स्थळः मरीन ड्राईव्ह
वेळः रात्री ११ ते पहाटे कितीही..
सोबतः बेगम अख्तर, अबिदा परवीन, फरिदा खानुम, रेखा भारद्वाज, जगजित सिंग, गुलाम अली खान, गालिब वगैरे..
असल्या भयानक रोमँटीक वातावरणात बसलेलं असताना मनभर उदासी व्यापलेली असावी यासारखा वैताग नाही. Be aware what you wish for or it might come true. Hell it does! It does come true and its extremely frightening. It shatters my soul to its very core. Am I among the lucky ones or what? Because I always get what I want. May be at wrong time, may be in wrong place, may be at wrong point but I always get what I want. माझा एक मित्र (त्याला "अ" म्हणू) मला म्हटलेला, "you fancy being lonely. You romanticize the pain of loneliness." आणि त्यावेळी मला ते पटलं नव्हतं. नंतर जेव्हा पटलं तेव्हा मी त्या वेडातून बाहेर आलेले किंवा मला असं वाटलेलं तरी की मी बाहेर आलेय. (आपल्याला जे वाटतं ते खरं असतं का? खरंच खरं असतं का? असलं तर कितपत खरं असतं? विचारांचं कसं असतं, many a times we think that we think. तसंच भावनांचं पण असतं का? वाटण्याचं पण असतं का? I feel what I feel but sometimes I might feel what I choose to feel. But what if what I choose to feel is imaginary and I am not able to think of it as imaginary? What if I perceive imaginary as real?) तर मी त्या एकटेपणाच्या वेडातून बाहेर आले or at least तसं जेव्हा वाटत होतं त्याला कारण म्हणजे माणसांच्या रुपात झालेले काही साक्षात्कार. काही गुंतागुंत न करता पण उत्कट होणं शक्य असतं आणि अतिशय सहज सोपं रहाणं पण जमू शकतं हे पाहून एकटेपणाचं वेड कधीतरी संपलं. or मला तरी संपल्यासारखं वाटलं सोबतीच्या स्वप्नांच्या सोबतीने. पण ते होणं नव्हतं. I didnt realize when my fetish became my destiny. Or it was meant to be? As Sarah and Phil say,
May be love stay
May be love can't
May be love shouldn't...
Love arrives exactly when love is supposed to
And love leaves exactly when love must
When love arrives say,
"Welcome, make yourself comfortable"
If love leaves,
ask her to leave the door open behind her
Turn off the music, listen to the quiet Whisper,
"Thank you for stopping by".
Say thank you for stopping by and move on. Move on as its all you can do. And even if you cant, you have to. You have to stretch your limits and move on. In search of a bigger pain may be.
आणि आता तू.. मित्र कॅटेगरी वेगळे. त्यांना अ, ब, क म्हणू शकते. तू मित्र नाहीस. तुला 'क्ष' म्हणू. तू मित्र नक्कीच नाहीस पण बराच काही आहेस पण तरी तू आणखी कोणी होऊ शकत नाहीस. तुला कदाचित हे सगळं माहितीही पडणार नाही. पण त्याने फरक पडत नाही. जब भी खयालोंमे तू आये.. चारचौघांत असताना तुझी आठवण आली तर खिंडीत गाठल्यासारखी अवस्था होते, चेहर्यावरचे भाव लपवणं अशक्य होतं. तुझी आठवण एकटीला सोसवत नाही. विश्वरुप पहायला जशी दिव्यदृष्टी लागते तसं तुझ्या निवांत आठवणींसोबत जॅक डेनियल्स हवी. बाय द वे, जॅक डॅनियल्स चं नाव जॅक डॉवसन का नाही? नाव पाहिजे जॅक डॉवसन आणि बाटलीवर केट चं 'चित्र'! माझा परमनंट ब्रँड झाला असता मग तो. असो, तर तुझी आठवण..
हर रगे खूं में फिर चरागां हो,
सामने फिर वो बेनकाब आए।
कोणाला आपण बघू शकतो असं बेनकाब? किती लोकांना बेनकाब भेटायला आवडेल आपल्याला? वासनांनी बरबटलेलं, जखमांनी विदिर्ण झालेलं, सगळ्या गुणावगुणांसहितचं अस्तित्व. असं किती लोकांना बघावसं वाटेल? पण तरीही काहींना असं बघावसं वाटतं. The naked soul is still haunting with its every torment and turmoil. त्यातला तू.
तुम्ही कल्पना बनवता, कल्पना जगता. स्वप्नं बघता, स्वप्नं शोधता खर्या जगण्यात. हरुन, हरवून, थकून गेल्यावर कळतं, अर्रे ही स्वप्नं आहेत. नुसत्या कल्पना, मृगजळ. यात काहीच खरं नाही, काहीच सत्य नाही. सत्य होणं शक्य नाही. You give up your chaotic dreams and make peace with the reality. ते स्वप्न आहे.. ते स्वप्न आहे... ते स्वप्न आहे..... असं काही नसतं. असं कुठे कधीच नसतं. तसं वाटत असलं तरी तसं नसतं. Make peace with the fact. And what the hell! why to stop just at making peace? Learn to be happy with that. Because now you know its possible. Being happy is possible even when your chaotic wild dreams are not fulfilled. You can be happy. And you be and exactly at that very moment yet another dream comes true. Again at wrong time. At wrong place. मला दिसतं की माझं स्वप्न खरं होतं, खरं असू शकतं. I was not all wrong in believing in it. मला दिसतं माझ्या नजरेसमोर माझ्या स्वप्नाचं वास्तव रुप. आणि त्याच्या जवळपास पोहचता येणंही अशक्य असतं. स्पर्श करणं तर दूरच. देव खुश असावा अशा वेळी. त्याने तथास्तु म्हणून आपलं काम केलेलं असतं. आणि नशीब की काय ते आपल्या क्रूर योगायोगावर हसत असावं. आणि मी उद्ध्वस्त!
दिल तो रोता रहे और आँख से आंसू न बहे..
इश्क की ऐसी रवायात ने दिल तोड़ दिया..
समोर समुद्र आहे. ज्याच्याकडे मी तासन् तास नुसतीच पहात बसू शकते तो समुद्र. मी अजून समुद्र पार केला नाहीये, कधी स्पर्श केला नाहीये त्याच्या क्षितिजाला. पण उगीचच खात्री वाटते की मी कधी पडले तिथे तर बुडणार नाही. अलगद तरंगत ठेवेल मला समुद्र. विचित्र आहे. पण आता वाटतं तर वाटतं... खरंतर मला आत्ता या क्षणी कसलाच विचार करायचा नाहीये. तरीपण मी स्वतःचा विचार करतेय पण त्यात मी कुठेच नाही, सगळा तूच आहेस. सगळा तू.. सगळा तुझा कोलाहल. मी नाहीच..
जब कि तुझ बिन नहीं कोई मौजूद,
फिर यह हंगामा ए खुदा क्या है?
तुला समुद्र आवडतो का? आवडत असावा का? तुला नक्की काय आवडत असावं? समुद्र? सह्याद्री? पाऊस? मैफिल? एकांत? solitude? or sweet rush? गजल की ठुमरी? अख्तरबाई की लता? bike or car? तू सलग २४ तास गप्पा मारु शकतोस का? पुस्तकातली पात्रं तुझ्या आयुष्यात जिवंत माणसांइतकी खरी असतात का? रोज ४-४ मूव्हीज बघत तू सलग किती दिवस काढू शकतोस? तुझी स्वप्नं रंगीत असतात का? तुला तुझी स्वप्नं आठवायला आवडतात का? रात्री २ वाजता एकटा समुद्रावर बसलास तर तू कसला विचार करतोस? डोकं जड होईपर्यंत पावसात भिजायची हुक्की येते का तुला? morning person or night owl? tea lover or coffee fan? असंख्य प्रश्न. ज्यांची उत्तरं कधीच मिळणार नाहीयेत आणि मला तुझं चित्र कधीच पूर्ण करता येणार नाहीये. आणि म्हणूनच मला स्वत:चा विचार करायचाय. तुझा नाही. तरीही सगळा तूच आहेस डोक्यात. आज मैं तुझसे दूर सही और तू मुझसे अंजान सही.. वास्तविक मला मुंबईचा समुद्र फारसा आवडत नाही. किंबहुना मुंबईच आवडत नाही. मुंबईत शिरल्या शिरल्या सगळा खारा वैतागलेपणा आणि गोंधळ अंगाला चिकटतो इथल्या चिकट हवेबरोबर. नकोसा वाटतो. रिमझिम गिरे सावन चं फिमेल व्हर्जन कधी पाहिलंय का? त्यातला तो पाऊस आणि मुंबई ही मुंबईची मला सगळ्यात जास्त आवडलेली रुपं. बाकी मला मुंबई कधीच आवडली नाही. ना ही मुंबईचा समुद्र. तरीपण या क्षणी मला फार फार बरं वाटतय की समोर समुद्र आहे.
एक अजनबी झोंकेने जब पूछा मेरे गम का सबब,
सहरा की भीगी रेत पर मैंने लिखा, आवारगी...
आयुष्यात कधीच कुठलाच वेडेपणा न करावासा वाटणार्या लोकांविषयी माझ्या मनात जबरदस्त कुतूहल आहे. कधीच कोणताच प्रश्न न विचारता सगळं काही कसं विनातक्रार मान्य करु शकतात हे लोकं? की तक्रारी असतात पण सांगत नाहीत? वाटत असूनही मनाला आवर घालतात? मग आपल्याला का जमत नाही? का जमवावसं वाटत नाही मनाला बांध घालणं? आयचा घो!
मानवी इतिहासात नाती कधी नितळतेच्या फूटपट्टीवर मोजली गेली आहेत का? नसतील तर का नाही? Why do we always measure them on the scale of legitimacy and not purity? I guess because its easy. आपल्याला सगळ्याचं सुलभीकरण हवं असतं. And it leads to mediocrity. पण मध्यम मार्ग सोडून आजूबाजूला काय आहे? कोणी बघायचा प्रयत्न केलाय का? सख्ख्या भावाबहिणीपेक्षा पुस्तकातलं एखादं पात्र जास्त जवळचं आणि ओळखीचं असू शकत नाही का? एखाद्या बापलेकीपेक्षा एखाद्या अनोळखी माणसाचं त्याच्या दुकानात कधीमधी येणार्या मुलीबरोबरचं नातं जास्त घट्ट नसेल कशावरुन? एखाद्या नवरा बायकोच्या नात्यापेक्षा एखाद्या रखेलीचं आणि तिच्या कस्ट्मरचं नातं जास्त नितळ नसेल कशावरुन? आणि असं असू शकत असेल तर legitimacy ला काय अर्थ राहिला?
स्वतःशी बोलल्याला खूप काळ लोटला. अवघड असतं स्वतःशी बोलणं. पण स्वतःशी बोलणं तर चालूच असतं ना. इतके दिवसही बोलतच होते की. पण ते काही खरं नाही. स्वतःचीच समजूत घालणं, counselling करणं, स्वतःला improve करणं, analysis करणं म्हणजे संवाद नव्हे. स्वतःचा सगळा cynicism ऐकता आला पाहिजे. तटस्थपणे. Oh yes! I am cynic. And I havent been cynic in so long. I was in pain. I was depressed. But I avoided being cynic for too long successfully. I had almost forgotten how does it feel to be cynic. माझा अजून एक दुसरा मित्र, 'ब' म्हणालेला, "you can eat life out of anything." याला खूप वर्षे झाली. तेव्हा मला नीटसं कळलंही नव्हतं त्याला काय म्हणायचंय. मग कळलं तेव्हा मला वाटलं की मला आवडतं असं असणं.
मेरा अज़्म इतना बलंद है के पराये शोलों का डर नहीं..
मुझे ख़ौफ़ आतिश-ए-गुल से है, ये कहीं चमन को जला न दे..
पण तू guess केलंस तेव्हा मी नाकारलं सपशेल. आपल्याला इतक्या लवकर कोणी इतकं ओळखावं हे काही मला बरं वाटलं नाही. But yes, you were right. I can eat life out of anything and everything.
मुझे छोड़ दे मेरे हाल पर तेरा क्या भरोसा है चारागर,
ये तेरी नवाजिश-ए-मुख़्तसर मेरा दर्द और बढ़ा न दे...
Acts of liberation. Yes! acts.. actions.. because rebellion doesnt always lead to liberation. So always weigh your options and actions. Seek liberation.
Act in front of mirror the weirdest character you can imagine..
Travel to foreign land alone..
Dance crazily like/when nobody is watching..
Drink alone...
Liberation.. Missing you at 2 past midnight by the sea without bothering about the world which might get confused if anyone observed expressions on my face...
Seek liberation.. Reach to the point where you dont need to seek it any longer.
मैं यहां टुकडोंमे जी रहा हुं..
तू कही टुकडोंमे जी रही है...
अशा तुकड्या तुकड्यांतच जगतेय कधीपासून. यातून एकसंध चित्र कधी तयारच होणार नाही का? तुकडे.. मनाचे, भावनांचे, स्वप्नांचे, विचारांचे.. निवडलेले.. जाणिवपूर्वक.. पण चित्र तयार होण्याच्या दृष्टीने नगण्य..पण चित्र पूर्ण कराण्यासाठी म्हणून निवडू शकत नाही सरसकट काहीच. कसं मान्य करायचं? तुम्हाला परिसीमा माहिती आहे. सोबतीची.. एकटेपणाचीसुद्धा. You know the limits. The extremes. You know how it feels to talk continuously for 24 hours and stop just because of physical limitations. Go to sleep. Continue the conversation in dreams and continue it in real after getting up for another 24 hours. And you also know how it feels not to utter a word for months. Even years. But its all worth it. तुम्हालाच कळत नाही तुम्ही कधी तयार झालेले असता २८ युगांच्या एकटेपणाची किंमत मोजण्यासाठी त्या एका दिवसासाठी. तुमची तयारी होत असते, कधीच चित्र पूर्ण करु न शकणारे पण आयुष्याचे लखलखते तुकडे मिळवण्याची. तुमची तयारी झालेली असते तुमच्याही नकळत.
I know its absurd. I know it doesnt make any sense. अस्तित्वात असलेल्या पण भेटू न शकणार्या लोकांशी, अस्तित्वातच नसलेल्या लोकांशी, भेटूनही परक्या राहिलेल्या लोकांशी,अशा सगळ्यांशी बोलायला.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःशी बोलायला absurdism बरा पडतो..
हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले...
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले....
आता पुन्हा २८ युगांचं एकटेपण.....
------------------------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/
असल्या भयानक रोमँटीक
असल्या भयानक रोमँटीक वातावरणात बसलेलं असताना मनभर उदासी व्यापलेली असावी यासारखा वैताग नाही>>>
पहिलेच वाक्य मनाला असे भिडले की पुढचा सगळा लेख अधाश्यासारखा वाचून काढला आणि वाक्या- वाक्यागणिक सहमती वाढतच गेली. मनातली घालमेल किती सुंदर रीतीने व्यक्त केली आहे तुम्ही. You made my day!!
खूप खूप आभारी आहे!
बेस्ट लिहिलंय! जियो जियो!
बेस्ट लिहिलंय! जियो जियो! __/\__
वाह, चांगल जमलय, मधे मधे
वाह, चांगल जमलय,
मधे मधे आंग्ल तुकडे आहेत ते टाळता आले असते तर एकसलगता अजुन चांगली जमली असती. अर्थात हे आमचे वैयक्तिक मत.
असे स्वगत प्रकारातले मुक्तछंदी लेखन करताना, लिहिणार्या व्यक्तीची जी काही स्वाभाविक जडणघडण असते त्यानुरूपच भावना शब्दात व्यक्त होतात, आणि हे आहे असे व्यक्त होणे त्या व्यक्तीला फार मानसिक समाधान देऊन जाते. कविता जमणे (करणे नाही) आणि असे लेखन जमणे हे एकाच प्रकारचे आहे.
पु.ले.शु.
अमेझिंग!! इतकं चांगलं अन
अमेझिंग!! इतकं चांगलं अन वेगळं किती दिवसांनी वाचले!!
नाईस!
नाईस!
बाप रे.. भारी जमलय. एकदा
बाप रे.. भारी जमलय. एकदा अधाशासारखं वाचलं.... मग पुन्हा चवीचवीनं.
तसं ते अख्तरीबाई वगैरेंसोबत असलं एकटेपण म्हणजे कसली गर्दी ते नीटच कळलं.
पुन्हा पुन्हा वाचणारै...
ऊफ.. सोबतः बेगम अख्तर, अबिदा
ऊफ.. सोबतः बेगम अख्तर, अबिदा परवीन, फरिदा खानुम.... गालिब
वाह!!काय लिहिलंयस तू, वाचून संपल्यावरही त्यातून बाहेर निघायला तयार नाही मन.. वॉट अबाऊट यू??
लिहून संपल्यावरही इथेच अडकली असशील किती तरी काळ...
लिहीत राहा!! लिहीत राहा!! लिहीत राहा!!
वॉव वॉव व्वॉव!! हे सगळे रिलेट
वॉव वॉव व्वॉव!! हे सगळे रिलेट करू शकलो. असं शब्दात उतरवणं कधीच जमले नसते. वॉव!!
सगळ्यांचे खूप आभार. चंद्रा,
सगळ्यांचे खूप आभार.
चंद्रा,
जिज्ञासा, थॅक्स.. __/\__
महेश,
तुमचं बरोबर आहे. मलाही असं वाटलेलं पण मग जे आंग्ल भाषेत नॅचरल वाटतं ते लिहिताना मराठीत लिहायला कृत्रिम वाटतय की काय अशी भीती वाटत होती. त्यामुळे मनात आलं तसंच लिहिलं.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बस्के, आभारी आहे
राया.
दाद, तुम्ही केलेलं कौतुक कायमच खूप स्पेशल असतं. धन्यवाद..
वर्षू नील, खरंय. अडकले होते खरी. मुळात लिहायला घेतलं तेच लिहिल्यावर थोडी फार तरी सुटका मिळेल या विचारातून. धन्यवाद.
ट्ण्या, थॅक्स..
बाप्रे! __/\__ मी निशब्ध आहे!
बाप्रे! __/\__
मी निशब्ध आहे!
जस्ट वॉव!! एकदा अधाशासारखं
जस्ट वॉव!!
एकदा अधाशासारखं वाचलं.... मग पुन्हा चवीचवीनं.>> आणि पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतंय.. लिहीत रहा..
इट्स हॉरिबली ब्युटीफूल !! अस
इट्स हॉरिबली ब्युटीफूल !!
अस लिहून हलक व्हायचय कधीतरी.. तंद्रि भंग न होऊ देता लिहायचय..
हे सगळे रिलेट करू शकलो. असं
हे सगळे रिलेट करू शकलो. असं शब्दात उतरवणं कधीच जमले नसते. >> +१. सुरूवातीची चार वाक्ये ओलांडून जायला भयंकर कष्ट घ्यावे लागले एव्हढी जबरदस्त उतरलेली आहेत.
मस्त. छान जमलय... हे सगळे
मस्त. छान जमलय...
हे सगळे रिलेट करू शकलो. असं शब्दात उतरवणं कधीच जमले नसते. >> +१ अगदी खरे आहे...
सुरूवातीची चार वाक्ये ओलांडून
सुरूवातीची चार वाक्ये ओलांडून जायला भयंकर कष्ट घ्यावे लागले एव्हढी जबरदस्त उतरलेली आहेत >>> अगदी अगदी! हे असं बांध फुटल्यासारखं लिहायचंय एकदातरी. जियो!
रीया, धन्यवाद.. आत्मधून, खूप
रीया,
धन्यवाद..
आत्मधून,
खूप खूप आभार..
प्रकु,
इट्स हॉरिबली ब्युटीफूल !!>> हॉरिबली ब्युटीफूल" हा शब्द लई लई आवडला.. थॅक्स..
असामी, माउ, rmd,
खूप खूप धन्यवाद..
rmd, लिहा की मग.. बरंच मोकळं वाटतं..
अप्रतिम!!! खूप छान जमलय..
अप्रतिम!!!
खूप छान जमलय.. आवडलं.
जबरा!!!!!!
जबरा!!!!!!
पुन्हा एकदा मस्त
पुन्हा एकदा मस्त लिहिलयस.....
हा असला वेडेपणा शब्दात कैद करायला देणं असाव लागत...... मनातल सगळं थेट पोहोचवता येण सोप नसतच.
मग हे असलं सगळ रुतून बसतं मनात... अब्र, गोरखधन्दा, आवारगी, ........ नुसरत, मेहदीजी, गुलामसाहेब छळत रहातात काळजात टोचत. छा..... अगदीच.
वा प्रतिसादही एकेक
वा प्रतिसादही एकेक भारावल्यासारखे आलेत,
सुरेख उतरलेय
सर्व नवीन प्रतिसादकांचे खूप
सर्व नवीन प्रतिसादकांचे खूप खूप आभार..
मी मुक्ता.. खरंच आवडेल. पण
मी मुक्ता.. खरंच आवडेल. पण गद्यलेखन कधी जमलंच नाही. मला काय वाटतंय हे ही चार ओळींत उरकून टाकेन असंच वाटतं. पण प्रयत्न नक्की करणार आहे.
बंगालीमधे असते "भिषण भालो",
बंगालीमधे असते "भिषण भालो", "दारूण शुंदोर" तसे हे "हॉरिबली ब्युटीफूल"
महेश, rmd, नक्कीच...
महेश,
rmd,
नक्कीच...
मुक्तक फार छान जमलय.
मुक्तक फार छान जमलय.
आज पावसाळी हवेत मी लताची गोड गोड बांग्ला गाणी लावुन बसलेले आहे आणि मला रसमलाईसारखी एखादी कथा हवी आहे म्हणुन उत्खनन करते आहे.
तर अचानक हे रत्न सापडले. आता तुमच्या सर्व कथा, कविता, लेख वाचून काढेन म्हणते.
.....................
इन्टेन्स असणे हे वरदानही असावे व शापही. मला अनुभव नाही. पण पिलीअन रायडर बनून अशी उत्कटता भोगणे आवडते.
लेखनाला हार्ट हार्ट !
लेखनाला हार्ट हार्ट !
ते “खानुम” नका लिहू प्लीज, ते “खानम” आहे. फ़रीदा खानम, खानम जान इ.