आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991
स्वित्झर्लंड भाग ६ - युफ http://www.maayboli.com/node/53065
स्वित्झर्लंड भाग ७ - सुरसी http://www.maayboli.com/node/53248
स्वित्झर्लंड भाग ८ - अर्नीसी ! http://www.maayboli.com/node/53359
स्वित्झर्लंड भाग ९ - आईनसिडऽन आणि इन्नरथाल http://www.maayboli.com/node/54499
स्वित्झर्लंड भाग १० - रिगी http://www.maayboli.com/node/54543
स्विस नॅशनल चॅनेल वर दर गुरुवारी रात्री ९ वाजता वेगवेगळ्या विषयावर माहितीपट दाखवायचे. अगदी निवडक आणि सुंदर. कधी विषय इन्टेरेस्टिंग असेल तर मार्था न चुकता मला हाक मारायची ते बघायला यायला! अर्थात सगळ जर्मन मध्येच असायचं पण मार्था मला सगळ अगदी वर्ड टु वर्ड ट्रान्सलेट करुन सांगायची! केव्हढा संयम तिच्या ठायी! त्यादिवशी पण असच मार्थाची टिपिकल कुलदी ऽऽऽ प" अशी हाक आलीच, दी जरा जास्तच दीर्घ करुन! त्यादिवशी Die Kinder vom Napf (नाफ् मधली मुले) हा माहितीपट होता. नाफ नावाची डोंगररांग बर्न आणि ल्युसर्न च्या सीमेवर आहे. गोलाकार छोट्या छोट्या टेकड्या हे त्याच वैशिष्ट्य! तर तिथली मुले अगदी कडक हिवाळ्यात शाळेला कशी जातात आणि एकंदर त्याम्चे जीवन याविषयी हा महितीपट होता. तिथलं दिसणारं ते निसर्गसौंदर्य पाहुन मी मार्थाला म्हटल की मला इथे जायचय कुठे न कसं जाऊ सांग. हिवाळा असल्याने तिथे जाणारा पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद होता! म्हणुन मग तिने मला नाफ् मधेच असणार्या मेन्झबर्ग च नाव सुचवल आणि मी निघालो! हार्डकोर विन्टर होता. -९ तापमान घराजवळच! दिवस म्हणायच कारण गच्च अंधार नव्हता एव्हढच! आदित्यराव आकाशगंगे तर राजीनामा देऊन गेल्यासारखेच! तरी नाफ् ने पछाडलं होतं!
प्रवास, हवा, परीसर, निसर्ग यासगळ्याचं वर्णन दोन शब्दांत होऊ शकेल- बर्फाळ आणि थंडगार!
नाफ् च्या परीसरात आलो हे त्या गोलाकार टेकड्या बघुनच लक्ष्यात आलं
सगळीकडे मऊसुत शुभ्र कापुस पसरला होता जणु. आमची टुमदार आरामशीर बस आम्हाला त्या टेकड्यांमधुन नेत होती (ड्रायव्हर धरुन आम्ही चर जण!!!! कसं परवडतं काय माहीत. आमच्यात एवढी माणसे बसने प्रवास करतात तरी के एम टी नेहमी तोट्यात , आणि इकडे चार जणानी प्रवास करुन पण यांची पोस्ट ऑटो मात्र फायद्यात! हे काही बरोबर नाही!)
मेन्झबर्गात पोहोचलो आणि पोस्त ऑटोतुन बाहेर पडलो. थंडी सनकुन झोंबायला लागली. खर, का माहीत नाही त्या थंडीचा त्रास होत नव्हता. एव्हढी झोंबत होती म्हणुन कुठेतरी गरम ठिकाणी जावं असं वाटत नव्हतं. परत कधी अशी थंडी अनुभवायला मिळेल काय माहित! बसने आम्हाला तिथल्या एकमेव हॉटेलच्या दारात नेऊन सोडल!
भयंकर भुक लागली होती! मझं आवडतं केजहोर्नली (उच्चाराप्रमणे लिहिणं कठिण आहे!) आणि रिवेल्ला मागवलं!
खाऊन तरतरीत झाल्यावर मेन्झ्बर्ग आणि परीसर बघायला बाहेर पडलो! इथे लोकवस्ती अवघी ६००! त्यातले अर्ध्याहुन आधिक ६० च्य पुढचे आणि तरुण अधिककरुन झुरिक, बर्न, बासेल सरख्या मोठ्या शहरात नोकरीला असलेले. त्यामुळे गाव तसं शांत!
आजुबाजुला बर्फाळ जंगल! अगदी नार्निया आठवला मला बघताना!
उत्तर युरोपमधील आल्प्सच्या दर्याखोर्यात आढळणारे सुचिपर्णी वृक्ष वगैरे सगळं भुगोलातल अचानक आठवलं! म्हणजे आपल्याला भुगोल अगदीच काही खोटा शिकवला नाही म्हणायच!
बर्फाने अलगद कवेत घेतला होता झाडांना!
झाडावर साचुन राहिलेल हलकं हिम झाडाना एकदम वेगळंच रुप देत होत! दैवी शक्ती असल्यासारखं!
समोर चर्च दिसलं! छोटुसं!
छोटं चर्च म्हणुन कॉम्प्र्माईज नाही कुठे. चालु अवस्थेत असलेला एक ऑर्गन तिथेही होताच!
ख्रिसमस चे दिवस होते. आपल्याकडे बाळकृष्णाच्या लीलांचे देखावे जसे असतात तसं इथे बालपणीच्या ख्रिस्ताच्या लीलांचा छोटासा देखावा होता!
खिडकीतुन अचानक प्रकाश आत पसरला! आदित्यराव आल्याची वार्ता! बाहेर येऊन पाहिल तर गर्द धुक्यातुन वाट काढत सुर्यकिरण मंडळी मेन्झबर्ग मधे येत होती!
सुर्याचा पहिला किरण त्या चिमुकल्या घरावर अगदी विकत घेतल्यासारखा. सुखी माणसाचा सदरा तिथेपण! नंतर कळलं की ते एका धनाढ्य शेतकर्याचं घर होतं. उगवणारा सुर्यासरशी येणारा पहिला किरण आपल्या घराला उजळुन टाकतो ही भावनाच अगदी स्वर्गसुखाची आहे !
शुभ्र बर्फावर पडलेले सुर्यकिरण चर्चला अजुनच शांत स्वरुप देत होते
आणि झाडाना गुदगुल्या करत होते!
सुर्याप्रकाशामुळे हवेतले बाष्प (अगदीच हवामान खात्याचा शब्द!) दिसु लागले! बाय द वे बर्फात त्या नांगरल्यासारख्या खुणा माझ्यामुळे झाल्या आहेत. बर्फात मनसोक्त पळापळ केली!
ऊन पडल्यावर झाडांच्या पानांवर साचलेले बर्फाचे स्फटीक लकाकु लागले!
हे घर अर्धं बर्फात बुडालं त्यावरुन बर्फ किती होता हे लक्ष्यात येईल!
खुळ लागल्यासारखं सगळं डोळ्यात साठवत होतो! काय काय बघणार. १२ ते ४ एकसलग मी हिंडत होतो! पुर्ण मेन्झबर्ग मधे मी एकटा असल्यासारखा! अशी शांतता मनात झिरपत जाते आणि मन पण शांत होत! रेमण्ड फॉस ची एक कविता हे सुंदर सांगते!
High up at the top of the chairlift
at the summit of the mountain,
the trees were coated, as with larger amounts of clay
with snow and ice, layer on layer
from mother nature and the snow guns of man
the trees carried the load with aplomb
graceful, statuesque, white,
hiding their evergreens.
मला परत घेऊन जाणारी पोस्ट ऑटो आली होती. गुड बाय म्हटलो नाही कारण परत मी कधीतरी जाणार आहे तिथे!
आपल्याकडे खेड्याच्या वेशीबाहेर एखादं घर असत तसं हे!
आणि टेकडीवर असलेलं हे अजुन एक टुमदार घर जाताना दिसलं! मागच्या जन्मी काय पुण्य केलं त्यात राहणार्या माणसाने काय माहीत!
येतो रे बाबा नाफ्!
अजुनही कधीकधी झोपेत मेन्झबर्ग च्या गोल टेकड्या स्वप्नात येतात, अंगात हुडहुडी भरल्यासारखं वाटत! सुर्यप्रकाशाने होणार्या गुदगुल्यांचा पुन्हा पुन्हा भास होत राहतो!
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
काय लिहीतोस रे! मस्त.
काय लिहीतोस रे! मस्त.
मस्त रे
मस्त रे
मस्त फोटो. अशा बर्फात सगळं
मस्त फोटो. अशा बर्फात सगळं खरंच फार सुंदर दिसतं.
मस्तच...
मस्तच...
जबरी फोटो !!!
जबरी फोटो !!!
अप्रतिम! काय सुंदर सफर
अप्रतिम! काय सुंदर सफर घडवली...खरंच त्या गावाची शांतता सर्व फोटोज मध्ये व्यापून राहिली आहे!
सुपर क्लास , कुलु, तुझं
सुपर क्लास , कुलु, तुझं निरिक्षण, तुझ्या जाणिवा आणी फोटोज.. क्लास!!क्लास!!
आहाहा, आहाहा कुलु, आहाहाच
आहाहा, आहाहा कुलु, आहाहाच सर्व. आता शब्द संपले तुझं कौतुक करायला.
थँक्यु, ह्याही अप्रतिम सफरीसाठी.
वजा ९ तापमान शिवाय
वजा ९ तापमान शिवाय आदित्यरावांनी सुट्टी घेतलेली.....रस्त्यावर चिटपाखरूदेखील नाही. अशा परिस्थितीत केवळ शुभ्रतेचे दर्शन कॅमे-यात साठवूण ठेवण्यासाठी कुलदीपने जे प्रयत्न केले आहेत ते किती सुंदर रुपात इथे प्रकटले आहेत हे जाणवते जरूर.....तरीही तो त्यावेळी क्लिक करतानासुद्धा किती गारठला असेल याची केवळ कल्पनाच आम्ही करू शकतो.
आता स्वप्नात जरी ह्या जागा आल्या तरी हुडहुडी भरल्यागत तुला होते यातच सर्व काही आले. नशीबवान आहेस खरा.
सुपर्ब फोटो
सुपर्ब फोटो
मस्त!
मस्त!
अरे, काय जबरदस्त आहे हे!
अरे, काय जबरदस्त आहे हे! अफलातून फोटो आणि वर्णनही! फार आवडलं!
अप्रतिम! नशीबवान आहेस हे सगळे
अप्रतिम!
नशीबवान आहेस हे सगळे प्रत्यक्ष पाहायला मिळाले.
स्वप्नवत वाटतंय सगळं, मस्तच
स्वप्नवत वाटतंय सगळं, मस्तच फोटो.
मस्त रे त्या बर्फातल्या
मस्त रे
त्या बर्फातल्या नांगरल्यासारख्या खुणा पाहुन एक लहाणपणीचा खेळ आठवला.
ग्राउन्डवर पायात गुळगुळीत झालेल स्लीपर घालुन एकाने उकीडवं बसायच आणि दोघांनी त्याचे एक एक हात पकडुन त्याला ओढत न्यायचं.
बर्फात हे असं काहि करायला लैच धमाल येइल
भन्नाट फोटो, वर्णन, अनुभव
भन्नाट फोटो, वर्णन, अनुभव सगळचं.
आजच्या दिवसाची सुरवात मस्त झाली
शांत आणि सुंदर
शांत आणि सुंदर
कुलु ....... कसलं भारी
कुलु ....... कसलं भारी लिहितोस तू! अप्रतीमच!
नार्निया.........+१०००
आणि फोटो .................नि:शब्द झाले मी!
.
.
सुरेखच रे फोटो आणि लेख मेळ
सुरेखच रे
फोटो आणि लेख मेळ मस्त जमून आलाय
तेरा ये नजरिया मुझे भी दे दे
तेरा ये नजरिया मुझे भी दे दे ठाकूर जीयो, मेरा दिन बन गया!
नार्निया, भूगोल.. यासोबत मला हायडी पण आठवत गेली. त्या शेतक-याच्या घराभोवती पडलेलं लुसलुशीत ऊन बघून तिचं ते माळ्यावरच्या गोल खिडकीतून आत पाझरणारं टिपुर चांदणं आठवलं.
सगळेच फोटो अप्रतिम आहेत, पण मला ख्रिस्ताच्या देखाव्याकडेचं अलगद पकडलेलं ऊन खुप आवडलं.
इतकी नीरव शांतता, धवल परिसर, कोवळं कोवळं ऊन आणि त्यात फक्त आपण एके आपणच.. नुसत्या कल्पनेनंच हरखायला झालं. ह्या इतक्या शुभ्राने मनही आपसुक साफ होऊन गेलं असेल नाही?
मस्त. नार्निया, भूगोल..
मस्त.
नार्निया, भूगोल.. यासोबत मला हायडी पण आठवत गेली. >+१
वर्णन आणि फोटो दोन्ही अतिशय
वर्णन आणि फोटो दोन्ही अतिशय सुंदर !!
फोटो एकदम सुपर्ब,आणि वर्णन पण
फोटो एकदम सुपर्ब,आणि वर्णन पण छान..
अशोकमामा आणि सई फार सुंदर
अशोकमामा आणि सई फार सुंदर प्रतिसाद.
सर्वांचे खुप खुप आभार! हे
सर्वांचे खुप खुप आभार! हे फोटोज इथे अपलोड करताना माझा मला पण कधी कधी स्वतःचा हेवा वाटतो. इतकी सुंदर सुंदर ठिकाणे बघता आली!
मामा आणि सई, खरंच सुंदर प्रतिसाद! हैदी तर आल्प्सच्या दर्याखोर्यात कुठेही गेलं तरी आठवत राहतेच! परीसर तोच आहे!
झकास तु म्हणतोस तस बर्फात खेळतात! मज्जा येते!
डोळे आणी मन अगदी तृप्त झाले,
डोळे आणी मन अगदी तृप्त झाले, धन्यवाद कुलु.
वाह मस्त वर्णन आहे.... डोळे
वाह मस्त वर्णन आहे....
डोळे आणी मन अगदी तृप्त झाले, धन्यवाद कुलु.> +१
धन्यवाद रश्मी .. न माउ
धन्यवाद रश्मी .. न माउ
Pages