शटर..... ओपन युवर माइंडस नाऊ!! (सिनेरीव्ह्यु)

Submitted by मी मधुरा on 12 July, 2015 - 08:40

‘तीन-तीन सुगरणी आणि स्वयंपाक मात्र आळणी’ , ‘तीन तिगडा, फिर भी काम बिगाडा??’........ Any thing else to say?
सचिन खेडेकर कडून ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘आजचा दिवस माझा’ आणि ‘काकस्पर्श’ या चित्रपटांमुळे वाढलेल्या अपेक्षा घेऊन हा सिनेमा बघायला जाणार असाल तर जाऊ नका.
अमेय (दी.दो.दु मधला कैवल्य) आवडत नसेल तर तिकीट काढण्याकरता बाहेर काढलेलं क्रेडीट कार्ड आत्ताच्या आत्ता पाकिटात ठेवा परत. नाहीतर ‘नावडतीच मीठ आळणी’ अशी गत व्हायची.
सोनाली कुलकर्णी आणि अमेय वाघ यांचा अभिनय बघायचा असेल, तर मात्र नक्की बघा.

सिनेमाची मुख्य कल्पना मात्र छान आहे. माणसाला एक व्यसन किती संकटात टाकू शकत आणि जीवनाच्या अश्या वळणावर आणून सोडत कि पुढच सगळ जीवन अंधारात दिसू लागतं. त्या वळण्याच्या पुढे अंधारात आपण पाय टाकतोय त्याखाली जमीन आहे कि खसकन सरकणारी वाळू, हे माहित नसत. पटकथा साधी, सोप्पी, पण न रुचणारी; तरीसुद्धा त्यात एक element आहे. पण चित्रपटातून जे सांगायचं, ते चित्रपटाची पटकथा, डायलॉगज आणि अभिनेते अभिनयातून आपल्या पर्यंत पूर्णपणे पोचवण्यात अयशस्वी ठरतात.

पण सिनेमाचा मुळ कणा म्हणजे जित्या भाऊ हा पूर्ण सिनेमा दारू पिऊन वावरल्या सारखा वाटतो. पाण्याऐवजी जित्या भाऊ दारूच्या बाटल्या ढोसत असावा कि काय, अस वाटायला लागतं. हि कथा एका सभ्य माणसाची आहे. ज्याला दारू पिण्याची सवय असते. (सगळेच सभ्य दारू पितात असा गैरसमज नसावा. एखादी कथा, ते हि सिनेमाची, अपवाद असू शकतेच.) जित्या भाऊच्या वादग्रस्त असलेल्या बंद दुकानात मित्रांसोबत रात्री बाटली घेऊन बसणाऱ्या जित्या भाऊला त्याच्या मुलगी मात्र कडक शिस्तीत राहावी आणि वाया जाऊ नये म्हणून तिचं लहान वयातच लग्न करायचं ठरवतो. त्याच्या ओळखीच्या रिक्षावाल्याकडून म्हणजे एक्याकडून (अमेय वाघ) दारू मागवून दुकानात अहोरात्र सो कॉल्ड मित्रांसोबत ‘बसण्याचे’ ठरलेले असतानाच सगळा स्टॉक संपल्यामुळे जित्याभाऊ एक्यासोबत बाहेर दुकानात जातो. आणि परत येताना जित्याभाऊच्या जवळून एक सुंदर तरुणी, (घोगऱ्या आवाजाची सोनाली कुलकर्णी) त्याच्याकडे बघत जाते. आणि त्याच्या मनाचा तोल......!!!

एक्या ते ओळखून जित्यासाठी तिला विचारतो आणि दोघांनाही बंद असलेल्या जित्याच्याच घरासमोरील त्याच्याच दुकानात आणून सोडतो. तिच्यासाठी अंडाभुर्जी आणायला जाताना एक्या शटर ओढून त्याला कुलूप लावतो आणि तिथेच चुकतो! पुढे बाकी काही उपकथानक जोडलेली आहेतच. पण त्या प्रत्येक गोष्टींच स्पष्टीकरण देण्यात चित्रपट “माती खातो!!!” (एक्याच्याच भाषेत) !

त्या बंद शटरच्या आतून बाहेरच्या जगाचा खरा चेहरा उघडकीला येताना, बसलेला धक्का, तुटलेल्या संकल्पना हे सगळ अभिनयातून दाखवण्यात सचिन खेडेकर कमी पडले आहेत, असे वाटते.

दारू पिण, मग अगदी ते रिक्षावाल्याने का असेना, मग किती चुकीच आहे, किती वाईट आहे आणि ते तुमच्या सोबत तुमच्या जवळच्या लोकांना सुद्धा किती त्रास देऊ शकत, हे दाखवण, हा चित्रपटाचा हेतू होता. आणि ही गोष्ट मला खूप पटली.

का पाहावा?
- अमेय आणि सोनालीने आपापली कामे मन लाऊन केलेली आहेत.
- मूळ कल्पना छान आहे.

का पाहू नये?

- सचिन खेडेकर यांचे पंखे असाल तर! (उगाच acting impression डाऊन होईल.)
- गाणी श्रवणीय नाहीत. (नंतर तर आठवतही नाहीत.)
- काही प्रश्न (प्रेक्षकांना पडलेले...) अनुत्तरीत राहतात.
- ‘का पाहावे’ या लिस्ट मधलं काहीच पटल नसेल तर!

रेटिंग:
(काय बर द्यावं ? १ ? कि अर्धा ? ओके! अमेय आणि सोनालीसाठी २!)
**

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या चर्चा वाईट किंवा चुकीच्या आहेत असं मला म्हणायचं नाहिये...प्लीज गैरसमज करुन घेउ नये.....
फक्त माझं म्हणण आहे की ही जागा योग्य नाही....कारण ईथे लेखकाने लेख कसा लिहिलाय त्यावर बोल्णं अपेक्षित आहे....( हे मा वै म )
जेव्हा एखादा सदस्य एखादा लेख लिहितो आणि त्याला असं दिसतं की लेखावर नवे प्रतिसाद आलेत तेव्हा खुप अपेक्षेने तो सदस्य बघायला जाईल की बाबा माझ्या लिखाणावर कोणी काय लिहिलय....कोणाची काय काय मते आहेत..आणि प्रतिसाद वाचल्यावर असं कळतं की मूळ लिखाणाबद्दल बोलणं बाजुलाच पडलय...
कोणी ईथे सल्ले देतय...कोणी परस्पर त्यावर उत्तरं देयत....कोणी अजुन काही योग्यच असेल पण चर्चा करयत..अशावेळी मूळ लेखकाचा हिरमोड होत नसेल का ? असा माझा मुद्दा होता....

सर्व चर्चात्मक प्रतिसाद लेखाला अनुसरूनच आहेत, स्मिताजी. जबरदस्तीने कैवार घेऊ नका. आम्ही कुणीही मधुराला खच्ची करायचा विचारही करत नाही आहोत. ह्या चर्चेतून तिला किंवा इतर कुणाला काही शिकवायचाही हेतू नाही. अश्या चर्चेतून स्वत:लाच शिकायला मिळतं, असं मला वाटतं.

लेखाबद्दल चर्चा करताना लेखाची योग्यायोग्यतेबरोबर लेखाच्या प्रकाराची चर्चाही होणारच. लेखकाला त्यातुन बरेच काही शिकायला मिळते आणि इतरांनाही.

आता लेखकाचा हुरुप वाढावा म्हणुन फक्त छान छान, सुंदर एवढेच लिहावे का लेखाखाली? मग मायबोली कशाला हवी त्यासाठी. सरळ आपला ब्लॉग काढावा आणि नातेवाईकांना आमंत्रित करावे वावा छान छान लिहिण्यासाठी.

मायबोलीवर लेखन टाकण्याचा एवढाच मर्यादित हेतू असावा असे मला वाटत नाही. इथे असलेल्या अनुभवी मंडळींच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपला विकास साधावा हे योग्य असे मला वाटते.

मायबोलीवरच्या लेखकांनो -

तुम्ही चित्रपट समीक्षक असा वा नसा पण जर कॅज्युअल का होईना चित्रपट समीक्षण लिहित असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की आवर्जून लेखक पटकथाकार संवादलेखक आणि गीतकार ह्यांचा उल्लेख करा. चित्रपटाची जाहिरात होत असताना लेखक आणि गीतकराचा उल्लेख खूप कमी वेळा होतो. किती वेळा आपल्याला चित्रपटाच्या पोस्टरवर लेखक पटकथाकार संवादलेखक आणि गीतकार ह्यांचा उल्लेख दिसतो हे मुद्दाम पाहा. अनेकदा लेखक पटकथाकार संवादलेखक आणि गीतकार ह्यांना मुद्दाम डावलले जाते. ह्याप्रथेविरुद्ध मालिका चित्रपट आणि नाटकाच्या लेखकांनी आवाज उठवायचे ठरवले आहे. ह्याकरीता त्यांनी मानाचि नावाची संघटना स्थापन केली आहे.

तेव्हा आपण नेट लेखकांनी त्यांना पाठिंबा देऊया. जिथे जमेल तिथे आवर्जून चित्रपटाच्या लेखक पटकथाकार संवादलेखक आणि गीतकार ह्यांचा उल्लेख करूया.

शटर आणि हायवेच्या पोस्टरवर लेखकांचा उल्लेख आहे.

रसप आणि साधना यांच्या मताशी सहमत !

इथे सर्व लेखांचा परीक्षण आणि समीक्षण होते आणि खूप चांगले इन्पुट मिळतात .
घेणारा त्यातून पॉझिटीव्ह घेतो !

मधुरा, धन्यवाद. मी हा सिनेमा नक्की बघणार आहे. मला ह्यात माझा भाऊच दिसला. तो अगदी फक्त आणि फक्त दारुचे व्यसन करुन करुन शेवटी गेला. त्याला स्मरुन आठवून .. तो गेला म्हणून रडून हा सिनेमा बघणार आहे.

तद्दन थर्ड क्लास चित्रपट आहे .

उगाच पैशाचा आणि वेळेचा अपव्यय :रागः

परीक्षण ठीक आहे ..
(घोगऱ्या आवाजाची सोनाली कुलकर्णी) >>> ह्यावर हसु आले , इतक्या वरच्या पीच चा आवाज आहे सोनाली बाईंचा की ऐकवत नाही , त्यांचे तोंड शटर सारखेच बंद ठेवायला हवे होते ! बाई , तुम्ही फक्त नाचा !!

बाकी प्रतिसाद वाचुन मनोरंजन झाले Happy

Pages