कोकण ..सावंतवाडी माझो गांव ...

Submitted by शैलेशगांवकर on 16 August, 2015 - 03:38

नमस्कार ....मित्रांनो .......आपल्या मायबोली वरील .."जिप्सी" ह्यांची "कोकणमय" मालिका आणि "यो रॉक्स" ह्यांची "कोकणफ्रेश" आणि मु.पो.बांबर्डे " मालिकेतील आपल्या कोकणाची प्रकाशचित्रे व वर्णन बघुन आणि वाचुन मलाही माझ्या गावचे म्हणजे घराचे प्रकशचित्रे पोस्ट करावीशी वाटले .....वाईट प्रकाशचित्रे आले असतील तर चुक भुल माफ असावी ... Happy

आमचे घर .. [कोकण शोभुन उठते ते ह्या मंगलोरी कौलांच्या छतांमुळे .. Happy हल्ली सिंमेटच्या स्लॅबची पण घरे दिसायला लागली आहेत ...जीव जळतो हे पाहून . . Sad ]
50(2).jpg

घरासमोरील खळे (अंगण)
75(3).jpg

घरासमोरील खळयातील तुळसी वृंदावन ...(घरातील वातावरण सात्विक होते ..संध्याकाळी कुलदैवतेला ..ग्रामदेवतेला,वास्तुदेवतेला नमन करुन दिवाबत्ती केली जाते .... )
75(2).jpg

घराचा एका बाजुने घेतलेला फोटो..
50(3).jpg

आम्ही काही काजुची ,कोकमाची आणि सागाची कलमे लावलेली आसत ..साधारण दोन वर्षापूर्वी .....थय जाणारी वाट ... आणि कोकणात सगळी कडे अशी वाट असता ..लाल मातीची .. Happy
50(6).jpg

हयती कलम ....आता थोडी मोठी झालेली आसत ..वरुणराजाची कृपा आसा ना आपल्या कोकणावर .. Happy
90(2).jpg

आणखी एक प्रचि ...तो डोंगर दिसता मा ...त्या थयसर तिलारी प्रकल्प असा..म्हणतत ....महाराष्ट्र आणि गोवा सरकारचो मिळान .. १५ वर्ष व्होत ईलित अजुन काय पुरा व्होणा नाय ....देवाक काळजी .... Happy
75.jpg

पावसातलो एक ...प्रचि ..भात शेती ..सुंदर वाटता मा ! Happy
50(4).jpg

मुंबई सुन गावाक येताना काढलेलो वशिष्ठ नदीचो प्रचि ..
90.jpg

- वाईट वाटला तर ......नविन समजुन दुर्लक्ष करा ..सुरवात हा मा .. :))

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच ईलेत सगळे फोटो. वाडी-मळगावाक मामा रवता त्येचा घर आणि खळा अगदी सेम टू सेम. त्यामुळे फोटो बघता बघता गावी जावन ईल्यासारख्या वाटला Happy

बिटेल,

अतिशय उत्तम फोटो आहेत! कोकणचे सौंदर्य अनुभावायला दिल्याबद्दल आपले आभार! भाषा सुद्धा गोड वाटली फार! अन तुमचे घर पाहुनच तिथे बहुमूल्य शांती किती भरभरुन मिळत असेल हे जाणवले!

शुभेच्छा

व्वा! सुंदर फ़ोटो. कौलारू घर, खळं, तुळशी वृंदावन, वसिष्ठी नदी, निसर्ग सगळं फ़िरून आले मी इथूनच. Happy
काळतोंड्या माकडांना गावाला वांदर म्हणतात. खूप उच्छाद मांडतात ती.>>>>>>>..हो अंजू, आणि एकदा त्यांनी घरावर उडी मारली की बर्‍याच कौलांचा चक्काचूर. बाकीचा पण झाडं , भाजीपाला यांचीही वाट लावत आहेत असं ऐकलं. ह्या वानरांवर एक कुत्रा भुंकायला लागला, तर यांनी त्याला फाडून टाकला. Sad असं गेल्या वर्षी ऐकलं. बरेच उपाय करून थकलेत लोकं.

आता वांदरमार्‍यांकाय घाबरणत नाय वांदर. आधी त्यांच्या वासानय पळुन जायत असा आयकलंला आसा. Happy

गुदस्ता मामानं नव्या घर बांधला. स्लॅबचा, मस्त निवांत! पण जुन्या घराची अजुन आठवण येतां आणि गलबलाक जाता. Sad

सोन्याबापू...
अतिशय उत्तम फोटो आहेत! कोकणचे सौंदर्य अनुभावायला दिल्याबद्दल आपले आभार! भाषा सुद्धा गोड वाटली फार! अन तुमचे घर पाहुनच तिथे बहुमूल्य शांती किती भरभरुन मिळत असेल हे जाणवले!>>>>> हो खूप मन:शांती मिळते ….एकदम १००% बोललात … मुंबईच्या ह्या धावपळीत गावाकडेच मन:शांती मिळेते … Happy

फोटु मस्त ता सांगायचा राह्यला!
आजयच .. अग्दी आत्ताच इलय कुडाळात्सून पुण्याक परत.

फोटो उत्तमच... खूप बरां वाटलां...

माका येक सांग... कोकणी माणूस मां तू?... तर ह्यां असलां इंग्रजी/ टेलीफोन वाल्याचा नांव कशाक घेतलंस?... Wink
Proud

दोनच दिवसांपूर्वी कुडाळात होतंय... आता आसंय मुंबयत...
Happy

वांदर>>>>> वांडर म्हनतत. मोठ्यांका वांडर म्हनतत आणि बारकी 'केडली'. लहानपणी वांडर शेतात लय धुडगूस घालीत, म्हणान आजोबांनी एक 'केडला' पकडून घेतलेल्यांनी वांडरमाऱ्याकडून. तेका झबला घालून परत सोडून दिल्यानी आणि ता केडला परत त्यांच्या कळपात जावचो प्रयत्न करी तेंव्हा बाकीची केडली आणखी लांब पळत.

एखादा चेडू/झिल जरा खय नटानथटान जाव लागलो काय लोका लगेच त्येचो पानउतारो करीत. 'काय केडला आकाडता'.

Aamchyakade kelada mhantat.Vagh padalo ghali kelada dakhayta नाli

सुंदर !
तिथल्या निसर्गाशी सुसंगत असं कोकणातलं 'टिपीकल' घर आंणि परिसर !!
मालवणीमाणसा, नशीबवान आसस !!!

Pages