माणुसकीच सत्य

Submitted by vasant_20 on 8 September, 2015 - 08:36

अयलान, थोडा मोठा असतास
तर कळाल असत तुला
शाळेतल्या रबराने खोडता येतील
अशा रेघोट्या नसतात नकाशावर
आणि त्या दिसत नसल्या प्रत्यक्षात
म्हणुन ओलांडायच्याही नसतात कधी

पडले असतील अनेक प्रश्न
जेंव्हा तुला झिरकाडल असेल
पण कळाल असेल एक सत्य
माणसां सारखे असले तरी
ती माणसंच असतील अस नाही

अयलान, तू आता पहात असशील
संवेदनांचे, अश्रुंचे, भावनांचे आलेले पूर
कदाचित तुलाही भरून आल असेल
एवढं प्रेम पाहुन
पण तू थोड़ा मोठा असतास
तर तुला कळाल असत
आम्हालाही लागतो एक 'नरबळी'
आमच्यातली माणुसकी दाखवायला
आमच्यातल्या संवेदना जागवायला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users