चाळीतील घर लीगल असते का ?

Submitted by lalitshinde on 23 July, 2015 - 20:11

मुम्बई परिसरात चाळीतील घरांच्या अनेक जाहिराती येतात. ही घरे लीगल आहेत व लोनही मिळते असा त्यात उल्लेख असतो.

चाळीतील घरे लीगल असतात का ?

माझ्या एका डॉक्टर मित्राने खूप वर्षांपूर्वी चाळीत दोन घरे घेतली होती. नंतर त्याने त्यावर दोन मजले चढवुन दवाखाना व घर केले.. अर्थात हे बांधकाम लोड बेअरिंगचे म्हणजे मेटलचे खांब व बीम्स या पद्धतीचे असते.

दोन नाही निदान एक तरी मजला नक्की चढवता येतो.

वीस पंचवीस वर्षानी जागेलाही भाव येऊ शकतो.

याबाबतचे अनुभव व माहिती कृपया इथे लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाळ म्हणजे गरीब घुसखोर बेकायदेशीर
फ्लॅट म्हणजे श्रीमंत प्रामाणिक कायदेशीर

ही समजूत चुकीची आहे

चाळीतील घर लीगल असू शकते, व्यक्ती संत असू शकते
आणि बिल्डिंगमधला एखादा पूर्ण फ्लोअर बेकायदेशीर असू शकतो , व्यक्ती लबाड असू शकते , उदा तेंडुलकर , नवनीत राणा प्रकरण

परफेक्ट सल्ला.
तुमची आर्थिक कुवत काय आहे त्या वर अवलंबून.
सामान्य आर्थिक कुवत असेल तर चाळीत रूम घ्या कोणी तरी जमीन चोर तुमचे भले करेल.
चाळीत तुम्ही रूम घेतला तरी तुम्ही मालक नसता जागा दुसऱ्याची असते.
तुम्ही डब्बल करू शकता.
पण बाकी चाळीचे मेंबर आणि आणि मालक हे एकत्र आले की तुमची खोली पडली जावून नियमानुसार रूम मिळते.तुम्ही काही ही करू शकत नाही.
त्या पेक्षा तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर बंगलो प्लॉट घ्य .त्याचे तुम्ही पूर्ण मालक असता काही ही करू शकता.

चाळीतील जागा काही ठिकाणी सातबारा करून मिळतो

काही ठिकाणी सातबारा मिळत नाही , पण इतर कागद करपावती , लाईटबील ठेवावे , तसेच जमिनीचा मालकही तसा स्टॅम्प करून देतो , भविष्यात मालक परत तिथे शेतजमीन करून झाड थोडेच लावणार असतो, !! त्यामुळे काहीही इतर विकास झाला तर आपला हक्क राहतोच.

१) भाडेपावतीवर राहणारा चाळीतला रहिवासी अधिकृतच असतो.

आणि मुख्य फायदा म्हणजे
२) मुंबईत भाडे वाढवता येत नाही. बरेच नेते मोठ्या घरांत( दीड दोन हजार फुट जागा) राहतात, भाडे १९४० सालचे ५०-६० रु.( वॉरटाइम acquisition act मध्ये ब्रिटिशांनी ट्रक्स आणि जागा ताब्यात घेतल्या होत्या तो.)
३) रहिवाशास धंध्यात तोटा झाल्यास राहाती जागा भाडेकरू म्हणून ताब्यात राहाते पण ती कर्जवसुलीसाठी जप्त ( attach)करता येत नाही.

Pages