Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31
मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीलू... सतिश 'रिफ्रेशीन्ग
नीलू...
...
सतिश 'रिफ्रेशीन्ग कोर्स' करतसत... वांयच थोडी बसलेली धूळ झटकून मगे सरसरीत पणे मालवणी बोलतले...
डॅफो...
बर्याच दिवसांनी परत हंयसर हजेरी लावलात. चला, धागो जिवंत केल्याचो कायतरी फायदो झालो...
आता परत अभ्यासाक सुरुवात करुक लागा. वरती बघा नवे विद्यार्थी कशे लिवतत ते, आणी तसोच प्रयत्न करुक लागा. भियां नाकात, जमतलां
पद्मजा आणी ममा...
...
आजच्या अभ्यासाची उत्तर-पत्रीका याच धाग्यावर संध्याकाळी ०७ नंतर बघूक मिळात. तो पर्यन्त प्रत्यक्षिकाक हजेरि लावन घ्येवा...
निलु मॅडम..fluently मालवणी
निलु मॅडम..fluently मालवणी लिवुक येणा नाय म्हणान गजालीर गप्प बसान रवाक लागता म्हणान परत अॅडमिशन घेतली..:)
तुमच्या प्रत्येकाच्या
तुमच्या प्रत्येकाच्या कंसातल्या वाक्यां वरच पुढचो अभ्यास अवलंबून असता, ह्यां लक्षात घ्येवा. तेव्हां कंसातली वाक्यां लिहिण्यावर माझो कसलोही आक्षेप नाय... ... >>> सर छ्डी लागली.
माझी कंसातला आवाज करुची सवय बंद पडुक होवीच.
तुमचो वर्ग हयसर भरवण्याचो उद्देश एकदम पटलो. माका पण सोयीचं कारण सिनियर लोक आम्हाला रॅगिंग करुक पहात होती. ( चुगली )
सर मालवणीसुन मराठीक लिहिणं खरंच कठिण आसा. माजा प्रयत्न जारी आसा.
१> आजपासून परत येकदा
१> आजपासून परत येकदा मालवणीच्या वर्गात बसान अभ्यास सुरु करतंव.
>> आजपासून पुन्हा एकदा मालवणीच्या वर्गात बसून अभ्यास सुरू करतोय.
२> मास्तर काल आपलो दोन दिवसांचो कुडाळ दौरो आटोपून परत ईले. परत येताना मास्तर फक्त अभ्यासच घ्येवन ईले. आमका वाट्लेलां विद्यार्थ्यांसाठी एखादी छोटिशी भ्याट घ्येवन येतीत.
>> मास्तर काल आपला दोन दिवसांचा कुडाळ दौरा आटोपून परत आले. परत येताना मास्तर फक्त अभ्यासच घेऊन आले. आम्हाला वाटलं होतं, की विद्यार्थ्यांसाठी एखादी छोटिशी भेट घेऊन येतील.
३> गजालेवर पोरां गोंधळ घालून, गजाली करुक द्येणत नाय म्हणान मास्तरांनी आज दुसरीकडे वर्ग भरवलेलो दिसताहा.
>> गजालीवर पोरं गोंधळ घालून गजाली करू देत नाहीत, म्हणून मास्तरांनी आज दुसरीकडे वर्ग भरवलेला दिसतोय.
४> धुमशानी कलाकार गेल्या आठवड्या पासून खंय दिसांचाच बन्द झालां. बहुतेक आम्ही तेका बघुन घेतलंव ह्येची कल्पना ईलेली दिसताहा.
>> मस्तीखोर कलाकार गेल्या आठवड्यापासून इथे दिसायचाच बंद झाला. (कोण हा/ही? :अओ:) बहुतेक आम्ही त्याला बघून घेऊ याची कल्पना आलेली दिसते आहे.
५> मास्तरांनी काही ठराविक लोकांसाठीच भ्याट आणलिहा असां समाजता. आता हंयसर मनापासून अभ्यास करुन, पुढच्या खेपेक मास्तर आमच्यासाठी भ्याट घ्येवन येतीत काय?...
>> मास्तरांनी काही ठराविक लोकांसाठीच भेट आणली आहे, असे समजते. आता इथे मनापासून अभ्यास करून (केला तर), पुढच्या खेपेला मास्तर आमच्यासाठी भेट घेऊन येतील काय?
(वरचा भाग सोप्पाच आहे हो!)
शुद्ध-मराठीतसुन मालवणीत लिवा: -
१> एक वेळ मालवणीतून मराठीत लिहिणं सोपं पडतं, पण मराठितून मालवणित लिहिताना पंचाईत होते.
एक वेळ मालवणीतसुन मराठीत लिवणं सोपं, पण मराठीतसुन मालवणीत लिहिताना पंचाईत आसां.
२> मास्तर मालवणिचं व्याकरण अजीबात शिकवत नाहीत. 'सरावानेच मालवणी लिहिता-बोलता येईल' असं सांगतात. काय सांगणार? मस्तरांची अजब शाळा...
नाही आलं!
३> इतर दुसरी भाषा शिकण्या पेक्षा मालवणी भाषा शिकायला सोपी पडेल, असं अजुनही वाटतंय.

४> वरचेवर 'गजाली' ला भेट देऊन, मालवणीचा सराव करण्याला दुसरा कोणता पर्याय सापडेल का?.

)

५> मी जर घरात मालवणी बोलायला सुरुवात केली, तर घरच्यांचा काय प्रतीसाद असेल?, त्याच्या कल्पनेनेच मला हसायला येते आहे...
(मला रडायला येते आहे..
प्रतिशब्द कसे वापरावेत हाच मुख्य घोळ आहे!
मला क्रियापदं कशी वापरावीत
मला क्रियापदं कशी वापरावीत हेच कळत नाही.
म्याँव, क्रियापदांबाबत मागे
म्याँव, क्रियापदांबाबत मागे खयतरी ह्याच धाग्यार म्हायती आसा ती वाच. सोप्या आसा गो.
शोधतय आता मीच.
थँक्स गं शैलु, सोप्या आसा
थँक्स गं शैलु, सोप्या आसा तुला. माका तर काहीच समजत नाही. आता दोन्ही धागे आज रात्री वाचुन काढते आणि नोट्स पण.
देसायानु, मास्तर कोन असत?
देसायानु, मास्तर कोन असत? माका पण शिकवले काय?
मास्तरांकाच ईचारतास मास्तर
मास्तरांकाच ईचारतास मास्तर कोण म्हणून
आया उगी उगी
म्हणजे कोकाटे की देसाई, असा
म्हणजे कोकाटे की देसाई, असा इचारतासा ता
अगो नीलू, मी पयला काय वाचूक
अगो नीलू, मी पयला काय वाचूक नाय. शेवटचो पान उघडून बघलय, म्हणून असा इचारलय.
आता मास्तरांका पण, नवीन विद्यार्थी कसा आसा (आळशी) ता समजतला
आता माका अॅडमिशन मिळूची नाय 
>>आता माका अॅडमिशन मिळूची
>>आता माका अॅडमिशन मिळूची नाय>> न मिळूक काय झाला. मास्तरांका ओळखा नी अॅडमिशन मिळवा असा काय नाय आसा हयसर.
तुमी येवक लागा. आणि तुमचा मालवणी तर फक्कड होता असा माका आठावता कायतरी अंधूकअंधूक 
मी वर्गात इलंय एक वेळ
मी वर्गात इलंय
एक वेळ मालवणीतून मराठीत लिहिणं सोपं पडतं, पण मराठितून मालवणित लिहिताना पंचाईत होते.
एक येळ मालवणीतून मराठीत लिहूक जमाल पण मराठीतून म्लावणीत लिवताना तंतरतला (शब्दशः भाषांतर व्हया काय?)
२> मास्तर मालवणिचं व्याकरण अजीबात शिकवत नाहीत. 'सरावानेच मालवणी लिहिता-बोलता येईल' असं सांगतात. काय सांगणार? मस्तरांची अजब शाळा...
मास्तर मालवणीचा व्याकरण अजाबात शिकवनत नाय. 'सरावानेच मालवणी लिहूक- बोलूक येतला' अशे सांगतंत. काय बोलूचा? मास्तरांची अजब शाळा
३> इतर दुसरी भाषा शिकण्या पेक्षा मालवणी भाषा शिकायला सोपी पडेल, असं अजुनही वाटतंय.
दुसरी खंयची भाषा शिकण्यापरीस मालवणी भाशा शिकूक सोपी असा अजून बी वाटता हा.
४> वरचेवर 'गजाली' ला भेट देऊन, मालवणीचा सराव करण्याला दुसरा कोणता पर्याय सापडेल का?.
वरच्याSर गजालीक भेटो दिऊन मालवणीचो सराव करण्यापरास दुसरो काय उपाय गावतलो काय?
५> मी जर घरात मालवणी बोलायला सुरुवात केली, तर घरच्यांचा काय प्रतीसाद असेल?, त्याच्या कल्पनेनेच मला हसायला येते आहे...
मी जर घरात ,मालवणी बोलूचा सुरू केला तर घरचे काय म्हणातले त्याच्योया कल्पना करूनच हसू येता हा..
आजची उत्तर पत्रिका:
आजची उत्तर पत्रिका: -
मालवणीतसून शुद्ध-मराठीत करा: -
१> आजपासून परत येकदा मालवणीच्या वर्गात बसान अभ्यास सुरु करतंव.
आजपासून परत एकदा मालवणीच्या वर्गात बसून अभ्यास सुरु करतोय/ करत आहोत.
२> मास्तर काल आपलो दोन दिवसांचो कुडाळ दौरो आटोपून परत ईले. परत येताना मास्तर फक्त अभ्यासच घ्येवन ईले. आमका वाट्लेलां विद्यार्थ्यांसाठी एखादी छोटिशी भ्याट घ्येवन येतीत.
मास्तर काल आपला दोन दिवसांचा कुडाळ दौरा आटोपून परत आले. परत येताना मास्तर फक्त अभ्यासच घेऊन आले. आम्हाला वाट्लेलं विद्यार्थ्यांसाठी एखादी छोटिशी भेट (खाण्यासारखी) घेऊन येतील...
३> गजालेवर पोरां गोंधळ घालून, गजाली करुक द्येणत नाय म्हणान मास्तरांनी आज दुसरीकडे वर्ग भरवलेलो दिसताहा.
गजालीवर पोरं गोंधळ घालून, गजाली करायला देत नाहीत, म्हणुन मास्तरांनी आज दुसरीकडे वर्ग भरवलेला दिसतोय.
४> धुमशानी कलाकार गेल्या आठवड्या पासून खंय दिसांचाच बन्द झालां. बहुतेक आम्ही तेका बघुन घेतलंव ह्येची कल्पना ईलेली दिसताहा.
दंगेखोर कलाकार गेल्या आठवड्या पासून कुठे दिसलीच नाही. बहुतेक आम्ही तीला बघुन घेऊ, याची कल्पना आलेली दिसतेय.
५> मास्तरांनी काही ठराविक लोकांसाठीच भ्याट आणलिहा असां समाजता. आता हंयसर मनापासून अभ्यास करुन, पुढच्या खेपेक मास्तर आमच्यासाठी भ्याट घ्येवन येतीत काय?...
मास्तरांनी काही ठराविक लोकांसाठीच भेट (खाण्यासारखी) आणली आहे असं समजतय. आता ईथे मनापासून अभ्यास करुन, पुढच्या वेळी मास्तर आमच्या साठी भेट घेऊन येतील का?...
शुद्ध-मराठीतसुन मालवणीत लिवा: -
१> एक वेळ मालवणीतून मराठीत लिहिणं सोपं पडतं, पण मराठितून मालवणित लिहिताना पंचाईत होते.
एक वेळ मालवणीतसून मराठीत लिवक सोप्यां पडता, पण मराठीतसून मालवणीत लिवताना पंच्यायती होताहा.
२> मास्तर मालवणिचं व्याकरण अजीबात शिकवत नाहीत. 'सरावानेच मालवणी लिहिता-बोलता येईल' असं सांगतात. काय सांगणार? मस्तरांची अजब शाळा...
मास्तर मालवणीचां व्याकरण अजाबात शिकवणत नाय. 'सरावानच मालवणी लिवक्-बोलाक येतली' असां सांगतत. आता काय सांगतले?. मास्तरांची अजब शाळा...
३> इतर दुसरी भाषा शिकण्या पेक्षा मालवणी भाषा शिकायला सोपी पडेल, असं अजुनही वाटतंय.
इतर दुसरी भाषा शिकण्या पेक्षा मालवणी भाषा शिकाक सोपी पडात, असां आजुनय वाटता...
४> वरचेवर 'गजाली' ला भेट देऊन, मालवणीचा सराव करण्याला दुसरा कोणता पर्याय सापडेल का?.
वरचेवर गजालेक भेट द्येवन, मालवणीचो सराव करण्यापेक्षा दुसरो खंयचो पर्याय सापडात काय?.
५> मी जर घरात मालवणी बोलायला सुरुवात केली, तर घरच्यांचा काय प्रतीसाद असेल?, त्याच्या कल्पनेनेच मला हसायला येते आहे...
मी जर घरात मालवणी बोलाक सुरुवात केलंय, तर घरच्यांची काय अवस्था होयत?, तेच्या कल्पनेनच माका हसाक येताहा...
माका मालवणी समजता. बोलूक येत
माका मालवणी समजता. बोलूक येत नाय.
नंदिनी ये ये.. गंगा व्हाता हा
नंदिनी ये ये.. गंगा व्हाता हा हात धुऊन घे बाय
मास्तर पोरांनी घाम गाळून ईतके पेपर सोडवलेत आसत तर वायच वायच गुण देवन टाका कसा?
नंदिनी, सगळ्यांची तीच अवस्था
नंदिनी, सगळ्यांची तीच अवस्था आहे. पण तु वेळेवर आलीस, आज पहिलाच धडा होता. चल ये बस वर्गात. मास्तर खुपच चांगले आहेत. मॉनिटर खुप कडक पण प्रेमळ आहे. कोण विचारु नको. लगेच शिमटी तयार असते तिच्या हातात.
नमस्कार मंडळी......... मला
नमस्कार मंडळी.........:फिदी:
मला अॅडमिशन मिळेल का? तुमचं खूपच शिकून झालंय. आणि मी आजच ह्या धाग्यावर डोकावलेय.त्यामुळे सॉरी............
शाळेक सुटी असा काय?
शाळेक सुटी असा काय?
शाळा गुरुवारची बंद असता.
शाळा गुरुवारची बंद असता.
मास्तरांका सुट्टी होती काल. आज येतीत. तयारेत रवा नवीन प्रश्नपत्रिका येयत आज.
पद्मजा... काल हयसर माशाचोच
पद्मजा...
काल हयसर माशाचोच गजाली चाल्लेली असां...>>> काल हंयसर माशांचे गजाली चल्लंले नां...
म्हणुन काई बोल्ले नाई...>>>... म्हणान काय्यक बोलाक नाय...
माका त्यातलो काही सम्जत नसां ना...>>>... माका तेच्यातलां काय्यक समाजणा नाय...
हळू-हळू तू देखिल 'माशां'चे गजाली सुरु करतलस, ह्यां मी तुका सांगतंय. तेच्या साठी माशे खावचे लागणत नाय...
...
हळू-हळू तू देखिल 'माशां'चे
हळू-हळू तू देखिल 'माशां'चे गजाली सुरु करतलस, ह्यां मी तुका सांगतंय. तेच्या साठी माशे खावचे लागणत नाय...>>> व्हय मास्तरांनु
समस्त 'मालवणी-बोली-भाषा'
समस्त 'मालवणी-बोली-भाषा' विद्यार्थी-वर्ग...
कधी न्हंय तां मास्तरांकडे काम ईलांहां, त्या मुळे मास्तर आज 'कामा'च्या पाठी लागलेहत... तेव्हां तुमका सगळ्यांक आज सुट्टी... हां!, उद्या शनवार म्हणान 'अर्धो-दिवस' शाळा नसतली, तेव्हां उद्या सगळ्यांची 'हजेरी' घेतली जातली, ह्यां ध्यानांत घ्येवा...
माजो पायगुण बरो दिसना नाय.
माजो पायगुण बरो दिसना नाय. शाळेत पाय टाकलंय आणि शाळेक सुटी.
बदली मास्तर नाय गावतील काय
बदलीचे मास्तर आसत एक पण
बदलीचे मास्तर आसत एक पण त्यांकाच बदलूची येळ ईली हा
मास्तर मी हजर आजपासुन.
मास्तर मी हजर आजपासुन.
नीलू
नीलू
खयच्या मास्तराक काडून टाकतास?
खयच्या मास्तराक काडून टाकतास?
शांकली, घाबरू नको. आम्ही
शांकली, घाबरू नको. आम्ही सुद्धा बालवाडीतलेच आसव. मास्तरांनी वर दिलेलो गृहपाठ गुपचूप करूचा आपोआप शाळेत अॅडमिशन पक्की. कसले फॉर्म भरूचे नायत आणि रात्रभर शाळेच्या बाहेर बसूचा नाय.
प्रज्ञा.............. मी फक्त
प्रज्ञा..............:हाहा:
मी फक्त वाचायचा प्रयत्न करतिये! मोठ्याने वाचलं आणि माझं कुणी ऐकलं तर चक्कर येऊन खाली पडेल तो माणूस. त्यामुळे इथे प्रतिसाद लिहायचे झाले तर प्लीज मी मराठीतून लिहिले तर चालतील का? गृहपाठ मी मनातल्या मनात करण्याचा प्रयत्न करीन!! .............
Pages