संप्रति भारत देशात इ पुस्तकांचा चांगला पर्याय उपलब्ध जाहला आहे. ह्यात पुस्तके वाचून झाल्यावर
नीट ठेवायची किंवा आपल्या माघारी कोणाला तरी ती विल्हेवाट लावायला उद्युक्त करायचे अश्या जबाबदार्या नाहीत.
तसेच हव्या त्या मोठ्या आकाराची अक्षरे/ वाक्ये करता येतात. हे हार्ड कॉपीत करता येत नाही. इ पुस्तकसंवाद स्वरूपात ऐकता ही येते.
कागद व पर्यायाने झाडांची नासाडी ही नाही.
इतके फायदे असल्याने किंडल नावाची इ पाटी घ्यावी का? किंमत १२००० रु. आहे व इतर उपयुक्त वस्तु जसे दिवा, वेष्टन इत्यादि अजून काही हजारात आहे. पण हा खर्च केल्यावर हवी ती पुस्तके मनात येइल तेव्हा उतरवून घेता येतात. इ पुस्तके तुलनेने फारच स्वस्त आहेत. उदा. एका इंग्रजी लेखकाचे साहित्य इ पुस्तक१८९ रु. व कागदी आवृत्ती ४००० रु च्या पुढे आहे. ते ही बारीक आकाराचे लेखन. ( वाचायला त्रास होतो) .
ह्याला पर्याय फ्लिपकार्ट अॅप हे आय पॅड वर उतरवून घेतले आहे. परंतु काही ई पुस्तके अमेझॉनवरच उपलब्ध आहेत. ती वाचायची असल्यास किंडल घ्यायचा खर्च करावा का? आपला काय अनुभव आहे?
मराठी इ पुस्तके मासिके वगैरे किंडल वर उपलब्ध आहेत का? किंडल वर अजून काय काय करता येते?
म्हणजे पैसे वसूल होतील ? - गाणी पॉडकास्ट उपलब्ध असतील का?
>फॅब्लेट टाईपचे ५-६ इन्च
>फॅब्लेट टाईपचे ५-६ इन्च स्क्रीन साईजचे अँड्रॉईड फोन पुस्तकं वाचायला छान, असे माझे वै.म.
+१
उगाच कशाला जास्त खर्च करता आयपॅड्/किंडल वर? अँड्रॉईड्वर किंडल अॅप आहे. मी वापरतो. मस्त चालते.
फ्लिपकार्टावर वगैरे मस्त स्वस्त ५.५ इन्च फोन आहेत, त्यातला घेऊ शकता...
चांगली माहिती संकलित होतेय.
चांगली माहिती संकलित होतेय. वाचतेय.
५. पुस्तकातली चित्रं वगैरे हार्डकॉपी सारखीच दिसतात का ?
paper white वर नीट दिसत नाहीत. कलर वर दिसतात पण वाचनाचा फिल येत नाही.
वाचनासाठी किंडल तर फोटो बघायला आयपॅड वापरवा. >>> हे वाचून थोडी गोंधळात पडले. मुळात किंडलवर पुस्तक हातात घेऊन वाचतो तसं मुखपृष्ठावरच्या चित्रापासून वाचायला सुरुवात होते का ? आणि शेवटच्या ब्लर्बवर संपते का ? ( पानं उलटण्याची क्रिया असते हे पाहिले आहे कुठेतरी ). पुस्तक म्हणजे नुसतेच शब्द / टेक्स्ट नव्हे तर रेखाटनं, कृष्ण-धवल किंवा रंगीत चित्रं, फोटो ह्या सर्वांतून वाचन घडत असते. सगळ्या पुस्तकांत चित्रं असतात असं नाही पण उदा. काल किंडलसाठी 'द लिटील प्रिंन्स' ची आवृत्ती पाहिली नेटवर. त्यात जर रेखाटनं दिसली नाहीत तर वाचनाचा अनुभव अपूर्ण राहील.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=eQvT56SyZKY
इथे किंडल व्हाईटपेपरचा छान रिव्ह्यू आहे.
मी सध्या ओव्हरड्राइव्ह हे
मी सध्या ओव्हरड्राइव्ह हे अॅप वापरते आहे. आमच्या इथल्या लायब्ररीला हे कनेक्ट करता येते आणि पाहिजे ती ई पुस्तके घेउन वाचुन परत करता येतात. मला आवडले खुप.
इथे बरीच जणं म्हणतायत की
इथे बरीच जणं म्हणतायत की आयपॅडवर किंडल अॅप आहे. कोणी इथे फोटो काढून टाकू शकेल कां त्या अॅपचा, मला दिसत नाहीये कारण अॅप स्टोअरवर असं काही.
आऊटडोअर्से - इथे ही क्लिप बघ
आऊटडोअर्से - इथे ही क्लिप बघ किंडल अॅप ची.
https://www.youtube.com/watch?v=n3R5qBjOvkA
आणि हा आयकॉनः (लहानपणी पुस्तके वाचताना अगदी हिच पोज आणि असेच एखादे झाड असायचे)
छान विषय आणि मला नवीन महिती
छान विषय आणि मला नवीन महिती वाचायला मिळाली....
<<कागद व पर्यायाने झाडांची नासाडी ही नाही. >>
---- नासाडी नाही होते असे म्हणता येत नाही... फायदे तसेच तोटे दोन्ही आहे. पुस्तक तयार करण्यासाठी एकवेळाच कच्चा माल लागेल (झाड, लाकुड, केमिकल्स), एक वेळा पुस्तक तयार झाल्यावर त्या पुस्तकाचा वापर तुम्ही (किव्वा इतर) २०० वेळा करु शकता.
हेच पुस्तक (२०० वेळा ) वाचायला आय-पॅड ला सतत पावर लागणार... विज काही मोफत मिळणार नाही. कुठल्याही प्रकारची विज तयार होते तेव्हा पर्यावर्णाला क्षती पोहोचतेच. आय-पॅड तयार होतानाच्या प्रत्येक टप्यात (metal mining, extraction, processing, actual production) आपण पर्यावर्णाला मोठी हानी पोहोचवलीच आहे.
माझ्यासाठी दोन्ही प्रकारात आपण पर्यावर्णाला काही प्रमाणात हानी पोहोचवतो...
Kobo Books For android
Kobo Books
For android user.
सगळ्यात मस्त अॅप पुस्तक वाचण्यासाठी. (स्वानुभव)
मलापण घ्यायचाय किंडल. पण
मलापण घ्यायचाय किंडल. पण किंमत कमी होण्याची वाट पाहतेय.
माझे 'एनिथिंग कॅन हॅपन' जॉर्ज आणी हेलेन पापाश्विली चे घोडे विषय पुस्तकांचा आहे म्हणून परत पुढे दामटते:
माझ्यासाठी हे पुस्तक कोणी अमेरिकेत ऑर्डर करेल का?
किंमत साधारण ११ डॉलर दिसते आहे.
http://www.bonanza.com/listings/vintage-1945-anything-can-happen-george-...
भारतात शिप करत नाहीत म्हणे.
अमॅझॉन वर आहे पण त्याचा व्ह् एक्स्पांड केल्यावर फ्रेंच भाषेतले पुस्तक दिसते.
माझ्याकडे ह्या चित्राचं एकही
माझ्याकडे ह्या चित्राचं एकही अॅप दिसेना
आमच्या देशात नसावं काय?
चांगला धागा. बरीच माहिती
चांगला धागा. बरीच माहिती मिळाली. सध्या तरी लॅपटॉपवर फ्री अॅप्स वापरुन लायब्ररीची पुस्तके, मासिके वाचणे/ ऐकणे चालते. अॅमेझॉनवरची फ्री बुक्सही डाऊनलोडकरुन वाचता येतात.
आयपॅड ऑलरेडी असेल घरात तर आणि
आयपॅड ऑलरेडी असेल घरात तर आणि घरीच वाचन करायचे असेल तर किंडल अॅप वापरावे.
प्रवासात वाचायला किंडल मस्त. एकदम हलके आणि छोटे.
मराठी पुस्तके किंडलवर वाचता येतात हे माहित नव्हते. कुठून घ्यायची? कशी डाउन्लोड करायची?
अगो, किंडल वायफायने घरच्या नेटवर्कला जोडता येते आणि त्यातून इंटरनेट. त्यातून अॅमझॉनच्या दुकानात जाऊन पुस्तके घेणे. मुखपृष्टापासून शेवटच्या पानापर्यंत सगळी पाने असतात. आणि पान उलटायचे एक (रादर चार) बटण(बटणे). चित्रे असतात. माझ्या कृध किंडलात एव्हढी बरी दिसत नाहीत. पण रंगीत किंडलवरची सुंदर दिसतात चित्रे.
आडो तू कोणत्या देशात आहेस? (मिडल ऑफ नोव्हेअर की काय, आउटडोअर्स म्हणजे ;-))
माझी मुलगी पण ओवरड्राइअव अॅप
माझी मुलगी पण ओवरड्राइअव अॅप वापरते. वरती पेरुने सांगितलं आहे ते.
मी ही वापरते ओव्हरड्राईव्ह
मी ही वापरते ओव्हरड्राईव्ह अॅप.
माझ्याकडेही आहे ओवरड्राइव
माझ्याकडेही आहे ओवरड्राइव अॅप लायब्ररीच्या पुस्तकांसाठी आणि मॅगझिन्स साठी नुक अॅप.
विंडोजवरचे अॅमझॅान किंडल
विंडोजवरचे अॅमझॅान किंडल फ्री अॅप ,४एमबी इथे
किन्डल पेप्परव्हाइट
किन्डल पेप्परव्हाइट एक्स्क्लुजिवली अमेझॉनवरच आहे का? फ्लिपकार्टवर दिसत नाहीय.
१२ आणि १४ हजार अशी किंमत आहे. मागे मी सहा हजार बघीतल्याची आठवतेय ती सेल मधे असावी बहुतेक.
युप शर्मिला. किंडल बहुतेक
युप शर्मिला. किंडल बहुतेक अमेझॉनवरच असेल.
फार खर्चात नसेल पडायचं तर बेसिक किंड्ल घेणे कधीही श्रेयस्कर
मृदुला, युएई ला आहे मी.
मृदुला, युएई ला आहे मी.
किंडल पेपर व्हाइट घेतले. छान
किंडल पेपर व्हाइट घेतले. छान आटोपशीर साइजचे आहे. आय पॅड सारखा झगमगाट नाही पण
वजनही कमी आहे. दोन पुस्तके वाचून झाली. फीचरस छान आहेत . जसे शब्दार्थ, फाँट साइज
वर्थ ओनिंग. दहा मिनिटे माबो सर्फ करून मग निवांत किंडल वर पुस्तक वाचावे असे चालू आहे.
प्रतिसाद फ्री लाइफ.
asus च्या टॅब मध्ये किंडल च
asus च्या टॅब मध्ये किंडल च सॉफ्ट्वेअर मिळालं होतं, एक्दम भिकार आहे ते खुपच स्लो. त्यापेक्षा मून रिडर मला जास्त आवडलं. मला तरी किंडल पेक्षा टॅब बरा वाटला.
एकदम पैसे अडकवायचे नसतिल तर सध्या (मित्र-मैत्रिनिकडुन उसन्या घेतलेल्या) टॅब वर मून रिडर डालो करुन फिल घेउ शकता, प्रकरण जमेल असं वाटलं तर किंडल किंवा टॅब घेउन टाकायचा.
तुम्ही क्लासिकचे फॅन्स असाल तर प्रोजेक्ट gutenberg वरुन हव्या त्या फॉरमॅटमध्ये बरिच पुस्तके फुकट मिळवता येतिल (समग्र शेरलोक होम्स पण आहे).
आणि हो जाता जाता...फुल ब्राइटनेस मध्ये इबुक्स वाचुन डोळे बरबाद होतात
जर अॅपल आयपॅड असेल तर
जर अॅपल आयपॅड असेल तर त्यामधे पुस्तके डाऊनलोड करून वाचण्यासाठी कोणते अॅप उपयुक्त आहे ?
महेश, फ्लिपकार्ट चे येते एक.
महेश, फ्लिपकार्ट चे येते एक. किंडल हॅज बीन अ ग्रेट व्हॅल्यु अॅडिशन. आता निसर्ग नियमा नुसार लेक
सकाळी घेउन जाते लोकल मध्ये जाता येता वाच ते मी रात्रीतून वाचते खूप सारी फ्री इबूक्स अवेलेबल आहेत. व किंडल इको सिस्टीमच त्यांनी उभारायचा मस्त प्रयत्न केला आहे. ग्राहक म्ह णून माझा ए प्लस.
अमा, फ्लिपकार्टचे इबुक अॅप
अमा, फ्लिपकार्टचे इबुक अॅप आहे, पण किंडल अॅप देखील घेता येत आहेच आयपॅडवर, मग फरक काय दोन्हीत ?
किंडलवर मायबोली वाचता येणार
किंडलवर मायबोली वाचता येणार नाही.>> चुकीची माहिती. किंडल फायरवर मी मायबोली नियमीत वाचते.वाय फाय असल्यामुळे वेबवरून कोणत्याही साईट्वर जाता येत.
सगळी चर्चा वाचली. काल क्रिकेट
सगळी चर्चा वाचली.
काल क्रिकेट मॅच दरम्यान सारखी जाहिरात येत होती, म्हणून सहज पाहिलं तर, amazon.in वर kindle 6" glare-free touchscreen display, wifi रु.४९९९/- ला दिसतंय आता.
Battery lasts weeks, not hours
Over 500,000 eBooks at Rs. 99 or less and over 1.5 million eBooks at Rs. 299 or less
ह्या वरच्या दोन गोष्टी पाहून काही शंका...
मराठी पुस्तकं वाचता येतात का? (पूर्वीच्या प्रतिक्रियांपेक्षा नवीन काही बदल झाले आहेत का?)
वाचनाची आवड असलेल्या एका ज्ये.ना. ना भेट देण्याचा विचार आहे. टेकसॅवी नसले तरी हे ज्ये.ना व्हॉट्स अप छान वापरतात
4 GB; holds thousands of books>> कोणाचा याबाबतीतला अनुभव...
मराठी किंडलबुक्स नाहीत बहुधा.
मराठी किंडलबुक्स नाहीत बहुधा. पिडीएफ करून वाचायला लागतील. ४ जिबीमध्ये खरोखरीच भरमसाठ ई-बुक्स मावतील.
मराठी पुस्तकांसाठी सध्या
मराठी पुस्तकांसाठी सध्या किंडल ची काय परिस्थिती आहे? मराठी पुस्तके किंडल वर डाउनलोड करता येतील का?
मराठी पुस्तकांसाठी सध्या
मराठी पुस्तकांसाठी सध्या किंडल ची काय परिस्थिती आहे? मराठी पुस्तके किंडल वर डाउनलोड करता येतील का?>>
बरिचशी आहेत, अॅमेझॉन वर पाहा, (बहुतेक मेहताने केलेत बरेचसे इबुक्स अवेलेबल)
बरीचशी मराठी पुस्तके किंडल
बरीचशी मराठी पुस्तके किंडल एडीशन म्हणून आहेत अॅमेझॉन वर.
)
अॅमेझॉन वेबसाईट वर (फोन/टॅबलेट अॅप वर बुक्स पर्चेस नाही करता येत) किंडल एडिशन खरीदलं की ते पुस्तक आपोआप किंडल वर येतं (अर्थात किंडल वर त्याच इमेल अॅड्रेस नी लॉग्ड इन असायला हवं ज्यावरून तुम्ही खरेदी केलीय आणि किंडल वायफाय ला कनेक्टेड ही हवं
तुमच्याकडे काही पीडीएफ्स असतील तर ती तुमच्या किंडल ईमेल ला फॉरवर्ड केली की किंडल डिवाईस वर आपोआप येतात.
तुमचा किंडल इमेल अॅड्रेस अॅमेझॉन अकाउंट च्या इन्फो पेज वर असतो; तो आपल्याला हवा तसा एडीट करून घेताही येतो.
Pages