुबक ठेंगणी अँड १२७ अदर लाईक धिस.
मधु मलुष्टे : लोकांना फार पंचाईती पडलेल्या असतात, फार चौकश्या करतात, फार...
सुबक ठेंगणी लाईक्स धिस.
हरितात्या : अजूनही तिय्या साधता येतच नाही वाटतं!
झंप्या दामले : आता काय फरक पडतो! बी.ए. कम्प्लीटेड, फायनली!
सही . आवडल. मी पण पु ल़ ची
सही . आवडल. मी पण पु ल़ ची महा पंखा.
शेअर्ड बाय सुबक ठेंगणी >>
शेअर्ड बाय सुबक ठेंगणी >> भारीए हे..
स्वस्ति लाईक्स धीस
स्वस्ति लाईक्स धीस
भारी आहे हे !!
भारी आहे हे !!
आवडलं....
आवडलं....
लोल. भारीच !
लोल. भारीच !
सुबक ठेंगणी! गोड आहेत सगळेच
सुबक ठेंगणी! गोड आहेत सगळेच फ्रेंडलिस्टमधले. पुलं नी वाचले असते तर..!
सहीये...
सहीये...
भारी!!
भारी!!
छान लिहिलंयस.
छान लिहिलंयस.
भारी!
भारी!
(No subject)
मस्तच !
मस्तच !
<सुबक ठेंगणी! गोड आहेत सगळेच
<सुबक ठेंगणी! गोड आहेत सगळेच फ्रेंडलिस्टमधले. पुलं नी वाचले असते तर..! स्मित> +१
छान आहे कल्पना!!
भारीय. अजून लिहायला हवं
भारीय. अजून लिहायला हवं होतंस. रावसाहेब हवेच होते या स्टेटसामध्ये.
आता काय फरक पडतो! बी.ए.
आता काय फरक पडतो! बी.ए. कम्प्लीटेड, फायनली!
<<
मस्त जमलंय
(No subject)
हरितात्या : अजूनही तिय्या
हरितात्या : अजूनही तिय्या साधता येतच नाही वाटतं! >>> गिरीकंद लाईक्स धिस.
ललितादेवी, >> सुबक ठेंगणी :
ललितादेवी,
>> सुबक ठेंगणी : अक्षर चांगलं असावं लागणारच. तिथे लेखनिक नसतो कुणी ’आक्षरास हासू नये’
>> असं लिहून घ्यायला...
हा खास तुमच्या शैलीतला विनोद वाटतो. अजून येऊ द्या.
आ.न.,
-गा.पै.
नंदिनी, >> रावसाहेब हवेच होते
नंदिनी,
>> रावसाहेब हवेच होते या स्टेटसामध्ये.
नक्की का? कळली हो तुमची अभिरुची!
आ.न.,
-गा.पै.
(No subject)
मस्त!
मस्त!
आवडलं
आवडलं
सह्ही!!!
सह्ही!!!
मस्त. सकाळी वाचल्यावर विचार
मस्त.
सकाळी वाचल्यावर विचार करताना इतर १२७ पात्र घालून डोक्यात स्टेटस यायला सुरुवात झालेली. पण इतकंच गोड वाटतंय, बाकीचं वाचकांवर सोडून दिलेलं.
मला सुबक ठेन्गणी खाशी आवडली.
मला सुबक ठेन्गणी खाशी आवडली.:फिदी:
हंड्रेड पर्सेंट जमलंय
हंड्रेड पर्सेंट जमलंय
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
सही!
सही!
Pages