ममो ने काही दिवसांपुर्वी काढलेल्या या धाग्याने मला चांगलीच भुरळ पाडली. सुरुवातीला जमतय का नै ते बघु तर अस म्हणुन सुरु केलेला प्रयोग चांगलाच successful झाल्यावर अजुन काहितरी वेगळ असं म्हणत म्हणत मी नवनविन शिकत गेली..
आधी ममोच्या धाग्यावर मग माझ्या पराक्रमाच्या धाग्यावर अस करता करता ते धागे हायजॅक होऊन जातील म्हणुन सगळा पसारा इथ करावा म्हटलं म्हणुन हे नविन धाग्याच प्रयोजन.
आता हि फुल; फुल न राहता त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी मी तयार करायला सुरुवात केलीय. त्यात मुख्यत्वे हेअर अॅसेसरीज जास्त आहे.. आता विचार आहे की नेकपीस, इअररिंग्ज, छोट्या मुलींच्या ड्रेससाठी वेस्ट बेल्ट वगैरे सुद्धा करुन पाहिल..अर्थात हे माझ्या मॉडेल वर सर्वात पहिले ट्राय करेल आणि त्याकरीता तिची ना नाही. तिच्यामते मी तिची बेस्ट फॅशन डिझायनर आहे. त्यामुळे मी अजुनतरी विन विन सिच्युएशन मधे आहे.
I hope तुम्हा सर्वांना हे प्रकार आवडतील आणि तुम्ही तुमच्या मॉडेल्स वर ते ट्राय कराल..
याउप्पर माझ्या मॉडेल च्या येत्या वाढदिवसाला तिच्या मित्रमैत्रीणींसाठी रिटर्न गिफ्ट म्हणुन यातल काही देऊ शकतो असं माझ मत पडलं.. मुलांसाठी काय यावर अजुन नक्की काही ठरल नाही पण त्यावर विचार चालु आहे.
येत्या नोव्हेंबर मधे माझ्या भाचाचा पहिला वाढदिवस आहे तेव्हा सर्व बच्चेकंपनींसाठी क्राऊन वगैरे बनवावे असा पन डोक्याट प्लॅन आहे..आणखीही बरच काही बाही चाललयं विचारात .. जे काही करेल त्याचे फोटो वरचेवर अपलोड करेलच मी इथे..
सद्ध्या बनवलेल्यांपैकी काही.. ममो आणि माझ्या धाग्यावर टाकलेले प्रचि सुद्धा इथच संग्रही करुन ठेवते.. तुम्ही केलेल्या प्रयोगांच पन इथं स्वागत आहे..
सर्व काही तयार स्थितीत नाहिए खरतर..बराच कच्चा माल सुद्धा दिलाय मी खाली..
१.उदा. ही फुल..काही वापरली..काही शिल्लक आहेत अजुन..
२.
३.
४. ह्या हेअरक्लीप्स
५.
६.हे सर्व हेअरबेल्ट
७.
८.
९.
१०.
११. याचे इअररिंग्ज करावे का ?
१२. हा बो..
१३. आणखी काही फुलं..
१४. न जमलेलं
या फुलांच्या मदतीने छोट्या बाहुल्यांचे ड्रेस , हेअरस्टाईल मधे वापरतो ते ब्रॉच, बुके, फ्लॉवरपॉट मधल्या फुलांच्या स्टिक्स, नेकपिस प्रमाणेच पेंडंट, ग्रिटींग कार्ड्स, फोटोफ्रेम्स, पर्स्/बॅग, मोबाईल कव्हर, विंडचेन, स्टिकर्स, बुकमार्क्स, ज्वेलरी बॉक्स, पेन स्टॅन्ड, वॉल आर्ट अस भरपुर काही बनवता येईल.. ज्यांना आवड असेल त्यांनी करा मग सुरुवात..
सगळेच सुपरर्लाईक!अमेझिंग
सगळेच सुपरर्लाईक!अमेझिंग स्किल..
कौशल्या हे तुमचे नविन नाव... मेहंदी, रांगोळी, क्विलिंग, सॅटिन...एकसे एक आणि ते पण उत्कृष्ठ.
धन्यवाद ऑल
धन्यवाद ऑल
_ खूप छान!
_ खूप छान!
कानातले आणि पेंडंट.. नाही ती
कानातले आणि पेंडंट..
नाही ती पिटी मी बनवलेली नै..डिमार्ट मधुन विकत घेतलेली आहे
घरमालकाच्या मुलीसाठी बनवलेला हेअरबेल्ट
खुप छान दिसतो हा डोक्यावर..तिला दिल्यापासुन ती तोच घालुन मिरवते दिवसरात्र
टीने _/\_
टीने _/\_
टीना, काय काय करून र्हायले
टीना, काय काय करून र्हायले वो तुमी, आमचा _____/\_____
सुंदर केवळ अप्रतिम. गुलाबी
सुंदर केवळ अप्रतिम. गुलाबी रंग काय गोड दिसतोय.
मस्त मस्त मस्त...
मस्त मस्त मस्त...
मंजूताई, देवकी, ममो, सायली >>
मंजूताई, देवकी, ममो, सायली >> धन्यवाद
फारच सुरेख ग ___/\___ मी पण
फारच सुरेख ग ___/\___
मी पण ट्राय करेन कधीतरी, धन्यवाद
टीना, भारीच आहेस ग तू. सफाई
टीना, भारीच आहेस ग तू. सफाई तर अप्रतिमच पण उत्साह आणि चिकाटीला मझा सलाम!
मी पण काय काय बघून भारावते, सामाअन आणून करून बघते. पण जरा जमले की ते कपाटात आणि मी नवीन कशाच्या तरी मागे. लक्की आहे तुझी भाची.
ते पांढर फूल माझ्या मामेबहिणीच्या फ्रॉक वर लावणार आहे>>> जाई, एक अनाहूत सल्ला. फ्रॉकवर फूल लावू नकोस पर्मनंटली. धुतल्याने त्याची रया जाईल. धुताना काढता येईल असे लाव. म्हणजे पिन लावून ब्रूच कर किंवा वेल्क्रो लावून.
हे आज केले.. दोन्हीही
हे आज केले..
दोन्हीही
रिबीनची क्वालिटी इतकी छान नव्हती .. त्यात फिनीशिंग पन इतक चांगल नै जमल

तरी ठिक जमले अस वाटतय.. घालुन मिरवेल कधीतरी
सॉलीड्ड आहे हे . तू खरच
सॉलीड्ड आहे हे . तू खरच हरहुन्नरी दिसतेस. स्वयंपक, मेंदी, ही फुलं वगैरे.
सॅटीनची सुंदर कलाकृती. अशी
सॅटीनची सुंदर कलाकृती. अशी फुलं मी फक्त विदर्भातच पाहिलीत.
ह. घ्या.
ऐ बाई, इतकी एनर्जी, वेळ कुठून
ऐ बाई, इतकी एनर्जी, वेळ कुठून आणतेस.. लईच कवतिक वाटतं तुझं ..झोपते बिपतेस ना रात्री??. __/\__
वर्षुताईना मम.
सर्वच सुंदर केलंस.
तु झोपत नाहीस रात्री, हे माहीतेय मला.
वा.... नवीन सर्व केलेले
वा.... नवीन सर्व केलेले सुद्धा फार सुंदर झालेत.
रिबीनची क्वालिटी इतकी छान
रिबीनची क्वालिटी इतकी छान नव्हती .. त्यात फिनीशिंग पन इतक चांगल नै जमल >>> ओ ताई! इतक मॉडेस्ट होवु नका, फार भारी जमलेयत... बाकी वरचेही काही काही फार भारी जमलेयेत... फिनिशिन्ग पण छान आहे... तुझ्यात कला आणि उत्साह दोन्हीही आहे..
येस सहेली, बरोबर आहे तुझं !!
येस सहेली, बरोबर आहे तुझं !! तसेच करते
अप्रतिम आहे सगळेच.
अप्रतिम आहे सगळेच.
अप्रितम आहे सगळ पायले
अप्रितम आहे सगळ पायले
काय काय करत असतेस ग बाई धन्य
काय काय करत असतेस ग बाई
धन्य आहे तुझी
टीना , 10 no. च्या इमेज ची
टीना ,
10 no. च्या इमेज ची कृती सागनार का pls.
मला माझ्या मुली banyacha ahe साठी आहे .
thx.
थँक्यु ऑल.. श्रद्धे..तु इथं
थँक्यु ऑल..
श्रद्धे..तु इथं चक्क..कमिनी, जरा भरभर येत जा न..
mani१२३४५६, तशी मागे मी लिंक दिली आहे ती बघीतली का ?
इथ स्टेप बाय स्टेप फोटो टाकण्यापेक्षा विडीओ मधे जास्त छान कळेल म्हणुन म्हणतेय
अन्जू,
प्राजक्ता, मॉडेस्ट वगैरे नै गं..खरच ती रिबीन इंटॅक्ट नै आहे..चुका दाखवू का माझ्या सांग ?
टिना सगळंच खुप छान केलयस,तो
टिना सगळंच खुप छान केलयस,तो पींक हेअर बेल्ट ऐकदम सुपर्ब.
आणी खरंच ग कधी करतेस ऐवढं सगळं .
टीना, करेक्ट आहे तुझं.
टीना, करेक्ट आहे तुझं. रिबीनीच्या क्वालिटीवर बरच अवलंबुन असत. कधी कधी रिबीनी अगदीच मेंगळ्या आणि विशविशीत असतात त्याच्या वस्तु एवढ्या चांगल्या नाही होत, म्हणून नेहमी ट्रस्टेड दुकानातुनच घ्यायची रिबीन.
हो न ममो.. हि तशीच होती
हो न ममो..
आणि त्यामानाने पैसे भरपुर वसुल करतात..
हि तशीच होती म्हणुन मी सुट्या पाकळ्या न करता जरा भरीव तयार केल्या..
ट्रस्टेड दुकानात हवा तो रंग मिळेलच याची खात्री पन तर नसते ना..
वर दिड, दोन ते तीन इंचाच्या सॅटीन रिबीन कुठ मिळेल पुण्यात माहितीये का ?
सम्राट दुकान सोडून विचारतेय..तिथली क्वालिटी नै आवडली मला
मस्त.. मुली नवीन धागा काढ.
मस्त.. मुली नवीन धागा काढ. एकदम सगळे फोटु लोड होताना खूप वेळ जातोय.
मुली नवीन धागा काढ. एकदम सगळे
मुली नवीन धागा काढ. एकदम सगळे फोटु लोड होताना खूप वेळ जातोय.
>>
+१
टिने पण तुझ्यात कित्ती कला आहेत बाई. कशा कशाचे धागे काढणार तू.
:फाको मोड ऑन
अचानक कधी तरी तुला मेहंदी काढत असताना ही फूलं बनवायची इच्छा झाली की तू 'कला, तू जरा गप्प बस' म्हणत असशील ना?
:फाको मोड ऑफः
नी, रीया, नविन धागा ? हेच तर
नी, रीया,
नविन धागा ? हेच तर सगळ मिक्स होऊ नये म्हणुन फक्त सॅटीन चा नवा धागा काढला..
अगं लोड व्हायला वेळ लागतोय
अगं लोड व्हायला वेळ लागतोय म्हणून सॅटीन पार्ट २ काढ.
Pages