इपुस्तके वाचण्यासाठी किंडल की आयपॅड घ्यावे?

Submitted by अश्विनीमामी on 23 July, 2015 - 06:21

संप्रति भारत देशात इ पुस्तकांचा चांगला पर्याय उपलब्ध जाहला आहे. ह्यात पुस्तके वाचून झाल्यावर
नीट ठेवायची किंवा आपल्या माघारी कोणाला तरी ती विल्हेवाट लावायला उद्युक्त करायचे अश्या जबाबदार्‍या नाहीत.

तसेच हव्या त्या मोठ्या आकाराची अक्षरे/ वाक्ये करता येतात. हे हार्ड कॉपीत करता येत नाही. इ पुस्तकसंवाद स्वरूपात ऐकता ही येते.

कागद व पर्यायाने झाडांची नासाडी ही नाही.

इतके फायदे असल्याने किंडल नावाची इ पाटी घ्यावी का? किंमत १२००० रु. आहे व इतर उपयुक्त वस्तु जसे दिवा, वेष्टन इत्यादि अजून काही हजारात आहे. पण हा खर्च केल्यावर हवी ती पुस्तके मनात येइल तेव्हा उतरवून घेता येतात. इ पुस्तके तुलनेने फारच स्वस्त आहेत. उदा. एका इंग्रजी लेखकाचे साहित्य इ पुस्तक१८९ रु. व कागदी आवृत्ती ४००० रु च्या पुढे आहे. ते ही बारीक आकाराचे लेखन. ( वाचायला त्रास होतो) .

ह्याला पर्याय फ्लिपकार्ट अ‍ॅप हे आय पॅड वर उतरवून घेतले आहे. परंतु काही ई पुस्तके अमेझॉनवरच उपलब्ध आहेत. ती वाचायची असल्यास किंडल घ्यायचा खर्च करावा का? आपला काय अनुभव आहे?
मराठी इ पुस्तके मासिके वगैरे किंडल वर उपलब्ध आहेत का? किंडल वर अजून काय काय करता येते?
म्हणजे पैसे वसूल होतील ? - गाणी पॉडकास्ट उपलब्ध असतील का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योकु +१.. खूप प्रचंड साठा नाहीये पण १.५$ ला बरीच मराठी पुस्तकं दिसली. पर्व, मृत्युंजय, श्रीमान योगी वगैरे ऐतिहासिक कादंबर्‍या.. वपुंची,दमांची पुस्तकं दिसली. जरा कलेक्शन वाढलेले आवडेल बघायला पण सुरवात तर झाली.

हाय परवा घर बदलले तेव्हा किंडल सापडले. चार दिवस चार पुस्तके वाचे परेन्त उत्साह होता. हळू हळू गुगल प्ले स्टोअर वर इ बुक्स व ऑडिओ बुक्स घेणे सो पे पडू लागले. मध्ये डोळ्याचा त्रास होता मग मेन भार ऑडिओ बुक्स वर होता. इ बुक्स पण फोन वरच. कँटिन मध्ये जेवताना सोपे पडते वाचायला. आता सर्व फोन वरच संगीत पुस्तके व ऑडिओ बुक्स. टीव्ही पण धूळ खात पडून आहे. फोन वर सुभा ऐकला तरी बास होते. किंडलचा कोस्टर होईल काही दिवसां नी

किंडल पेपर व्हाइट घ्या. मी गेले २ वर्ष वापरतोय, छान आटोपशीर साइजचे आहे. वजनाला एकदम हलके आणि बरेच चांगले फीचरस छान आहेत, जसे शब्दार्थ, फाँट साइज. मला सगळ्यात आवडतो तो फीचर म्हणजे dictionary आणि highlight. एखादे वाक्य आवडले तर मस्त मार्क करून ठेवता येते. तसे अंधारातहि वाचायला चांगले. डोळ्यावर ताण येत नाही ... अमेझॉन वर बरीच फ्री पुस्तके पण आहेत ...
एकंदरीत काय तर किंडल पेपर व्हाइट एकदम झकास

मी वाचन करण्यासाठी मोबाईल वापरतो.

मोठी सचित्र (आकृत्या इ.) पुस्तके वाचायची असतील उदा. अभ्यासाच्या पीडीएफ फाईल्स, तर स्क्रीन कास्ट करून एका टीव्हीवर वा काँप्युटर स्क्रीनवर.

फक्त पुस्तके वाचण्यासाठी वेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेऊन ते सगळीकडे कॅरी करण्यापेक्षा, मग सरळ हार्ड कॉपी परवडते. प्रवासात वाचन करताना हातातला मोबाईल सोपा पडतो. अन टॅब्/आयपॅड पेक्षा लॅपटॉप कॅरी करणे मला गरजेचे असते, कारण विविध ठिकाणी प्रेझेंटेशन्ससाठी प्रत्येक जुन्या/नव्या प्रोजेक्टरला लॅपी जोडणे सोपे असते.

टवणेसर, फोनवरून घेता येत नाहीत पुस्तके आता. पूर्वी व्हायचे बहुधा.
मला किंडलवर वाचायला खूप सोपे व डोळ्यांच्या दृष्टीने( Proud ) कम्पॅरिटिवली इझी वाटते. फोनचा ब्लू लाईट सतत नाही बघवत. अंधार असेल तर किंडलवर वाचता येत नाही. (हा प्लस पॉईंट वाटतो).. शिवाय ईरीडरवर फक्त पुस्तके असल्याने खरोखर वाचन होते. डीस्ट्रॅक्शन कमी होते.
भुत्याभाऊ +१. लगेच अडलेल्या शब्दांचे अर्थ पाहता येणे फार आवडते. शिवाय हायलाईट केलेल्या नोट्स सगळ्या इमेलमध्ये वगैरे एक्स्पोर्ट करता येतात. हे स्मार्टफोनच्या किंडल अ‍ॅपला पण होते.

माझ्याकडे सर्वात बेसिक मॉडेल, किंडल टच ८थ जनरेशन आहे. दोन वर्षापूर्वी ब्लॅक्फ्रायडेला घेतला होता..

किंडलवर वाचायला खूप सोपे व डोळ्यांच्या दृष्टीने( Proud ) कम्पॅरिटिवली इझी वाटते. फोनचा ब्लू लाईट सतत नाही बघवत. अंधार असेल तर किंडलवर वाचता येत नाही. (हा प्लस पॉईंट वाटतो).. शिवाय ईरीडरवर फक्त पुस्तके असल्याने खरोखर वाचन होते. डीस्ट्रॅक्शन कमी होते. >>>>>+1

शिवाय मोबाईल ची बॅटरी FB आणि WA साठी टिकते Proud

हार्डकॉपी वाचायला मला पण आवडते पण काही पुस्तके फार जाडी जाडी असतात, हँडबॅग मध्ये मावायला त्रास होतो

Saying that,
किंडल घेतल्यावर अपेक्षेप्रमाणे वाचन झाले नाही Sad
ऍमेझॉन वाले हलकट आहेत, किंडल अनलिमिटेड ची मेम्बर्शीप संपली म्हणून रेन्यू करायला गेलो, अनलिमिटेड स्कीम ला डझन डझन फुकट पुस्तके दिसत होती,
मेम्बर्शीप रिन्यू केल्या क्षणापासून सगळी गायब Sad

तसे अंधारातहि वाचायला चांगले. डोळ्यावर ताण येत नाही>>>
माझा अनुभव चांगला नाहीये, अंधारात वाचण्याचा, थोड्या वेळाने डोळे जड होतात आणि दुसर्‍या दिवशीही डोळे जड वाटतात.
अंधारात : brightness level : 6, 7
वाचनाचा वेळ : ०.5 to 1.5 hours
बहुतेक सेल्फ इलुमिनिटेड डिवाइसेस अंधारात वाचुच नयेत अस असावं.
तुम्ही वाचाताना काय सेटिंग ठेवता?

मी आयपॅड वापरतो. किंडल मी वापरले नाही. मी आयपॅड सुचवेन किंडलपेक्षा. कारण आयपॅडवर किंडल डालो केले की किंडलवरील सर्व पुस्तके आयपॅडवर उपलब्ध होतात. या शिवाय ॲप्पलच्या बुक स्टोअरवर जितके कलेक्शन आहे तेवढे मी कुठेच पाहीले नाही. तेही अगदी फ्री. आयपॅडच घ्या.

Bright नेस लेवल अगदी 2 3 वर असते अंधारात वाचताना.

शाली, त्यांचा प्रॉब्लेम सुटलाय, त्यांनी किंडल घेऊन, ते वापरले न गेल्या बद्दल खंतपन व्यक्त करून झाली Wink

नवीन चर्चा वाचतोय..
त्यांचा प्रॉब्लेम सुटलाय, त्यांनी किंडल घेऊन, ते वापरले न गेल्या बद्दल खंतपन व्यक्त करून झाली >>>सिम्बा, चर्चा होत राहू दे तरीही. माझ्यासारख्या 'टू बी ऑर नॉट टू बी' च्या द्वंद्वात अडकलेल्यांना मार्गदर्शन होत राहिल. Happy

अ‍ॅमेझॉनवर नसलेल्या मराठी प्रकाशकांची ईबुक्स जी त्यांच्या त्यांच्या साईटवर किंवा बुकगंगावर असतात ती किंडलवर सुखद पणे वाचता येतात का?

माझ्याकडे किंडल पेपर्व्हाईट आहे आणि एक मायक्रोमॅक्सचा अवघ्या २७०० रू. ला घेतलेला टॅबदेखिल. टॅबला आता ३ वर्‍षे पूर्ण झालीयेत. प्रचंड फायदा झालाय मला त्याचा. खूप वाचून झालं. त्यामानाने किंडल पडून राहते. किंडल पुस्तकांच्या फॉरमॅटपेक्षा गुगल प्लेबुक्सवरील फॉरमॅट अधिक सुबक आहे.

अ‍ॅमेझॉनवर नसलेल्या मराठी प्रकाशकांची ईबुक्स जी त्यांच्या त्यांच्या साईटवर किंवा बुकगंगावर असतात ती किंडलवर सुखद पणे वाचता येतात का? >>>

याच धाग्यावरची मागच्या पानावरची शेवटची पोस्ट वाचा बरं

>>त्यांनी किंडल घेऊन, ते वापरले न गेल्या बद्दल खंतपन व्यक्त करून झाली<<

किंडलची युटिलिटी अत्यंत मर्यादित असल्याने हे होणं साहजीकच आहे. शिवाय किंडलचा ठोस असा रोडमॅप नसल्याने एक प्रॉडक्ट म्हणुन ते इवॉल्व झालेच नाहि. किंमत अतिशय कमी असली तरिहि भारंभार गॅजेट्स न जमवण्याकडे बर्‍याच लोकांचा कल असतो. अ‍ॅपल्/अँड्रॉय्ड बेस्ड टॅबलेट्स याबाबतीत बेटर वॅल्यु फॉर मनी आहेत. आय्पाड सारखीच किंडलची सुरुवातीला जरा हवा होती, पण आता आय्पाड प्रमाणेच ते फेजआउट होण्याच्या मार्गावर आहे...

हे सगळे ठरते तुमच्या गरजे नुसार. जर घरी टॅब्लेट इत्यादी प्रकार नसतील तर ते घ्यावेत (म्हणजे नाल्यासाठी घोडा प्रकार नाही.. पण युटिलिटी टॅब्लेटची जास्त आहे म्हणून) व त्यावर किंडल अ‍ॅप डालो करून घ्यावे. इबुक हा प्रकार मुळात वाचवला जातोय का आपल्याकडून हे तपासावे. हे जमत असेल व वाचताना डिस्ट्रॅक्शन होत असेल/ लाईटचा त्रास होत असेल/ टॅब्लेट-फोनची बॅटरी वाचवायचे असेल/ जड आयपॅड हातात धरून हात अवघडणे होत असेल तर किंडल ईरीडर घ्यावा.

मला किंडल फेज आउट होईल असे वाटत नाही. नुकताच वॉटरप्रुफ किंडल रिलिज झालाय. एक वर्ग असतो जो अमेझॉन इकोसिस्टिममध्ये कम्फर्टेबल असतो किंवा वाचण्यासाठी स्ट्रिक्टली इरीडरच प्रीफर करतो - असा वर्ग बराच मोठा आहे.

बस्के, बेस्ट पर्याय. नॉर्मली स्मार्ट्फोन सगळ्यांकडे आहेच सो आधी किंडल अ‍ॅप डालो करून काही फ्री पुस्तकं वाचून आजमावून पाहाणे हा सुपर पर्याय आहे. नंतर किती वेळ देताय वाचनाकरता (स्पे. ई-रिडींग ला) ते पाहून पुढे किंडल डिवाईस घ्यायचं का नाही हे ठरवता येईल

@सिम्बा - तुमची मेम्बरशिप चालू केलीत कि ती पुस्तके तुम्हाला परत डाउनलोड करावी लागतात. मेम्बरशिप संपली कि पुस्तके आपोआप किंडल वरून डिलीट होतात. पण वाचनाची खरंच आवड असेल तर मेम्बरशिप नक्कीच फायद्याची आहे. आमच्याकडे सगळेच वाचतात म्हणजे एकावेळी निदान ४-५ पुस्तकंचे वाचन सुरु असते, ती सगळी पुस्तके विकत घेण्यापेक्षा मेम्बरशिप परवडते.

मी इथे जास्तच वेळा लिहीतीय! Lol झालेय असे, की सध्या मी फार प्रेमात आहे किंडलच्या. भरपूर वाचन होत आहे जे गेल्या १० वर्षात झाले नाही! जड पुस्तकं व त्यांचा साईझ पाहून दडपण यायचे ते येत नाही. भरपूर फिक्शन, नॉन फिक्शन, मराठी, अभ्यासाची पुस्तकं असं सगळं वाचन होत आहे. त्यामुळे मी रिवॉर्ड म्हणून एक छान कव्हर घेतले किंडलसाठी. इतकी सुंदर केस आहे! फोटो शेअर केल्यावाचून राहवत नाही..

image1.jpegimage2.jpeg

आणि काही मराठी पुस्तक घेतली विकत परवा. त्यातील एक हे- चौघीजणी. $१.५ ला.

IMG_1538.JPGIMG_1539.JPG

उनाडटप्पू>>>>
हो पुस्तके डिलीट होतात हे माहीत आहे,

मी म्हणत होतो,
मेम्बर्शीप घ्या सांगताना , कोणती पुस्तके अव्हेलेबल आहेत दाखवतात, त्यालिस्ट मध्ये 99% पुस्तके फ्री म्हणून दाखवत होते,
मेम्बर झाल्यावर जे सर्च रिझल्ट येतात त्यात फ्री पुस्तकांचे प्रमाण कमी आहे.

मेनली मला ही मेम्बर्शीप लहान मुलांच्या पुस्तकासाठी सोयीची पडते,
छोटी छोटी पुस्तके 1 2 वेळ वाचली की इंटरेस्ट संपतो, ती किंडल app वर टॅब वर वाचायची (कारण टॅब वर रंग दिसतात, किंडल वर bw दिसते)

मी सुरुवातिला असुस टॅब वर मुन रिडर वर बरिचशी पुस्तकं वाचली, त्यातल एक बेस्ट फिचर म्हणजे पान उलटतानाचं अनिमेशन, फॉन्टसचे भर्पुर ऑप्शन्स, शिवाय पेज कलर बदलता येतो (मला आवडला होता तो फिकट पिवळसर, विंटेज लुक वाला), सगळ्यात बेस्ट रात्रिच्या वाचनासाठी रिवर्स मोड आहे (काळ्या पानावर पांढरी अक्षरे), ह्यात ब्राइटनेस कमी करुन खुप वेळ वाचता येत असे.

पैसे नक्की कुठे घालववावेत , ते कळत नाहीए.
<<

व्यनितून अकाउंट नंबर कळवतो आहे. कोणत्याही प्रकारची मनी ट्रान्सफर स्वीकारली जाईल. Happy

किंडल फक्त आणि फक्त पुस्तक वाचण्यासाठी आहे. यात बाकी दुसरा काहीही नाही. एकाग्र होऊन पुस्तक वाचता येते. नोटिफिकेशन वगैरे ने लक्ष विचलित होत नाही . बाकी डोळ्यांसाठी चांगला आहेच. बॅटरी बराच वेळ टिकते. मला व्यक्तिगत लगेच पुस्तक वाचता येणे हा फार मोठा फायदा वाटतो. पुस्तकांच्या किमती देखील कमी आहेत (छापील पेक्षा)

बाकी LCD स्क्रीन वर पुस्तक वाचणे हा डोळ्यांवर अत्याचार आहे.

Pages