नमस्कार ....मित्रांनो .......आपल्या मायबोली वरील .."जिप्सी" ह्यांची "कोकणमय" मालिका आणि "यो रॉक्स" ह्यांची "कोकणफ्रेश" आणि मु.पो.बांबर्डे " मालिकेतील आपल्या कोकणाची प्रकाशचित्रे व वर्णन बघुन आणि वाचुन मलाही माझ्या गावचे म्हणजे घराचे प्रकशचित्रे पोस्ट करावीशी वाटले .....वाईट प्रकाशचित्रे आले असतील तर चुक भुल माफ असावी ...
आमचे घर .. [कोकण शोभुन उठते ते ह्या मंगलोरी कौलांच्या छतांमुळे .. हल्ली सिंमेटच्या स्लॅबची पण घरे दिसायला लागली आहेत ...जीव जळतो हे पाहून . .
]
घरासमोरील खळे (अंगण)
घरासमोरील खळयातील तुळसी वृंदावन ...(घरातील वातावरण सात्विक होते ..संध्याकाळी कुलदैवतेला ..ग्रामदेवतेला,वास्तुदेवतेला नमन करुन दिवाबत्ती केली जाते .... )
घराचा एका बाजुने घेतलेला फोटो..
आम्ही काही काजुची ,कोकमाची आणि सागाची कलमे लावलेली आसत ..साधारण दोन वर्षापूर्वी .....थय जाणारी वाट ... आणि कोकणात सगळी कडे अशी वाट असता ..लाल मातीची ..
हयती कलम ....आता थोडी मोठी झालेली आसत ..वरुणराजाची कृपा आसा ना आपल्या कोकणावर ..
आणखी एक प्रचि ...तो डोंगर दिसता मा ...त्या थयसर तिलारी प्रकल्प असा..म्हणतत ....महाराष्ट्र आणि गोवा सरकारचो मिळान .. १५ वर्ष व्होत ईलित अजुन काय पुरा व्होणा नाय ....देवाक काळजी ....
पावसातलो एक ...प्रचि ..भात शेती ..सुंदर वाटता मा !
मुंबई सुन गावाक येताना काढलेलो वशिष्ठ नदीचो प्रचि ..
- वाईट वाटला तर ......नविन समजुन दुर्लक्ष करा ..सुरवात हा मा .. :))
मस्तच ईलेत सगळे फोटो.
मस्तच ईलेत सगळे फोटो. वाडी-मळगावाक मामा रवता त्येचा घर आणि खळा अगदी सेम टू सेम. त्यामुळे फोटो बघता बघता गावी जावन ईल्यासारख्या वाटला
वांदरं = वानर ? नेहमीचे माकड?
वांदरं = वानर ? नेहमीचे माकड?
काळतोंड्या माकडांना गावाला
काळतोंड्या माकडांना गावाला वांदर म्हणतात. खूप उच्छाद मांडतात ती.
स्पॉक, नेहमीचे माकड वेगळे.
स्पॉक, नेहमीचे माकड वेगळे. वांदरं म्हणजे काळ्या तोंडाची मोठी माकडे.
ओके
ओके
बिटेल, अतिशय उत्तम फोटो आहेत!
बिटेल,
अतिशय उत्तम फोटो आहेत! कोकणचे सौंदर्य अनुभावायला दिल्याबद्दल आपले आभार! भाषा सुद्धा गोड वाटली फार! अन तुमचे घर पाहुनच तिथे बहुमूल्य शांती किती भरभरुन मिळत असेल हे जाणवले!
शुभेच्छा
व्वा! सुंदर फ़ोटो. कौलारू घर,
व्वा! सुंदर फ़ोटो. कौलारू घर, खळं, तुळशी वृंदावन, वसिष्ठी नदी, निसर्ग सगळं फ़िरून आले मी इथूनच.
असं गेल्या वर्षी ऐकलं. बरेच उपाय करून थकलेत लोकं.
काळतोंड्या माकडांना गावाला वांदर म्हणतात. खूप उच्छाद मांडतात ती.>>>>>>>..हो अंजू, आणि एकदा त्यांनी घरावर उडी मारली की बर्याच कौलांचा चक्काचूर. बाकीचा पण झाडं , भाजीपाला यांचीही वाट लावत आहेत असं ऐकलं. ह्या वानरांवर एक कुत्रा भुंकायला लागला, तर यांनी त्याला फाडून टाकला.
पूर्वी वांदरमारे येत असत.
पूर्वी वांदरमारे येत असत. तेही हल्ली दिसत नाहीत.
हो पुर्वी वांदरमारे आले की
हो पुर्वी वांदरमारे आले की काही दिवस वादरांच्या त्रासातून मुक्तता होत असे.
पूर्वी वांदरमारे येत असत.
पूर्वी वांदरमारे येत असत. तेही हल्ली दिसत नाहीत.>>>>>....त्यांनाही दाद लागू देत नसतील.
खुप खुप धन्यवाद … आमच्या इथे
खुप खुप धन्यवाद … आमच्या इथे "माकड " जास्त आहेत

खूप छान घर, अंगण आहे तुमचं
खूप छान घर, अंगण आहे तुमचं अगदी कोकणात फिरुन आल्याचा भास होतो प्र. चि. बघून.
आता वांदरमार्यांकाय घाबरणत
आता वांदरमार्यांकाय घाबरणत नाय वांदर. आधी त्यांच्या वासानय पळुन जायत असा आयकलंला आसा.
गुदस्ता मामानं नव्या घर बांधला. स्लॅबचा, मस्त निवांत! पण जुन्या घराची अजुन आठवण येतां आणि गलबलाक जाता.
सोन्याबापू... अतिशय उत्तम
सोन्याबापू...
अतिशय उत्तम फोटो आहेत! कोकणचे सौंदर्य अनुभावायला दिल्याबद्दल आपले आभार! भाषा सुद्धा गोड वाटली फार! अन तुमचे घर पाहुनच तिथे बहुमूल्य शांती किती भरभरुन मिळत असेल हे जाणवले!>>>>> हो खूप मन:शांती मिळते ….एकदम १००% बोललात … मुंबईच्या ह्या धावपळीत गावाकडेच मन:शांती मिळेते …
फोटु मस्त ता सांगायचा
फोटु मस्त ता सांगायचा राह्यला!
आजयच .. अग्दी आत्ताच इलय कुडाळात्सून पुण्याक परत.
फोटो उत्तमच... खूप बरां
फोटो उत्तमच... खूप बरां वाटलां...
माका येक सांग... कोकणी माणूस मां तू?... तर ह्यां असलां इंग्रजी/ टेलीफोन वाल्याचा नांव कशाक घेतलंस?...

दोनच दिवसांपूर्वी कुडाळात होतंय... आता आसंय मुंबयत...

सुंदर आलेत सारेच ! लिखाण पण
सुंदर आलेत सारेच ! लिखाण पण छान
पु ले शु ...
सुंदर फोटो. तिकडे मनीमोहर
सुंदर फोटो. तिकडे मनीमोहर यांच्या घराचे आणि आता तुमच्या घराचे असे दोन सुंदर फोटो ! मस्तच!
Sundar photos
Sundar photos
वांदर>>>>> वांडर म्हनतत.
वांदर>>>>> वांडर म्हनतत. मोठ्यांका वांडर म्हनतत आणि बारकी 'केडली'. लहानपणी वांडर शेतात लय धुडगूस घालीत, म्हणान आजोबांनी एक 'केडला' पकडून घेतलेल्यांनी वांडरमाऱ्याकडून. तेका झबला घालून परत सोडून दिल्यानी आणि ता केडला परत त्यांच्या कळपात जावचो प्रयत्न करी तेंव्हा बाकीची केडली आणखी लांब पळत.
एखादा चेडू/झिल जरा खय नटानथटान जाव लागलो काय लोका लगेच त्येचो पानउतारो करीत. 'काय केडला आकाडता'.
मस्त
मस्त
गावची आठवण इली......
गावची आठवण इली......
सुनतुन्या, केडला न्हय हो.तुमी
सुनतुन्या,
केडला न्हय हो.तुमी बोलतासात ता "केलडा
केडलाच म्हणतंत.
केडलाच म्हणतंत.
मस्त!
मस्त!
Aamchyakade kelada
Aamchyakade kelada mhantat.Vagh padalo ghali kelada dakhayta नाli
भ्रमर >+१
भ्रमर >+१
(No subject)
केडलि आणि वान्डर वेगळे असतात.
केडलि आणि वान्डर वेगळे असतात. दोघेहि उच्छाद मान्डतात. मला फोटो टाकता येत नै नाइतर वानरचा फोटो टाकला असता
सुंदर ! तिथल्या निसर्गाशी
सुंदर !
तिथल्या निसर्गाशी सुसंगत असं कोकणातलं 'टिपीकल' घर आंणि परिसर !!
मालवणीमाणसा, नशीबवान आसस !!!
Pages