जेव्हा मला मोठ्या माणसांसाठी असणार्या कलरींग बुक्सबद्दल कळले, तेव्हापासून मी ह्या कल्पनेने फार खुष झाले होते. मला माझ्यासाठी एखादं पुस्तक मिळणार! नाहीतर मी आपली मुलाचीच कलरिंग बुक्स घेऊन बसायचे. मुलाला कितपत इंटरेस्ट आला माहीत नाही पण माझा मात्र चांगलाच टिकला होता. शेवटी एक 'मिस्टीकल मंडल' नावाचे पुस्तक घेतले व मुलाच्या रंगीत खडूंनी रंगवायला सुरवात केली. इतकी मजा आली! छान मन लावून, फोकसने चित्र रंगवत बसण्यात काय धमाल येते!
तुम्ही विचार करत असाल, अरे बापरे, ही रोज चित्रं रंगवणार व इथे चिकटवणार की काय.. तर कदाचित हो. झालंय असं. मला हातात चिक्कार वेळ मिळतो. परंतू अलिकडे माझ्या लक्षात आले होते की मी बराच वेळ वायाच घालवत आहे. हा लेख ह्या सगळ्यावरूनच सुचला होता. भरपूर वेळ, भरपूर रिसोर्सेस हाताशी आहेत, पण काहीच भरीव होत नाहीये आयुष्यात असं चित्र दिसू लागले होते. ( म्हणून चित्रांमध्ये रंग भरू लागले! :biggrin: ) मी किती संकल्प ठरवून एकदाही पाळले नाहीयेत गेल्या वर्षभरात, हे आठवले की चिंताग्रस्त होत होत.
हे सगळं ठरवून नाही हा प्रोजेक्ट चालू केला. उगीच ते मंडलाचे पुस्तक दिसले म्हणून घेतले. व रंगवताना जाणवले, की ही अॅक्टीव्हिटी अशी आहे की मी मन लावून, फोकसने चित्र पूर्ण करीनच. समहाऊ माझा इतर ठिकाणी दिसणारा आरंभशूर स्वभावापुढे ही कन्सिस्टन्सी मला एकदम रिलॅक्स करून गेली. हाताशी वेळ आला की पूर्वी उग्गच फेसबुकवर सत्राशेसाठ लिंका वाचत बसण्यापेक्षा मार्कर घेऊन चित्रातला छोटासा का होईना कोपरा रंगवायचा, एव्हढं एकंच ठरवले. आश्चर्यकारक रीत्या मला उत्साह जास्त जाणवू लागला. सगळी कामं झटापट होऊन चित्रासाठी १५ मिनिटं काढणं म्हणजे पार्टीच होती. मला वयाची ३ दशकं उलटल्यावर समजले आहे की मी आळशी नाहीये उलट मला सतत काहीतरी करायचे असते, ते काय करायचे हे न कळल्याने उगीच सगळी धरपकड. पण सध्या एकाच हॉबीवर, अॅक्टीव्हिटीवर मन केंद्रीत केले आहे. आणि मला खूप छान वाटत आहे!
बस्केने हे काय चित्रांची चळत लावली आहे असं वाटत असेल, म्हणून शेअर केली थॉट प्रोसेस.
एनीवे. ही आत्तापर्यंतची चित्रं. दिसामाजी रोज काहीतरी रंगवावे असे करून काही चित्रं एक दिवसात(येऊन जाऊन रंगवत २ तास) ते दोन तीन दिवस(५-६ तास) ह्या कालावधीत रंगवली आहेत.
१) खडू :
२) मार्कर्सः
३)रंगीत पेन्सील्सः
४) जेल पेन्स :
५) मार्कर्सः
६) मार्कर्स
७)
हे सिक्रेट गार्डनचे चित्र झाले एकदाचे पूर्ण! काय दमवलंय ह्या चित्राने. इतकं प्रचंड डिटेलिंग आहे.. संपता संपेना. पण ह्या कलरिंग अॅक्टीव्हिटीचा मेन उद्देश पेशन्स वाढवणे असल्याने पुस्तक भिरकावून न देता, केले एकदाचे पूर्ण. (मात्र शेवटी हातघाईला आलेले अगदी दिसून येतंय. पूर्ण चित्रात रात्रीचा निळसर पर्पल अंधाराचे वातावरण निर्माण करावे म्हणून पेन्सिल घेतली.. अन शेवटी अगदीच घाई केली. फराटे उठले. ते ब्लेन्ड होऊ शकतील. पण आता पेशन्स खरंच संपला! निदान आजसाठी. परत नंतर दुरूस्त करीन चित्र.. )
फारच छान! अनुकरणीय! secret
फारच छान! अनुकरणीय!
secret garden कुठल्या प्रकारच्या रन्गानि रन्गवले आहे?
मला खुप आवडलंय हे सगळं एक
मला खुप आवडलंय हे सगळं
एक ओळखीच्या काकू सध्या डिप्रेशन मधे आहेत फार . त्यांना देऊन बघते
छान झालेय. मार्कर वाले रंगकाम
छान झालेय. मार्कर वाले रंगकाम एकदम रेखीव झाले आहे.
सकाळी प्रतिसाद दिला
सकाळी प्रतिसाद दिला .ऑफिसमधल्या मैत्रिणीला दाखवली पुस्तकं .
आता आम्ही चेक करतोय कुठली पुस्तक मागवायची ती ऑनलाईन.
थँक्स एव्हरीवन.. निरा,
थँक्स एव्हरीवन..
निरा, सिक्रेट गार्डनमध्ये मी जेल पेन्स व रंगीत पेन्सील्स वापरत आहे. ( त्या पुस्तकात एकच दोष आहे, तो म्हणजे दोन्ही बाजूला चित्रं आहेत. व कागद उत्तम क्वालिटीचा आहे असे वाटते, पण मार्कर्स ब्लीड होतायत. म्हणून जेल पेन्स व रंगीत पेन्सील्स वापरत आहे. )
रीया नक्की देऊन बघ..
स्वस्ति मी दिलेल्या लिंक्स मधले दुसरे मी सजेस्ट करेन. अँजी ग्रेसची ची पुस्तकं.
बस्के, सुंदर रंगवलीत
बस्के, सुंदर रंगवलीत चित्रं.कलर काँबिनेशन्स फार आवडली. चित्रं टी शर्टांवर छापून घ्याविशी वाटताहेत.
मुलांना क्लासला सोडून ,कारमध्ये बसून चित्र रंगवणारी आई बघितल्यापासून कलरिंग बुकमधली चित्र रंगवायचा नाद गेल्या वर्षीपासून लागला. सुरवातीला 'नेचर मंडला' मधली रंगवली. फॉक्स चॅपेल पब्लिशिंगची पुस्तकं खूप छान आहेत. पाठ कोरी पानं, कागदाची उत्तम क्वालिटी ह्यांमुळे चित्रं रंगवायला मजा येते. आवडलेली चित्रं फ्रेम करून भिंतीवर टांगता येतात.
रेपेटेटिव्ह आणि बारीक रंगकाम करून झाल्यावर वर्ल्ड ट्रॅव्हलर मधली चित्रं रंगवायला फार आवडलं. भरपूर वेगवेगळ्या माध्यमातले रंग वापरता आले. शेडिंग करून थ्री डी इफेक्ट आणायचा प्रयत्न करता आला. करून बघ. लई मज्जा!
सध्या स्टेन्ड ग्लास कलरिंग बुक आणि जिओमेट्रिक पॅटर्न्सवर्ची पुस्तकं आणलीत. स्टेन्ड ग्लासमध्ये रंगवून झाल्यावर थ्रीडी पेंन्ट्स वापरून चित्रं टिफनी स्टाइल करायचं आहे.
बार्न्स अँड नोबल्समध्ये भरपूर नवं कलेक्शन आलंय. इतक्यात गेली नसशील तर बघून ये.
अरे वा मृण्मयी! माहित नव्हते
अरे वा मृण्मयी! माहित नव्हते तूही रंगवतेस हे.. तू लिहीलेली पुस्तकं शोधून बघते.. बर्याच दिवसात नाही गेले बार्न्स & नोबल्सला.
हे सिक्रेट गार्डनचे चित्र झाले एकदाचे पूर्ण! काय दमवलंय ह्या चित्राने. इतकं प्रचंड डिटेलिंग आहे.. संपता संपेना. पण ह्या कलरिंग अॅक्टीव्हिटीचा मेन उद्देश पेशन्स वाढवणे असल्याने पुस्तक भिरकावून न देता, केले एकदाचे पूर्ण. (मात्र शेवटी हातघाईला आलेले अगदी दिसून येतंय. पूर्ण चित्रात रात्रीचा निळसर पर्पल अंधाराचे वातावरण निर्माण करावे म्हणून पेन्सिल घेतली.. अन शेवटी अगदीच घाई केली. फराटे उठले.
ते ब्लेन्ड होऊ शकतील. पण आता पेशन्स खरंच संपला! निदान आजसाठी. परत नंतर दुरूस्त करीन चित्र.. )
सुंदर दिसतायेत बस्के तुझी
सुंदर दिसतायेत बस्के तुझी चित्रं. रंगवत रहा.
तुझं बघून फार मोह होतोय ती पुस्तकं विकत घ्यायचा. सध्या वेळेची मारामार आहे, पण कधीतरी घेईनच. थँक्स फॉर शेअरिंग.
खुपच सुंदर एकदम परीच्या
खुपच सुंदर एकदम परीच्या गोष्टीतलं...
धन्यवाद बस्के! पुर्ण झालेले
धन्यवाद बस्के!
पुर्ण झालेले चित्र फ़ारच छान दिसतय.
मस्त आहे सगळचं रंगकाम !
मस्त आहे सगळचं रंगकाम !
अतिशय सुरेख. फेबुवर पाहिलेले
अतिशय सुरेख. फेबुवर पाहिलेले हे. सुरवातीला वाटले तुच चित्रे काढुन भरलीयेस. पण नंतर लक्षात आले. मलाही पाहिजेत ही पुस्तके आता.
मला वयाची ३ दशकं उलटल्यावर समजले आहे की मी आळशी नाहीये उलट मला सतत काहीतरी करायचे असते, ते काय करायचे हे न कळल्याने उगीच सगळी धरपकड. पण सध्या एकाच हॉबीवर, अॅक्टीव्हिटीवर मन केंद्रीत केले आहे. आणि मला खूप छान वाटत आहे!
जबरी..... खूप खूप धन्यवाद.
जबरी..... खूप खूप धन्यवाद. परतभेट म्हणून हि लिन्क तपासा http://color-your-own.com/free_e_coloring_books.html
सीक्रेट गार्डन वालं चित्र
सीक्रेट गार्डन वालं चित्र मस्त जमलं आहे..मार्कर्सच्या माहितीबद्दल धन्स!
याचे apps असतील असं मनात आलंच होतं. सध्या बुक्स ऑर्डर करणं जमणार नाहीये पण प्ले स्टोअर वरुन app डाउनलोड केलंय खूप फ्री ऐप्स आहेत तिथे. मजा येतेय फोनवर पण !
मस्त, मस्त. सिक्रेट गार्डन
मस्त, मस्त. सिक्रेट गार्डन सगळ्यात आवडले. टीशर्टवर छापून घ्यावीशी वाटत आहेत आणि स्ट्रेस बस्टर अॅक्टिव्हिटी ह्याला + १००
माझी आजी फार हौशी आहे. तिला असे पुस्तक आणि रंग भेट द्यावे का असे वाटते आहे. सुरुवातीला 'हे कशाला उगाच' असं म्हणेल आणि नंतर चांगलीच रमेल असं वाटतंय
मृण्मयी, तूही टाक ना तुझ्या रंगकामाचे फोटो.
बस्के, बरे झाले तू हे
बस्के, बरे झाले तू हे लिहिलेस. तुला याबद्दल विचारायचेच होते.
फेसबुकावर तुझे तुकड्यातुकड्यातले रंगकाम बघून फारच उत्सुकता चाळवली होती.
अप्रतिम, आहे सगळे रंगकाम.
क्रमांक २ आणि ५ मधली रंगसंगती फारच सुरेख आहे!
थँक्स सर्वांना! अगो, नक्की
थँक्स सर्वांना!
अगो, नक्की दे.
साधना, मी काय चित्रं काढतेय! एव्हढं नाही स्किल्स..
मस्स्स्स्स्स्त
मस्स्स्स्स्स्त
Sundar.. Kharech chhaan
Sundar.. Kharech chhaan chhand aahe ha.
मस्त !! आवाक्यातल
मस्त !!
आवाक्यातल वाटतंय
नक्की करून बघणार
सुंदर!
सुंदर!
खूपच छान! स्ट्रेसबस्टर असणार
खूपच छान! स्ट्रेसबस्टर असणार अगदी!
सर्वांचे आभार!!
सर्वांचे आभार!!
सुंदर रंगकाम !!
सुंदर रंगकाम !!
इथे वाचून बार्न्स
इथे वाचून बार्न्स अॅन्ड्...मध्ये शोधशोध केली तर एक २० पोस्टकार्डांचं नेचर मंडलाचंच पुस्तक मिळालं. कार्ड डिटॅचेबल आहेत. एका बाजूला चित्र आणि दुसर्या बाजूला पत्ते लिहिण्यासाठी आणि स्टँप चिकटवण्यासाठी जागा आहेत. एका मैत्रिणीच्या इथे भेटीसाठी आलेल्या आईला ते गिफ्ट दिलं तर त्यांना खूपच आवडली कल्पना. वेळ सत्कारणी लावण्याचा चांगला उपाय आहे म्हणाल्या. थँक्स बस्के
कॉस्कोमध्ये 'कलर मी' आणि 'कलर
कॉस्कोमध्ये 'कलर मी' आणि 'कलर मी १/२/३/४' अशी पुस्तकं दिसली. आपली चित्रकलेची मोठी वही असायची साधारण तेवढ्या आकारात. मी एक आणले आहे. गिफ्ट द्यायला पण चांगले वाटतील.
हो सध्या खूपच पुस्तके आली
हो सध्या खूपच पुस्तके आली आहेत बाजारात. पण घरातली जी ४-५ आहेत ती संपल्याल्हेरीज मी बघणार पण नाहीये तिथे.
सध्या रंगकाम थोडे थंडावले आहे. एक खूप कॉम्प्लिकेटेड कॅलिडोस्कोपसारखे चित्र रंगवायला घेतले आहे. गेले २-३ महिने तेच हळूहळू रंगवत आहे. ५०% झाले असेल आत्ताशी.. :|
सध्या google वरून दोन
सध्या google वरून दोन चित्रांच्या प्रिंट काढल्या. त्या रंगवणार पुस्तकं घेईपर्यंत. पण खरच अस मोठ्यांसाठी पुस्तकं असतील अस वाटलच नव्हत. लहान मुलांची चित्र रंगून कंटाळा आला होता. मोठ मोठे पार्ट रंगवायचा. धन्यवाद बस्के
Jabara disatahet.
Jabara disatahet.
जबरदस्त.... छान
जबरदस्त.... छान
Pages