"शिरेयस चर्चा फक्त शुक्रवारी करून मिळतील. एरवी जादा चार्ज पडेल" अशा समेवर येऊन संपलेली नव्हे तर सुरु झालेली बेकरीवरची चर्चा इथे हलवतेय.
आपल्यापैकी काही जणांना नोकरी/शिक्षण किंवा इतर कुठल्याही (जसं बेटर किंवा स्वतः नोकरीबदलल्यामुळे वगैरे) जागा बदलांचा अनुभव असेल. त्यात तुम्ही आधीच्या जागी बरीच वर्षे राहिलात तर तुमची त्या जागेबद्दलची जवळीक जास्त असते. अशावेळी पटकन उठून दुसरीकडे स्थापन्न होणे, हे सहज शक्य होत नाही. त्यावेळी कोतबो होणं साहजिक आहे. हे तिथलं उचलून इथे चिकटवतेय. पण ज्यांना याबाबतीत जास्त अनुभव आहे त्यांनी आपले अनुभव, दुसरीकडे लवकर रूळता येण्याचे काही सोप्पे उपाय वगैरे असतील तर ते आणि ज्यायोगे जे आत्ता (किंवा हा धागा वाचताना) या अनुभवातून जाताहेत त्यांचं मनोधैर्य उंच होण्यासाठी जे उपयुक्त वाटेल ते सगळं काही इथे येऊन सांडलंत तर चालेल.
वेका | 25 July, 2015 - 07:16
बरीच वर्षे एकाच ठिकाणी राहून मग मुव्ह करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आपण इतके आपल्या सभोवतालच्या लोकांना सरावलो असतो की नव्या ठिकाणी पटकन एकटेपणा येतो. आता हा चुकून कुणी चांगला मित्र्/मैत्रीण मिळाल्यामुळे दूर झाला तर ठीक नाहीतर तोच एकटेपणा आपण आपल्या फायद्यात रुपांतरीत करायचा.
थोडक्यात स्वतःचा शोध घेणे हे काळात शक्य होतं आणि शिवाय पुढे-मागे हा एकटेपणा वेगळ्या कारणाने येऊ शकतो तेव्हा काय याचा विचार केला जातो. मग त्या अनुषंगाने काही वेगळे मार्ग पुढे येतात. एकला चालो रे वगैरे मिथ्या नसून सत्य आहे हे पटतं.... आता मला माझं वय झाल्यासारखं वाटायला लागलं स्मित
पण काय होतं की ही शेवटी तात्पुरती अवस्थाच असते. हेही दिवस बदलतात नव्य जागी केल्या जाणार्^या नव्या गोष्टी, भटकंती, खाऊ गल्ल्या जे काही तुमच्या आवडीचं असेल ते तुम्ही पुन्हा करू लागता. और दिल ने कब करवट बदली पता ही नहीं चलता...यही तो है जिंदगी मेरे दोस्त.
धनि तुझ्या धाग्यासाठी सेव्ह करून ठेव स्मित
संपादन
पारु | 25 July, 2015 - 07:27
<एन्ड गोल डिग्री आहे आणि ती झाली की इथुन निघायचे आहे हे दिसत होते.> +१
मी पोर्टलँडला ७-८ महिने होते इंटर्नशिप साठी तेंव्हाचा काळ खुप एन्जॉय केला मी.
पोर्टलँडल आणि सिएटल चे हवामान तसे बरेच सारखे आहे हे त्यातल्या त्यात बरे आहे.
मी अंडरग्रॅड झाल्या वर कंपनी कडून डेन्मार्कला गेले होते. माझ्या बरोबर एक तेलगु कलिग होती. आम्ही खुप रडायचो होमेसिक होउन. काही दिवसांन्नी आम्ही रेन्ट्ल अपार्ट्मेंट बदलत होतो तर त्या नवीन अपार्टमेंट चा जुना भाडेकरु जो मुळचा युके चा होता तो सामान हलवत असताना भेटला. कितीतरी वेळ आमच्याशी बोलत होता त्याच्या युकेच्या घराविषयी, कुटुंबाविषयी आणि नंतर आम्हाला म्हणे इफ यु फील होमेसिल वी कॅन मीट अॅंन्ड टॉक ! त्याला बघुन वाटलं की आम्ही एकटेच नाही आहोत जे थोडे आउट ऑफ प्लेस फील करत आहोत आणि आम्हाला जरा बरं वाटलं स्मित
rmd | 25 July, 2015 - 07:29
मूव्ह करण्याबद्दल माहिती नाही. पण एमेस करायला इथे आले हे एक मोठ्ठं मूव्ह करणंच होतं माझ्या दृष्टीने. सगळंच नवीन होतं. शेअरिंगमधे राहणं हा ही नवीन एक्स्पिरिअन्स होता. आजूबाजूला लोकं असून एकटं वाटायचं. आता एकटं असूनही त्रास वगैरे होत नाही. पुन्हा रूमीज बरोबर राहायला आता नको वाटतं. तर हा सवयीचा भाग आहे असं मला वाटतं.
इतकं बोलून आता मीटिंगडे फिदीफिदी
पियु | 25 July, 2015 - 08:03
नमस्कार, मंड्ळी. आज अगदी गंभीर चर्चा.
मूविंगचा अनुभव नाही पण एका जवळच्या मैत्रिणीला यातुन जाताना बघतेय, रादर ऐकतेय. इथे बर्याच मेहनतीने मिळविलेला मनासारखा जॉब सोडुन ईस्ट कोस्टला मूव्ह झाली. तिथे घडी बस्तेय तोवर पुन्हा वर्षभरात वेस्ट कोस्टला दुसर्या शहरात. आता मैत्रिणी नाहीत, जॉब नाही म्हणुन जाम डीप्रेस होते कधी कधी. पण मुळात स्वभाव उद्योगी आणि मनमिळाऊ त्यामुळे जिथे जाइल तिथे गोतावळा जमवेलच.
मला वाटत, एका ठराविक वयानंतर सेट रूटीन मधे बदल नको वाटतात.
rar | 25 July, 2015 - 08:33
माय हायपोथेसिस - जितकी सिस्टीम जास्त रिजीड कराल/असते - तितकी कोलॅप्स लवकर होते/त्रास जास्त होतो.
प्लेक्झीबीलीटी असणं (मग ते खाण्याच्या वेळा असोत किंवा राहण्याच्या जागा असोत..लोल) अवश्यक आहे.
मुळात लाईफ इतकं अनसर्टन आहे, तरी आपण फार दूरचे प्लॅन करतो आणि त्यात फार रूतत जातो आणि रिजीड होत जातो.
- रारमहाराज मोड ऑफ हाहा
सीमंतिनी | 25 July, 2015 - 08:43
एक निरिक्षण स्वतः व मित्रपरिवाराला बघून - मूव्हिंगचे कारण मनापासून पटले नसेल तर मूव्हिंगचा त्रास होतो. एखादे ध्येय डोळ्यासमोर असेल तर मूव्हिंगचा फारसा बाऊ वाटत नाही, उलट एक्साईटमेंट असते. जुन्या गावाकडे बघताना 'गुड टाईम्स!' एवढीच ओळ मनाशी येते.
पारू अशे ब्रिट ड्यूड्स असतील तर रोज होम्सिक व्हायला होईल न काय डोळा मारा स्मित
फारएण्ड | 25 July, 2015 - 09:05
अरे छान लिहीत आहात लोकहो (रारमहाराज यांचे निरूपण सुद्धा फिदीफिदी). पण हे वाहून जाईल. कोणीतरी बाफ काढा एक.
साहिल शहा | 25 July, 2015 - 09:07
ह्या धाग्यावर गंभीर चर्चा!
वेका, rar , सीमंतिनी तिघाचे मुद्दे पटले.
आम्ही १५ वर्ष सिंगापुरला राहुन मुलाच्या शिक्षणासाठी ३ वर्ष अमेरिकेत बदली करुन घेतली. सुरवातिला ध्येय समोर असल्याने काही वाटले नाही पण मुलाला चांगली university मिळाली की ध्येय पुर्ण झाल्यावर एकटेपणा जणवायला लागला आहे. . आता शेवटचे वर्ष काढायचे आहे तर दिवस मोजतोय. असे वाटते की कधी एकदा आपल्या गावी परत जातोय.
खाली सोन्याबापू यांनी दिलेली अतिशय सुंदर कविता इथे देतेय.
I must go down to the seas again, to the lonely sea and the sky,
And all I ask is a tall ship and a star to steer her by;
And the wheel’s kick and the wind’s song and the white sail’s shaking,
And a grey mist on the sea’s face, and a grey dawn breaking.
I must go down to the seas again, for the call of the running tide
Is a wild call and a clear call that may not be denied;
And all I ask is a windy day with the white clouds flying,
And the flung spray and the blown spume, and the sea-gulls crying.
I must go down to the seas again, to the vagrant gypsy life,
To the gull’s way and the whale’s way where the wind’s like a whetted knife;
And all I ask is a merry yarn from a laughing fellow-rover,
And quiet sleep and a sweet dream when the long trick’s over.
मी हा धागा न वाचता तुमचं
मी हा धागा न वाचता तुमचं मनोगत वाचून प्रतिसाद देत आहे मीनाक्षी. तीन वर्षे हा विचार आधी काढून टाका. लहान विभागात(दिवस, आठवडा) काळास गृहीत धरून चालले तर दडपण कमी होते. आणि बाहेर फार पडू शकत नसल्याने तुमची जी परिस्थिती आहे ती सध्या कोविड मुळे बऱ्याच लोकांचीही आहे. तुम्हाला online लहानसहान कोर्स वगैरे करणे शक्य आहे का? तर विपू करा. तसं सुचवता येईल. दिल्लीत माबोकर असतीलअसे वाटते. तसा ग्रुप सापडला तर माबोवर शोधून काढता येईल.
बाकी नवीन जागी कंटाळा येणं स्वाभाविक आहे..
मिनाक्षी,
मिनाक्षी,
तुमच्या पतीच्या नोकरीचे स्वरुप बघता ठराविक काळाने नवे पोस्टिंग, नवे गाव-घर हा तुमच्या आयुष्याचा भाग असणार आहे .नव्या जागी रुळायला थोडा वेळ लागणार. मात्र आता ३ वर्षांसाठी दिल्लीला स्वकीयांपासून दूर असा विचार न करता 'हे माझे घर' असा विचार केलात तर रुळणे सोपे होईल. सध्या घरुन काम + मुलांची ऑनलाईन शाळा + घर चालवणे अशी तारेवरची कसरत बरेच जण करत आहेत. तसे तुम्हाला करावे लागत नाहीये असा पॉझिटिव विचार करुन तुमचे आणि मुलीचे एक रुटिन बसवा. मुलीची शाळा बंद आहे तरी तिला होम स्कूल करता येइल. त्यात आणि मुलीशी खेळण्यात दिवसातले दोन तास सहज जातील. जोडीला तुम्ही देखील काही ऑनलाईन कोर्सेस करु शकता. यात कोर्सेरा आणि edX वर बरेच कोर्सेस ऑडिट म्हणून केल्यास फ्री आहेत. युडेमीचा सेल असतो तेव्हा कोर्सेस अतिशय माफक दरात विकत घेता येतात.
https://www.mooc.org/
https://www.coursera.org/
https://www.udemy.com/
युट्युबबर देखील छंदांसाठी आणि शिकण्यासाठी म्हणून बरेच काही उपलब्ध आहे. तुम्हाला काय आवडतेय, जमतेय ते अजमावून बघायची छान संधी मिळाली आहे असा विचार करा. कुणी सांगावे , बदलीची नोकरी वगैरे सांभाळून, घरुन करता येइल असे आवडीचे स्वतःचे काम यातून सुरु होईल. तुम्हाला खूप शुभेच्छा!
मीनाक्षी, इथे कितीही सल्ले
मीनाक्षी, इथे कितीही सल्ले मिळाले तरी 'ट्राईड-अँड-टेस्टेड' म्हणजे स्वानुभवावर आधारित परिस्थितीनुरूप सल्ले इतर वायुदलातील जोडीदारच देवू शकतील. तिथे 'स्पाऊसल क्लब' किंवा जोडीदारांसाठी काही योजना नाहीत का? त्यांच्याबरोबर संवाद साधून बघा. इतर जागी अशा महिलांचे/जोडीदारांचे क्लबचा वाईट अनुभव आले होते का? असतील तरी खुल्या मनाने नव्या जागी एक-दोन झूम पार्टीपुरत्या तरी जावून बघा. बाकी तुम्हाला काय करायची आवड आहे हे थोडे लिहीले असते तर त्या अनुषंगाने काही सुचवता आले असते. (उदा: पुन्हा व्यवसाय/नोकरी इ करायचे आहे का? नवा/जुना छंद जोपासायचा आहे का? फिटनेसची आवड आहे का?) बहुतेकांची समस्या वेळ पुरत नाही अशी असते. तुम्ही भाग्यवान आहात की मोकळा वेळ आहे. जी ले अपनी जिंदगी...
आर्मी वाइव्ज क्लब असतो तसे
आर्मी वाइव्ज क्लब असतो तसे एअर्फोर्स मध्ये असते का? एक तर तुमच्या नवर्याचे लोकेशन इथे जालावर लिहू नका. त्यांना तशी परवानगी नसेल. ते रूल्स चेक करून घ्या.
तसेच नवर्याच्या सी ओ किंवा कमांडरच्या बायकोची जबाबदारी असते नव्या जॉइन झालेल्या गृहिणींना युनिटच्या कार्यक्रमात सामावून घ्यायची. त्यांना गोडव्याने संपर्क करा. म्हणजे काहीतरी केक वगैरे घेउन भेटायला जा किंवा हाय टी ला घरी बोलवा. सेम रँकच्या नवरे असलेल्या इतर बायका काय वेळ घालवतात ते बघून त्यात सामावून घ्या.
तुमच्या कँपस मध्ये उत्तम स्विमिन्ग पूल जिम स्वस्त दरात उपलब्ध असेल जॉगिन्ग ट्रॅक व इतर सुविधा नक्की अस्तील. त्यांचा आनंद घ्या.
गार्डनिंग करता येइल . बाकी एअर्फोरस्ची गाडी घेउन इतर लेडीज बरोबर शॉपिन्ग ट्रिप. पिकनिक असे करता येइल पण सध्या कोव्ह्ड असल्याने ती काळजी घ्या.
घरी रोज फोन व्हिडीओ कॉल करा. आई मावशी ह्यांना राहायला बोलावून घ्या.
दिल्ही मोठे स्टेशन स्टेशन आहे त्यामुळे तुम्हाला तुमचे पुढील शिक्षण पण करता येइल. वीकांताला नवृयाबरोबर वेळ स्पेंड करता येइल.
हार्दिक शुभेच्छा.
इथे लिहा अनुभव प्लस रेसीपीज फोटो कलाकृती. कविता लेख कथा व्गैरे आम्ही आहोतच धीर धरा.
A Ship in Harbor Is Safe, But
A Ship in Harbor Is Safe, But that Is Not What Ships Are Built For.
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सध्या मन गुंतवायचा उपाय शोधला आहे, एक online कोर्स लवकरच सुरू होईल. बाकी सजेशन्ससही लवकरच प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करेन नक्की
मुली बद्दल म्हणायचं तर तिला घेऊन रोज सकाळी आणि संध्याकाळी भाजी, दूध आणायला बाहेर पडेन, म्हणजे 2 फेऱ्या होतील, बाग फार जवळ नाही त्यामुळे तिथे आठवड्यातून १-२ वेळाच जाणे शक्य आहे.
Btw आता मला आधीचा प्रतिसाद संपादित किंवा delete कसा करता येईल किंवा करता येईल का ?
जन्म शिक्षण लग्न सगळं एकाच
जन्म शिक्षण लग्न सगळं एकाच गावात. त्यामुळे वयाची चाळीशी उलटेपर्यंत गाव बदलायची वेळच आली नाही. आणि मग दिड वर्षांपुर्वी अचानक डायरेक्ट साऊथ मुंबईत शासकीय वसाहतीत येऊन लॅन्ड झालो.
आता काहीजणं म्हणतील "ह्या sobo मधे आलात मग कशाला काही त्रास होतोय शिफ्टिंगचा?"
मला नाहीच झाला त्रास पण टिन एजर लेकीला मात्र झाला त्रास. अकरावीची ॲडमिशन घेतल्यानंतर तसही शाळेतला गृप पांगणार होताच, नवीन मित्र मैत्रिणी जोडावे लागणार होतच असं आम्ही जरी म्हंटले तरी तिला ते तितके सोपे नाही गेले. पहिलं वर्ष जर्रा काही खुट झालं की गंगाजमुनाला कामाला लावत आपलं जुनच घर किती चांगलं आहे. इथे का आलो उगाच म्हणून रिपीट टेलिकास्ट सुरु असायचे तिचे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आता बरीच सुधारणा आहे
मला त्यामानाने सोपे गेले बदल ॲक्सेप्ट करायला. सुरवातीला नकळत तुलना व्हायची माझ्याकडून "तिथे उतरल्यावर लगेच फुलं भाजी गजरे मिळतात ... इथे रेल्वेने येण्याजाण्याच्या रस्त्यावर भाजीबिजी काय ती नाहीच. तिथे घरकामाला मावशी एक गेली दुसरी मिळायची... इथे नो मावशी नो काका आम्हीच घरचे रामागडी... तिथे कडवे वाल , आगळ अलमोस्ट प्रत्येक वाण्याकडे ..
इथे पावटा देतात कडवे वाल मागितल्यावर आणि कोकम सरबत देतात आगळ मगितल्यावर... अजून आहेत गोष्टी काही खुपच छोट्या काही जरा कमी छोट्या". पण सुरवातीच्या आठवड्याभरातच माझं मला लक्षात आलं, जर मी अशी तुलना करत बसले तर मी इथे पटकन रुळणार कशी?
प्रत्येक शहरात प्लस मायनस असतातच, कुठेही जा.
इथे रहायचे तर इथले प्लस आणि मायनस दोन्ही ओळखून नोंद करायची मनाशी पण म्हणून निगेटिव्ह पॉईंटसमुळे रडत नाही बसायचे. सोल्युशन काय आहे ते शोधायचे नाहीतर त्या गोष्टीला पर्याय तरी शोधायचे. इथल्या प्लस मायनसची इतर ठिकाणच्या प्लस मायनसशी सतत तुलना करायची नाही. इथल्या अनुभवाला सामोर जायला कोरं करकरीत मन घेऊन जायचं. आधीच फार चांगले किंवा फार वाईट ग्रह/मत करुन इथल्या गोष्टींकडे बघायचे नाही.
इथेही लोकं पिढ्यानपिढ्या रहात आहेतच की. अगदी आम्ही जसे जन्मगावाबद्दल नॉस्टाल्जीक होऊ तसेच इथलेही होत असणार इथल्या गोष्टींबद्दल. याचा अर्थ वाळवंटात नाही येऊन पडलोय आपण.
हम्म! आता तिथे माझा गोतावळा होता. म्हणजे अजूनही आहे) रस्त्यात दर पाच पावलावर कोणीतरी ओळखीची लांबून का होईना हात करुन जायची, काय कसं काय म्हणून खुणेनेच चौकशी व्हायची घाईत असलो तरी. पण तिथे असा गोतावळा तयार व्हायला ४० वर्ष लागल्येत. इथे मी एक दिड वर्षात मैत्रिणी बनायची अपेक्षा ठेवून कसं चालेल? (त्यातलेही बारा महिने लॉकडाऊनचे
)
गमती शोधल्या तर गमतीच दिसत जातात आणि रडायचय अस ठरवलं असेल मनाने तर आजूबाजूला तशीच कारणं सापडत जातात.
एकूण काय तर मी आधीही माझ्या छोट्या शहरात खुश होते आणि आताही इथे खुश आहे. दोन्ही ठिकाणचे प्लस मायनस मला माहिती आहेत आणि माझ्यालेखी ते not a big deal आहेत याच एकमेव कारण मी तुलना न करता दोन्ही जागांना आहे तसं ॲक्सेप्ट केलय. आणि इथल्या कमी अधीकचा विचार करुन मी माझं रुटीन सेट केलय (परत जायची वेळ आली जर बदली वगैरेमुळे तर सुरवातीचा आठ पंधरा दिवसाचा काळ सोडता मी परत जुन्या रुटीनमधे शिरु शकेन असा मला विश्वास आहे)
मस्त पोस्ट कविन.
मस्त पोस्ट कविन.
तांदूळ कुठले घ्यायचे असतात हेही माहिती नव्हतं
ओळखीचं कुणी नव्हतं विचारायला. दुकानात मिळणारे विविध प्रकारचे तांदूळ एकेक किलो आणून बघून शेवटी सोना मसुरी नावाच्या तांदुळावर अनेक वर्षं स्थिरावलो. मग एकदा अचानक शोध लागला की जिरा राईस नावाने मिळणारे तांदूळ आपल्या आंबेमोहोर तांदुळासारखे असतात.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माझंही अगदी असंच मत आहे. (की आपला दृष्टिकोन मोकळा ठेवला की सोपं जातं नवीन ठिकाणी रुळणं)
आम्ही बंगलोरला रहायला आलो तेव्हा नुकतंच लग्न झालं असल्याने जो काही संसार मांडला तो डायरेक्ट इथेच. त्यामुळे कदाचित 'इथे पुण्यासारखं हे मिळत नाही आणि ते मिळत नाही' अशी तक्रार मी केली नाही. कारण एकंदरीत स्वैपाकात सगळा आनंदीआनंद होता.
पुण्यात जशी भेळ, पाणीपुरी, पावभाजी वगैरे कितीतरी ठिकाणी चांगली मिळते तशी इथे अजिबात मिळत नाही. पण मग इथल्यासारखी कुठल्याही कोपऱ्यातल्या हॉटेलमध्ये मिळणारी फिल्टर कॉफी आणि डोसे तरी पुण्यात कुठे मिळतात?
मीनाक्षी, दिल्ली ला
मीनाक्षी, दिल्ली ला महाराष्ट्र मंडळ आहे त्याच्याशीही संपर्क ठेवा. त्यांचे बरेच कार्यक्रम होतात.
https://www.facebook.com/MaharashtraMitraMandalDwarkaNewDelhi
प्रत्येक गावची, शहराची,
प्रत्येक गावची, शहराची, देशाची आपापली वैशिष्ट्ये असतात. ती दुसरीकडे शोधायला जाऊ नये. त्या त्या शहरात जे जे पिकते विकते त्याची आवड लावून घ्यावी. इथे तसं नाही, ते मिळत नाही, त्याची मजा नाही म्हटलं की कुठेच रमता येणार नाही.
मीनाक्षी, माझी मावशी
मीनाक्षी, माझी मावशी दिल्लीच्या एअरफोर्स क्वार्टर्सला राहिली आहे. पण आता फारच वर्षे झाली. तेव्हा तिच्याशी संपर्म्क म्हणजे टपालखाते आणि तिचा पत्ता माहित असल्याने मुंबईहून जाणारे आमचे नातेवाईक तिथे मुक्कामी राहायला गेले तर मिळणारीखबरबात. आमची मावसभावंडं आम्हाला मे महिन्याच्या सुट्टीत ओळखतील का ही भीती. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे त्यामानाने आता इंटरनेटमुळे आपण बरेचसे कनेक्टेड आहोत. माझी मावशी तेव्हा म्हणायची की तिथलं कल्चर (म्हणजे क्वार्टर्समधलं) चांगलं आहे. लोकं खूप सांभाळून घेतात. मावशीला बरेचसे छंद होते त्यामुळे ती सामावून गेली. मी स्वतः तिच्या त्या घरी गेले नाही पण नंतर दुसर्या जागेत बदली होती तिथे एकदा अर्धा उन्हाळा काढलाय मग परत आल्यावर स्वतःच्या घरी कंटाळा आला होता. अर्थात तेच कल्चर कोविद काळात तसं नसेलही पण तुम्हाला थोडीफार चांगली माणसे भेटतील अशा शुभेच्छा. प्रयत्न करत रहा. तुमच्यासारखंच कुणी तिथेही असेल मग एकत्र (किंवा सोशल डिस्टंट) वॉक वगिरे करता येईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुन्हा एकदा शुभेच्छा.
<< Btw आता मला आधीचा प्रतिसाद
<< Btw आता मला आधीचा प्रतिसाद संपादित किंवा delete कसा करता येईल किंवा करता येईल का ? >>
------- चार तास उलटून गेल्यावर लिहीलेला प्रतिसाद ( तो लिहीणार्याला ) बदलता किंवा डिलीट करता येत नाही.
मी पण १८ वयाची लग्न करून
मी पण १८ वयाची लग्न करून हैद्राबादेस आले. तेव्हा अॅडजस्ट व्हायला फार त्रास झाला. बोअर होउन रडू यायचे. पुण्याची आठवण यायची. काय ते भकास बडी चौडी ते विचित्र मराठी बोलणारे लोक. असे वाटायचे. पुढे नोकरी घेतली. मित्रमैत्रेणी झले. वेळ लागतो पण जमते.
@mi_anu , हो नक्की,
@mi_anu , हो नक्की, महाराष्ट्र मंडळाशी contact करेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@वेका... हो, क्वार्टर्स मध्ये खूप छान ओळखी होतात, आणि वेळही जातो , पण इथे आम्ही बाहेर भाड्याने राहतो, क्वार्टर चा नंबर लागायला खूप वेळ आहे अजून त्यामुळे सध्या इथेच मुक्काम. तरीही नवनवीन ओळखी करून घेण्याचे, काही शिकण्याचे प्रयत्न हळूहळू सुरू केले आहेत, लवकरच इथे जम बसेल अशी आशा आहे .
@उदय ... हो, ते लक्षात आले, पण 4 तास उलटून गेले आणि मग , सो आता कोणताच प्रतिसाद नाही उडवू शकणार![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
Anyway,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वांनी आपुलकीनं दिलेल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद
मिनाक्षी, मी गेली १५ वर्ष
मिनाक्षी, मी गेली १५ वर्ष दिल्लीत रहाते आहे. दिल्लीत बरेच मराठी लोक आहेत. मायबोलीकर पण आहेत थोडेफार एन्सीआर मध्ये. काही वर्षांपूर्वी आम्ही ५-६ जण भेटायचो अधून मधून. आता ग्रूपातले २-३ जण उरलेत दिल्लीत. फोनवर संपर्कात असतो आम्ही.
संपर्कातून मेल करा.. बोलू आपण.
पण 4 तास उलटून गेले आणि मग ,
पण 4 तास उलटून गेले आणि मग , सो आता कोणताच प्रतिसाद नाही उडवू शकणार >>> अॅडमिनना विनंती करा. कारण महत्त्वाचे आहे.
@ फारएन्ड, its ok... माझं
@ फारएन्ड, its ok... माझं झालं आहे बोलणं मिस्टरांशी, ते okay म्हणाले आहेत, फारशी माहिती दिलेली नाही
आमच्या दिल्ली स्थित
आमच्या दिल्ली स्थित मित्राकडून मागून घेतलेले फॉरवर्ड:
Whatsapp च्या नवीन Terms & Conditions बघता Telegram join करा
*दिल्ली मराठी प्रतिष्ठान च्या कार्यक्रमात च्या माहिती साठी सगळ्यांना निवेदन आहे की त्यांनी प्रतिष्ठान च्या Telegram Group आणि channel ला subscribe करावे....* धन्यवाद
Telegram group ची link:
https://t.me/joinchat/NOC-EU2Au5FVzeSL6hvXKg
Telegram Channel ची link:
दिल्ली मराठी प्रतिष्ठान च्या उपक्रमांच्या माहिती साठी (Admin Only Mode)
https://t.me/delhimar
दिल्ली मराठी प्रतिष्ठान चे संकेत स्थळ
www.delhimarathi.org
दिल्ली मराठी प्रतिष्ठान चे Facebook पान
www.facebook.com/delhimarathipratishthan
दिल्ली मराठी प्रतिष्ठान चे Twitter Handle
@DelhiMarathi
@DMP_Delhi
करेक्ट 'सी फिव्हर' ही नितांत
करेक्ट 'सी फिव्हर' ही नितांत सुंदर कविता आहे. अजुन एक इथे देते.
"The Roamer" कवितेतल्या पाळीव भटक्या कुत्र्यासारखा - मूर्तिमंत Wanderlust
.........Ahh!! the sweet Wanderlust
The Roamer - Denise Levertov
The world comes back to me
eager and hungry and often
too tired to wag it's tail
a dog with wanderlust
back from South Boston or the Reservoir
Keeps coming back,
brought by triumphant strangers
who don't understand he knows the way well
Faint jingle of collartag breaking
my sleep, he arrives
and patiently scratches himself on the front steps
I let in blue
daybreak
in rushes the world
visible dog concocted
of phatasmagoric atoms
nudges my hand with wet nose
flumps down deeply sighing
smelling of muddy streams, of thrown away treasures
of some exotic news, not blood, not flowers,
and not his own fur -
unable
except by olifact
to tell me anything.
- where have I been
without the world? Why am I glad
he wolfs his food and gathers
strength for the next journey
छान कविता.
छान कविता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवांतर, फारेण्डा, आपल्या ओरिजिनल चर्चेत मला वाटतं तू (आणि असामी) आपापल्या अनुभवांविषयी लिहिणार होता. अजून ते मनांत असेल तर हो जाओ शुरु
@ फारएन्ड, its ok... माझं
@ फारएन्ड, its ok... माझं झालं आहे बोलणं मिस्टरांशी, ते okay म्हणाले आहेत >>> मग नो प्रॉब्लेम
बाकी ज्यांना नोकरीकरता फिरावे लागते तितका शहरे बदलण्याचा अनुभव नाही, आणि जो आहे तो ही बहुतांश ओळखीच्या शहरांतच परत जाण्याचा आहे, पण एक सांगू शकतो की नवीन ठिकाणी पहिले काही दिवस जितके रूळायला अवघड वाटते तितके नंतर वाटत नाही.
वेका - मला अंधुक आठवत होते कोठेतरी असे म्हंटल्याचे
लिहीतो जमेल तसे.
मीनाक्षी, संपर्कातून इमेल
मीनाक्षी, संपर्कातून इमेल करते. बघणार का प्लीज?
Pages