माझे रंगकाम

Submitted by बस्के on 15 August, 2015 - 00:17

जेव्हा मला मोठ्या माणसांसाठी असणार्या कलरींग बुक्सबद्दल कळले, तेव्हापासून मी ह्या कल्पनेने फार खुष झाले होते. मला माझ्यासाठी एखादं पुस्तक मिळणार! नाहीतर मी आपली मुलाचीच कलरिंग बुक्स घेऊन बसायचे. मुलाला कितपत इंटरेस्ट आला माहीत नाही पण माझा मात्र चांगलाच टिकला होता. शेवटी एक 'मिस्टीकल मंडल' नावाचे पुस्तक घेतले व मुलाच्या रंगीत खडूंनी रंगवायला सुरवात केली. इतकी मजा आली! छान मन लावून, फोकसने चित्र रंगवत बसण्यात काय धमाल येते!

तुम्ही विचार करत असाल, अरे बापरे, ही रोज चित्रं रंगवणार व इथे चिकटवणार की काय.. तर कदाचित हो. झालंय असं. मला हातात चिक्कार वेळ मिळतो. परंतू अलिकडे माझ्या लक्षात आले होते की मी बराच वेळ वायाच घालवत आहे. हा लेख ह्या सगळ्यावरूनच सुचला होता. भरपूर वेळ, भरपूर रिसोर्सेस हाताशी आहेत, पण काहीच भरीव होत नाहीये आयुष्यात असं चित्र दिसू लागले होते. ( म्हणून चित्रांमध्ये रंग भरू लागले! :biggrin: ) मी किती संकल्प ठरवून एकदाही पाळले नाहीयेत गेल्या वर्षभरात, हे आठवले की चिंताग्रस्त होत होत.
हे सगळं ठरवून नाही हा प्रोजेक्ट चालू केला. उगीच ते मंडलाचे पुस्तक दिसले म्हणून घेतले. व रंगवताना जाणवले, की ही अ‍ॅक्टीव्हिटी अशी आहे की मी मन लावून, फोकसने चित्र पूर्ण करीनच. समहाऊ माझा इतर ठिकाणी दिसणारा आरंभशूर स्वभावापुढे ही कन्सिस्टन्सी मला एकदम रिलॅक्स करून गेली. हाताशी वेळ आला की पूर्वी उग्गच फेसबुकवर सत्राशेसाठ लिंका वाचत बसण्यापेक्षा मार्कर घेऊन चित्रातला छोटासा का होईना कोपरा रंगवायचा, एव्हढं एकंच ठरवले. आश्चर्यकारक रीत्या मला उत्साह जास्त जाणवू लागला. सगळी कामं झटापट होऊन चित्रासाठी १५ मिनिटं काढणं म्हणजे पार्टीच होती. मला वयाची ३ दशकं उलटल्यावर समजले आहे की मी आळशी नाहीये उलट मला सतत काहीतरी करायचे असते, ते काय करायचे हे न कळल्याने उगीच सगळी धरपकड. पण सध्या एकाच हॉबीवर, अ‍ॅक्टीव्हिटीवर मन केंद्रीत केले आहे. आणि मला खूप छान वाटत आहे! Happy

बस्केने हे काय चित्रांची चळत लावली आहे असं वाटत असेल, म्हणून शेअर केली थॉट प्रोसेस. Happy

एनीवे. ही आत्तापर्यंतची चित्रं. दिसामाजी रोज काहीतरी रंगवावे असे करून काही चित्रं एक दिवसात(येऊन जाऊन रंगवत २ तास) ते दोन तीन दिवस(५-६ तास) ह्या कालावधीत रंगवली आहेत.

१) खडू :

color3.jpg

२) मार्कर्सः

color2.jpg

३)रंगीत पेन्सील्सः

IMG_2642(1).jpgIMG_2644(1).jpg

४) जेल पेन्स :

IMG_2695.JPGIMG_2697.jpg

५) मार्कर्सः

color5.1.jpg

६) मार्कर्स

11891405_10153732941192018_6872257540057987995_o.jpg

७)
sg.jpg

हे सिक्रेट गार्डनचे चित्र झाले एकदाचे पूर्ण! काय दमवलंय ह्या चित्राने. इतकं प्रचंड डिटेलिंग आहे.. संपता संपेना. पण ह्या कलरिंग अ‍ॅक्टीव्हिटीचा मेन उद्देश पेशन्स वाढवणे असल्याने पुस्तक भिरकावून न देता, केले एकदाचे पूर्ण. (मात्र शेवटी हातघाईला आलेले अगदी दिसून येतंय. पूर्ण चित्रात रात्रीचा निळसर पर्पल अंधाराचे वातावरण निर्माण करावे म्हणून पेन्सिल घेतली.. अन शेवटी अगदीच घाई केली. फराटे उठले. Sad ते ब्लेन्ड होऊ शकतील. पण आता पेशन्स खरंच संपला! निदान आजसाठी. परत नंतर दुरूस्त करीन चित्र.. )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्यूटीफुल बस्के.. तुझ्या थॉट प्रोसेस शी मिळतीजुळतीये माझी थॉ प्रो ही, म्हणून ही आयडिया फार आवडली

सुंदर झालीये निर्मिती.. अगदी बिंधास्त डकव तुझे रंगकाम.. इंप्रेसिव!!! Happy

मोठ्यांकरता कलरबुक्स.. वॉव, हे आजच समजलंय.. ग्रेट जॉब ज्या कुणी इनवेंट केलं असेल.. ऑस्सम!!

मस्तं!
मी त्या लाईफ स्टाईल मॉडिफिकेशनच्या धाग्यावर कुणीतरी 'मुलीची कलरबुक्स रंगवते' म्हटलं होतं तिथेच 'मस्तं कल्पना' असं लिहिलं होतं. तेव्हच मोठ्यांसाठीपण कलरिंग बुक्स असायला हवीत असं वाटून गेलं होतं.
आणि आता तू प्रत्यक्ष डेमो दिलास.
खूप आवडली मला ही सगळी चित्रं!

मस्त मस्त मस्त.
मोठ्यांसाठी पण कलरिंग बुक्स मिळतायत हे अलीकडेच कळलं तेव्हापासून ही पुस्तकं घ्यायचं डोक्यात आहे.
आणखी चित्रं नक्की पोस्ट करा..बघायला आवडेलच!

शिवाली, भारतात असाल तर क्रॉसवर्डमध्ये 'इंट्रोडक्शन ऑफ मंडला' नावाने मिळतात.
मी कालच पाहिली.

आले आले.. धन्यवाद सर्वांना! ह्या घ्या लिंक्स..

पहिले चित्र(अन इतर गोल मंडला असलेले) ह्या पुस्तकातील आहेत.. Mystical Mandala Coloring Book (Dover Design Coloring Books) https://www.amazon.com/dp/0486456943/ref=cm_sw_r_awd_9Y.Zvb6W0QEES

चौकोनाची चित्रं ह्या पुस्तकातीलः Quirky (Angie's Patterns Volume 14) https://www.amazon.com/dp/150602422X/ref=cm_sw_r_awd_0Z.ZvbZCTRM5H

अन अजुन एक पुस्तक आहे.. फार देखणं अन जास्त वेळखाऊ आहे. त्यातील एक चित्र कालपासून सुरू केले. ते हे.. Secret Garden: An Inky Treasure Hunt and Coloring Book https://www.amazon.com/dp/1780671067/ref=cm_sw_r_awd_R0.ZvbS78B5YP

धन्यवाद साती. भारतातच आहे. कधी एकदाची पुस्तके घेते असे झाले आहे. पण...पण भरतकामाचे २—३ प्रकल्प चालू आहेत. ते पूर्ण होईपर्यंत कठोर संयम.

हायला, ते सिक्रेट गार्डन पुस्तक कसलं मस्त आहे. Happy मी पण ऑर्डर करणार.

त्यातलं तू रंगवायला सुरुवात केलेलं चित्रं रंगवून मस्त दिसतंय.

आता नेटवर शोधत होते तर ही चित्रं रंगवणं हे एक स्ट्रेस बस्टर आहे असं लिहिलंय.

हो मामी, अतिशय स्ट्रेसबस्टर प्रकरण आहे. म्हटले तर डोके चालवावे लागत नाही .. अन त्याचवेळेस रंगसंगतीचा विचार करणे, रेषेच्या बाहेर रंग न जाऊ देणे ह्याने मन एकाग्र होते. मी ५००% रेकमंड करीन ही अ‍ॅक्टिव्हिटी!

बस्के, कलरिंग मार्कर्स पुस्तकासोबत मिळतात का? अन्यथा त्याची लिंक किंवा ब्रैंड नेम सांगू शकाल का?

मस्त रंग संगती... पोस्ट मधे टाकलेले चित्र तर फारच मस्त आहे.. पूर्ण रंगवून झाल्यावर क्लास दिसेल.. वेळात वेळ काढुन हे असलं काहीतरी करायला पाहिजे.

थँक्स!

सीएनडब्ल्यु,
पुस्तकांबरोबर मार्कर्स इत्यादी मिळत नाही, ते वेगळेच विकत घ्यावे लागते.मी खालील प्रकार वापरते.

खडू, रंगीत पेन्सील्स- क्रेयोला. ( मुलाचे पळवले)
जेल पेन्स- पायलट जी२
अल्ट्राफाईन पर्मनंट मार्कर्स, शार्पी.

बस्के, तुम्ही रंगवलेली चित्रे छानच आहेत.
असे रंगकाम कधीकधी मीही करते पण Mobile apps वापरून.( घरात असलेल्या पुस्तकांमध्ये एकाची भर कमी ;)) Adult coloring book असा सर्च दिल्यास अनेक पर्याय मिळतील. मला तिथे असलेली "Undo" सुविधा आवडते आणि त्यामुळे दिलेला एखादा रंग नाही आवडला तर दुसरा वापरून बघता येतो किंवा "overpaint" करता येतो आणि कलाकृती हवी असेल तर Save करता येते.

चंद्रा, मी ही अ‍ॅप्स ट्राय केली.(कलरफाय नावाचे अ‍ॅप चांगले आहे) पण अ‍ॅक्चुअल कागदावर रंगवण्याच्या सुंदर अनुभवाच्या कुठेही जवळपास जात नाही ते.

Pages